#मिटू

(74)
  • 63.2k
  • 68
  • 29.9k

मी टू आजूबाजूला घडणाऱ्या स्त्री अत्याचाराचा आढावा घेत ह्या विषयावर कथा माध्यमातून सविस्तरपणे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे . आज भारता सारख्या सुजलाम सुफलाम देशात स्त्री कुठेच सुरक्षित नाही अगदी चार भिंतीच्या आतही नाही आणि सताड रस्त्यानेही . मग प्रश्न पडतो अश्या ह्या देशाला सुजलाम सुफलाम म्हणावे का ? ज्या स्त्रीवर अत्याचार घडतो ती ही सार काही बदनामी होऊ नये म्हणून गप्प गुमान सहन करत असते ह्याची ती कुठेच वाच्यता करत नाही . अश्या स्त्रियांनी स्वतःला न्याय मिळावा म्हणून समोर येणे गरजेचे असते . आणि गुन्हेगाराला मोकाट न सोडता परत कोणी त्याची शिकार होवू नये म्हणून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा हा प्रयत्न ..

Full Novel

1

#मिटू ( भाग -1)

#metoo हया माझ्या कादंबरीबद्दल मी वाचकांना काही सांगू इच्छिते ....आपणाला #metoo बद्दल काय माहिती आहे हे मला ठाऊक नाही पण #metooहे स्त्रियांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचे माध्यम आहे जिथे स्त्रिया आपल्यावरझालेल्या अन्यायाविरुद्ध बोलतात ...#metoo स्त्रियांनी आपल्यावर झालेल्या अतिप्रसंगाची वाचा फोडली आहे .मराठी वाचकांपर्यंत ही वस्तुस्थिती पोहचवण्यासाठी प्रतिलिपीच्या साह्याने मी#metoo सदर लेखन करते आहे ....वाचकांसाठी :- माझ्या प्रिय वाचकांनो comments करून फक्त छान उत्तम असंलिहू नकातर आपल्याला पडलेली प्रश्न ....⏩आपण ही ह्या अशा हिंसात्मक घटनांना बळी पडलेल्या आहेत का ❔❔⏩आपल्या सभोवताली घडलेल्या अश्या हिंसेला आपण कधी विरोध दर्शविण्याचा⏩प्रयत्न करून गुन्हेगारीला आळा घातला आहे का ❔⏩नक्की सांगा ....येत्या दिवसात आपण बघतोच स्त्रिया ...Read More

2

#मिटू ( भाग -2)

मास्टरबेशन ( भाग - 2 )नेहा ( बदलेले नाव ) बस ची वाट बघत बसस्टॉप वर उभी होती .अचानक लक्ष समोर असलेल्या एका टिनपत्राच्या झोपड्याकडे गेलंसमोरचा सुरू असलेल्या प्रकार बघून नेहाला धक्कादायक अंगावर शहारेबसले ... चर्रर्र घाम आला ओढणीने घाम पुसत बस लवकर यावी आणि इथूनसुटका व्हावी म्हणून स्वतःच्याच मनाला ती केविलवाणी विनवण्या करत होती .असं काय दृश्य बघितलं होतं नेहाने ज्यामुळे ती घाबरली होती ❔❔ते दृशच लाजिरवाण आणि एका स्त्रीला अनामीकपणे त्रासदायक ठरू शकतं .नेहा 23 वर्षाची तरुणी रोज कॉलेजला जाण्यासाठी त्या बसस्टॉप वरूनबस पकडते .असा प्रसंग तिच्या वाट्याला किंवा एखाद्या व्यक्तीला नवखाच असू शकतो .तिला ही हा ...Read More

3

#मिटू (भाग -3)

अस्सलाम वालेकुमअब्बा ,कसे आहात तुम्ही ?काय झालं ??ओळखलं नाहीत .....अहो मी तुमची मुलगी आलिया !नाही आठवतं ?काही वर्षांपूर्वी तुम्ही हक्काच्या बायको आणि मुलीकडे चक्करमारत यायचे . त्या गरिबीच्या झोपडीत भेटायला ..माझ्यासाठी फुगे विकत घ्यायला वेळ नासायचा तुमच्याकडे म्हणूनहातात दोन पैसे टाकत बाप होण्याचं कर्तव्य निभावत निघून जायचे तुम्ही ....नाही ?काय आठवतं ना तुम्हाला ??नेहमी अम्मीला म्हणायचे हिचं नाव अफ्रिन चुकीचं ठेवलं तू हीच नाव तरआलिया ठेवायचं होतं ... मग्रुरता पाहिलं का ह्या छटकीची ??आणि शेजाऱ्या सोबत फटकरत मी इंग्लिश बोलायची तेव्हा माझी खोड काढततुम्ही चिडवायचे I Walk in english , i talk in english , i laugh inenglish because ...Read More

