आयुष्य म्हणजे जणू दोन घडींचा डाव... पण आपण कधी कधी या डावात नकळत स्वता: ला गमावून बसतो तेही आपल्याच माणसासाठी. हे आपल्याला खूप उशिरा कळतं. पण जेव्हा कळतं तो क्षण कोणता का असेना त्यात सारं जीवन जगून घेतल्याचं सामर्थ्य मिळवून अंत निश्र्चितच सुखद करता येतो. प्रत्येकाच्या छुप्या मानवी अंतर्मनाला ओलसर हाक देणारी ही कथा आहे. यातून सांगायचा उद्देश इतकाच की जे हवं त्यापाठी वेळ दवडण्यापेक्षा स्वता: ला स्वता: साठी घडवा, इतरांसाठी नव्हे...

1

प्राक्तन - भाग 1

प्राक्तन भाग -१आयुष्य म्हणजे जणू दोन घडींचा डाव... पण आपण कधी कधी या डावात नकळत स्वता: ला गमावून बसतो आपल्याच माणसासाठी. हे आपल्याला खूप उशिरा कळतं. पण जेव्हा कळतं तो क्षण कोणता का असेना त्यात सारं जीवन जगून घेतल्याचं सामर्थ्य मिळवून अंत निश्र्चितच सुखद करता येतो. प्रत्येकाच्या छुप्या मानवी अंतर्मनाला ओलसर हाक देणारी ही कथा आहे. यातून सांगायचा उद्देश इतकाच की जे हवं त्यापाठी वेळ दवडण्यापेक्षा स्वता: ला स्वता: साठी घडवा, इतरांसाठी नव्हे... *-*-*-*-*-*-*-*-*-*-*अख्खी रात्र तिने विचार करूनही कोणत्याच एका निर्णयावर तिचं एकमत होत नव्हतं. आपली हक्काची असणारी व्यक्ती ही फक्त औपचारिकता म्हणून आपल्यासोबत आहे या विचारानेच तिला कीव ...Read More

2

प्राक्तन - भाग 2

प्राक्तन-२दोन तीन दिवस उलटून गेलेले... ती शांतच होती, मनानेही शांत. यशचं म्हणणं सिरियसली घेतलेलं तिने. आता मनात काहीच ठेवावंसं नव्हतं. कारण मन रितं करायचं ठरवलेलं तिने. ना कसली काळजी, ना नवर्याच्या प्रकरणांची इनसिक्यूरिटी,ना जास्त विचार, ना कसली चिडचिड... तिच्या वागण्यातला अचानक झालेला बदल मयुरेशच्या म्हणजेच तिच्या नवर्याच्या लक्षात आलेला.. पण त्याला आता तिला विचारण्याचं किंवा सामोरं जाण्याचं धाडस राहिलं नव्हतं. तो फक्त पाहत होता त्याशिवाय पर्याय उरलेला नव्हता. आज रविवार ऑफिसला सुट्टी असल्याने दोघेही घरातच होते. पण ती मात्र लवकरच उठलेली, आज ती ट्रेकिंगला जाणार होती एकटीच... तिची आवराआवर चालु होती. ते बघून त्याने न राहवून विचारलं," आज रविवारी ...Read More

3

प्राक्तन - भाग 3

प्राक्तन -३अनिशा सहा वाजता सकाळी घरी आली ती मोकळ्या आणि हलक्या मनाने... सकाळचं कोवळं ऊन स्पर्श करून जात होतं. वाटत होतं तिला आता. मन स्थिर असलं की कसलेच विचार आजूबाजूला फिरकत नाहीत याचा पुरेपूर अनुभव तिला येत होता. मनावरचं खूप मोठं ओझं उतरल्यासारखं वाटत होतं. तिच्या वागण्यातील या बदलामुळे मात्र मयुरेश विचारात पडायचा. पण तिला आता या गोष्टी खूप क्षुल्लक वाटायला लागलेल्या... ती त्याला वेळेनुसार मोजकंच बोलून इग्नोर करत होती. जे तो मागची अडीच वर्षे तिच्यासोबत करत आलेला... मयुरेश आता रात्री रोजच्यापेक्षा लवकर घरी येऊ लागलेला... तिचं आणि अमेयचं अटेन्शन मिळावं म्हणून धडपडत होता. पण तिला या गोष्टीचा काहीच ...Read More

