शहरातील एक प्रशस्त नामांकित कॉलेज. आज तो कॉलेजचा हाल फुलून गेला होता.. रंगबिरंगी फुलांनी बाग जशी फुलून जाते त्याप्रमाणे हजार बाराशे स्टुडंट्स रंगीबिरंगी कपड्यांमध्ये वावरत होती. हसत खेळत एकमेकांसोबत सेल्फी काढत होती. तर कुणी एकमेकांसोबत डान्स करत व्हिडिओ बनवून घेत होती. हसत्या खेळत्या फुलांनी भरलेला बगीचा वाटत होता तो संपूर्ण हॉल. कार्यक्रम सुरू झाला. अतिथी गणांनी स्टेजवर प्रवेश केला. संचालन करण्यासाठी ज्या दोन विद्यार्थिनी होत्या. त्यांनी उत्कृष्ट संचालन करणे सुरू केले. प्रतिष्ठित व्यक्ती स्टेजवर बसलेली त्या सर्वांची स्वागतं पुष्पगुच्छाने केली गेली. त्याबरोबरच त्यांचे स्वागत छानसे स्वागत गीताने पण नृत्य समवेत केले गेले. स्वागत समारंभ संपल्यानंतर मग विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ सुरू करण्यात आला.
नियती - भाग 1
भाग १शहरातील एक प्रशस्त नामांकित कॉलेज. आज तो कॉलेजचा हाल फुलून गेला होता.. रंगबिरंगी फुलांनी बाग जशी फुलून जाते हजार बाराशे स्टुडंट्स रंगीबिरंगी कपड्यांमध्ये वावरत होती. हसत खेळत एकमेकांसोबत सेल्फी काढत होती. तर कुणी एकमेकांसोबत डान्स करत व्हिडिओ बनवून घेत होती.हसत्या खेळत्या फुलांनी भरलेला बगीचा वाटत होता तो संपूर्ण हॉल.कार्यक्रम सुरू झाला. अतिथी गणांनी स्टेजवर प्रवेश केला. संचालन करण्यासाठी ज्या दोन विद्यार्थिनी होत्या. त्यांनी उत्कृष्ट संचालन करणे सुरू केले.प्रतिष्ठित व्यक्ती स्टेजवर बसलेली त्या सर्वांची स्वागतं पुष्पगुच्छाने केली गेली. त्याबरोबरच त्यांचे स्वागत छानसे स्वागत गीताने पण नृत्य समवेत केले गेले. स्वागत समारंभ संपल्यानंतर मग विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ सुरू करण्यात आला.हे ...Read More
नियती - भाग 2
भाग 2मोहित जेव्हा स्टेजवर आला तेव्हा तो गोंधळून गेला होता.अगदी तसंच जेव्हा दाखवायला आणलेल्या मुलीला हातात चहाचा ट्रे देतात हॉलमध्ये पाठवून सर्वांसोबत बसवून मग प्रश्न विचारतात तेव्हा जशी तिची अवस्था होते त्या बिचार्याची अवस्था झाली होती.सर्वांग घामाने डबडबले त्याचे...फासावर चढवण्यासाठीच जणू त्याला आणलेले होते.कसाबसा थरथरत्या पायांनी मोहित स्टेजवर चढला.शाल श्रीफळ तसेच डिग्री देऊन मान्यवरांनी त्याचा सत्कार केला...उसने अवसान आणून चेहरा हसतमुख ठेवला होता त्याने.तेवढ्यात संचालन करणाऱ्या विद्यार्थिनींनी म्हटले..."तर डियर फ्रेंड्स....मिस्टर मोहित आता आपल्या सोबत आपले विचार , आपले एक्सपिरीयन्स...शेअर करतील..सो... मिस्टर मोहित....!!!"आणि हे ऐकूनच त्याचे पाय......त्याच्या पायात आतापर्यंत जो त्याने धीर एकवटून ठेवलेला होता ..तोही आता गळून पडला...आणि...............आणि आता ...Read More
नियती - भाग 3
भाग 3मुकाट्याने मोहित झोपडीत शिरला. बाहेरच्या पेक्षा आत दुर्गंधी अधिक होती. त्याला त्या दुर्गंधीचे काहीच वाटत नव्हते. कारण दुर्गंधी नेहमीची सवय झाली होती.तेवढ्यात त्याची लक्ष त्याच्या मामाकडे गेले. मामा अधाश्यासारखा मोहितच्या ठेवलेल्या सिल्वर ट्रॉफी कडे पहात होता एकटक.मोहितचेही लक्ष गेले की मामा आपल्या सिल्वर ट्रॉफी कडे एकटक बघतोय.त्याचे मामा विचार करत होते...."हा चांदीचा कप आहे म्हणतोय मोहित. तर हा कप किती रुपयांना विकता येईल...??"त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून मोहित ही समजून गेला की त्यांच्या मनात काय आहे...??...मनीषा काय आहे...???"मोहित्या हे काय आहे...???""मामा ...माझं बक्षीस आहे ते मला मिळाले आहे.""बक्षीस किती रुपयांचा असेल...???"मोहित आता खरच मनातून चरकला. गडबडून त्याने मामाच्या तोंडाकडे ...Read More