4

#मिटू ( भाग -4)

ब्रोकन हार्ट तीन वर्षांपूर्वी जेव्हा पॉलीटेकनिकच्या द्वितीय वर्षाला मी एका हॉस्टेलवरराहायची .आमची रूम म्हणजे थ्री शिटरची . दोन रूम दोघीही माझ्या पेक्षा सिनिअरहोत्या . अनुष्का ताई स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या तर त्या रूम वरच राहायच्या .रजनी ताईच लॉ च लास्ट इयर होतं त्या कॉलेज मध्ये जायच्या .माझा ही नऊ वाजता पासूनचा पूर्ण वेळ चार पर्यंत कॉलेज मध्ये जायचा .हॉस्टेल जॉईन करून जवळ जवळ सहा सात महिने झाले होते मला .अनुष्का ताईला एकाच रूम मध्ये चार पाच वर्षे . काही दिवसांनी समजलंकी त्यांचे नातेवाईक आहेत पण त्यांना आई बाबा नाहीत ...हे कळल्यावर खूप वाईट वाटलं मला .संध्याळच्या वेळेला मी आणि रजनी ...Read More

5

#मिटू ( भाग -5)

खूप दिवसांनी तिचा आज msg आला .... मी म्हटलं बरी आठवण केलीआज आमची ... तर ती म्हणाली , ते कोई मिल गया मधले एलिअन्स नाही का ... सर्च करा सर्च करा तेव्हा कुठेत्यांना संदेश पोहचल्यावर जमिनीवर येता तशा आहात मॅडम ...! मी म्हटलं काय बोलते शलाका हे ?तर ती म्हणाली , अरे तुझं व्हाट्सएपच बंद होतं तर तुला msg कशी करू मी आणि तू च नाही काआता म्हणाली बरी आठवण केली आमची .... मी हम्म म्हणून msg टाकला ....आणि ऑफलाईन झाली ....स्क्रीनवर तिचा msg झळकला , तुला काही सांगायचं आहे ... तिला काय सांगायचं आहे मला ... ह्याच उत्सुकतेपोटी मी ...Read More

6

#मिटू ( भाग -6)

बेनाम जिंदगी मे कुछ ऐसेही किस्से मजहब तरस्ते हुये रुह को निचोडते पनाहे अपनेपण की क्या खूब भी क्रूरताने रोंधी है मानवता यहा ! काय वय असावं तीच ? बारा पंधरा ....तारुण्याच्या उंबरठ्यावर पडलेली पाऊले तिच्या जगण्याची दशा मागे खेचत होती ...आणि ती ... बंद खोलीत स्वतःला बंधीस्त करून घेत जगणारी ! नाही .....दुनियादारीत वावरताना ती मात्र जखमा खोलवर रुजवंत त्या कोसत जगत होती .बाप दारोडा दारू पिऊन यायचा आणि आईला बेदम मारायचा त्याचा मारालाकंटाळून दोन ...Read More

7

#मिटू ( भाग -7)

ही गोष्ट आहे तेव्हाची ..... action ..... अहो मॅडम ,नीट .... नीट समजून घेऊन तो म्हणाला , आपल्याला शॉर्ट फ्लिमसाठी रोल प्ले करायचा आहे जरा जबरदस्त आणि झकास व्हायला पाहिजे ... ओढणी सांभाळत हात समोर असलेल्या टेबलाला टेकवतच ऋत्विक म्हणाली , करा तुम्ही चालू .... 1 , 2, 3 स्टार्ट action ....... प्ले ! काय घेशील , चाय कॉपी की ज्यूस नाही म्हणजे घरी जाऊन आपल्याला तुझ्याकडे जेवायचंच आहे .... विनय तिला बोलता झाला . तशी ऋत्विक ही गोंधळलीच काय बोलू आणि काय नको असं झालं तिला . रात्रीच थंडगार वातावरण आणि आजूबाजूचा परिसरात झाडाचा ...Read More

8

#मिटू ( भाग -8)

