किमयागार

(29)
  • 147.6k
  • 9
  • 81.6k

त्या मुलाचे नांव सॅंटीआगो. तो मेंढपाळ होता. संध्याकाळ झाली होती. तो मेंढ्याना घेऊन प्रवास करत एका उजाड चर्चजवळ पोहोचला होता. त्या चर्चचे छप्पर उडाले होते. तेथे खुप उंबराची झाडे होती. त्याने ती रात्र तिथे काढायचे ठरवले. त्याने सर्व मेंढ्या दरवाजातून आत आल्याची खात्री केली व आजुबाजुने लाकडे लावली जेणेकरून कळपातील कोणी इकडे तिकडे जाऊ नये. त्या भागात लांडगे जरी नसले तरी एखादी मेंढी चुकली असती तर त्याचा दुसरा दिवस शोधण्यात गेला असता. त्याने आपल्या अंगावरील जाकीट खाली पसरले, व तो वाचत असलेले पुस्तक उशीसारखे घेतले. त्याच्या मनात आले आता थोडे जाड पुस्तक आणले पाहिजे म्हणजे उशी म्हणूनपण चांगला उपयोग होईल आणि वेळही ही जास्त जाईल. त्याला जाग आली तेव्हा तसा अंधारचं होता. पडक्या छपरातूंन तारे दिसत होते. आपण थोडा वेळ आणखीन झोपलो असतो तर, असा विचार त्याच्या मनात येउन गेला. मागच्या आठवड्यात पडलेले स्वप्नचं त्या रात्री ही पडले होते पण याही वेळी ते पूर्ण होण्याआधीच त्याला जाग आली होती.

Full Novel

1

किमयागार - 1

Alchemist या इंग्रजी पुस्तकाचे हे भावांतर आहे.किमयागार - सुरुवातत्या मुलाचे नांव सॅंटीआगो. तो मेंढपाळ होता. संध्याकाळ झाली होती. तो घेऊन प्रवास करत एका उजाड चर्चजवळ पोहोचला होता. त्या चर्चचे छप्पर उडाले होते. तेथे खुप उंबराची झाडे होती. त्याने ती रात्र तिथे काढायचे ठरवले. त्याने सर्व मेंढ्या दरवाजातून आत आल्याची खात्री केली व आजुबाजुने लाकडे लावली जेणेकरून कळपातील कोणी इकडे तिकडे जाऊ नये. त्या भागात लांडगे जरी नसले तरी एखादी मेंढी चुकली असती तर त्याचा दुसरा दिवस शोधण्यात गेला असता. त्याने आपल्या अंगावरील जाकीट खाली पसरले, व तो वाचत असलेले पुस्तक उशीसारखे घेतले. त्याच्या मनात आले आता थोडे जाड पुस्तक ...Read More

2

किमयागार - 2

आणि आता चारचं दिवसात तो त्या गांवात पोहोचणार होता. त्याच्यात एक वेगळाच उत्साह आला होता. पण त्याचवेळी त्याला असे होते की ती मुलगी आपल्याला केव्हाच विसरली असेल. असे कितीतरी मेंढपाळ रोज जात येत असतात. तो मेढ्यांना म्हणाला , विसरली असेल तर विसरू दे, मला इतरही मुली माहित आहेत. पण त्याचे मन मात्र त्याला सांगत होते की नाही असे होणार नाही. मेंढपाळ, खलाशी व फिरते विक्रेते याना नेहमीच कोणीतरी असे भेटतं असते जे त्याना प्रवासातील आनंद विसरायला लावते.दिवस उजाडायला लागला होता, त्याने मेंढ्याना उगवतीच्या दिशेने वळवले. त्याच्या मनात आले मेंढ्या कोणताच निर्णय घेउ शकत नाहीत आणि म्हणूनच त्या माझ्यावर अवलंबून ...Read More