4

प्राक्तन - भाग 4

प्राक्तन -४आतापर्यंत आपण बघितलं की पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे आत्महत्या करायला निघालेल्या अनिशाला यशने वाचवलं आणि आनंदी जीवन जगण्याचं सुत्रही आणून दिलं. त्यामुळे अनिशा सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून स्वता साठी जगत स्वताला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर तिला कळून चुकलं की सर्व फक्त यशमुळेच शक्य झालं आणि तिने त्याला पून्हा त्याच टेकडीवर भेटून त्याचे आभारही मानले. आता आठवड्यातून एकदा तरी ती तिथे जायचीच. दोघांमधला सलोखा वाढत होता. त्यानंतर अनिशाला मात्र यशबद्दल विशेष जिव्हाळा आणि आपुलकी वाटत होती. एवढं असलं तरी त्या दोघांनी नावाव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्य अजूनही एकमेकांसोबत शेअर केलं नव्हतं. आणि ते जाणून घेण्याच्या आशेने अनिशा पून्हा यशकडे गेलेली. ...Read More

5

प्राक्तन - भाग 5

प्राक्तन -५" यश________" तिने अगतिकपणे त्याच्या खांद्यावर थरथरता हात ठेवला. तसं त्याने तिच्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यात उभे ठाकलेले असंख्य त्याला कळत होते. " लिव्ह इट. कुल डाऊन... ओके. " तो स्वत: ला सावरत म्हणाला. " नाही मला जाणून घ्यायचंय तुझ्या या खोल दुःखामागचं कारण... तू सांग यश, बोल, रड आणि मन मोकळं कर. जर खरंच तू मला तुझी मैत्रिण समजत असशील तर..." अनिशा मन घट्ट करत म्हणाली. मैत्रिण म्हणून तिचा हक्क दाखवणं, तिचं स्पष्ट बोलणं जे त्याला नेहमीच आवडायचं ते आज पुन्हा त्याला मनापासून आवडून गेलं. " माझंही एक छोटंसं कुटूंब होतं. मी, माझी पत्नी वीणा जी एका कॉर्पोरेट ...Read More

6

प्राक्तन - भाग 6

प्राक्तन -६ " डॉक्टर काय झालंय यशला...? आता बरा आहे ना तो.." डॉक्टर यशला चेक करून बाहेर पडताच अनिशाने विचारलं. " हो आता बरे आहेत ते काळजीचं कारण नाही. पण तुम्ही कोण त्यांच्या मिसेस का?" डॉक्टरांनी तिच्याकडे बघत स्वाभाविकपणे विचारलं. " अं नाही मी त्याची मैत्रिण... त्याला चक्कर आली सकाळी मॉर्निंग वॉक वेळी धावताना म्हणून लगेच घेऊन आले.. " ती कशीबशी थाप मारत म्हणाली. आणि सुदैवाने डॉक्टरांनाही ते पटलं. " अच्छा. पण लो बीपी आणि त्यात काहीही खाल्लं नसावं त्यामुळे अशक्तपणा आलाय. म्हणून हा त्रास उद्भवला. मी काही गोळ्या औषधे देतो ती आणून द्या त्यांना. आणि दुपारपर्यंत डिस्चार्ज मिळेल. ...Read More

7

प्राक्तन - भाग 7

प्राक्तन -७अनिशाने तिचं आवरल्यानंतर अमेय आणि तिने दोघा मायलेकांनी एकत्र जेवण केलं. थोडा वेळ येनकेन गप्पा मारून अमेय अभ्यास त्याच्या खोलीत गेला. तेव्हा अनिशा जरा पडावं म्हणून बेडवर कलंडली. पण यशची विदारक कहाणी काही तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हती. त्याची आठवण येताच तिने फोन हातात घेतला. दुपारचे तीन वाजलेले... जेवण करून औषधं घेतली असतील का त्याने?? फोन करू का.. पण तो झोपला असेल तर झोप मोड होईल ना त्याची.. काय करू असा विचार ती करत होती. अखेर तिने मेसेज करून विचारू असं ठरवलं. आणि तिने त्याला मेसेज वरून विचारणा केली. व्हॉट्सॲप वर मेसेज केल्यावर डबल टीक तर आली नाही म्हणून ...Read More