नियती - भाग 4
भाग 4बैठकीकडे जायचे होते तर बैठकीचा जिना दोन भिंतीच्या मध्ये होता भुयारा सारखा वरती चढणारा.स्टेप्स चढताना दोघेच होते. ती पुढे चढत होती. तिच्या मागे मागे खाली पाहत तो चढत होता. आणि एका क्षणाला ती मध्येच थांबली. आणि पलटली.हा आपला खाली पाहतच.. आणि मग..लक्ष नसल्यामुळे तो तिला धडकला गेला. आणि ती धडपडत होती तर त्याने पटकन तिला सावरले.दोन क्षणांसाठी दोघांचीही ह्रदय धडधडू लागले होते.पण काहीही झाले तरी मोहित हा विलक्षण संयमी स्वभावाचा होता. त्याने तिला व्यवस्थित सरळ उभे केले.आणि पुढे पाहून चालण्याचा इशारा केला. नजर चुकवून तो वर खाली पाहू लागला कोणी पाहत तर नाहीये......जवळपास 20 मिनिटांनी बैठकीतून मोहित परत ...Read More
नियती - भाग 5
भाग-5मुखातून एकदा शब्दाचे बाण बाहेर पडल्यानंतर आपण ते परत घेऊ शकत नाही हे तेवढेच खरे आहे. आणि जिव्हारी लागलेले सारखे बोचत असतात हृदयात.त्याने चालणे थोडे मंद केले तेवढेच तिच्यासोबत बरोबरीने चालता येईल असे वाटून. पण ती आता थोडी भरभर चालू लागली होती...नाईलाजाने मग तोही फास्ट चालत तिच्याबरोबर समांतर पावले टाकू लागला...गेट जवळ पोहोचताच मात्र... तो भीतीने समोर पाहू लागला....समोर त्यांच्या घरचा भला मोठा पुतळा काळाकुट्ट कूत्रा आपले घारे डोळे टकमक करून लांब जीभ काढून उभा होता.त्याच्याकडे बघून त्याच्या अंगी सरसरून घाम फुटला.तेवढ्यात मायराने त्या कुत्र्याला आवाज दिला.मायरा..."शेरू !!! बाजूला हो... शेरू... शेरू काय सांगितलं...?? समजलं का ??? बाजूला हो ...Read More
नियती - भाग 6
भाग 6चालता चालता डोक्यात विचारांनी थैमान माजवले होते त्याच्या... केव्हा झोपडी वजा घर आले समजले ही नाही.आणि त्याचे समोर गेले....तर...समोर त्याचे वडील वाट पाहत होते त्याची.आपल्या मुलाला पाहून त्याचे आई वडील दोघेही भारावून गेले होते.तरी पार्वती अधेमधे शहरात जाऊन मोहितला भेटून येत होती. पण कवडूला मात्र कधीही वेळ मिळत नव्हता.अंगाने भरलेला जरी कवडू होता तरी त्याचे मन फारंच भावनिक होते.मोहितही आपले आई-बाबांना फार फार दिवसांनी भेटत असल्यामुळे तात्पुरते तो सर्व काही विसरून गेला.त्याच्या आईला भारावल्यागंत ...त्याला काय करून देऊ खायला...?? आणि काय नाही ....??..असे वाटू लागले.मोहित ने मग एक एक किस्से सांगितले.मोहितचे बाबा कवडू आणि आई पार्वती आज निवांत ...Read More
नियती - भाग 7
भाग 7...नकळत आपोआप तिचे पाय आवाजाच्या रोखाने जाऊ लागले.आणि जवळ जाताच ती खुळ्यागत पाहतच राहिली.झुडपांच्या जाळीत एक गोरेपान पोर होते. क्षीण आवाजात अधून मधून रडत होते. तोंडातून फेस ही येत होता त्याच्या.न रहावून पार्वती त्याला घेण्यास खाली वाकली.. पण तीपाहून आणखीन थबकली कारण....त्याच्या एका अंगाला लाल मुंग्या चावत होत्या. तेथून रक्तही येत होते. ते पाहून पार्वतीचा जीव गलबलला.आणि खाली वाकून त्याला घेण्यास हात पुढे केले. पुन्हा ती थबकली आणि घाबरली ही. या बाळाला आपण हात लावावे की लावू नये.. हा विचार तिच्या मनात आला.अगोदरच गावामध्ये त्यांना बऱ्याचशा गोष्टीला हात लावायला आणि प्रवेश घ्यायला मनाई होती.असा सगळा विचार मनात चालू ...Read More
नियती - भाग 8
