विषाची परीक्षा

(0)
  • 5.1k
  • 0
  • 2k

देवराज इंद्र अमरावतीला भेट द्यायच्या विचारात होता. खरेतर इंद्राने वरूणदेव व अग्नीदेव यांना अमरावतीच्या रक्षणासाठी नेमले होते. तरीपण असुरांच्या सततच्या हल्ल्यांनी तो त्रासला होता. त्याने विचार केला की, अमरावतीला स्वत: हजर राहूनच सुरक्षित ठेवता येईल. इंद्राला माहिती होती की असुरांचे डावपेच फारच धूर्त होते आणि त्यांच्याशी लढणे सोपे नव्हते. सन २०४३, पृथ्वीवर भारतातील मुंबई येथे शतग्रीव अरोरा आणि मरिच हे दोघे पहिल्यांदाच आले होते. देवांच्या हातून मारल्या गेलेल्या नरगुप्त असूराचे ते दोघे सख्खे भाऊ होते. पृथ्वीलोकांत हे दोघे माणसाचे रूप घेऊन आले होते. शतग्रीवने मरिचला म्हटले, “भ्राताश्री, चिंता सोडून हे सौंदर्य पहा. आकाशात सूर्यदेव तेजाने उजळतायत व वसुंधरेवर ही माणसे आपल्या कर्मामध्ये मग्न आहेत.” मरिचने त्याला गप्प बसवले व ते दोघे एका दुकानात शिरले. तिथे त्यांनी काही अत्याधुनिक शस्त्रांची खरेदी केली, कारण त्यांना देवांवर हल्ला करण्यासाठी आवश्यक साधनांची गरज होती.

1

विषाची परीक्षा - भाग 1

देवराज इंद्र अमरावतीला भेट द्यायच्या विचारात होता. खरेतर इंद्राने वरूणदेव व अग्नीदेव यांना अमरावतीच्या रक्षणासाठी नेमले होते. तरीपण असुरांच्या हल्ल्यांनी तो त्रासला होता. त्याने विचार केला की, अमरावतीला स्वत: हजर राहूनच सुरक्षित ठेवता येईल. इंद्राला माहिती होती की असुरांचे डावपेच फारच धूर्त होते आणि त्यांच्याशी लढणे सोपे नव्हते. सन २०४३, पृथ्वीवर भारतातील मुंबई येथे शतग्रीव अरोरा आणि मरिच हे दोघे पहिल्यांदाच आले होते. देवांच्या हातून मारल्या गेलेल्या नरगुप्त असूराचे ते दोघे सख्खे भाऊ होते. पृथ्वीलोकांत हे दोघे माणसाचे रूप घेऊन आले होते. शतग्रीवने मरिचला म्हटले, “भ्राताश्री, चिंता सोडून हे सौंदर्य पहा. आकाशात सूर्यदेव तेजाने उजळतायत व वसुंधरेवर ही ...Read More