8

प्राक्तन - भाग 8

प्राक्तन -८मागील भाग.थोड्या वेळाने अमेयने चहा कपमध्ये गाळून भरला आणि तो कप अनिशाच्या हातात दिला. चहाचा तो सुवास किचनमध्ये तो त्या दोघांनीही दीर्घ श्वास घेत श्वासात भरून घेतला. आता अमेयला उत्सुकता लागली होती की त्याने पहिल्यांदाच बनवलेला चहा कसा झाला असेल याची.. म्हणून तो उत्सुकतेपोटी अनिशाकडे बघत होता. तिने एक सिप घेतला आणि तिच्या चेहऱ्यावर आश्चर्यकारक भाव पसरले. कारण चहा सेम टू सेम मयुरेश बनवल्यावर जसा लागतो अगदी तसाच झालेला... त्याच्या हाताची चवही अमेयच्या हातात मिसळली असं तिला वाटत होतं. आता पुढे..." आई काय झालं? काही कमी जास्त झालंय का... प्लीज लवकर सांग..." अमेयची एक्साईटमेंट ताणलेली आता जास्तच. " ...Read More

9

प्राक्तन - भाग 9

प्राक्तन -९बरोबर पहाटेला तिला जाग आली. अखेर तिने मयुरेशचा हात अलगद बाजूला ठेवला. आणि ती निघाली. जाताना तिच्या मनात विचार येत होते. मयुरेशला सांगावं का यश बद्दल.. माझा जीव वाचवला त्याने, एवढंच नाही तर जगण्याचा अर्थही सांगितला. मयुरेश समंजस आहे मग तसंच समजून घेईल ना तो.. ती संभ्रमात पडलेली. पण आता तो झोपलाय परत सांगू असा विचार करत ती निघाली. ती तिथे येऊन पोहोचली तर यश आधीच तिथे आलेला... डोळे मिटून शांतपणे तो बसलेला. चेहऱ्यावर समाधान वाटत होतं त्याच्या, त्यामुळे तो प्रसन्न चित्ताने बसलेला दिसत होता. ती आल्याची चाहूल त्याला लागली पण त्याने डोळे उघडले नाही. आणि त्याची तंद्री ...Read More

10

प्राक्तन - भाग 10

प्राक्तन -१० " आणि यश तुला अजून एक विचारू, पण खरं सांगायचं हं.. लपवाछपवी किंवा उडावाउडवीची उत्तरं नाही द्यायची. तिने आधीच बजावलं त्याला. त्यावरून आता ही काय बॉम्ब टाकणार या विचाराने तो तिच्याकडे बघायला लागला. आणि त्याने तिला 'बोल बिनधास्त' असा इशारा केला. " प्रेमाबद्दल तुझं मत काय आहे? आयुष्यात खरं प्रेम फक्त एकदाच होतं का?" ती विचार करत म्हणाली. " अरे प्रेम हा कधीच न आटणारा झरा आहे. आणि हो ते एकदाच नाही अनेकदा होतं अगदी आपल्याही नकळत... पाडगावकर म्हणतात ना प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं..." त्याने सांगितलं. पण यावर तिचं समाधान झालेलं दिसत नव्हतं. ...Read More

11

प्राक्तन - भाग 11

प्राक्तन -११आतापर्यंत आपण बघितलं की मयुरेश आणि अनिशा मधले सगळे गैरसमज दूर होतात. आणि हेच सांगायला अनिशा तिच्या ठरलेल्या पहाटे यशला भेटायला जाऊन त्याला हे सगळं सांगते. तोही तिचा झालेला गैरसमज आणि तिच्या मनातली सगळी इनसिक्यूरिटी दूर करतो. पण तेवढ्यात अनिशाला शोधत मयुरेश तिथे येतो. आणि त्या दोघांना एकमेकांसोबत पाहतो. आता पाहुया पुढे काय होते...आता पुढे. अनिशा गेल्यानंतर मयुरेश शेजारी ती झोपलीय म्हणून हात टाकतो पण ती जागा मोकळी असते. अनिशा तिथे नाही म्हणून तो जागा होतो. आणि वॉशरूमजवळ जात बघतो तर तो दरवाजा बाहेरून लॉक असतो. मग तो तिला घरात सगळीकडे शोधतो पण ती घरात कुठेच नसते. आता ...Read More