3

किमयागार - 3

क्षितिजावर सोनेरी प्रकाश पसरला आणि सूर्योदय झाला. मुलाला वडिलांचे बोलणे आठवले व तो आनंदीत झाला. तो आतापर्यंत खूप शहरांतून होता आणि अनेक मुलींना भेटला होता पण आता तो ज्या मुलीला भेटणार होता तशी कोणी त्याला भेटली नव्हती.‌ त्याच्याकडे मेंढ्या होत्या, एक जाकीट व एक बदलता येण्यासारखे पुस्तक होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला मनासारखे फिरायला मिळणार होते. आणि अंदालुशिया च्या मैदानात फिरण्याचा कंटाळा आला तर मेंढ्या विकून तो समुद्रावर जाऊ शकत होता. आणि समुद्रावर फिरायचा कंटाळा येईपर्यंत तो अनेक शहरांमध्ये फिरलेला असेल, अनेक मुलींना भेटला असेल, त्याच्या आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण येऊन गेलेले असतील. तो नेहमी नवीन रस्ते शोधत ...Read More

4

किमयागार - 4

म्हातारी जरा वेळ शांत बसली मग परत त्याचा हात हातात घेऊन गंभीरपणे पाहू लागली. " मी तुझ्या कडून फी नाही पण तुला मिळणाऱ्या खजिन्यातील दहावा हिस्सा तू मला दे". त्याला मनातून हसू आले , चला या खजिन्याच्या स्वप्नामुळे आपले पैसे आत्ता तरी वाचले. 'ठिक आहे, स्वप्नाचा अर्थ सांग' तो म्हणाला. ' तू आधी शपथ घे की आता मी तुला जे काही सांगणार आहे त्याचा मोबदला म्हणून तू खजिन्याचा दहावा हिस्सा देशील. त्याने शपथ घेतली. तीने परत प्रभू येशू कडे पाहून शपथ घेण्यास सांगितले. मी याचा अर्थ सांगू शकते पण ते खूप कठीण काम आहे म्हणून मला वाटते की तुला ...Read More

5

किमयागार - 5

तो म्हातारा पाठ सोडत नव्हता. तो म्हणाला तो खुप थकलाय आणि तहान लागलीय आणि म्हणाला मला थोडी वाईन देशील त्याने म्हाताऱ्याला बाटलीचं दिली म्हणजे तो एकदाचा जाईल. पण त्या म्हाताऱ्याला बोलायचेच होते .त्याने विचारले तू कोणते पुस्तक वाचतोयस?. खरेतर त्याला एवढा राग आला होता की वाटले बाकाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बसावे पण ते उद्धटपणाचे वाटले असते, त्याच्या वडिलांनी त्याला मोठ्या माणसांचा आदर करण्यास शिकवले होते. मग मुलाने पुस्तक त्याच्या हातात दिले. पुस्तक देण्याची दोन कारणे होती, एक म्हणजे त्याला स्वत:ला‌च त्या पुस्तकाचे नाव उच्चारता येईल की नाही याची खात्री नव्हती, दुसरे म्हणजे त्या म्हाताऱ्याला वाचता येत नसेल तर तो ...Read More

6

किमयागार - 6

आणि पुढे काही बोलायच्या आतच तो म्हातारा वाकला व काठीने तेथील वाळूवर लिहू लागला. आणि अचानक त्या म्हाताऱ्याच्या छातीवर तरी चमकले , त्या प्रकाशाने मुलाचे डोळे दिपले. त्या म्हाताऱ्याने अगदी तरुणाच्या चपळाईने आपल्या कोटाने सर्व झाकून टाकले. मुलाचे डोळे उघडले तेव्हा त्याला वाळूवरील शब्द दिसू लागले. वाळूवर त्याच्या आई वडिलांचे नाव लिहीले होते. त्याच्या विद्यालयाचे नाव होते एवढेंच नव्हे तर त्याला स्वतःलाही माहित नसलेले त्या व्यापाऱ्याच्या मुलीचे नावही होते. आणि अशा काही गोष्टी होत्या ज्या तो आजपर्यंत कोणाजवळ बोलला नव्हता. मी सालेमचा राजा आहे असं म्हातारा म्हणाला होता ते त्याला आठवले. "एक राजा माझ्यासारख्या मेंढपाळाशी का बोलेल " त्याने ...Read More