रिलेशनशिपनाती म्हणतात ना एक विसावा असतो आपुलकीचा त्या नात्यावर आपणडोळेझाक पणे विश्वास ठेवतो .एक सत्य घटना काव्या सोबत घडलेली आजही ती त्या घटनेला विसरलेली नाहीबारावी झालं आणि ती आपल्या आते भावाकडे शिकायला गेली . आत्या मामाजीहयात नव्हतेच आते भावाचं लग्न झालेले .... तिची वहीनी 2 , 3 महिण्याकरिताबाळंतपणासाठी माहेरी गेली होती .काव्याने इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली होती हॉस्टेल मिळत नव्हत म्हणूनआते भावाने त्याच्या घरी राहायला तिला परवानगी दिली .तिला ही खूप छान वाटलं . इथे कसलीच आपल्याला उणीव भासणार नाही म्हणून .काव्याच्या आत्याच अगदी मेनरोडला लागून तीन मजली घर होते . तिथूनकॉलेजला जायला काव्या घरासमोरुनच बस पकडायची .एक महिना निघून ...Read More

9

#मिटू ( भाग -9)

छळाला सुरूवात नात्यातून ?संयुक्ता इंजिनीयरींगची विद्यार्थींनी ..... आज तीन चार वर्षानंतर भेटली बीई पुर्ण झालंम्हणे एवढ्यात माझं डोकं खुप गं ... तिचं डोकं दुखण्यामागचं नेमक कारण काय असावंडॉक्टरकडे जाण्याचा सल्ला तिला देणं योग्य ठरावा छे ! टेबलेट घेऊन ताण कमी व्हावा अशातलंकाहीच नव्हतं ...वेगळ्याच काही कारणाने स्वतः ला खुप Depress फिल करतं होती ती .....प्रदिप ( बदलेले नाव ) तिचा हा चुलत मामेभाऊ गेल्या एक वर्षा पासून तिच्या वॉटसअँपवर होता ...फेसबुक वरून त्याने हिला तिचा वॉटस अँपनंबर मागितलेला आणि तिने देऊनही दिला ...नातेवाईक आहे ह्या विश्वासाखातीर .....गेली दहा अकरा महिने झाली तो बोलायचा नाहीच तिच्या सोबत फक्त पोस्ट शेअर ...Read More

10

#मिटू ( भाग -10)

डोंगरदऱ्यांच्या शेजारी वसलेलं शेदोनशे लोकांचं ते गाव . पडीक जमीन कोरड्या विहिरी ओलिताला पाणी भेटतं नाही म्हणून लोक गाव शहराचा रस्ता धरू लागले . विनायकराव त्या गावातले लोकप्रिय इमाने इतबारे व्यवहार करणारे इसम होते . त्यांचा जीव अडकला होता आपल्या शेती वाडीत रुखमाबाई (त्यांची दुसरी बायको) त्यांना कितीतरी वेळा सांगून चुकली हे गाव सोडून दुसरीकडे चला म्हणून . तिला सारखं वाटायचं आपणही हे खेडे सोडून शहरात जावं चार लेकरांना शिकवून काहीतरी मोठं ऑफिसर बनवावं . तीच ऑफिसर बण्याचं स्वप्न तिची धाकटी मुलगी दीपमाला पूर्ण करतच होती . रुखमाबाईचे पोटचे दोन लेकरं नाना आणि दीपमाला दोघे वयाने लहान सवंतीचे दोन्ही ...Read More

11

#मिटू ( भाग -11)

जगण्याच्या वर्तुळात प्रेम हे प्रत्येक सजीवाला बहाल केलेली अनमोल देणगी ....प्रेम म्हणजे जीवनाचं मर्म ! त्या वाटेवर मनुष्यानं निरंतर जावं असं सुखद कर्म ....जेव्हा एखादा मनुष्य आपल्या अतृप्त इच्छेसाठी एखाद्यावर प्राण घातक हल्ला करतो , तेव्हा त्याच्या माणुसकीवर संदेह निर्माण होतो .आपण त्याला क्रूर जनावर किंवा नरभक्षक म्हणून मोकळे होतो . तेव्हा , त्याला जबाबदार तो एकटा नसतोच तर संस्कृतीची थोरवी गाणारे , त्यांना बंधनात अडकविणारा हा समाज ही असतो .प्रेमापासून आपल्या अपत्यांना दूर ठेवणारे आईबाबा . त्यांना वाटतं आपला मुलगा किंवा मुलगी प्रेमात पडले म्हणजे तोंड काळे करून येणार की काय ?आणि तस चुकून माकून झालंच तर समाजात ...Read More