भाग -8आणि आता दुसरी चिंता होती की दिवसेंदिवस आता मोहितला समजत जाणार होते ,अक्कल येणार होती,तर लोकांकडून खरे समजण्याची होती दोघांना.एक दिवस कवडू असाच बसलेला होता. त्याच्या मनात तीच तगमग सारखी होती आणि दिवस जात होते तशी तशी नवीन चिंता ग्रासंत होत्या..आपल्या मनात असलेली चिंता ती...कवडू पार्वतीला बोलू लागला...की....."पार्वती ...आता मोहितला आपल्याला शाळेत घालावे लागेल.""हो.". कवडू बोलायला मोहितला शाळेत घालावे लागेल पण त्यालाही माहीत होते की त्याच्याने हे होणार नाही शाळेत मोहितला प्रवेश घेऊन देणे.कारण गावामध्ये त्या लोकांना शाळेमध्ये प्रवेश नव्हता. आणि त्याची परिस्थिती मोहितला बाहेर पाठवण्याची नव्हती.इकडे पार्वती म्हणाली...."केव्हा घालणार..??""तेच विचार करताय मी. त्याला इथे तर आपण घालू ...Read More
नियती - भाग 9
भाग 9आपल्या आई-बाबांच्या मनस्थितीत पासून अनभिज्ञ मोहित भराभर पावले उचलत एका दिशेने निघाला गावाच्या..संध्याकाळ होण्याच्या मार्गावर होती. त्याचा जीव करू लागला कारण ती तिथे एकटी होती. पोहोचायला त्याला पंधरा मिनिटे तरी लागणार होती.जसा शॉर्टकट घेता येईल तसा तो शॉर्टकट घेत गेला तरी त्याला पोहोचायला बारा मिनिटे लागले.पोचल्यानंतर तू इकडे तिकडे पाहू लागला...पण तिथे...........मायरा ओढ्याच्या काठावर वीस मिनिटांपूर्वीच पोचली होती. एखाद्या दगडावर बसून वाट पाहत होती. ओढ्याच्या दुसऱ्या बाजूला दोन गुरे गुरकावून एकमेकांशी भांडत होते... त्यांच्या शिंगांची आघात एकमेकांवर होत होते.मायरा तिथे बसली होती तेव्हा दुरून तिला दोन डोळे न्याहाळत होते...मायराचे वडील बाबाराव... गावातल्या एक प्रतिष्ठित व्यक्ती... घरंदाज करारीपणा त्यांच्या ...Read More
नियती - भाग 10
भाग 10असं म्हणून त्याने मायराला जवळ घेतले आणि तिच्या ओठ कपाळावर टेकवले. आणि तिचा हात धरून तिला झरझर नेऊ तर एका क्षणासाठी मायराने त्याला थांबवले.. तिने इकडे तिकडे पाहिले आणि त्याच्या जवळ येऊन त्याच्या गळ्यात हात गुंफले आणि ओठावर ओठ टेकवले...दोन क्षण होत नाही तर झाडाच्या आडोशाला जे दोन डोळे पाहत होते त्यांना .... असं पाहून त्याला राग आला ... रागाच्या भरात त्याने जवळ असलेली काठी जवळपास आदळली.यासारखे दोघेही भानावर आले आणि विलग झाले.संध्याकाळच्या कातरवेळी मायराचा हात पकडून जात असताना मात्र......मायराच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले..."मोहित माझ्याशी लग्न करताना तुला भीती नाही ना वाटणार???"तिचा प्रश्न ऐकून मोहित आश्चर्यचकित झाला ...Read More
नियती - भाग 11
भाग 11पण बाबाराव मात्र अगदी शांत होते पाहाडासारखे.त्यांच्या अंतकरणात खळबळ माजली होती. ती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट करून दिसत होती. ओठातून शब्द बाहेर पडणारे बंद झाले होते. आणि शांत डोळे असणारे खळबळ माजवू लागले होते.डोळे त्यांचे अंतकरणातील वेदना व्यक्त करत होते..लीला या अजूनही बडबड करत होत्या तर त्यावर थंड स्वरात डोळ्यांत .....तांबडा अंगार घेऊन बाबाराव म्हणाले..."लीला... नशिबात असतं ते चुकत नाही.. ते भोगावंच लागते."अगदी थंडपणे त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले आणि ते शब्दंही थरथरत होते ज्याप्रमाणे त्यांचे हात रागाने थरथरत होते अगदी तसेच.लीला..."पण हे कसलं नशीब ??? ...काय कमी आहे हो तिला. काही सांगू नका तुम्ही.... काहीतरी करा लवकर.."हताश स्वरामध्ये ...Read More
नियती - भाग 12
