त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का?

(7)
  • 11.5k
  • 0
  • 5.3k

या फुलांच्या गंधकोषी…सांग तू आहेस का? भाग १" कृपा गेली…एक निरागस शब्द संपला. आयुष्याच्या अर्ध्या वाटेवरच हा शब्द मला सोडून गेला. माझ्या श्वासापेक्षाही हा शब्द मला प्रिय होता.आता मी काय करू डाॅक्टर? काळ सगळ्यावर औषधं असतं असं म्हणून माझं सांत्वन करून नका.माझा शब्द मला परत देता आला तर द्या."हरीशसकाळी सकाळी हरीशचा मेसेज वाचून डाॅक्टर मृदुला सुन्न झाली.सकाळच्या या प्रसन्न वेळेला उदासीची गडद छाया दाटून आली असं मृदुलाला वाटलं.***कृपा ही मृदुलाची पेशंट होती. मृदुला ही डाॅक्टर आहे आणि ती कॅंन्सर पेशंटचं काऊन्सलिंग करत असे. कृपा जेव्हा पहिल्यांदा मृदुलाच्या दवाखान्यात आली तो दिवस मृदुलाला आठवला.कृपा आपले सगळे रिपोर्ट घेऊन मृदुलाच्या ओपीडी मध्ये आली होती. कॅंन्सर पेशंटना काऊन्सलिंग करणे आवश्यक असतं.

Full Novel

1

त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का? - भाग 1

या फुलांच्या गंधकोषी…सांग तू आहेस का? भाग १" कृपा गेली…एक निरागस शब्द संपला. आयुष्याच्या अर्ध्या वाटेवरच हा शब्द मला गेला. माझ्या श्वासापेक्षाही हा शब्द मला प्रिय होता.आता मी काय करू डाॅक्टर? काळ सगळ्यावर औषधं असतं असं म्हणून माझं सांत्वन करून नका.माझा शब्द मला परत देता आला तर द्या."हरीशसकाळी सकाळी हरीशचा मेसेज वाचून डाॅक्टर मृदुला सुन्न झाली.सकाळच्या या प्रसन्न वेळेला उदासीची गडद छाया दाटून आली असं मृदुलाला वाटलं.***कृपा ही मृदुलाची पेशंट होती. मृदुला ही डाॅक्टर आहे आणि ती कॅंन्सर पेशंटचं काऊन्सलिंग करत असे. कृपा जेव्हा पहिल्यांदा मृदुलाच्या दवाखान्यात आली तो दिवस मृदुलाला आठवला.कृपा आपले सगळे रिपोर्ट घेऊन मृदुलाच्या ओपीडी मध्ये ...Read More

2

त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का? - भाग 2

या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का भाग२सकाळी कृपा गेल्याचं कळल्यापासून मृदुलाचं मन जडशीळ झालं होतं. तिला अजीबात काहीच इच्छा होत नव्हती. कृपा भेटून दोनच वर्ष झाली होती. या दोन वर्षांत मृदुला मध्ये खूप बदल घडला होता.कृपाच्या सानिध्यात राहून तिचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन खूपच व्यापक झाला होता.वैद्यकीय क्षेत्रात डाॅक्टर मृदुला हे नाव खूप विश्वासाने घेतल्या जाई. पेशंट, त्यांचे औषधोपचार, पेशंटचं काऊन्सलिंग आणि सतत असणारे सेमिनार यात मृदुला पूर्ण बुडालेली होती.आधी ती डाॅक्टर म्हणून पेशंटला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आयुष्याकडे कसं बघायचं या विचारांची रुजवण करायची पण कृपाला भेटल्यावर त्या दृष्टीकोनाला साहित्यिक तरल संवेदनांची झालर मिळाली आणि मृदुलाच्या काॅऊन्सिलींग मधील रूक्षता ...Read More

3

त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का? - भाग 3

या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का भाग ३मागील भागात आपण बघीतलं की मृदुला सासुबाईंना मिठी मारून ढसाढसा रडली. शांत होण्याची सासूबाईंनी वाट बघितली. मृदुला सासूबाईंना सांगेल का झालं? बघू या भागात.बराच वेळाने मृदुलाचं रडणं थांबलं. तिने सासूबाईंना मारलेली मिठी सोडली. डोळ्यातून गालावर ओघळलेले अश्रू तिने हळूच पुसले." झालीस का बाळा शांत?"" हं" दबक्या आवाजात हुंदका आवरत मृदुला उत्तरली." काय झालं?"सासूबाईंनी विचारलं."आई कृपा आज सकाळी गेली."" काय?"सासूबाईंंचाही यावर विश्वास बसला नाही. " सकाळीच हरीशचा मेसेज आला. आई कृपा जाणार हे सहा महिने आधी कळलं होतं हो पण ती इतकी सकारात्मक ऊर्जेने वावरत होती की तिने कधी कोणाच्या डोळ्यात अश्रू ...Read More

4

त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का? - भाग ४

या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का भाग ४मागील भागात आपण बघीतलं की मृदुलाला कृपाच्या घरी जाण्याची हिंमत होत बघू मृदुला हिंमत करू शकते का?मृदुला जरा सावरली आणि कृपाकडे जायचं म्हणून उठली. तयार झाली निघताना पायात चप्पल घालताना पुन्हा तिचे पाय अडखळले. तिच्या पायात गोळे आले. क्षणभर ती भिंतीचा आधार घेऊन उभी राहिली. तिने डोळे मिटून घेतले होते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू धारा पुन्हा सुरू झाल्या.मृदुलाच्या सासूबाई तेवढ्यात बाहेरच्या खोलीत आल्या आणि त्यांना भिंतीचा आधार घेऊन निश्चल उभी असलेली मृदुला दिसली. तिच्या गालावर अश्रूंचे ओघळ दिसले. त्यांच्या लक्षात आलं की मृदुला अजूनही कृपाकडे जाण्याची हिंमत करू शकत नाहीय. त्या ...Read More

5

त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का? - भाग ५ (अंतिम भाग)

या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का भाग ५(अंतिम भाग)मागील भागात आपण बघीतलं की मृदुला कृपाच्या घरी गेली होती. बघू या भागात काय होईल ते.मृदुला कृपाच्या घरून निघाली तीच मुळी गलीतगात्र होऊन. मृदुला कशी तरी गाडीपाशी आली. कितीतरी वेळ तिला गाडीची किल्ली सापडेना. पर्समधील सगळ्या खणांमध्ये शोधून तिला किल्ली सापडेना. ती किल्ली शोधताना थकली आणि उभ्या उभ्या तिला रडू कोसळलं.पाच दहा मिनिटांनी तिचा उमाळा थांबला. तिने पुन्हा पर्समध्ये किल्ली शोधली. किल्ली सापडताच तिला हायसं वाटलं. किल्लीने कारचं दार उघडून ती ड्रायव्हिंग सीटवर बसली. कार सुरू करण्यासाठी किल्ली लावताना तिचा हात थरथरत होता. मृदुलाला आश्चर्य वाटलं ते याचं की आजपर्यंत ...Read More