कावळे

(27)
  • 57.7k
  • 14
  • 24.4k

मला कावळा लहानपणी फार आवडे. त्याचा तो काळा कुळकुळीत रंग, त्याचा तो मोठा काऽ काऽ आवाज, त्याच्या पंखांचे फडफडणे, त्याच्या वाकुल्या-मला सारे आवडे. आईच्या कडेवर बसून मी त्याला कितीतरी वेळा पाहावयाचा. लहाणपणी, विशेषत: मला, जेवताना आई अंगणात घेऊन यायची. तिच्या हातात घास असायचा व भरवताना ती मला म्हणायची, “हा घे हां, हा काऊचा, हा चिऊचा, तो बघ काऊ. येरे येरे काऊ, माझा बाळ घास खाऊ.” आणि मग घास घ्यायचा. मी राजा. आईच्या कडेवर बसून असा एक एक घास मी खेळत खेळत, चिमण्या-कावळे बघत बघत घ्यायचा. मध्येच कावळा उडून जाई. “गेला काऊ. घे रे एवढा घास, घे हो.” असे आई म्हणायची. आजूबाजूस कावळा दिसल्याशिवाय मी जेवायचा नाही. मी जरा मोठा झाल्यावर त्याला भाकरी फेकायचा व तो धिटुकला ती घ्यायचा. एक दिवस तर मी अंगणात भाकर घेऊन बसलो होतो,

Full Novel

1

कावळे - 1

मला कावळा लहानपणी फार आवडे. त्याचा तो काळा कुळकुळीत रंग, त्याचा तो मोठा काऽ काऽ आवाज, त्याच्या पंखांचे त्याच्या वाकुल्या-मला सारे आवडे. आईच्या कडेवर बसून मी त्याला कितीतरी वेळा पाहावयाचा. लहाणपणी, विशेषत: मला, जेवताना आई अंगणात घेऊन यायची. तिच्या हातात घास असायचा व भरवताना ती मला म्हणायची, “हा घे हां, हा काऊचा, हा चिऊचा, तो बघ काऊ. येरे येरे काऊ, माझा बाळ घास खाऊ.” आणि मग घास घ्यायचा. मी राजा. आईच्या कडेवर बसून असा एक एक घास मी खेळत खेळत, चिमण्या-कावळे बघत बघत घ्यायचा. मध्येच कावळा उडून जाई. “गेला काऊ. घे रे एवढा घास, घे हो.” असे आई म्हणायची. आजूबाजूस कावळा दिसल्याशिवाय मी जेवायचा नाही. मी जरा मोठा झाल्यावर त्याला भाकरी फेकायचा व तो धिटुकला ती घ्यायचा. एक दिवस तर मी अंगणात भाकर घेऊन बसलो होतो, ...Read More

2

कावळे - 2

मी एका शेतात गेलो. दुपारची वेळ होती. मी माझी भाकर घेऊनच शेतात गेलो. मी झाडाखाली भाकर खात बसलो. आधी दिशांना मी भाकरीचे तुकडे फेकले. फेकले नाही, अर्पण केले! आजूबाजूला किड्या-मुंग्या असतील. अदृश्य योनीही असतील त्यांना नको का थोडेसे द्यायला. एकटे खाणे हे पाप. प्राचीन काळापासून वेद ओरडून सांगत आहे. ‘केवलाघो भवती कैवलादि’ –‘जो केवळ एकटयाने खाईल तो पापरूप होईल.’ परंतु आज ऐकतो कोण? कावळे, चिमण्या, किडा-मुंगी, मांजर, कुत्रे यांनाही आपण जेवताना घास देणे हे तर दूरच राहिले परंतु शेजारी भाऊ उपाशी असेल, घरातील गडीमाणसे उपाशी असतील इकडे तरी आपले लक्ष कोठे असते? थोर हिंदी संस्कृतीचे स्वरूप अजून आपल्या गळी उतरतच नाही. आपण सारे उदरंभर. आपलेच पोट भरणारे झालो आहोत. ...Read More

3

कावळे - 3

“आलास का कावळोबा, केव्हापासून मी तुझी वाटच पाहत होतो. आम्हा माणसांबद्दल तुम्हा पशुपक्ष्यांना काय वाटते, ते मला समजून घ्यायचे कावळ्यांची प्रचंड सभा भरवायचे ठरले म्हणून मागच्या वेळी तू सांगितले होतेस.” मी विषयाला एकदम हात घालण्याच्या हेतूने दुस-या दिवशी जेवताना कावळ्याला बोलावून म्हणालो. ...Read More

4

कावळे - 4

अध्यक्ष व इतर पाच असे सहाजण ईश्वराकडे निघाले. शिष्टमंडळात तरुणालाही घेतले. कावळ्यांची व यमाची मैत्री. पितरांच्या मध्यस्थीने, मृतात्म्यांच्या वशिल्याने यमदेवापर्यंत जाऊन पोचले. “आम्हांला त्या राजाधिराजाकडे, जगदीश्वराकडे घेऊन चल.” अशी अध्यक्षांनी यमराजाला विनंती केली व ती त्याने मान्य केली. ...Read More

5

कावळे - 5

यमराज, त्याचा महिष आणि हे कावळ्यांचे शिष्टमंडळ देवलोकात येऊन दाखल झाले. तो त्यांना कोलाहल व आरडाओरडा ऐकू आला. मानवांची गर्दी दिसू लागली. ईश्वराचे दूत त्यांना भराभर खाली लोटत होते. तो पहा एक गयावया करीत आहे. “अहो माझ्या मालकीच्या 30 गिरण्या आहेत. हजारोंना मी पोटास दिले. मला घ्या आत.” ...Read More

6

कावळे - 6

जाता जाता मंडळी आत शिरली. देवाचे अफाट राज्य. तेथे हवा खाऊनच तृप्ती होत होती. तेथे मुंग्या, चिमण्या, मोर, कोकिळा, बैल दिसू लागले, परमेश्वराच्या मांडीवरही ती जाऊन बसत. देव त्यांना कुरवाळी. विचारी, “पुन्हा भूतलावर? माझा मनुष्य बाळ अजून सुधरत नाही. तुमचाच तो भाऊ. तो सुधरेपर्यंत त्याच्या साहाय्याला तुम्ही जायला हवे. तुम्ही जाता का?” ...Read More

7

कावळे - 7

कावळ्याची सारी हकीकत ऐकून मी लज्जित झालो स्तंभित झालो. “सख्या गुरो, हा आणखी तुकडा ने. तूही खा. पाणी मला समाधान होईल. तू मला दिव्य विचार दिलेस. मी कृतज्ञतेने हा तुकडा देतो, घे.” मी म्हणालो. माझ्या आग्रहास्तव त्याने तुकडा खाल्ला. तो पाणी प्याला. मी त्याला वंदन केले. गेला. कावळा उडला. ...Read More