भाग 12बाबाराव...."मायू.... तू आणि कार्यकर्ते आहेतंच ग. पण आपल्या घरचा एखादा धडधाकट मुलगा पण हवा. आणि सध्या तरी आपल्या तोच आहे म्हणून.. आता जास्त काही विचार करू नको... पाहू पुढे आपण..."मायरा....."ठीक आहे... बाबा....पण आई कूठे..."असे बोलतंच होती तर उजवीकडून आवाज आला काहीतरी खाली पडण्याचा....बाबाराव आणि मायरा दोघांचेही लक्ष तिकडे गेले. तर घरात काम करणारा एक गडी माणूस चहाचा कपाचा ट्रे घेऊन येत होता. त्याच्या हातातून चहाचा ट्रे खाली पडला.आधीच बाबाराव मनातली अस्वस्थता मनातच दडपून शांतपणे हँडल करत होते सगळं... आत मधून ... आंतरिक.. तडफड होत होती त्यांची कधीपासूनची... आणि आता हा चहाचा ट्रे खाली पडला तर मात्र शांतपणाचं सोंग ...Read More
नियती - भाग 13
भाग -13मायराचे डोळे जड झाले हळूहळू आणि मग झोपून गेली तशीच....पहाटे चार चा प्रहर असेल... दूरवरून तिला शेरूचा भुंकण्याचा आला.... शेरू एवढ्या पहाटे असा का भुंकतोय...??? म्हणून ती डोळे किलकिले करत उठून समोर जाऊन खिडकीच्या गजांमधून बाहेर पाहू लागली.....तर अंधुक अंधुक असणाऱ्या प्रकाशामधून सडपातळ अशी आकृती गेटच्या आत येताना दिसली.... ती आकृती गेटच्या आत मध्ये बिनविरोध आली ... ना त्याला वॉचमनने अडवले... ना शेरुनी हाकलले... म्हणजे तो बंगल्यात नेहमी येणारा व्यक्ती असावा...मग कोण असावा हा... असा विचार करत ती डोळे बारीक करून बघू लागली.जसे जसे ती व्यक्ती जवळ येत होती तसं तसे तिचे चालण्याची ढब पाहून तिला वाटले की ...Read More
नियती - भाग 14
भाग 14दोन क्षण बाबाराव तिच्या चेहऱ्याकडे बघत राहिले.. आणि बाहेर निघून गेले..दरवाजा बंद झाल्याचा आवाज ऐकताच मायराने लांब श्वास आणि श्वास नियंत्रणात आणू लागली.दोन मिनिटांनी ती धडपडत उठली... तिच्या रूम मधल्या ड्रेसिंग टेबल मध्ये खालच्या खणामध्ये कोपऱ्यात वस्तू बाजूला सरकवून पाहू लागली...पाहिल्यानंतर ती वस्तू तिला सापडली...हातात घेऊन ती बारकाईने तिच्याकडे बघू लागली तर दरवाजा जवळ पुन्हा पावलांचा आवाज येऊ लागलाआणि मग....ती वस्तू हातात घेऊन पटकन पुन्हा बेडकडे आली आणि अंगावर पांघरून घेऊन शांतपणे झोपली.तर आता रूम मध्ये लीला आल्या... त्यांनी येऊन बघितलं जवळ मायराच्या .....तर मायरा शांत झोपून दिसली .....त्यांना बरे वाटले निदान शांत झोपून आहे आता.... त्यांनी जवळ ...Read More
नियती - भाग 15
भाग 15आणि त्याला थोडासा मोहित बद्दल... आपल्या मुलाचे वागणे हेही थोडे ...त्याला शंकाग्रस्त वाटत होते... मोहित आल्यापासून कवडूला थोडे होते की आपला मुलगा प्रेमात पडला आहे कोणाच्यातरी...हा विचार येताच... कवडूच्या अंगावर भीतीचे शहारे उमटले..धडधडते अंतकरण घेऊन कवडू.... बाबाराव यांच्या बंगल्याच्या गेट जवळ आला.... आणि....वॉचमन जवळ कवडूने सांगितले की त्यांच्या मालकांनी त्याला बोलावले आहे. तर दोन वॉचमन पैकी एक वॉचमन बंगल्याच्या आत मध्ये निरोप घेऊन गेला. तेव्हापर्यंत त्याला तिथेच बाहेर उभे राहावे लागले. कवडू ला त्याचे विशेष काही वाटले नाही. त्याला आताही वागणूक तिथे सगळीकडे तशी मिळत असल्यामुळे अंगवळणी पडले होते.आतून वॉचमन निरोप घेऊन आला. कवडू ने तेथेच थांबावे बाहेर.... ...Read More
नियती - भाग 16
