मुक्त व्हायचंय मला

(44)
  • 39.8k
  • 0
  • 25.9k

“ मुक्त व्हायचय मला ’’ भाग १‘हॅलो......’ सरीताचा आवाज ऐकताच तिची आई म्हणाली, ‘"सरिता तुला वेळ आहे का?"कशासाठी?" सरीतानी आईला प्रतिप्रश्न केला. "तुझ्याशी बोलायचं’’ आई“तुला माझ्याशी बोलायचय?” सरिताच्या आवाजात आश्चर्य होत.“ हो” आई म्हणाली. “तुझ्याशी आणि माधवशी दोघांशी बोलायचं आहे.”आई“बापरे!....दोघांशी बोलायचंय. आई काही गंभीर आहे का?” “ते भेटल्यावर कळेल” “ बरं मी घरी येते.” “घरी नको..आपण बाहेर भेटू.”“का?” आईच्या बोलण्यानी सरीता गोंधळली. तेवढ्यात आई म्हणाली, “आपल्या घराजवळच्या कॉफी हाउसमध्ये भेटू.चल ठेवते.”आईनी फोन ठेवल्यावर सरीता विचार करू लागली की आईला काय बोलायचं असेल? कारण,एवढ्या आयुष्यात तिला कधीच बोलतांना पाहिलं नाही, बोलायचे फक्त बाबा ....विचार करून डोकं दुखायला लागल्यावर तिने नाद सोडला आणि माधवला फोन लावला.

1

मुक्त व्हायचंय मला - भाग १

“ मुक्त व्हायचय मला ’’ भाग १‘हॅलो......’ सरीताचा आवाज ऐकताच तिची आई म्हणाली,‘"सरिता तुला वेळ आहे का?""कशासाठी?"सरीतानी आईला प्रतिप्रश्न बोलायचं’’ आई“तुला माझ्याशी बोलायचय?”सरिताच्या आवाजात आश्चर्य होत.“ हो” आई म्हणाली.“तुझ्याशी आणि माधवशी दोघांशी बोलायचं आहे.”आई“बापरे!....दोघांशी बोलायचंय. आई काही गंभीर आहे का?”“ते भेटल्यावर कळेल”“ बरं मी घरी येते.”“घरी नको..आपण बाहेर भेटू.”“का?” आईच्या बोलण्यानी सरीता गोंधळली. तेवढ्यात आई म्हणाली,“आपल्या घराजवळच्या कॉफी हाउसमध्ये भेटू.चल ठेवते.”आईनी फोन ठेवल्यावर सरीता विचार करू लागली की आईला काय बोलायचं असेल? कारण,एवढ्या आयुष्यात तिला कधीच बोलतांना पाहिलं नाही, बोलायचे फक्त बाबा ....विचार करून डोकं दुखायला लागल्यावर तिने नाद सोडला आणि माधवला फोन लावला.*** ...Read More

2

मुक्त व्हायचंय मला - भाग २

मुक्त व्हायचंय मला भाग २मागील भागावरून पुढे…मुलांचं मागे येणं, रडवेला चेहरा करून बोलणं मालती बाईंना मनातून रडवून गेलं पण त्यांनी ठाम निर्णय घेतला होता. विचार करता करता मालतीला त्यांना बघायला जेव्हा रघुवीर आले होते तो दिवस आठवला.रघूवीर त्यांचे काका काकू त्याची चुलत बहीण असे सगळे मालतीला बघायला आले होते."याया बसा. घर सापडायला त्रास नाही गेला नं !" मालतीची आई"नाही नाही. तुम्ही पत्ता अगदी बरोबर सांगीतल्यामुळे आम्ही सहजपणे घर शोधू शकलो."रघूवीर चे काका म्हणाले."चंदू पाणी आण." मालतीचे वडील चंदूला मालतीच्या भावाला म्हणाले."हो आणतो." चंदूचंदू पाणी आणायला आत वळला पण तेवढ्यात नंदाने त्याच्या बायकोने पाणी आणलं."हा माझा मोठा मुलगा चंदू .त्याचं ...Read More

