ब्लॅकमेल

(26)
  • 46.5k
  • 1
  • 29.2k

“सर, आपल्या रिसेप्शन मधे एक तरुणी आल्ये, तुम्हाला भेटायला. पण ती आपलं नाव सांगायला तयार नाहीये.” सौंम्या पाणिनीला म्हणाली. “ मग हाकलून दे तिला.” सौंम्याकडे न बघताच पाणिनी म्हणाला. “ तरी सुद्धा मला वाटतंय की तुम्ही एकदा भेटावं.”-सौंम्या “ काय विशेष आहे त्यात की मी भेटायलाच हवं ?” “ तुम्ही स्वत: ते ऐकून घ्यावं सर.”-सौंम्या “ तू फारच गूढ बोलायला लागल्येस. ठीक आहे तू म्हणते आहेस तर येऊ दे तिला.” पाणिनी म्हणाला सौंम्या आपल्या बरोबर एका तरुणीला घेऊन आली. अत्यंत निराश असा चेहेरा आणि मानसिक तणावाने सर्व

Full Novel

1

ब्लॅकमेल - प्रकरण 1

ब्लॅकमेल प्रकरण १ “सर, आपल्या रिसेप्शन मधे एक तरुणी आल्ये, तुम्हाला भेटायला. पण ती आपलं नाव सांगायला तयार नाहीये.” पाणिनीला म्हणाली. “ मग हाकलून दे तिला.” सौंम्याकडे न बघताच पाणिनी म्हणाला. “ तरी सुद्धा मला वाटतंय की तुम्ही एकदा भेटावं.”-सौंम्या “ काय विशेष आहे त्यात की मी भेटायलाच हवं ?” “ तुम्ही स्वत: ते ऐकून घ्यावं सर.”-सौंम्या “ तू फारच गूढ बोलायला लागल्येस. ठीक आहे तू म्हणते आहेस तर येऊ दे तिला.” पाणिनी म्हणाला सौंम्या आपल्या बरोबर एका तरुणीला घेऊन आली. अत्यंत निराश असा चेहेरा आणि मानसिक तणावाने सर्वांग थरथरत होतं. “ घाबरु नकोस.मी तुला मदत करीन. काय हवंय ...Read More

2

ब्लॅकमेल - प्रकरण 2

प्रकरण २ सकाळी नऊ वाजता पाणिनी आपल्या ऑफिसात आला तेव्हा सौंम्या आणि गती एकमेकांकडे पाहून हसत होत्या.पाणिनी ला काहीतरी आला म्हणून त्याने गतीकडे चौकशी केली की काय भानगड आहे.गतीने पाणिनीच्या टेबलावर ठेवलेल्या वर्तमान पत्राकडे पाणिनीचं लक्ष वेधलं.यातील छोट्या जाहिराती या सदरात आलेल्या एका जाहिराती भोवती लाल वर्तुळ काढून ठेवलं होतं गती ने.पाणिनीने ते वाचलं. ‘ रोख रकमेच्या बदल्यात मी तडजोड करायला तयार आहे.मला डेल्मन हॉटेल मधे संपर्क करा १२३-३२१ ’ “ ही आपल्याच अशिलाने दिलेली जाहिरात आहे?” पाणिनीने विचारलं. “ दिसतंय तरी तसच ” सौंम्या म्हणाली. “ अवघडच आहे.एकंदरित तो माणूस तिला चांगलाच त्रास देणार असं वाटतंय.आणि मग ती ...Read More

3

ब्लॅकमेल - प्रकरण 3

प्रकरण 3 पाणिनी डेल्मन हॉटेलच्या रिसेप्शन मधे गेला आणि विचारलं, “ प्रचिती खासनीस नावाने तुमच्याकडे बुकिंग आहे?” “ आहे नंबरची रूम आहे.” आपलं रजिस्टर चाळत रिसेप्शनिस्ट ने उत्तरं दिलं. “ मी आल्याचं तिला कळवालं का प्लीज?” पाणिनीने विचारलं. “ नाव काय आहे तुमचं?” “ ती मला नावाने ओळखत नाही.तिला सांगा, सामाजिक सुरक्षिततेच्या संबंधात काम आहे. १२३-३२१ या नंबरशी संबंधित काम आहे.” रिसेप्शनिस्ट ने संशयित नजरेने पाणिनीकडे पाहिलं आणि रूम ७६७ ला फोन लावला. “ मॅडम, तुम्हाला भेटायला एक गृहस्थ आलेत. सुरक्षिततेच्या संबंधात काम आहे त्याचं.” दोघांचं फोन वर हलक्या आवाजात बोलणं झालं ते ऐकून रिसेप्शनिस्ट पाणिनीला म्हणाला, “मॅडम म्हणाल्या ...Read More