भाग 16बाबाराव विचार करू लागले की....कवडूला आपण जाणीव करून द्यावी का मायरा आणि मोहित बद्दल एकदा का कवडू आणि यांच्या मनाची तयारी झाली .....की ते मोहितला आठ दिवसाच्या आत दिल्लीला पाठवू शकत होते ...आणि तो परत येईपर्यंत मायराचे लग्न उरकून घेऊ शकत होते. भरपूर अवधी मिळणार होता त्यांना...यावेळी त्यांनी...राजू च्या वेळी विचार केला होता त्याप्रमाणे .......यावेळी बाबाराव यांनी तसा विचार केला नव्हता. यावेळी त्यांना काही वाईट करण्यापेक्षा चांगलं करून घराण्याची जाऊ पाहणारी इज्जत आपण वाचवावी आणि असं जर झालं तर आपल्या नशिबी एक पुण्य पडेल..यावेळेस त्यांनी असा विचार केलेला होता.आणि इकडे कवडू च्या वागण्यातून काहीच कळत नव्हते.आता त्यांनी पक्का ...Read More
नियती - भाग 17
भाग 17तेवढ्यात मोहित चा फोन व्हायब्रेट झाला....तसा तो आपल्या जवळचे पुस्तक त्याने ठेवून दिले आणि तो उठला...फोन त्याच्या पॅन्टच्या व्हायब्रेट होत होता.. पण ती व्हायब्रेशन मोड वरची गुणगुण ऐकू जाऊ नये म्हणून तो ताडताड बाहेर निघाला.... आणि....बाहेर निघून सर सर सर एकांत हवा असल्यामुळे इकडे तिकडे जायचं सोडून तो सरळ स्मशानाच्या भिंतीच्या तिकडे आतल्या दिशेने गेला.फोन उचलला...पलीकडून मायरा बोलत होती.दहा-पंधरा मिनिटे बोलणे झाल्यानंतर तो घरात आला.मनात त्याच्या विचारांनी ढवळाढवळ केली होती.काय करावे बरं आपण...?? मायरा म्हणते तसं करावं काय..?? एवढे दिवस दूर राहायचं का तिच्यापासून..??आपल्याच धुंदीत घरात येऊन खाली चटई अंथरली आणि लेटला..आज तरी त्याला सध्या कोणताही विचार करायचा ...Read More
नियती - भाग 18
भाग -18सुंदर...."काय सांगतो...???.. अरे .!!!.आठ दहा महिन्यापूर्वी जेव्हा मला ती दिसली होती....तेव्हा तर दहावी-अकरावीत असल्यासारखी वाटत होती. ही एवढी ..एवढ्याच दिवसात कशी झाली..??"त्याचा मित्र म्हणाला..."पोरींच्या बाबतीत ...आठ-दहा महिने ...काही कमी होत नाही... बापू... अरे मर्दा.. आठ दहा महिन्यांत काहीही होऊ शकतं... पोरगी बाई होऊ शकते.....पोरी म्हणतात कशाला मग...??"सुंदरच्या मित्राने असे म्हटल्याबरोबर......मग..तेथे बसलेले सर्व त्याचे मित्र अर्थ समजून लक्षात येताच खो-खो करून हसू लागले.ज्या दिवशी मायराची भेट सुंदरला झाली होती त्या दिवसापासून त्याची अन्नावरची वासना उडाली.त्याला बाबारावांच्या त्या गुलबकावलीच्या फुलावाचून काही दिसेना आणि काही सूचेना.आजवर सुंदर ने अनेक मुली पाहिल्या होत्या आणि शहरातल्या मुली ही पाहिल्या होत्या..बरेच वेळा मुलींना घेऊन ...Read More
नियती - भाग 19
भाग -19दोन दिवसांपासून त्याचे हृदय तडफडत होते तिला पाहण्यासाठी. तिच्याशी बोलण्यासाठी.तिचा स्पर्श त्याला उभारी देऊन गेला. हृदय उचंबळून आले आणि नेत्रातून दोन अश्रू खाली पडले. आणि छातीवर असलेले तिच्या हातावरती ओलावा जाणवला अश्रू पडतानाचा.तसे मग तिने मागून मिठी सोडली आणि त्याच्या पुढ्यात येऊन उभी राहिले... भिरभिर त्याच्या नजरेत बघू लागली तर.....तर तिला त्याच्याही नजरेत तिच्या इतकीच भेटण्याची व्याकूळता दिसली...जेथे दोघेही उभे होते ते शहरातले शेवटच्या भागातल्या साईडचे घर असल्यामुळे येथून पूर्ण निसर्गरम्य वातावरण दिसत होते. सर्व टेकड्यांचा भाग स्पष्ट दिसत होता. त्यातून जाणारे आडरस्तेही वाकडे हेकडे .....हेकडे मेनरोड एखाद्या चित्रांमध्ये काढल्याप्रमाणे काळे डांबरी रस्ते तेही सुंदर दिसत होते.हिरव्या टेकडी ...Read More
नियती - भाग 20
