ब्लॅकमेल

(4)
  • 5.9k
  • 0
  • 2.8k

“सर, आपल्या रिसेप्शन मधे एक तरुणी आल्ये, तुम्हाला भेटायला. पण ती आपलं नाव सांगायला तयार नाहीये.” सौंम्या पाणिनीला म्हणाली. “ मग हाकलून दे तिला.” सौंम्याकडे न बघताच पाणिनी म्हणाला. “ तरी सुद्धा मला वाटतंय की तुम्ही एकदा भेटावं.”-सौंम्या “ काय विशेष आहे त्यात की मी भेटायलाच हवं ?” “ तुम्ही स्वत: ते ऐकून घ्यावं सर.”-सौंम्या “ तू फारच गूढ बोलायला लागल्येस. ठीक आहे तू म्हणते आहेस तर येऊ दे तिला.” पाणिनी म्हणाला सौंम्या आपल्या बरोबर एका तरुणीला घेऊन आली. अत्यंत निराश असा चेहेरा आणि मानसिक तणावाने सर्वांग थरथरत होतं. “ घाबरु नकोस.मी तुला मदत करीन. काय हवंय तुला?” “ पटवर्धन,मला गायब व्हायचंय कुठेतरी, म्हणजे व्हायलाच लागणार आहे, पण माझ्या आई बाबांना शोधता येता कामा नये मला.”

1

ब्लॅकमेल - प्रकरण 1

ब्लॅकमेल प्रकरण १ “सर, आपल्या रिसेप्शन मधे एक तरुणी आल्ये, तुम्हाला भेटायला. पण ती आपलं नाव सांगायला तयार नाहीये.” पाणिनीला म्हणाली. “ मग हाकलून दे तिला.” सौंम्याकडे न बघताच पाणिनी म्हणाला. “ तरी सुद्धा मला वाटतंय की तुम्ही एकदा भेटावं.”-सौंम्या “ काय विशेष आहे त्यात की मी भेटायलाच हवं ?” “ तुम्ही स्वत: ते ऐकून घ्यावं सर.”-सौंम्या “ तू फारच गूढ बोलायला लागल्येस. ठीक आहे तू म्हणते आहेस तर येऊ दे तिला.” पाणिनी म्हणाला सौंम्या आपल्या बरोबर एका तरुणीला घेऊन आली. अत्यंत निराश असा चेहेरा आणि मानसिक तणावाने सर्वांग थरथरत होतं. “ घाबरु नकोस.मी तुला मदत करीन. काय हवंय ...Read More

2

ब्लॅकमेल - प्रकरण 2

प्रकरण २ सकाळी नऊ वाजता पाणिनी आपल्या ऑफिसात आला तेव्हा सौंम्या आणि गती एकमेकांकडे पाहून हसत होत्या.पाणिनी ला काहीतरी आला म्हणून त्याने गतीकडे चौकशी केली की काय भानगड आहे.गतीने पाणिनीच्या टेबलावर ठेवलेल्या वर्तमान पत्राकडे पाणिनीचं लक्ष वेधलं.यातील छोट्या जाहिराती या सदरात आलेल्या एका जाहिराती भोवती लाल वर्तुळ काढून ठेवलं होतं गती ने.पाणिनीने ते वाचलं. ‘ रोख रकमेच्या बदल्यात मी तडजोड करायला तयार आहे.मला डेल्मन हॉटेल मधे संपर्क करा १२३-३२१ ’ “ ही आपल्याच अशिलाने दिलेली जाहिरात आहे?” पाणिनीने विचारलं. “ दिसतंय तरी तसच ” सौंम्या म्हणाली. “ अवघडच आहे.एकंदरित तो माणूस तिला चांगलाच त्रास देणार असं वाटतंय.आणि मग ती ...Read More

3

ब्लॅकमेल - प्रकरण 3

प्रकरण 3 पाणिनी डेल्मन हॉटेलच्या रिसेप्शन मधे गेला आणि विचारलं, “ प्रचिती खासनीस नावाने तुमच्याकडे बुकिंग आहे?” “ आहे नंबरची रूम आहे.” आपलं रजिस्टर चाळत रिसेप्शनिस्ट ने उत्तरं दिलं. “ मी आल्याचं तिला कळवालं का प्लीज?” पाणिनीने विचारलं. “ नाव काय आहे तुमचं?” “ ती मला नावाने ओळखत नाही.तिला सांगा, सामाजिक सुरक्षिततेच्या संबंधात काम आहे. १२३-३२१ या नंबरशी संबंधित काम आहे.” रिसेप्शनिस्ट ने संशयित नजरेने पाणिनीकडे पाहिलं आणि रूम ७६७ ला फोन लावला. “ मॅडम, तुम्हाला भेटायला एक गृहस्थ आलेत. सुरक्षिततेच्या संबंधात काम आहे त्याचं.” दोघांचं फोन वर हलक्या आवाजात बोलणं झालं ते ऐकून रिसेप्शनिस्ट पाणिनीला म्हणाला, “मॅडम म्हणाल्या ...Read More