4

ब्लॅकमेल - प्रकरण 4

प्रकरण ४ पाणिनीने बाहेर जाऊन एक सुटकेस खरेदी केली. नंतर बाहेर फुटपाथ वर एक पुस्तक विक्रेता बसला होता,त्याचे कडून पुस्तकं खरीदली.त्या पुस्तकवाल्यालाच विनंती केली की या सुटकेस मधे टाक सगळी पुस्तकं.त्यानंतर तो डेल्मन हॉटेलात आला आणि रिसेप्शनिस्ट ला म्हणाला, “मला आज रात्रीपुरता मुक्काम करायचाय, मला जरा वरच्या मजल्यावरची रूम द्या.ट्राफिक चा आवाज होणार नाही अशी पाचव्या मजल्याच्या वरची द्या.” “ तुम्हाला आज रात्री पुरते राहायचं असेल तर ११८४ नंबरची रूम देतो.नाव काय म्हणालात?” “ पटवर्धन. ११ वा मजला उंच होईल.आठव्यावर नाही का?” पाणिनीने विचारलं. “ त्यावरच्या सगळ्या गेल्या आहेत.” “ सातवा? ” “ एकच आहे, पण ती मोठी आहे ...Read More

5

ब्लॅकमेल - प्रकरण 5

प्रकरण ५ प्रचिती ला सूचना देवून पाणिनी ७६७ नंबरच्या खोलीत आला.समिधा ने त्याला विचारलं, “ कितपत संकटात आहे ही “ संकटात नाहीये अगदी पण इथे येई पर्यंत तिने स्वत:चा खूप माग सोडलाय मागे.ती इथे आल्यापासूनच मला जरा बेचैन वाटायला लागलंय....” पाणिनी म्हणाला तेवढ्यात दार वाजल्याचा आवाज आला. “ पोलीस किंवा हॉटेल चा सुरक्षा रक्षक असेल असं वाटतंय. कोणीतरी अधिकाराने वाजवलेले दार आहे.” पाणिनी म्हणाला “ विवस्वान असू शकतो?” “ नाही,नाही. पोलीस असायची शक्यता जास्त आहे.” पाणिनी म्हणाला “ दार उघडा.पोलीस आहोत आम्ही.” बाहेरून आवाज आला. “ शक्य होईल तेवढ बोलायचं काम मी करतो.” पाणिनी समिधाला म्हणाला आणि दार उघडलं.दारात ...Read More

6

ब्लॅकमेल - प्रकरण 6

प्रकरण ६ एकादषम अर्वाचिन कंपनीचे ऑफिसपाशी पाणिनी आला तेव्हा १०.२० झाले होते. तो अशा जागी उभा होता की आत कंपनीचे लोक त्याला बरोब्बर दिसत होते.ठीक १०.३० ला प्रचिती पारसनीस दारातून आत येतांना दिसली. “तू कुठे होतीस काल?” पुढे होत पाणिनी ने विचारलं. तिने पाणिनीचा हात असा काही पकडला की त्या स्पर्शावरून पाणिनीला जाणवलं की तिला त्याच्या शारीरिक आणि मानसिक आधाराची गरज होती. “ आज पहाटे ३.२५ ला प्रयंक गेला ! ” ती मुसमुसत म्हणाली. “ ओह ! प्रचिती, माफ कर मला.तुमचं खूप प्रेम होतं एकमेकांवर. पण प्रचिती, आपल्याला थोडं भावनिक न होता काही महत्वाची काम पार पडायची आहेत.” “ ...Read More

7

ब्लॅकमेल - प्रकरण 8

प्रकरण ८ तिथून निघाल्यानंतर पाणिनी टॅक्सी करून आपल्या ऑफिसमध्ये आला " सौम्या, प्रचिती बद्दल काही कळलं? काही बातमी कानावर आहे?" त्याने विचारलं तिने नकारार्थी मान हलवली. पाणिनीने समाधानाने निश्वास सोडला. “देवनार वरून काही फोन आला तर सांग. मला बोलायचंय. पुढच्या पंधरा मिनिटात जर मला अपेक्षित असलेला फोन आला नाही तर आपणच देवनारच्या पोलीस स्टेशनला फोन लावू आणि चौकशी करू आणि त्याने काही प्रतिसाद दिला नाही तर आपण तिथल्या कोर्टात प्रचिती पारसनीसला जिवंत किंवा मृत प्रत्यक्ष हजर करा म्हणून अर्ज देऊ. रिट ऑफ हेबिअस कोर्पस.” “का? काय घडलं एवढं?” सौम्यान विचारलं “त्यांनी प्रचिती पारसनीसला अटक केल्ये ” पाणिनी म्हणाला “अफरातफरीच्या ...Read More