भाग 20तिलाही तर तेच हवे होते... स्पर्शातून त्याच्या निरपेक्ष प्रेम जाणवत होते..... भावना उचंबळून गेल्या तिच्या .....सादाला प्रतिसाद देऊ तेवढीच...क्षण गेले काही चढाओढीचे.....त्यावेळी तिचेही हात त्याच्या पाठीवरून फिरत होते प्रेमळपणे.आणि आता त्याच्या स्पर्शात काहीतरी वेगळे जाणवू लागले तिला..वेगळेपण स्पर्शामध्ये जाणवताच तिने उजवा हात त्याच्या माने कडे नेला आणि केसांमध्ये घेऊन मुठीत केस पकडले आणि त्याची मान मागे ओढली...आणि मग.... मान मागे ओढल्यामुळे मोहितचा चेहरा वरउचलला गेला....तर डोळे त्याचे पाणावलेले होते...ती बोलू लागली...."मोहित ....माझी चिंता करू नकोस... तू गेल्यावर मी स्वतःची काळजी घेईन... स्वतःला जपेन रे...."ती पुढे म्हणाली......."बघ.......येथून गावाला गेल्यावर तर काही दिवस निवडणुकीच्या धामधुमीत जाईल... आणि असं तसं काही ...Read More
नियती - भाग 21
भाग -21बाबाराव......"अगं पोरी.. इथे...ते फक्त पाहायला येत आहेत.... पाहुणे म्हणून .... म्हणून आणि पाहायला आले म्हणजे लग्न जुळलं असं नाही ना ...!!! ...येऊ दे.... बघू दे..,. आपण संबंध वाढवू.... आपल्या निवडणुकीला योग्य होईल .....असे संबंधांमुळे निवडणूक लढण्यासाठी आणखी प्रबलन मिळते आणि मतांची वाढ होते आणखी भरपूर..... समजले काय गं..?? त्यासाठी येऊ दे त्यांना...मगची मग पाहू."असे म्हणून त्यांनी डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला..पण त्यावर ती.... शेवटी चूप राहिली........त्यादिवशी बाबारावांच्या बंगल्यामध्ये सकाळपासूनच मोठी धामधूम होती....मुलाकडची मंडळी गावातली होती तरी एका शेल्यावर राहणारी होती आणि ती मंडळी सर्व दुपारी येणार होती.पण त्यांच्या आगत स्वागतामध्ये कुठेही आणि काहीही कमी पडायला नको म्हणून बाबाराव प्रत्येक ...Read More
नियती - भाग 22
भाग 22"आपण बोलून काय उपयोग ...??"अशा हिशोबाचे व्यक्ती सावधपणे बोलत होते .....कोणी कसाही बोलला तरी गावात थोरामोठ्यांच्या बंगल्याच्या दारात लगीन धडाक्याने साजरे होणार आहे ....आणि या समारंभात .....ते दोन...चार दिवस उभ्या गावाची चंगळ राहणार आहे या कल्पनेतले सुख मात्र प्रत्येकालाच हवेहवे असे होते .....पण तिकडे मोहित.....तो घरात अभ्यास करत राहत असल्यामुळे त्याचे बाहेर काही तेवढे येणे जाणे नव्हते... त्यामुळे त्याच्या कानावर कोणतीही गोष्ट पडली नव्हती.जरी तो बाहेर कामानिमित्त गेलाही तरी बाबाराव यांच्या परिवाराबद्दल बोलणे हे उघडपणे होत नव्हते कारण..........त्या नावाचा धाकच एवढा होता की चुकून आपल्या तोंडून असं तसं काही निघायचं आणिआपला मूडदा चार दिवसांनी कुठेतरी लटकत दिसायचा या ...Read More
नियती - भाग 23
भाग 23आणि म्हणूनच ते मोहितला नाकारत होते आणि त्यांनी मनोमन हेही स्वीकारले होते की रक्त जरी त्याचे ब्राह्मणाचे असले लहानपणापासून तो कवडू साठेचा मुलगा म्हणून ओळखले जात होता आणि त्यांची एक जात सोडली तर मोहित एक चांगल्या व्यक्तीमत्त्वाचा अगदी त्यांच्या मायराला शोभेल असाच मुलगा आहे...बाबाराव यांनी झोपाळ्याचा मंद झोका थांबवला आणि वळून पाहत विचारले ...." कोण....??""मी...""कोण पाहिजे तुला... पोरी...??"पुढे येऊन उभी राहिलेली मुलगी ही आपल्या गावातली नक्कीच नाही हे बाबाराव यांनी व्यवस्थित ओळखले होते.तिला पूर्वी कधीही कुठेही पाहिले नव्हते.ही अनोळखी पोर का आली असावी आपल्याकडे...??? अशा विचारांमध्ये बाबाराव थोडा वेळ गप्प बसले एकटक पाहत तिच्याकडे.तिही बाबाराव यांना भेटायला आली ...Read More
नियती - भाग 24