3

मुक्त व्हायचंय मला - भाग ३

मुक्त व्हायचंय मला भाग ३रघूवीर आणि मालतीचं लग्न साध्या पद्धतीनं पार पडलं. लग्नात रघूवीर कडचे फार कमी लोक होते. खूप आश्चर्य वाटलं. लग्न संपन्न झालं. वरात निघाली.रघूवीर नेमाडेंच्या घरी वरात आली. मालतीचा गृहप्रवेश झाला. मालतीनं उखाणा घेतला.रघूवीरच्या काकूंनी पण उखाणा घेतला.रघूवीरने मालतीचे नाव बदलले नाही.पूर्ण लग्नात मालतीला रघूवीरचा ओझरता स्पर्शही झाला नाही. रघूवीरने तशी काळजी घेतली असावी बहुधा.मालती काहीच बोलत नव्हती पण सगळं निरीक्षण करत होती.मालती तिला सांगीतलेल्या खोलीत गेली. छोटीशी खोली होती पण जरा छान रंग दिलेली होती त्यामुळे बरी वाटते होती. हे घर रघूवीरच्या काकांचं होतं. रघूवीर खोलीत शिरला तशी पलंगावर बसलेली मालती उठून उभी राहिली.तो खोलीत ...Read More

4

मुक्त व्हायचंय मला - भाग ४

मुक्त व्हायचंय मला भाग ४मागील भागावरून पुढे…रघूवीर आणि मालतीचं लग्नं होऊन साधारण दोन महिने झाले असतील. या दोन महिन्यातच वीस पंचवीस वर्षांचा संसार केल्यासारखं वाटायला लागलं.मालतीच्या घरचे खूप माॅडर्न नसले तरी जगाच्या बरोबर चालणारे होते. कुठल्याही प्रसंगी निर्णय घ्यायचा असेल तर तिच्या घरचे सगळे एकत्र बसून विचार विनीमय करायचे. सगळेजण आपली मतं सांगायचे. पण विषय ज्याच्यासंबंधी असेल त्यानेच फायनल निर्णय घ्यायचा मग तो इतरांना अमान्य असला तरी ते या निर्णयावर आक्षेप घेत नसत.रघूवीरकडे सगळं ऊलटच होतं. रघूवीरच्या घरी सगळं त्याच्या हुकूमानुसार चालत असे. मालतीला मोबाईल घेण्याची सोय नव्हती. एक दिवस तिच्या भावाचा चंदूचा रघूवीरला फोन आला.अजून सगळं नवीन असल्यामुळे ...Read More

5

मुक्त व्हायचंय मला - भाग ५

मुक्त व्हायचंय मला भाग ५मागील भागावरून पुढे…दुस-या दिवशी चंदू मालतीच्या ऑफीसमध्ये लंचटाईममध्ये भेटायला जातो." मी काल फोन केला होता चंदू"कशाला?" मालती"अगं दोन महिने झाले तुमच्या लग्नाला.तुझ्याशी बोलणं झालं नाही म्हणून आईबाबा म्हणाले बघ तिला फोन करून ती येत असेल तर.म्हणून मी तुला घरी लॅंडलाईन वर फोन केला तर रघूवीर म्हणाले महत्त्वाचं काम असेल तरच मालतीला माहेरी पाठवीन.तेकाम मला महत्वाचं वाटलं तरच पाठवीत.एवढं बोलून झालं नंतर तुला फोन दे म्हणणार होतो तर त्यांनी फोन कट केला." चंदू"चंदू यापूढे घरी फोन करत नको जाऊस." मालती"का?" चंदू"नाही आवडत त्यांना." मालती "कमाल आहे सख्ख्या भावाने फोन केलेला आवडत नाही.!" चंदूहो. दुर्दैवाने आहे तसं ...Read More

6

मुक्त व्हायचंय मला - भाग ६

मुक्त व्हायचंय मला भाग ६मागील भागावरून पुढे…मालतीला बाळाची चाहूल लागते. ती रघूवीरला ही आनंदाची बातमी सांगते. तिला वाटतं यामुळे रघूवीरचा स्वभाव बदलेल. पण रघूवीर तिला गर्भपात कर म्हणतो. मालती ठामपणे गर्भपाताचा नकार देते. त्यावर रघूवीर खूप चिडतो.मालतीला अद्वातद्वा बोलतो तरी मालती ऐकत नाही.मालती ऐकत नाही म्हणून रघूवीर तिला खूप त्रास देतो त्यामुळे तिचा गर्भपात होतो.ही गोष्ट मालतीच्या जिव्हारी लागते. मालतीची मानसिक अवस्था खराब होते. तिला नोकरी वर सुद्धा जायची इच्छा होत नाही. घरातील कामं करण्याचं बळ तिच्या अंगी नसतंच. पण रघूवीरला तिची दया येत नाही.नोकरी,घरातली कामं आणि रघूवीरची सेक्सची इच्छा पूर्ण करता करता मालतीची तब्येत इतकी खराब होते की ...Read More