7

किमयागार - 7

आणि म्हणून तुम्ही अवतरला आहात का?. मुलाने विचारले. "असे काही नाही, मी कोणत्या ना कोणत्या रुपात येत असतो. मी वेळा प्रश्नाच्या उत्तराच्या रुपात अथवा कल्पनेच्या रुपात येतो. आणि काही कठीण परिस्थितीत मी गोष्टी सोप्या करतो. मी काही वेळा अशा गोष्टी करतो की त्या माणसाला मी काय केलेय ते कळत नाही." याचे उदाहरण म्हणून त्यांनी एक गोष्ट सांगितली. एक आठवड्यापुर्वी त्याला एका खाणमालकापुढे हजर व्हावे लागले होते. त्याने दगडाचे रुप घेतले होते. त्या माणसाने हिरा शोधण्यासाठी सर्व काही सोडले होते. त्याने पाच वर्षांत हजारो दगड तपासले आणि आता हे तो अशा क्षणी सोडणार होता की जेव्हा हिरा त्याच्या हातात येणार ...Read More

8

किमयागार - 8

त्याला अंदालुसीआ मधील सर्व कुरणे, मैदाने माहित झाली होती. आणि आपल्या मेंढ्यांची योग्य किंमत करणे त्याला कळू लागले होते. मित्राच्या तबेल्याकडे लांबच्या रस्त्याने जाण्याचे ठरवले. तो शहरातून जाताना एके ठिकाणी थांबला आणि एका टेकडीवर चढला. तेथून काही अंतरावरील आफ्रिका दिसत होती. त्याला कोणी तरी सांगितले होते की " मुर " लोकांनी तेथून येऊन स्पेन काबीज केले होते. तो जिथे बसला होता तेथून सर्व शहर दिसत होते, म्हाताऱ्याबरोबर ज्या चौकात भेट झाली होती तो चौक पण दिसत होता.कुठुन तो म्हातारा आपल्याला भेटला असं त्याच्या मनात आले. तो या शहरात त्याला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ सांगणाऱ्या जिप्सी स्त्रीला भेटण्यासाठी आला होता. जिप्सी ...Read More

9

किमयागार - 9

मुलगा काही तरी बोलणार इतक्यात तिथे एक फुलपाखरू आले आणि दोघां मध्ये फिरू लागले. मुलाला आठवले की फुलपाखरू शुभ दर्शवणारे असते असे त्याचे आजोबा म्हणाले होते. तसेच तीन पातींच्या गवतामध्ये चार पाती गवत मिळणे व पाली याही शुभ शकुन दर्शवणारे आहेत असे त्यांनी सांगितले होते.त्याच्या मनातील विचार ओळखत म्हातारा म्हणाला तुझे आजोबा बरोबर सांगत होते हे शुभ शकुन आहेत. त्याचवेळी म्हाताऱ्याने आपला कोट बाजूला केला आणि मुलाचे डोळे त्याला जे दिसले त्यामुळे दिपले. म्हाताऱ्याने सोन्याचे जड कवच घातले होते व त्यावर मौल्यवान खडे व रत्ने होती. म्हणजे म्हातारा खरंच राजा होता व चोरांपासून वाचण्यासाठी त्याने हा पेहराव केला होता. ...Read More

10

किमयागार - 10

मेंढपाळ गोष्ट ऐकून काहीच बोलला नाही. त्याला राजाने सांगितलेल्या गोष्टीचा अर्थ कळला होता. मेंढपाळ कितीही प्रवास करो पण त्याने मेंढ्यांना विसरता कामा नये. म्हाताऱ्याने मुलाचे हात हातात घेतले नंतर त्याच्या डोक्यावरून हात फिरवला व तो मेंढ्यांना घेऊन गेला. तरिफाच्या एका टोकाला 'मुर' लोकांनी बांधलेला एक किल्ला आहे. किल्ल्यावरून अफ्रिकेची झलक दिसते.सालेमचा राजा (म्हातारा) त्या किल्ल्यावरील भिंतीवर बसला होता. त्याच्या बाजूला असलेल्या मेंढ्या नवीन मालकाकडे थोड्या बुजल्या असल्या तरी त्याना बदल कळत होता.राजाने एक छोटे जहाज बंदरातून बाहेर पडताना दिसले, त्याच्या मनात आले आता तो मुलगा त्याला कधीच भेटणार नव्हता. मुलाच्या मनात आले की आफ्रिका खुप वेगळी आहे. तो एका ...Read More