भाग -24पण एक दिवस सुंदर तिला म्हणाला...."मिरा.... आपण लग्न करू ....माझ्या घरातल्या माणसांना हे नाही आवडलं ....तर आपण पळून लग्न करूया ...आयुष्यात मी लग्न करणार तर ते तुझ्याशीच ...नाही तर जन्मभर ब्रह्मचारी राहणार ......मीरा....तुझी माझी ताटातूट करण्याची ताकद माणसात काय ???....पण देवात सुद्धा नाही...."वगैरे वगैरे.... झालं ....या शब्दांवर मिरा भाळली.. भूलली... आणि इथेच चुकली.फार मोठी तिच्या हाताने चूक झाली आणि तिच्या आईला यातले काहीही माहीत नव्हते.आणि मग मिरा नावाच्या फुलाच्या भोवती.... सुंदर नावाचा भुंगा... गुणगूणत गुंजारव करत राहिला. आणि फुल फुलतच राहिले.आणि मग एक दिवस....... मग एक दिवस समजलेकी मिराला दिवस गेले आहेत.ती घाबरली... तिला समजत नव्हते आता काय ...Read More
नियती - भाग 25
भाग 25आता सुंदरला आपल्या प्रतिष्ठेला तडा गेल्यासारखे वाटले....त्याचे दुःख दुहेरी होते.मायरा सारखी मुलगी हातची गेली हे एक दुःख आणि गावकऱ्यांमध्ये बेइज्जत झाली हे दुसरे दुःख.असे दुहेरी दुःखाने सुंदरचे अंतकरण होरपळून गेले.आणि त्याने आपल्या मित्रांसमोर एक शपथ घेतली...""मायराला बायको म्हणून माझ्याच घरी आणिन.... तरच नावाचा सुंदर... नाहीतर डोक्यावरील केस आणि मिशी कापून ठेवीन. बाबाराव कुलकर्णी....कुठला जावई पसंत करतोय तेच बघायचं आहे मलां....गाठ सुंदर नानाजी शेलार याच्याशी आहे...???""आणि ही बातमी मग.... राममार्फत बाबाराव यांच्यापर्यंत पोहोचली.....बाबाराव..."काय....??? त्या नानाजी शेलारांच्या दिवट्याचीएवढी हिंमत....???की तो बाबाराव कुलकर्णी ला आव्हान करणार....???हा बाबाराव काही एवढा लेचापेचा नाही..... मुंडन करायला तयार राहा म्हणावं...... जावई तर आम्हाला मिळेलच पंचक्रोशीत ...Read More
नियती - भाग 26
भाग 26तोपर्यंत त्यांचा एवढा मोठा आवाज ऐकून बाहेरील असलेला वॉचमन कम बॉडीगार्ड.. तेथे आला ...तर नानाजी यांना... बाबाराव यांनी दिले त्याच्याकडे...नानाजी यांनी कसेबसे स्वतःला सावरले आणि व्यवस्थित सरळ उभे झाले...वॉचमन कम बॉडीगार्ड..."चला ...बाहेर चला....."म्हणत जवळपास ओढत बाहेर घेऊन जाऊ लागला.नानाजी या घोर अपमानाने अद्वा तद्वा बोलू लागले बाबाराव यांच्या बद्दल....वॉचमन ने त्यांना जवळपास ओढतच गेटच्या बाहेर आणले आणि समोर ....गेटच्या बाहेर....कवडू चामुलगा... मोहित उभा होता.त्याला नानाजी यांनी व्यवस्थितरित्या ओळखले. आणि पुन्हा त्याच्याकडे पाहून अद्वा तद्वा बोलू लागले ...वॉचमनने त्यांना ओढत रस्त्याला समोर लावले. आणि ते तसेच बडबडत निघून गेले.आणि त्यांच्या त्या बडबडण्यावरून मोहित समजून गेला की सुंदर बद्दल काय ...Read More
नियती - भाग 27
भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोदरच मायरा हीने पुढे येऊन म्हटले....."परिस्थितीचे भान त्याला अगोदरच आहे. त्यानेच मला हा आरसा दाखवला होता पण मी असे काही मानत नाही....."बाबाराव मोहित कडे पाहून म्हणाले..,.."मग तू जेव्हा हिला परिस्थितीचा आरसा दाखवला तेव्हा काय म्हणाली ही मुलगी....."तर त्यावर..........."मालक ....तेव्हाच काहीही असो ....आपण आताच बघूया का.....??? खरं म्हणजे आता आम्ही....."मोहितला पुढे बोलू न देता बाबाराव म्हणाले...."मोहित तू शहरांमध्ये चांगल्या ठिकाणी वावरला आहेस. चांगले विचार तू करायला शिकला आहे.आता मला सांग ... एकुलत्या एका पोरीकडून मी काही अपेक्षा बाळगल्या तर माझं काही चुकलं.मला हेही माहिती आहे की तिने ऐकलं नसेल तुझं पण .....निदान तू विचार करायला ...Read More
नियती - भाग 28
