बदफैली

(5)
  • 20.4k
  • 0
  • 11.3k

"शी..बाई आज खूपच उशीर झाला. अशोक जर माझ्या आधी घरी आला असेल तर काही खर नाही आज माझं" अपर्णा स्वतःशीच बडबडत झपझप चालत होती... "तरी मी सोहमला म्हणाले , मला हे असं खोटं बोलून नाही जगता येत, तू कर काही तरी मी नाही आता अशोकशी खोटं बोलणार.. पण त्याच आपलं एकच मला थोडं सेटल होत देत, नंतर आपण आहोतच कि, एकत्र आयुष्यभर पण माझी मनस्थिती का नाही हा समजून घेत माझी होणारी घुसमट नाही का दिसत सोहम ला कि सर्व कळत असूनही तो न कळल्या सारख करतोय”

1

बदफैली - भाग 1

"शी..बाई आज खूपच उशीर झाला. अशोक जर माझ्या आधी घरी आला असेल तर काही खर नाही आज माझं" अपर्णा बडबडत झपझप चालत होती... "तरी मी सोहमला म्हणाले , मला हे असं खोटं बोलून नाही जगता येत, तू कर काही तरी मी नाही आता अशोकशी खोटं बोलणार.. पण त्याच आपलं एकच मला थोडं सेटल होत देत, नंतर आपण आहोतच कि, एकत्र आयुष्यभर पण माझी मनस्थिती का नाही हा समजून घेत माझी होणारी घुसमट नाही का दिसत सोहम ला कि सर्व कळत असूनही तो न कळल्या सारख करतोय” अपर्णाच घर अगदी चार पाउलांवर आलं होत, अशोक आधीच घरी येऊन बसला ...Read More

2

बदफैली - भाग 2

तीने सहज म्हणून त्याचा फोन हातात घेतला, .त्याच्या वॉलपेपर वर दोघांचा लग्ना आधीचा फार जुना फोटो होता, ते जेव्हा भेटले होते तेव्हाचा, फोटो पाहताच तिच्या डोळ्या समोरून चार वर्षांपूर्वीचा काळ झळकू लागल. *********************************************************************************************************************************** किती सुंदर दिवस होते ते अशोक आणि अपर्णा घरच्यांचा विरोध पत्करून पळून जाऊन लग्न केल, अशोकच्या एका मित्राने त्यांना भाड्याने जागा मिळवून दिली. .त्याच्या डिपॉजिट चे पैसे आणि पुढचं तीन चार महिन्याचं भाडं देखील त्यानच दिल, नशीब दोघाचे जॉब होते म्हणून निदान जेवत तरी होते ते दोन वेळ पण घरखर्च , पाणीबिल, लाईटबील दोघांच्या तुटपुंज्या पगारात भागत न्हवत त्यातच अशोकला एक नवीन नोकरीची संधी मिळाली पगार ...Read More

3

बदफैली - भाग 3

भाग - ३ "खर सांगायचं तर मला पैशांची नितांत गरज आहे, काही महिन्यापूर्वी आम्ही एक घर घेतलं, आमच्या बजेटच्या होत खरतर पण, ते घर मला इतकं आवडलं , मला नाही म्हणताच आलं नाही, त्या मालकाला देखील घर विकायचं होत त्याने आमच्याकडील रक्कम घेतली आणि उरलेली रक्कम सहा महिन्यांच्या मुदतीवर ठेऊन आम्हाला हे घर दिल. मुदत संपायला आता फक्त एक महिना राहिलाय, आम्हाला त्याचे उरलेले पैसे परत करायचेत, त्या माणसाला एक महिन्यानंतर कायमच दुबई शिफ्ट व्हायचंय म्हणून त्याला खूप घाई आहे पैशांची.." "असं आहे तर म्हणून तुम्ही इतक्या टेन्शनमध्ये आहात होय, तुमच्या घरमालकाचं नाव सांगाल जरा." सोहम ने सहज ...Read More

4

बदफैली - भाग 4

भाग -४ तिने त्याला खुणेनेच वर घरी ये अस म्हणाली , पण तो मात्र नको तूच खाली ये अस खुणेनेच म्हणाला. अपर्णाने अशीही सुट्टी टाकलीच होती.. तिने त्याला एक छानस स्मित हास्य दिल आणि हातानेच थांब अस म्हणत ती लगेच तयारी करायला गेली... "सोहम ..तुम्ही आणि इथे "अपर्णा ने अक्षरशः त्याच्या कडे एकटक पाहत विचारल. "काय करणार..तुमच्याकडून ट्रीट घायचीये ना " सोहम पण तिच्या डोळ्या पाहत म्हणाला. "हो.. खरचं खूप आभारी आहे मी तुमची .. तुमच्या मुळेच आम्ही फार मोठ्या प्रसंगातून वाचलो... पण त्या दिवशी तुमचा नंबर देखील मी घेतला नाही.." अपर्णाने तिची चुटपूट बोलून दाखवली. हो ना...खरतर ...Read More