मात

(128)
  • 235.8k
  • 32
  • 150.1k

रेवती बसथांब्यावर नेहमी प्रमाणे.. नेहमीच्या वेळेवर वाट पाहत उभी होती. ती स्वताःशीच कुजबुजत होती.. अजुन कसा आला नाही बरे हा. एरवी तर वेळेच्या आधीच पाच मिनिट हजर असतो . पंधरा मिनिट होऊन गेले तरी आला नव्हता. रेवतीने बॅगेतून मोबाईल काढला आणि फोन लावू लागली. पण फोन संपर्क क्षेत्राबाहेर होता. तिला वाटले गाडी चालवत असेल किंवा रेंज नसेल.. म्हणून ती तशीच परत वाट पाहत उभी राहिली. अर्धा तास झाले तरी सुहासचा काही पत्ता नव्हता. आता मात्र तिचा जीव घाबरा घुबरा होऊ लागला. तिने परत फोन लावण्याचा प्रयत्न केला.. परत लागला नाही. काही कळण्यास मार्ग नव्हता. हा मुलगा आहे कुठे? ही काय पद्धत

Full Novel

1

मात भाग १

रेवती बसथांब्यावर नेहमी प्रमाणे.. नेहमीच्या वेळेवर वाट पाहत उभी होती. ती स्वताःशीच कुजबुजत होती.. अजुन कसा आला नाही हा. एरवी तर वेळेच्या आधीच पाच मिनिट हजर असतो . पंधरा मिनिट होऊन गेले तरी आला नव्हता. रेवतीने बॅगेतून मोबाईल काढला आणि फोन लावू लागली. पण फोन संपर्क क्षेत्राबाहेर होता. तिला वाटले गाडी चालवत असेल किंवा रेंज नसेल.. म्हणून ती तशीच परत वाट पाहत उभी राहिली. अर्धा तास झाले तरी सुहासचा काही पत्ता नव्हता. आता मात्र तिचा जीव घाबरा घुबरा होऊ लागला. तिने परत फोन लावण्याचा प्रयत्न केला.. परत लागला नाही. काही कळण्यास मार्ग नव्हता. हा मुलगा आहे कुठे? ही काय पद्धत ...Read More

2

मात भाग २

रेवती तशीच विचार करत करत बेड वर पडून होती. संध्याकाळ झाली होती.तिने सकाळ पासून काहीही खाल्लेले नव्हते. जुई केव्हाची उठून काही तरी खाऊन घे म्हणून सांगत होती.चल जरा चक्कर मारुन येऊ म्हणजे तुला बरे वाटेल म्हणाली. पण रेवतीला कसालाच उत्साह नव्हता. ती पडल्या पडल्या फक्त एकटक मोबाईल कडे बघत होती. जुईने तिला थोडे हलवल्यावर ती कशीबशी बेडवर उठून बसली. दोन्ही हात लांबवून एक मोठा आळस दिला..घड्याळावर एक नजर टाकली..तिने चेहऱ्यावर पाण्याचे ३-४ सपकारे मारले.. तेवढ्यात तिचा फोन वाजला..सुहास शुद्धीवर आला होता.. रेवतीला फार बरे वाटले.. त्याचे आई-बाबा पण आले आहेत हे ऐकून रेवतीची काळजी बऱ्यापैकी कमी झाली. तिला सुहासला ...Read More

3

मात भाग ३

रेवतीला सुहासच्या वागण्यातील बदल जाणवू लागले होते पण कारण तिच्या लक्षात येत नव्हते..आपले काही चुकले का? आपण अनावधानाने सुहासला दुखावले का? काही काही कळण्यास मार्ग नव्हता.. या घडीला तरी तिला हे सगळेच तिच्या आकलना पलिकडचे वाटत होते..पण हे मुरणारे पाणी कोणत्या प्रवाहाला जाऊन मिळत आहे.. प्रवाहाचा वेग मंदावला आहे की प्रवाहाने त्याची दिशाच बदलली आहे याचा छडा लावायचा चंगच रेवतीने बांधला होता..ती फार अस्वस्थ झाली होती की काहीतरी असे आहे जे सुहास आपल्या पासून लपवत आहे आणि ज्यामुळे तो आपल्याला टाळत आहे..एवढ्या सुंदर कणाकणाने बहरलेल्या नात्याची रेशमी वीण एवढ्यात उसवायला सुरुवात तर झाली नसेल ना! अचानक रेवतीच्या मनात विचार ...Read More

