मैत्रीण

(25)
  • 68.9k
  • 11
  • 28.6k

मैत्रीची नवी परिभाषा मांडण्याचा बारीकसा प्रयत्न... गोड मानून घ्यावा.....

Full Novel

1

मैत्रीण भाग १

मैत्रिण.... मैत्रिण... बराच दिवस विषय मनात रेंगाळत होता. खुपदा अस वाचनात आलाय की, आयुष्यात एखादी तरी मैत्रीण ही असावीच. आपल्याशी बोलाव,हसावं, उगाच चालावं, आपल्याला समजून घ्यावं. अनेकांची मैत्रिण ही त्यांची बहीण असते. पण तिथेही मर्यादा येतातच की. आता आमचं म्हणाल तर मला ही अस वाटायचं की, आपल्याही आयुष्यात एखादी मुलगी मैत्रिण म्हणून असायला हवी. आता अस म्हणून मी माझ्या मित्रांना कमी लेखत नाही. जिवाभावाचे माझेही काही मित्र आहेत. पण एखादी मुलगी मला आवडली तर हे साले तिच्यावर लाईन मारतात. इतके ते बारा xxx {तीन फुल्यांचे} आहेत. मग अशा ठिकाणी एक मैत्रीण असणं नितांत गरजेचं असतं. माझे काही मित्र असे ...Read More

2

मैत्रीण भाग 2

मैत्रिण... भाग २ मैत्री हे नातं इतकं सुंदर आहे की, आपण त्याला कुठल्याही नात्यात सहज बसवू शकतो. म्हणजे मी फॅमिली आशा पाहिल्या आहेत की, त्याच्यातील वातावरण अगदी फ्रेंडली असत. आई वडील आणि मुले, भाऊ-बहीण, आज्जी- नात, मामा-भाजे, दाजी-मेहुणे, असे कितीतरी नातेसंबंध सांगता येतील की ज्यात प्रेम, आदर या बरोबरच मैत्री हे ही एक नात असत. मैत्रीच्या नात्याला कसलीही अपेक्षा नसते, असत केवळ समर्पण... स्नेहा, नित्या आणि मी आता चांगले मित्र झालो होतो. एकत्र बसने, एकत्र कॉलेज ला येणे, एकत्र टाईमपास क ...Read More

3

मैत्रीण भाग 3

मैत्रीण भाग 3 पाऊस आजही सुरू होता. रिमझिम बरसणारा पाऊस हा सर्वांनाच हवा हवासा वाटणारा असतो. आणि मीही त्याला नाही. त्यामुळे ' अरे... छत्री घेऊन जा..' असे घरातून मतोश्रींचे सांगणे आले तरी त्याकडे दुर्लक्ष करून मी तसाच सरीवर सरी अंगावर घेत कॉलेज ला निघालो. कालच्या प्रश्नांनी डोक्याचा पार भुगा झाला होता. त्यामुळे लेक्चर करण्याची अजिबात इच्छा नव्हती. म्हणून थेट लायब्ररीत जाऊन वाचत बसलो. वाचनात गुंग असतानाच मागून पाठीवर जोराचा धपाटा पडला. तो नित्या होता. माझं लक्ष त्याच्याकडे गेलं मी त्याला काही बोलणार इतक्यात त्यानेच बोलायला सुरुवात केली, "Hi Buddy कसा आहेस आणि कुठे होतास, लेक्चर का नाही आलास. ...Read More

4

मैत्रीण भाग 4

मैत्रीण...भाग 4 स्नेहाचं कॉलेज ला येणं अचानक बंद झाल्यामुळे माझ्या मनात भीतीनं काहूर माजवलं होतं. नित्याही कधी नव्हे तो उत्साह हरवून बसला होता. कॉलेजला येणं मला नकोस झालं होतं. सारखा मनात स्नेहाचा विचार येत होता. तिला अनेक कॉल करून पाहिले परंतु एकाही कॉल ला उत्तर मिळत नव्हतं. मनाशी पक्क ठरवून आम्ही स्नेहाच्या घरी जायचं ठरवलं. रविवारी निवांत वेळ असतो म्हणून आम्ही रविवारची निवड केली. रविवारी सकाळी लवकर जायचं आम्ही ठरवलं. ठरल्या प्रमाणे आम्ही निघालो. नित्या त्याची गाडी घेऊन आला होता. आम्ही निघालो आणि नित्याने प्रश्न विचारला, " आयला, सम्या अस कस डायरेक्ट तिच्या घरी जायचं. आपण कोण... काय काम ...Read More

5

मैत्रीण भाग 5 - अंतिम भाग

मैत्रीण..... शेवटाकडे... आज स्नेहा कॉलेज ला येणार या विचाराने मी आनंदी झालो होतो. सकाळ पासून कॉलेज ला जाण्यासाठी माझी सुरू झाली होती. ती लगबग पाहून आमच्या मातोश्रींनी आम्हाला हटकलच, " काय रे... एवढी काय घाई...? कॉलेजलाच जायचे ना...?" " हो ग आई.... आणखीन कुठे जाणार आहे..?" मी कपाळावर आठ्या आणत विचारलं. " मग घाई कशाला करतोस..?" आईचे प्रश्न संपत नव्हते. तिची बॉलिंग सुरू होती आणि मी कसाबसा खेळत होतो. तिच्या तावडीतून कसातरी सुटलो आणि मी कॉलेज घाटलं. नित्या माझ्या आधीच कॉलेज ला आला होता. आम्ही दोघेही स्नेहाची वाट पाहत होतो. स्नेहा येईल की नाही याची धाकधूक लागली होती. आम्ही ...Read More