8

ब्लॅकमेल - प्रकरण 9

प्रकरण ९ दुसऱ्या दिवशी ऑफिसला आल्यावर पाणिनीने सौंम्याला देवनार मधे काय काय घडलं ते सर्व सांगितलं.म्हणजे अगदी प्रचिती विमानात नाही त्या क्षणापासून सर्व. “ सौंम्या, मला सर्वात धक्कादायक होतं ते म्हणजे,मी धारवाडकर ना भेटून निघताना कंपनीतल्या एका स्टेनोग्राफर मला उद्देशून ही चिट्ठी लिहून ठेवली होती आणि मोठ्या शिताफीने कोणाच्याही नकळत मला दिली.” पाणिनी म्हणाला आणि त्याने ती सौंम्याला दाखवली. तिने ती वाचली. “ तुम्हाला कंपनीकडून काही वस्तू खरेदी साठी ऑफर नाही का दिली गेली? डिस्काऊंट देऊन?” –सौंम्या. “ नाही.ते फक्त घाऊक स्वरूपातच विक्री करतात सौंम्या.मला फार उत्सुकता आहे हे लोक खरेदी आणि विक्री कुठून करतात याची. त्या आधी मला ...Read More

9

ब्लॅकमेल - प्रकरण 7

प्रकरण ७ “ एवढे सांगण्यासाठी तुम्ही रीवावरून एवढे लांब इथे आलात?” “ काय चूक आहे त्यात?” “ कारण पैसे गेले ते आम्हाला माहित नाहीये अजून.आम्हाला एवढंच माहित झालाय की रोख रकमेत तूट आली आहे.” “ खात्री आहे तुमची?” पाणिनीने विचारलं. “ अर्थात.वीस लाख तूट आहे.” धारवाडकर म्हणाला. “ एवढी मोठी रक्कम रोख स्वरूपात तुम्ही कंपनीत ठेवता?” पाणिनीने विचारलं. “ त्यापेक्षा खूप मोठ्या रकमा ठेवतो आम्ही. बरेचसे व्यवहार रोखीत करून आम्ही डिस्काउंट मिळवतो. विशेषतः बँका बंद असतात त्या आणि त्याच्या आदल्या दिवशी आम्ही मोठी रक्कम ठेवतो.” “ आणि त्याच्या हिशोब पुस्तकातील नोंदी बद्दल तुम्ही फारसे जागरूक नसता? सोयीस्कर पणे?” पाणिनीने ...Read More

10

ब्लॅकमेल - प्रकरण 10

प्रकरण १० तिथून निघाल्यानंतर पाणिनी टॅक्सी करून आपल्या ऑफिसमध्ये आला " सौम्या, प्रचिती बद्दल काही कळलं? काही बातमी कानावर आहे?" त्याने विचारलं तिने नकारार्थी मान हलवली. पाणिनीने समाधानाने निश्वास सोडला. “देवनार वरून काही फोन आला तर सांग. मला बोलायचंय. पुढच्या पंधरा मिनिटात जर मला अपेक्षित असलेला फोन आला नाही तर आपणच देवनारच्या पोलीस स्टेशनला फोन लावू आणि चौकशी करू आणि त्याने काही प्रतिसाद दिला नाही तर आपण तिथल्या कोर्टात प्रचिती पारसनीसला जिवंत किंवा मृत प्रत्यक्ष हजर करा म्हणून अर्ज देऊ. रिट ऑफ हेबिअस कोर्पस.” “का? काय घडलं एवढं?” सौम्यान विचारलं “त्यांनी प्रचिती पारसनीसला अटक केल्ये ” पाणिनी म्हणाला “अफरातफरीच्या ...Read More