11

किमयागार - 11

मुलाला मनातुन असेच वाटत होते की गर्दीमुळे तो तरुण हरवला असे वाटत असेल. थोडा वेळ याच विचारात गेला, आणि टॉवरवर एक धर्मगुरू आले तेंव्हा सर्व जण कपाळ जमीनीवर टेकवून बसले आणि अचानक सर्वजण स्टॉल बंद करून निघून गेले. संध्याकाळ झाली. तो एका नवीन देशात होता , तेथील भाषा पण त्याला येत नव्हती. तो मेंढपाळ पण राहिला नव्हता. आणि त्याच्या खिशात परत जाण्यासाठी पैसे पण नव्हते. सूर्योदय व सूर्यास्त यामध्ये बरचं काही घडून गेले होते. अचानक सर्व आयुष्य बदलले होते. त्याला रडू येऊ लागले होते. मार्केट रिकामे होते, तो घरापासून दूर होता, त्याच्या अश्रुंचा बांध फुटला. त्याला वाटू लागले की ...Read More

12

किमयागार - 12

भाग ११ मध्ये मार्केटमधील प्रसंगामध्ये काही भाग पोस्ट करायचा राहिला होता तो आता पाठवत आहे. क्षमस्व. किमयागार - मार्केट कोणीतरी हलवल्यामुळे जागा झाला. तो मार्केटमध्ये झोपला होता आणि मार्केट परत चालू होऊ लागले होते. तो आपल्या मेंढ्यांना शोधू लागला. त्याच्या लक्षात आले की तो आता नवीन जगात होता. आता मेंढ्यांसाठी चारा पाणी शोधायचे नव्हते.‌ आता तो खजिन्याच्या शोधात जाणार होता. त्याच्या खिशात एक पैसाही नव्हता पण श्रद्धा व आत्मविश्वास होता. त्याने रात्रीच ठरवले होते की हिरो फक्त पुस्तकात नसतात. तो साहसी माणूस होणार आहे.तो मार्केटमध्ये हळूहळू चालू लागला. व्यापारी त्यांची दुकाने लावत होते. मुलाने एका मिठाईवाल्याला दुकान मांडण्यात मदत ...Read More

13

किमयागार - 13

किमयागार भाग १३मुलगा म्हणाला, मी दुपारी व रात्री, अगदी पहाटेपर्यंत काम करीन आणि तुमचे दुकान पूर्ण स्वच्छ करीन. तुम्ही पैसे द्याल त्यातून मला उद्या इजिप्तला जायचे आहे.व्यापारी हसला , तू माझ्याकडे वर्षभर काम केलेस व मी तुला क्रिस्टल विक्री चे चांगले कमिशन दिले तरी तुला इजिप्तला जाण्यासाठी कर्ज काढावे लागेल. हजारो किलोमीटर चे वाळवंट या दोन प्रदेशांदरम्यान आहे.क्षणभर तिथे सारे शहर निद्रीस्त असल्यासारखी शांतता पसरली.बाजारातील आवाज, व्यापारी व गिह्राइक यांचे बोलणे असा कोणताच आवाज येत नव्हता. कान बधीर झाले होते. आता कसलीच आशा राहिली नव्हती, ना तो राजा, ना नियती, ना पिऱ्यामिड ना खजिना.मुलगा सुन्न होऊन कॅफेच्या बाहेर बघत ...Read More

14

किमयागार - 14

व्यापारी म्हणाला, मला कधी असे वाटलेच नाही की कोणी वाळवंट पार करून पिऱ्यामिड बघायला जाईल. ते दगडाचे ढिगारे आहेत. तसे आपल्या घराच्या मागे बांधू शकता. तुम्ही कधी प्रवासाचे स्वप्न पाहिलेच नाही का? मुलगा म्हणाला, पण इतक्यात एक गिह्राईक आल्याने बोलणे थांबले. दोन दिवसांनी व्यापाऱ्यानी परत शोकेसचा विषय काढला. मला बदल फारसे आवडत नाहीत. आपण काही त्या हसन सारखे श्रीमंत नाही, त्याने एखादी चुक केली तर त्याला फरक पडत नाही पण आपल्याला चुक महागात पडेल. मुलाला वाटले हे दु:खदायक असले तरी खरेच आहे. पण तू शोकेस का करू इच्छितोस?. मला लवकर परत जायचे आहे व मेंढ्या घ्यायच्या आहेत. आपण नशीब ...Read More

