शहरातील एक प्रशस्त नामांकित कॉलेज. आज तो कॉलेजचा हाल फुलून गेला होता.. रंगबिरंगी फुलांनी बाग जशी फुलून जाते त्याप्रमाणे हजार बाराशे स्टुडंट्स रंगीबिरंगी कपड्यांमध्ये वावरत होती. हसत खेळत एकमेकांसोबत सेल्फी काढत होती. तर कुणी एकमेकांसोबत डान्स करत व्हिडिओ बनवून घेत होती. हसत्या खेळत्या फुलांनी भरलेला बगीचा वाटत होता तो संपूर्ण हॉल. कार्यक्रम सुरू झाला. अतिथी गणांनी स्टेजवर प्रवेश केला. संचालन करण्यासाठी ज्या दोन विद्यार्थिनी होत्या. त्यांनी उत्कृष्ट संचालन करणे सुरू केले. प्रतिष्ठित व्यक्ती स्टेजवर बसलेली त्या सर्वांची स्वागतं पुष्पगुच्छाने केली गेली. त्याबरोबरच त्यांचे स्वागत छानसे स्वागत गीताने पण नृत्य समवेत केले गेले. स्वागत समारंभ संपल्यानंतर मग विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ सुरू करण्यात आला.

1

नियती - भाग 1

भाग १शहरातील एक प्रशस्त नामांकित कॉलेज. आज तो कॉलेजचा हाल फुलून गेला होता.. रंगबिरंगी फुलांनी बाग जशी फुलून जाते हजार बाराशे स्टुडंट्स रंगीबिरंगी कपड्यांमध्ये वावरत होती. हसत खेळत एकमेकांसोबत सेल्फी काढत होती. तर कुणी एकमेकांसोबत डान्स करत व्हिडिओ बनवून घेत होती.हसत्या खेळत्या फुलांनी भरलेला बगीचा वाटत होता तो संपूर्ण हॉल.कार्यक्रम सुरू झाला. अतिथी गणांनी स्टेजवर प्रवेश केला. संचालन करण्यासाठी ज्या दोन विद्यार्थिनी होत्या. त्यांनी उत्कृष्ट संचालन करणे सुरू केले.प्रतिष्ठित व्यक्ती स्टेजवर बसलेली त्या सर्वांची स्वागतं पुष्पगुच्छाने केली गेली. त्याबरोबरच त्यांचे स्वागत छानसे स्वागत गीताने पण नृत्य समवेत केले गेले. स्वागत समारंभ संपल्यानंतर मग विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ सुरू करण्यात आला.हे ...Read More

2

नियती - भाग 2

भाग 2मोहित जेव्हा स्टेजवर आला तेव्हा तो गोंधळून गेला होता.अगदी तसंच जेव्हा दाखवायला आणलेल्या मुलीला हातात चहाचा ट्रे देतात हॉलमध्ये पाठवून सर्वांसोबत बसवून मग प्रश्न विचारतात तेव्हा जशी तिची अवस्था होते त्या बिचार्‍याची अवस्था झाली होती.सर्वांग घामाने डबडबले त्याचे...फासावर चढवण्यासाठीच जणू त्याला आणलेले होते.कसाबसा थरथरत्या पायांनी मोहित स्टेजवर चढला.शाल श्रीफळ तसेच डिग्री देऊन मान्यवरांनी त्याचा सत्कार केला...उसने अवसान आणून चेहरा हसतमुख ठेवला होता त्याने.तेवढ्यात संचालन करणाऱ्या विद्यार्थिनींनी म्हटले..."तर डियर फ्रेंड्स....मिस्टर मोहित आता आपल्या सोबत आपले विचार , आपले एक्सपिरीयन्स...शेअर करतील..सो... मिस्टर मोहित....!!!"आणि हे ऐकूनच त्याचे पाय......त्याच्या पायात आतापर्यंत जो त्याने धीर एकवटून ठेवलेला होता ..तोही आता गळून पडला...आणि...............आणि आता ...Read More

3

नियती - भाग 3

भाग 3मुकाट्याने मोहित झोपडीत शिरला. बाहेरच्या पेक्षा आत दुर्गंधी अधिक होती. त्याला त्या दुर्गंधीचे काहीच वाटत नव्हते. कारण दुर्गंधी नेहमीची सवय झाली होती.तेवढ्यात त्याची लक्ष त्याच्या मामाकडे गेले. मामा अधाश्यासारखा मोहितच्या ठेवलेल्या सिल्वर ट्रॉफी कडे पहात होता एकटक.मोहितचेही लक्ष गेले की मामा आपल्या सिल्वर ट्रॉफी कडे एकटक बघतोय.त्याचे मामा विचार करत होते...."हा चांदीचा कप आहे म्हणतोय मोहित. तर हा कप किती रुपयांना विकता येईल...??"त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून मोहित ही समजून गेला की त्यांच्या मनात काय आहे...??...मनीषा काय आहे...???"मोहित्या हे काय आहे...???""मामा ...माझं बक्षीस आहे ते मला मिळाले आहे.""बक्षीस किती रुपयांचा असेल...???"मोहित आता खरच मनातून चरकला. गडबडून त्याने मामाच्या तोंडाकडे ...Read More

4

नियती - भाग 4

भाग 4बैठकीकडे जायचे होते तर बैठकीचा जिना दोन भिंतीच्या मध्ये होता भुयारा सारखा वरती चढणारा.स्टेप्स चढताना दोघेच होते. ती पुढे चढत होती. तिच्या मागे मागे खाली पाहत तो चढत होता. आणि एका क्षणाला ती मध्येच थांबली. आणि पलटली.हा आपला खाली पाहतच.. आणि मग..लक्ष नसल्यामुळे तो तिला धडकला गेला. आणि ती धडपडत होती तर त्याने पटकन तिला सावरले.दोन क्षणांसाठी दोघांचीही ह्रदय धडधडू लागले होते.पण काहीही झाले तरी मोहित हा विलक्षण संयमी स्वभावाचा होता. त्याने तिला व्यवस्थित सरळ उभे केले.आणि पुढे पाहून चालण्याचा इशारा केला. नजर चुकवून तो वर खाली पाहू लागला कोणी पाहत तर नाहीये......जवळपास 20 मिनिटांनी बैठकीतून मोहित परत ...Read More