11

ब्लॅकमेल - प्रकरण 11

प्रकरण ११ न्यायाधीश समीप सरदेसाई स्थानापन्न झाल्यानंतर त्यांनी कोर्टात सभोवताली नजर टाकली. “ही वेळ सरकार पक्षविरुद्ध प्रचिती पारसनीस या प्राथमिक सुनावणीसाठी राखून ठेवण्यात आली आहे तिच्यावर विवस्वान याच्या खुनचा आरोप आहे आरोपी कोर्टात हजर आहे? आणि त्याचे वकील?” पाणिनी पटवर्धन उठून उभा राहिला. “मी आरोपीचा वकील आहे अॅडव्होकेट पाणिनी पटवर्धन.” तो म्हणाला न्यायाधीश हसले. “मी ओळखतो तुम्हाला. आणि सरकार पक्षाकडून कोण हजर आहे?” सरकारी वकील रौनक फारुख कुठून उभा राहिला. “मी आहे न्यायाधीश महाराज. माझं नाव रौनक फारुख” “छान तर मग आपण सुरू करूया खटला. त्यापूर्वी मला एक सांगायचय की या खटल्यातील आरोपीचे वकील म्हणून काम पाहणारे पाणिनी पटवर्धन ...Read More

12

ब्लॅकमेल - प्रकरण 12

प्रकरण १२ त्या दिवशीच कोर्टाचं कामकाज संपल्यानंतर पाणिनी पटवर्धन सौम्या सोहोनी आणि कनक ओजस हे एका रेस्टॉरंट मध्ये कॉफी बसले. “मला वाटतंय पाणिनी,की न्यायाधीशानी त्यांचं मत आधीच बनवलय.” “तुला मी काही गोष्टी शोधायला सांगितल होतं, त्याचा काय केलस?” कनक च्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करत पाणिनी ने मुद्द्याला हात घातला “माहितीचे असे वेगवेगळे तुकडे मिळाले आहेत.. एक सलग अशी माहिती त्यातून निर्माण होत नाही आता हे तुकडे तुझ्या कितपत उपयोगी पडतील माहित नाही पण तू स्वतःच मगाशी म्हणालास त्याप्रमाणे तुझे हे अशील हे अत्यंत खोटारड आहे.”-कनक “ती आहे पण आणि नाही पण. ती माझ्याशी खोटं बोलली कारण तिला तिच्या भावाची इभ्रत ...Read More

13

ब्लॅकमेल - प्रकरण 13

प्रकरण १३ दुसऱ्या दिवशी सकाळी कोर्ट चालू झालं त्यावेळी सरकारी वकील फारुख अचानक उभा राहिला आणि त्यांनी जाहीर केलं सरकार पक्षातर्फे आम्ही आता थांबतो आहोत आम्हाला कुठलेही साक्षीदार किंवा साक्षी पुरावे द्यायचे नाहीत. “मलाही हेच अपेक्षित होतं तुमच्याकडून” न्यायाधीश म्हणाले “खरंतर हे कालच संध्याकाळी घडलं असतं तर बरं झालं असतं. मला वाटत नाही की या प्रकरणात आरोपीला काही बचाव आहे.” “१००% बचाव आहे युवर ओनर.” पाणिनी उभा राहत म्हणाला. “मी कालचंच वाक्य पुन्हा उच्चारतो मिस्टर पटवर्धन, मला उगाचच वेळ घालवलेल ...Read More

14

ब्लॅकमेल - प्रकरण 14 (शेवटचे प्रकरण)

प्रकरण १४ दोन्ही धारवाडकर आणि युक्ता बेहेल तिघांच्या चेहेऱ्यावर तणाव आला आहे हे स्पष्ट जाणवत होतं. “ युक्ता, तुला जर्किन बसते का पहा.” पाणिनी म्हणाला तिने ते जर्किन हातात घेतलं आणि अंगात घालायचा प्रयत्न केला तिला ते खूप सैल झालं. “ शुक्लेंदू, तुम्ही या पुढे.” पाणिनी म्हणाला “ अशा प्रकारे खुनी ठरवण्याची पद्धत चुकीची आहे.” तो ओरडून म्हणाला. “ ते कोर्टाला ठरवू दे, तुम्ही फक्त ते घालून दाखवा.” पाणिनी म्हणाला नाईलाजाने शुक्लेंदू ने ते जर्किन अंगावर चढवले.त्याला ते खूप घट्ट झालं. म्हणजे अंगातून आत जाईना. “ आता तुम्ही ” शाल्व ला उद्देशून पाणिनी म्हणाला आणि काही कळायच्या आत शाल्वने ...Read More