भाग 28मायरा...." नाही.... बाबा तो खरच माझ्यावर खूप प्रेम करतो..... मी त्याच्यासाठी कष्ट करायला तयार आहे.... तो माझ्यावर एवढा करतो .....प्रसंगी माझ्यासाठी तो काहीही करायला तयार होईल ....मला थोडे दिवस कष्ट घ्यावे लागतील एवढेच...."बाबाराव...."बरं... चला..आता मला एकांत हवा आहे...आणि अटी लक्षात ठेवा...."मोहित आणि मायरा बाहेर निघाले. रामला बाबाराव यांनी थांबवून घेतले...मोहित समोर निघाला होता की मागून रामने पटापट येऊन आवाज दिला... आणि मग...राम म्हणाला......"मोहित राव ...एक मिनिट"जवळपास धावल्यागंत येऊन दोघांच्या जवळ उभा राहिला आणि म्हणाला......"मालक म्हणत आहेत की तुम्हाला जर बोलायचं असेल तर ताई साहेबांच्या खोलीमध्ये जाऊन बोलू शकता अर्धा एक तास..."तसे मोहितने मायराकडे पाहिले.... मायराने होकारार्थी मान हलविली....मग ...Read More
नियती - भाग 29
भाग 29इकडे रूम मध्ये आल्यानंतरमोहितला रूम मधील सोफ्यावर बसण्याचा इशारा केला मायराने आणि दाराला कडी घातली.....तसा मोहित दचकला आणि....म्हणाला....."ए हे काय करते आहेस तू. ??? ....दरवाजा उघड... बंद करू नकोस..."मायरा दरवाजा बंद करून दरवाजाला टेकून उभी राहिलेली त्याच्याकडे पाहत.....तिच्या नजरे कडे बघूनच तो समजला होता की ती चिडलेली आहे.... त्यालाही त्याची चुकी लक्षात आली आता....भीतीने मनात त्याने आवंढा गिळून गप्प राहून तिच्याकडे पाहू लागला...तिने रागाने दोन्ही हात कमरेवर ठेवून त्याला म्हणाली..."तू मला बाबांसमोर..... आपल्या लग्नासाठी नकार द्यावे असे वाटत आहे म्हणालास...!!"मायराच्या चेहऱ्यावर हावभाव पाहून....मोहित...."अगं ...तसं नाही म्हणायचं होतं मला.... मी.."त्याची भीतीने बोबडी वळली होती...ती एक एक पाऊल समोर येत ...Read More
नियती - भाग 30
भाग 30मोहित आता गंभीर होऊन मायराला म्हणाला...."मायरा.... आपण कोर्ट मॅरेज करायचं.... की मंदिरात लग्न करायचं.... काय ठरवलं आहे सांग कारण दिवस कमी राहिले... मी आई-बाबांशी बोलून घेतो या विषयावर... तुही तुझ्या बाबांशी वगैरे बोलून घे..."त्यावर तिने केवळ हुंकार दिला.... त्या विषयासंबंधीत चर्चा करून झाल्यानंतर त्याच मार्गाने मोहित परतला...आणि घरी पोहोचला तर.......दुरून त्याला घराच्या अंगणात त्याचा मामा आणि मामी दिसली. मामा आणि मामी खाटेवर बसून होते.आई त्यांच्यासमोर पाटावर खाली बसून होती.. आणि बाबा दरवाजाजवळ एका स्टूलवर बसलेले पाहिले....तो दूरूनच विचार करू लागला की काय झाले असेल...?? कारण त्याला त्याची आई पदराने अश्रू पुसतांना दिसली...तो मंद पावले टाकू लागला....तेवढ्यात त्याच्या बाबांना ...Read More
नियती - भाग 31
भाग 31मोहित....."मला नको ती.... तुला आणि मला राबवून घेईल दोघे बापलेकं ...सगळेच दिवस... मजुरासारखे...तुला मजूरंच बनून राहायचं आहे का...???तीन थांब फक्त... तुला मी मग.... बंगल्याची राणी आणि बाबांना बंगल्याचा राजा बनवेल."असं म्हणून मोहितने पार्वतीच्या माथ्यावर ओठ ठेवले.......तिकडे कुलकर्णी बंगल्यासमोर...रात्री साडेनऊच्या दरम्यान ..... कारचा करकचून ब्रेक दाबल्यामुळे जोराने आवाज झाला.,... आणि आरामशीर बसून असलेला वॉचमन दचकून उभा झाला ....आणि.....एक आलिशान काळ्या रंगाची कार गेट समोर उभी राहिली... वॉचमन ने गेट खोलले.... कार आत मध्ये बंगल्यात एका साईडने घेतली आणि पुन्हा नियंत्रण सुटून मग गचकन ब्रेक दाबल्यामुळे ती पोर्चच्या खांबाला जिथे झोपाळा होता तेथे धडक देता देता थांबली....त्यातून जी व्यक्ती उतरली ...Read More