15

किमयागार - 15

व्यापारी म्हणाला येथे खुप ठिकाणी चहा मिळतो. मुलगा म्हणाला आपण क्रिस्टल ग्लास मधून चहा देऊया, लोक चहाचा आस्वाद घेतील ग्लास विकत घेण्यास तयार होतील. लोक नवीन व छान काही दिसले की खुश होतात. व्यापारी यावर काही बोलला नाही. त्या दिवशी दुकान बंद झाल्यावर व प्रार्थना म्हणून झाल्यानंतर हुक्का पित असताना व्यापाऱ्याने मुलाला बोलावले व विचारले तुझ्या मनात तरी काय आहे ?. मुलगा म्हणाला मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की मला मेंढ्या घ्यायच्या आहेत आणि त्यासाठी पैसे मिळवावे लागतील. व्यापाऱ्याने एक मोठा झुरका घेतला व म्हणाला मी हे दुकान तीस वर्षे चालवतोय. मला क्रिस्टल बाबत पूर्ण माहिती आहे . लोकांना ...Read More

16

किमयागार - 16

मुलगा पहाटेपुर्वीच उठला. त्याला आफ्रिका खंडात येऊन अकरा महिने नऊ दिवस झाले होते. त्याने खास या दिवसासाठी आणलेले पांढरे कपडे घातले. डोक्यावरील टोपी नीट करून त्याला उंटाच्या कातडीने बनवलेली रींगने घट्ट केली व नवीन चप्पल घालून तो पायऱ्या उतरला.सारे शहर झोपलेले होते. त्याने स्वतः साठी सॅन्डविच बनवले व क्रिस्टल ग्लास मधून चहा घेतला व नंतर अंगणात तो हुक्का पित बसला. तो शांतपणे हुक्का पित होता.मनात कोणताही विचार नव्हता, फक्त वाऱ्याचा आवाज येत होता व वाऱ्याबरोबर वाळूचा वास येत होता. नंतर त्याने खिशात हात घातला व खिशातील वस्तू चा विचार करत शांत बसला. खिशात पैशाचे बंडल होते, ते पैसे एकशेवीस ...Read More

17

किमयागार - 17

तो व्यापाऱ्याचा निरोप न घेताच निघाला. त्याला इतर लोक तिथे असताना रडणे नको होते. त्याला या जागेची आणि इथे गोष्टींची नेहमीच आठवण येणार होती. आता त्याला पहिल्यापेक्षा जास्त आत्मविश्वास आला होता. आणि आपण जग जिंकू शकू असे त्याला वाटत होते.किमयागार -शकुन की योगायोग?तो मनात म्हणाला, ' पण मी तर मला माहित असलेल्या ठिकाणी चाललो आहे. माझ्या कळपात परत जाऊन मेंढ्यांची काळजी घेणार आहे.'हे जरी तो मोठ्या खात्रीने बोलला असला तरी तो त्याच्या निर्णयाबाबत समाधानी नव्हता. तो जे स्वप्न खरे करण्यासाठी वर्षभर झटला होता, ते आता त्याला विशेष महत्वाचे वाटत नव्हते. कारण खरेतर ते त्याचे स्वप्नचं नव्हते. खरेचं क्रिस्टल व्यापाऱ्याप्रमाणे ...Read More

18

किमयागार - 18

त्याने आपल्या वडिलांकडून मिळालेल्या संपत्तीचा बराच भाग ' परीस ' शोधण्यात घालवला होता.त्याने जगातील मोठ्या वाचनालयात अलकेमीची पुस्तके वाचली विकत घेतली होती. त्यातून त्याला कळले होते की, एक अरब अल्केमिस्ट , जो दोनशे वर्षांचा होता त्याला परीस मिळाला होता. अरबस्तानात जाऊन आलेल्या एका मित्राने सांगितले की , अल फायोम वाळवंटात एक अरब आहे, तो कोणत्याही धातूपासून सोने बनवतो तो दोनशे वर्षांचा आहे असे म्हणतात.हे ऐकून इंग्रजाचा उत्साह अनावर झाला. त्याने आपली सर्व कामे थांबवली व काही पुस्तके घेऊन निघाला आणि तो आता या गोदामात पोहोचला होता.बाहेर एक मोठा तांडा आला होता आणि तो वाळवंट पार करून जाणार होता व ...Read More

