ओढ - प्रेमकथा

(7)
  • 19.6k
  • 2
  • 10.4k

कथेचे सर्व हक्क लेखकाकडे 'आज तिसरा दिवस तिला न पाहण्याचा' तो स्वतःशीच म्हणाला. त्याची अस्वस्थता काही केल्या कमी होत नव्हती. तिच्या असं अचानक गायब होण्याने त्याच्या हृदयात शल्य विशल्य निर्माण होत होतं. कितीतरी वेळ तो तसाच बाहेर कोसळणाऱ्या वर्षांसरिंना एकटक पाहत होता. कॉलेजनंतर फार क्वचितच त्याने असा शांत भासणारा पाऊस पाहला होता. आसमंतला सप्तरंगाचा इंद्रधनू शालू नेसलेला.. सात रंगाच्या छटेतून थंडगार पावसाचे थेंब धरणीला भेटायला आतूर झाले होते. त्या पावसात तरी त्याला काय दिसत काय असावं. तिची सुंदर मूर्ती की तिचे केळीच्या गाभ्यासारखे ईवले ईवले हात ज्यात ती हिऱ्यासारखे पावसाचे टपोरे थेंब मुठीत घट्ट आवळून लहान मुलांसारखा विभोर करीत होती? देवच जाणे.. आपल्या लहानश्या केसांवरून हात फिरवत समोरच्या चिंब भिजणाऱ्या पक्षांच्या जोडप्याला तो पाहत होता. चोचीत चोच टाकून एकरूप झालेले ते जोडपे.. हलकासाही दुरावा असाह्य होईल असं जणू ते दर्शवीतच होते.. पून्हा तिच्या आठवणीने त्याच मन घायाळ झालं. त्याच्या मनाच्या हिरव्यागार पर्णवेलीवर शंकेचे, तर्काचे काळे विहंग येऊन बसले होते. मनाची पर्णवेली तीव्रपणे झटकून तर्काचे काळे विहंग दूर पळवण्याचा अपुरा प्रयत्न त्याने केला.. पण छे! विचार एवढे नियंत्रित थोडी ना असतात.

Full Novel

1

ओढ - प्रेमकथा - भाग 1

ओढ -- प्रेमकथा (भाग 1)कथेचे सर्व हक्क लेखकाकडे 'आज तिसरा दिवस तिला न पाहण्याचा' तो स्वतःशीच म्हणाला. त्याची अस्वस्थता केल्या कमी होत नव्हती. तिच्या असं अचानक गायब होण्याने त्याच्या हृदयात शल्य विशल्य निर्माण होत होतं. कितीतरी वेळ तो तसाच बाहेर कोसळणाऱ्या वर्षांसरिंना एकटक पाहत होता. कॉलेजनंतर फार क्वचितच त्याने असा शांत भासणारा पाऊस पाहला होता. आसमंतला सप्तरंगाचा इंद्रधनू शालू नेसलेला.. सात रंगाच्या छटेतून थंडगार पावसाचे थेंब धरणीला भेटायला आतूर झाले होते. त्या पावसात तरी त्याला काय दिसत काय असावं. तिची सुंदर मूर्ती की तिचे केळीच्या गाभ्यासारखे ईवले ईवले हात ज्यात ती हिऱ्यासारखे पावसाचे टपोरे थेंब मुठीत घट्ट आवळून लहान ...Read More

2

ओढ - प्रेमकथा - भाग 2

' मी लिहलेले हे डायलॉग किती बनावटी आणी फसवे वाटतात.. याला खरेपणाची किनार असेलही पण मला असं का वाटत ही भावना, हे असे मर्मबंधी संवाद म्हणजे चित्रपटांमूळे मनाच्या आम्रतरुला मुद्दाम बहरवलेला आल्हाददायी पिवळसर आम्रबहर आहे. तो आम्रबहर तर खरा आहे परंतु अवाजवी मानवी हस्तक्षेपामूळे फुलेलेला तो बहर मुळीच प्राकृतिक नाही. नैसर्गिक छटेच विलोभनीय सौंदर्यही त्याला नाही. मन म्हणजे द्रव्यजनक वस्तू असावी ज्याला कुठलाही विशिष्ट आकार नाही, ज्याला कुठलंही विशिष्ट रंग,रूप नाही.. कुठल्याही साच्यात टाकला की त्याच रूप तो धारण करून घेतो. स्वतःला बदलून त्याच्याशी एकरूप होऊन जातो. ही भावनाही अशीच काहीशी असावी.. रोज रोज नेत्राच्या पडद्यावर चालणाऱ्या फिल्मी जगताच्या ...Read More

3

ओढ - प्रेमकथा - (शेवट भाग)

मध्य वरून पुढे विचारांच दोलन सारख मागे पुढे झुलत होत.. त्यातला एक विचार अती उच्च तर दुसरा फारच शूद्र होता. नकूलसाठी यापुढचा मार्ग फार काही सोयीस्कर नव्हता. तसं पाहिल तर स्थिती एवढीही गुंतागुंतीची, क्लिष्ट नव्हती. सर्व हिशोब तर व्यवस्थित मांडून होता. दिग्दर्शक या क्षेत्रावरच नकूलने जीवापाड प्रेम केल होत. अगदी बेंबीच्या देठापासून झोपता उठता एकच स्वप्न त्याने पाहिलं होत यशस्वी लेखक, दिग्दर्शक व्हायच. मग आज त्याला त्याची पाऊले का जड वाटत होती? मनाच्या कुठल्यातरी अज्ञात कोपऱ्यात तीच हलकस नाव कोरून होत का? मनाच्या शांत नीलवर्णी सरोवरात तीचही लहकस प्रतिबिंब उमटून होत का? बरेच प्रश्न त्याच्या मनावर तरंगत होते आणी ...Read More