4

मात भाग ४

मोबाईलच्या अलार्मने रेवतीची झोप मोडली.. तो बंद करून ती एका कुशीवर झाली.. कालचा अस्वस्थपणा बहुधा तिच्या उठण्याची वाट पाहत.. ठाण मांडून बसला असावा.. ती जागी होताच काही सेकंदातच कालचा तो अस्वस्थपणा रेवतीला परत जाणवू लागला..ती बेडवर उठून बसली.. डोके जड वाटत होते तिला.. दोन्ही हातांनी केसांना मागे घेऊन क्लच लावले.. नंतर नेहमीच्या सवयीप्रमाणे तिने दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासले.. त्या निर्माण झालेल्या ऊर्जेचा शेक डोळ्यांना आणि चेहऱ्याला देत तिने आपल्या नवीन दिवसाची सुरुवात केली..खिडकीचे पडदे बाजूला करून सूर्याच्या कोवळ्या किरणांना खोलीत प्रवेश करण्यास तिने वाट मोकळी करून दिली.. खिडकीची काच उघडली तसा सकाळचा प्रदूषणविरहित मंद वारा खिडकीच्या पडद्यांशी खेळू ...Read More

5

मात भाग ५

"प्रतीकला खरंच काही माहीत नाही की तो आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे? पण नेमके काय?तो बोलताना चाचरत का असे काय असावे की तो प्रतीक जो सुहास चुकल्यावर त्याचे कान पिळायलाही मागेपुढे पाहायचा नाही.. जो आपल्याला नेहमी आधार द्यायचा.. भांडणात बऱ्याचदा मध्यस्थी करायचा.. तो ही आपल्या मित्राच्या बाजूने त्याच्या लपवाछपवीत सामील असावा.. काय चालू काय आहे नक्की या दोघांचे.."रेवतीला काही सुचत नव्हते..प्रतीकची आणि तिची पहिली भेट तिला आठवली.. सुहासने त्या दोघांची एकमेकांशी ओळख करून दिली होती.. अगदी मोघम पाच मिनिटं बोलणं झाले असेल त्या वेळेस..पण त्यानंतर हळूहळू प्रत्येक भेटीगणिक प्रतीकशी वाढत गेलेली रेवतीची मैत्री.. तिला प्रतीकमुळे निखळ आणि निस्वार्थ ...Read More

6

मात भाग ६

रेवतीची रिक्षा एक स्थिर सुरक्षित अंतर ठेवून सुहास आणि प्रतीकच्या दुचाकीचा पाठलाग करत होती..अंतर कापले जात होते खरे पण जागीच थिजल्या सारखी झाली होती.. रेवातीचे हातपाय थरथरत होते.. रिक्षात बसल्या बसल्या विचारांच्या आहारी जाऊन ती आपल्या नखांचे चर्वण करत होती.. मधेच दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंतवून हनुवटीला लावत होती.. मधेच मोबाईल बघत होती.. मधेच रिक्षाच्या पुढच्या काचेतून सुहास आणि प्रतीक यांना घेऊन चाललेली दुचाकी दृष्टीक्षेपात आहे का याची खात्री करत होती..त्या दोघांना जर कळले की मी त्यांचा पाठलाग करत होते तर काय वाटेल त्यांना..? आपण बरोबर तर करत आहोत ना..?खरे पाहता ही एक आयती संधीच चालून आली होती रेवतीकडे ...Read More

7

मात भाग ७

रेवती सध्या वेगळ्याच मनस्थितीत होती.. विचार करून करून डोक्याचा भुगा झाला होता..तिला कळत होते की तिचे प्रतीकशी बोलणे झाल्याशिवाय.. सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाल्याशिवाय तिला काही चैन पडणार नाही..रेवतीने बराच विचार करून.. जे होईल त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवून.. आणि हिंमत एकवटून.. मनाशी काहीतरी निश्चित केले.."रेवती, जरा शांतपणे बोल.. घाई करू नकोस.. प्रकरण तुला वाटले होते त्यापेक्षा वेगळे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.." ती स्वतःशीच संवाद साधत होती..घडलेल्या प्रसंगांची साधारण मनाशी उजळणी करत करतच तिने प्रतीकला फोन लावला.."काय म्हणतोयस? कसा आहेस?.. मला तुला जरा तातडीने भेटायचे आहे"स्वतःला शांत राहण्यास बजावूनही.. एकंदरीत सगळ्या घटनाक्रमामुळे तिला स्वतःच्या वागण्यावर ताबा ठेवता आलेला नव्हता..रेवती ...Read More