19

किमयागार - 19

हा एक शुभ शकुन आहे. अरब बाहेर पडल्यावर इंग्रज म्हणाला. मी योगायोग व नशीब या दोन शब्दांवर ग्रंथ लिहू या शब्दांवर सर्वाना समजणारी अशी वैश्विक भाषा लिहिली जाते. तो मुलाला म्हणाला की, आपली भेट तुझ्या हातात उरीम थुम्मीम असतांना झाली हा फक्त योगायोग नाही. त्याने विचारले तू पण अलकेमिस्टला शोधायला चाललास का? मुलगा म्हणाला मी खजिना शोधण्यासाठी चाललो आहे. त्याला वाटले की हे आपण उगाच बोललो. पण इंग्रजाला त्यात काही विशेष वाटले नाही, तो म्हणाला मी पण एका अर्थी त्याच शोधात आहे. मुलगा म्हणाला, मला अल्केमी म्हणजे काय तेही माहिती नाही. तो असे बोलत असतानाच एक मुलगा त्यांना बाहेर ...Read More

20

किमयागार - 20

किमयागार - वाळवंट मी मेंढ्या कडून शिकलो, क्रिस्टल कडून शिकलो आणि आता मला या वाळवंटाकडून पण काही शिकायला मिळणार मुलगा विचार करित होता. वारा काही थांबत नव्हता, मुलाला तरिफामधील पहिला दिवस आठवला. तो किल्ल्यावर बसला होता आणि वारा झोंबला होता. अचानक त्याला मेंढ्यांची आठवण झाली. आताही त्या अंदालुसियाच्या मैदानात अन्नपाण्याच्या शोधात फिरत असतील. त्याच्या मनात आले , आता त्या काही माझ्या मेंढ्या नाहीत, त्या त्यांच्या नविन मेंढपाळाबरोबर रुळल्या असतील आणि कदाचित मला विसरल्या असतील. तसे असले तरी फारचं छान ! . मेंढ्यासारख्या प्राण्यांना प्रवासाची सवय असते आणि त्यांना पुढे जात राहणे समजते. त्याच्या मनात व्यापाऱ्याच्या मुलीचा विचार आला. त्याला ...Read More

21

किमयागार - 21

किमयागार -उंटचालकया पुरामुळे सर्व काही नष्ट झाले व मला जगण्यासाठी दुसरे काम शोधावे लागले व मी उंटचालक झालो.या संकटामुळे अल्लाहची जाणिव झाली व समजले की माणसाने संकटाला तोंड देण्याची तयारी ठेवावी, घाबरून जाऊ नये. त्याने हे समजून घेतले पाहिजे की, आपल्याला काय हवे आहे व आपण ते कसे मिळवू शकतो.आपण आपले सर्व काही गमावून बसू अशी आपल्याला भीती वाटत असते पण ही भीती त्यावेळी संपते जेव्हा आपण इतर लोकांचे जीवन बघतो व जगातील इतिहास पहातो. तेव्हा कळते की हे सर्व लिहिणारा हात एकचं आहे.प्रवासातील घटना.काही वेळा दुसरा प्रवासी तांडा भेटत असे.एकमेकांना हव्या असलेल्या वस्तू त्यांना मिळत असतं.जणूकाही त्या लिहून ...Read More

22

किमयागार - 22

किमयागार या किमयागारांनी आपले पूर्ण आयुष्य प्रयोगशाळेत धातू शुद्ध करण्यात घालवले होते. त्यांचा विश्वास होता की जर कोणताही धातू वर्षे तापवला तर तो त्याचे गुणधर्म सोडतो व मिळतो तो जगाचा आत्मा. या जगतआत्म्याच्या सहाय्याने त्याना जगातील अनेक गोष्टींची माहिती मिळवता येऊ शकते. कारण ही एक वैश्विक भाषा आहे जी सर्व ठिकाणी वापरता येते. ते जे कार्य करत होते ते घन व द्रव स्वरूपात होते. त्या कार्याला ते तज्ञांनी केलेले महत्त्वपूर्ण कार्य मानत. मुलगा म्हणाला, तुम्ही भाषा कळण्यासाठी माणसांचे निरीक्षण व शकुन चिन्हांचा वापर करू शकत नाही का?.इंग्रज म्हणाला, तुला सर्व गोष्टी सोप्या करण्याचे वेड आहे. किमयागारी हे एक मोठे ...Read More