7

मुक्त व्हायचंय मला - भाग ७

मुक्त व्हायचंय मला भाग ७वामागील भागावरून पुढे…मालती घरी येते. ती खूप अशक्त झालेली असते. मालतीला घरात शिरताच एक वृद्ध दिसतात. तिला प्रन पडतो या कोण?रघूवीर सांगतो." मालती या आमच्या गावच्या मावशी आहेत. तुझी तब्येत ठीक होईपर्यंत त्या इथेच राहतील." रतिच्या मदतीला म्हणून रघूवीर त्याच्या गावच्या मावशींना आणतो आणि त्यांची ओळख करून देतो.मावशी मालतीवरून भाकरतुकडा ओवाळून टाकतात आणि हलकसं हसतात. मालतीपणमावशींकडे पाहून हसते.मालतीचे चालताना पाय लटपटतात तर नवरा म्हणून काळजीपोटी रघूवीर मालतीला धरत नाही. शेवटी मावशी मालतीला पकडून हळूहळू चालवत आत नेतात.यावेळी मालती आणि मावशी दोघींच्याही मनात येतं ' हा माणूस कोणत्या मातीचा बनला आहे. कुणास ठाउक!'हळूहळू मावशी मालतीला आतल्या ...Read More

8

मुक्त व्हायचंय मला - भाग ८

मुक्त व्हायचंय मला भाग ८वामागील भागावरून पुढे…मालती घरात हिंडू फिरू लागते. मावशी आणि मालती यांच्यात जमलेली गट्टी रघूवीरच्या लक्षात नये म्हणून रघूवीर घरी आल्यावर दोघी एकमेकींशी बोलत नाहीत. मावशींना मालती जवळ राहावंसं वाटत असतं पण मालती आता घरात हिंडू फिरू लागली म्हणजे आता ती ऑफीसमध्ये जाईल म्हणजे आपला इथला मुक्काम संपला हे मावशींच्या लक्षात येत़.तसं त्याउदास राहू लागतात.मालतीच्या हे लक्षात येतं तसं ती विचारते"मावशी काय झालं? बरं वाटत नाही का?""बरं आहे." मावशी"मग एवढ्या उदास का असता?""काही नाही " मावशीअसं म्हणून मावशी घाईने स्वयंपाकघरात जातात.त्यांना आपल्या डोळ्यात येणारे पाणी मिरचीला दिसू नये असं वाटतं.मालतीच्या मनात शंका असतेच म्हणून तीही मावशींच्या ...Read More

9

मुक्त व्हायचंय मला - भाग ९

मुक्त व्हायचंय मला भाग९वामागील भागावरून पुढे…याही गोष्टीला बरीच वर्ष झाली.मावशींचं गावाकडे जाणं हळूहळू लांबत गेलं.पुन्हा जेव्हा मालतीला चक्कर आली तिला दिवस होते पण मालतीने या वेळी हुशारी केली रघूवीरला सांगीतलं नाही. पण रघूवीरचा त्रास तीन महिने कसा थांबवायचा यावरही मालतीने तोडगा काढला.अती श्रमाने त्या दिवशी मालती चक्कर येऊन पडली तेव्हा तिच्या पायाला जखम झाली.त्याला व्यवस्थीत बॅंडेज करून औषध घेऊन मालती आणि मावशी डाॅक्टरांकडून आल्या. त्या पायाची सबब सांगून मालतीने स्वतःला रघूवीरपासून वाचवलं." सूनबाई आता जरा दमाने घ्या.दोन जीवांच्या आहात. आता फक्त पायावर निभावलं जास्त दगदग करू नका.मी आहे नं!" मावशींनी मालतीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला." मावशी तुम्ही असतांना मला ...Read More