8

मात भाग ८

रेवती अगदी बधीर झाली होती ते सगळे ऐकून.. प्रतीकला रेवतीची अवस्था पाहून खरे तर काय करावे ते सुचत नव्हते.. मोठा आघात झाला होता तिच्या मनावर.. हेच टाळण्याचा प्रयत्न तो आणि सुहास गेल्या कित्येक दिवसांपासून करत होते.."सांभाळ स्वतःला.. चल निघू या का?" प्रतीकअंगात बळेच अवसान आणून कसेतरी रेवती तिथून बाहेर पडली..प्रतीक गेल्यावर रेवती तिच्या गाडीजवळच शुन्यात.. विचारांच्या गर्तेत हरवलेल्या अवस्थेत उभी होती.. खरंतर तिला जे ऐकले त्यावर विश्वास बसत नव्हता.. किंबहुना तिला त्यावर विश्वास ठेवायचा नव्हता असे म्हणावे लागेल.. तिच्या गाडीच्या शेजारी उभी असलेली गाडी पार्किंग मधून बाहेर काढत असणाऱ्या माणसाने हॉर्न वाजवल्यावर रेवती भानावर आली..तिला काही केल्या होस्टेलवर जाण्याची ...Read More

9

मात - भाग ९

0सुहास २ मिनिटे अवाक झाला.. तिच्याकडून अश्या प्रतिसादाची त्याने अपेक्षाच केली नव्हती..रेवतीने सुहासच्या कानाखाली लावून दिली खरी पण नंतर त्याच्या गळ्यात पडून रडू लागली..तिला तिच्या भावनांना आवर घालता आला नाही.. इतक्या दिवसाची घुसमट आणि अस्वस्थता तिच्या डोळ्यांवाटे बाहेर पडत होती..सुहासला रेवतीची एकंदरीत स्थिती पाहून आता पूर्ण खात्री पटली होती कि तिला सत्य परिस्थितीची जाणीव झालेली आहे.. त्याच उद्विग्न मनःस्थितीत नियंत्रणाबाहेर जाऊन तिने हा प्रतिसाद दिला असावा..आपल्या आजाराबद्दल हिला कळले म्हणजे प्रतीकला सांगायला भाग पाडले असणार रेवाने.. नाहीतर तो स्वतःहून सांगणे शक्यच नाही..प्रतीकने रेवतीला ते भेटले तेव्हा सगळे सांगितले होते.. "रेवती मन घट्ट करून ऐक.. ऐकल्यावर तुला त्रास होणार हे ...Read More

10

मात - भाग १०

रेवतीचे आई -बाबा फारच काळजीत पडले होते..काळजाचा तुकडा असा स्वतःहून विहिरीत पडतोय हे बघून त्याला ते आपल्या डोळ्यांदेखत विहिरीत पडू देणार होते.. रेवतीच्या बाबांचा विरोध होता.. ते रेवतीला म्हणले “भावुकता एकीकडे आणि वास्तविकता एकीकडे.. संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे.. मी तुला हा असला वेडेपणा करू देणार नाही..”पण रेवती कोणाचेच ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती.. त्यामुळे हे प्रकरण जरा वेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न रेवतीच्या बाबांनी ठरविले..त्यांनी सुहासला घरी बोलावून घेतले.. एकांतात त्याच्याशी बोलायचे होते त्यांना.. त्यांची काळजी सुहासच्या लक्षात आली होती..तो ही तेच म्हणाला “ती अजिबात ऐकत नाही आहे.. मी तिला माझ्या पासून तोडण्याचा खूप प्रयत्न केला.. पण ती काही ऐकत नाही.. यावर ...Read More

11

मात - भाग ११

रेवतीने त्याला घरी सोडले. डॉक्टर काय म्हणाले ते सुहासच्या आई-बाबांच्या कानी घातले. सुहासच्या आईने देवा समोर साखर ठेवली.सुहास दोन परत डॉक्टरांकडे गेला... गोळ्यांनाही त्याचे शरीर चांगला प्रतिसाद देत होते. डॉक्टरांच्या कृतींमधूनही आता खूप सकारात्मकता जाणवत होती. डॉक्टरांनी त्याला आता पुढील तीन महिन्याचा आराखडा लिहून दिला. गोळ्या, औषधे, पथ्य-पाणी आणि डॉक्टरांना भेटण्याच्या वेळा...सर्व ठरल्याप्रमाणे चालले होते. अडीच महिन्यात सुहासने तब्बेत सुधारण्या बाबत बरीचशी प्रगती दाखविली... डॉक्टरांनी तो सर्व आराखडा अजुन १ महिना राबवला...१ महिन्यात परत जवळ जवळ पूर्ववत होणाच्या कक्षेत आलेल्या सुहासला त्रास होऊ लागला... डॉक्टरांनाही अचानक काय झाले याचा अंदाज येईना...सुहासची तब्बेत आता वरचेवर खालावत चालली होती... त्याला अंथरुणावरून ...Read More