23

किमयागार - 23

किमयागार- किमयागिरीएक दिवस मुलाने सगळी पुस्तके इंग्रजाला परत केली. इंग्रजाने अत्यंत उत्सुकतेने व उत्तराच्या अपेक्षेने त्याला विचारले, तू यातून शिकलास का?. इंग्रजाला कोणीतरी बोलण्यासाठी हवे होते कारण त्याच्या मनात सतत युद्धाबद्दल विचार येत होते व त्याला बदल हवा होता.मला समजले की, या जगाला एक आत्मा आहे.ज्याला हे समजेल त्याला वैश्विक भाषा कळेल. मला लक्षात आले की अनेक किमयागारांनी आपले आयुष्य आपले भाग्य शोधण्यात घालवले आणि त्यांना जगाचा आत्मा, परिस व अमृत याचा शोध लागला.इंग्रज निराश झाला. वर्षानुवर्षे चालू असलेले संशोधन, विशिष्ट खुणा, चिन्हे, विचित्र शब्द, प्रयोगशाळेतील साहित्य या सगळ्या गोष्टींचा मुलावर काही परिणाम झालेला दिसत नव्हता. त्याने सर्व पुस्तके ...Read More

24

किमयागार - 24

किमयागार - ओॲसिसजग बऱ्याच भाषेत बोलत असते.काळ पुढे चालत असतो तसेच तांडेही. किमयागार ओॲसिसवर पोचणाऱ्या लोकांकडे व प्राण्यांकडे पाहत करत होता.नविन आलेले लोक आनंदाने ओरडत होते आणि वाळवंटातील सूर्याला धुळीचे लोट झाकत होते.ओॲसिसवर असलेली मुले नवीन लोकांचे स्वागत उत्साहाने ओरडून करत होती. किमयागाराने पाहिले की, स्थानिक लोक तांडा नेत्याचे अभिनंदन करत होते. तसेच बराच वेळ संभाषण करत होते.पण हे सर्व किमयागाराच्या दृष्टीने महत्त्वाचे नव्हते. आतापर्यंत अनेक लोक वाळवंटात आलेले व गेलेले बघितले होते. पण वाळवंट तेथेचं होते. त्याने अनेक राजे व रंक या वाळवंटात फिरताना बघितले होते.वाळूचे ढिगारे वाऱ्यामुळे बदलत असतात पण तो लहान असल्यापासून वाळू मात्र तिचं होती. ...Read More

25

किमयागार - 25

किमयागार ओॲसिसतांड्याच्या नेत्याने त्याचे पहारेकरी व इतरांना पण त्यांच्याकडील हत्यारे टोळी प्रमुखाने नेमलेल्या माणसाकडे देण्यास सांगितले.नेता म्हणाला, हा युद्धाचा आहे. ओॲसिस मध्ये सैनिकांना आश्रय नाही.(संघर्ष होऊ नये म्हणून). इंग्रजाने त्याच्याकडील रिव्हॉल्व्हर बॅगेतून काढून शस्त्रे गोळा करणाऱ्याकडे दिले.ते पाहून मुलाला आश्चर्य वाटले, त्याने विचारले रिव्हॉल्व्हर कां दिले?. इंग्रज म्हणाला त्यामुळे एकमेकांवरील विश्वास वाढतो.मुलाच्या मनात खजिन्याविषयी विचार चालू झाले होते. तो त्याच्या स्वप्नाच्या जेवढा जवळ जात होत होता, तेवढ्याच सर्व गोष्टी अवघड होत होत्या. राजा म्हणाला होता त्याप्रमाणे नविन सुरुवात करणाऱ्याचे नशीब हा सिद्धांत (अनुकुलतेचा सिद्धांत) सध्या काम करत नाही असे त्याला वाटले.त्याच्या स्वप्नपूर्तीच्या वाटचालीत त्याने अनेक परीक्षा दिल्या होत्या. अनेक ...Read More