10

मुक्त व्हायचंय मला - भाग १०

मुक्त व्हायचंय मला भाग १०मागील भागावरून पुढे…मालतीला वाटतं होतं तसंच घडलं. माधव आणि सरीता रघूवीर घरी नाही हे बघून भेटायला आले."आई तू पुन्हा विचार कर तुझ्या निर्णयावर." माधव म्हणाला." हो आई. अगं या वयात तू एकटी कशी राहशील? आणि बाबांना आता शुगर निघाली आहे.त्यांची काळजी घ्यायला हवी नं." सरीता काळजीने म्हणाली.मालती यावर काहीही बोलत नाही. तिचं गप्प बसणं यांचा अर्थ काय असेल याचा दोघांनाही अंदाज येत नव्हता." आई तू या घरात राहून तुझ्या मनाप्रमाणे जग.तू घरातील कुठल्याही कामात स्वतःला गुंतवू नको." माधव म्हणाला.माधवचा चेहरा खूप गोंधळलेला होता. त्याचा चेहरा बघून मारुतीला मनातून हसू आलं पण चेहरा तिने जाणीव पूर्वक ...Read More

11

मुक्त व्हायचंय मला - भाग ११

मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं ऐकून कितीतरी वेळ माधव आणि सरीता विचारात हरवले.मालती बराच वेळ दोघांचे निरखत होती. दोघांनाही हे सत्य पचवणं जड जाणार आहे हे मालतीला आधीच लक्षात आलं होतं."मुलांनो तुम्ही वेळ घ्या विचार करायला.मी मात्र घेतलेला निर्णय अंमलात आणणार आहे. मी एक घर परवाच पक्कं करून आले आहे.माझा भाऊ म्हणजे तुमचा मामा माझ्याबरोबर आला होता.मी वेगळी राहिले तर मला माझ्या माहेरच्या लोकांना मोकळेपणाने भेटता येईल. माझे आईवडील आता खूप म्हातारे झाले आहेत त्यांना मला काही दिवस तरी माझ्या घरी आणता येईल. मी लग्न झाल्यापासून माझ्या आईवडिलांना सुद्धा मनमोकळे भेटले नाही. तुम्हाला यावंस वाटलं तर ...Read More

12

मुक्त व्हायचंय मला - भाग १२

मुक्त व्हायचंय मला भाग १२वामागील भागावरून पुढे…" माधव आता आई या घरात थांबणार नाही असं दिसतंय" सरीता"हो आईला थांब बाबा म्हणणार नाहीत हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. कारण त्यांचा अहंकार आडवा येतो." माधव"आपला जन्मच होऊ नये असं बाबांना वाटत होतं हे आई म्हणाली. माधव तुझा यावर विश्वास बसतोय?" सरीता"मनात शंका येते पण एवढं मोठं खोटं ती का बोलेल? आजपर्यंत आपण कधी आईच्या इतक्या जवळ गेलोच नाही त्यामुळे ब-याच गोष्टी आपल्याला माहिती नाही." माधव"मग आता काय करायचं? बाबांच्या गळ्यात घंटा बांधणार कोण?" सरीता"आई ऊद्याच नवीन घरात जाणार आहे. तेव्हा घरात काय नाटक घडेल याचा अंदाज बांधणं कठीण आहे." माधव"आईने पाठवलेली घटस्पोटाच्या ...Read More

13

मुक्त व्हायचंय मला - भाग १३

मुक्त व्हायचंय मला भाग १३ वामागील भागावरून पुढे…सकाळी सकाळी सरीता ने माधवला फोन केला."माधव काल केला होतास का रात्री फोन?""हो. आज दहाच्या सुमारास ती घराबाहेर पडणार आहे." माधव"तू केव्हा भेटणार आहेस तिला?" सरीता"ती म्हणाली घरी नको येऊ. मी बाबांशी बोलेन. तू माझ्या नवीन घरी ये अस म्हणून हसली." माधव"अरे खरंच आहे ते नवीन घर तिच्या हक्काचं आहे. इथे या घरात ती इतकी वर्ष राहायचं म्हणून राह्यली." सरीता"मलापण आता आजी, आजोबा,मामा आणि मामीला भेटावसं वाटतंय." माधव"होरे मलापण भेटावसं वाटतंय." सरीता"आईने पत्ता सांगितला नाही ती ऊद्या ऑटोरिक्षा मध्ये बसली की मेसेज करणार आहे.मी तो मेसेज तुला पाठवीन. मग तिथे ये." माधव"तू ...Read More