26

किमयागार - 26

किमयागार - भाषा 'प्रेमाची'. शेवटी तिथे एक तरुणी आली. तिने काळे कपडे घातले नव्हते. तिच्या खांद्यावर कळशी होती. तिचे पदराने झाकले होते पण चेहरा दिसतं होता. तरुण तिच्या जवळ किमयागाराबद्दल विचारणेसाठी गेला. त्याच क्षणी त्याला काळ थांबला आहे असे वाटले. जगद्आत्म्याचा त्याच्यामध्ये संचार झाला आहे असे त्याला वाटले. त्याने तिच्या काळ्याभोर डोळ्यात पाहिले, तिचे अर्धोन्मिलित ओठ व स्मितरेषा (अर्धवट मिटलेले ओठ व हास्य ) पाहून त्याला अशा भाषेचे ज्ञान झाले, जी भाषा सर्व जगाला कळू शकते आणि जी थेट हृदयाला भिडते आणि ती भाषा म्हणजे ' प्रेमाची भाषा '. माणूसकी हून अधिक जुनी आणि वाळवंटापेक्षा प्राचीन अशी ही भाषा. ...Read More

27

किमयागार - 27

किमयागार -विहिर - Girish दुसऱ्या दिवशी तरुण परत विहिरीकडे गेला . त्याला खात्री होती की फातिमा भेटेल. तेथे त्याला बसलेला दिसला. त्याला आश्चर्य वाटले. तरुणाकडे बघून इंग्रज म्हणाला, मी दिवसभर वाट पाहिली पण किमयागार मला आकाशात चांदण्या दिसू लागल्या तेव्हा भेटला. मी त्याला सांगितले मी तुम्हालाच शोधत इथे आलों आहे. किमयागाराने विचारले ' तू यापूर्वी कधी कोणत्या धातूचे सोने केले आहेस का?'. मी म्हणालो तेच तर शिकण्यासाठी मी आलोय. तो म्हणाला, मग तू तसा प्रयत्न केला पाहिजे. जा ! प्रयत्न कर. तरुण क्षणभर काहीच बोलला नाही. बिचारा इंग्रज इतक्या दूरवर आलाय आणि त्याला सांगितले जातेय की तू इतके दिवस ...Read More

28

किमयागार - 28

किमयागार -मक्तूबफातीमा म्हणाली, आणि म्हणूनच मला वाटते की, तू तुझे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करावा. युद्ध संपेपर्यंत थांबावे लागले तरी पण तुला आधी जायचे असले तरी तुझ्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न कर. वाळूच्या टेकड्यांचा आकार वाऱ्यामुळे बदलत असतो, पण वाळवंट बदलत नाही आणि आपल्या प्रेमाचे असेचं होणार आहे.ती पुढे म्हणाली "मक्तूब". मी जर खरेच तुझ्या स्वप्नाचा एक भाग असेन तर तू नक्कीच परत येशील.त्या दिवशी तरुणाला उदास वाटत होते. त्याच्या मनात लग्न झालेल्या मेंढपाळांबद्दल विचार येत होते. त्यांना आपल्या पत्नीला हे समजवावे लागे की त्यांना दूरवरच्या प्रदेशात जाणे आवश्यक आहे. प्रेम माणसाला एकमेकांसोबत राहाण्यास भाग पाडत असते. हे विचार त्याने फातिमाला सांगितले.फातिमा ...Read More

29

किमयागार - 29

किमयागार -जाणिव त्याला या युद्धाच्या कल्पनेत रमण्यापेक्षा प्रेमाच्या कल्पनेत रमावे असे वाटत होते. तो गुलाबी वाळू व वाळवंटातील दगडांवर केंद्रीत करू पाहत होता पण त्याच्या मनाच्या कोपऱ्यात प्रेमामुळे निर्माण झालेली मृदू भावना त्याला तसे करू देत नव्हती.त्याच्या मनात आले, राजा म्हणाला होता, शकुनांकडे काळजीपूर्वक अवधान ठेवावे. आपण जे काही स्वप्न पाहू ते प्रत्यक्षात येत असतेचं. तो उठून खजुराच्या झाडांकडे परतीच्या मार्गावर चालू लागला. त्याला जाणवले की, प्रत्येक गोष्टीचा अर्थ दरवेळी बदलत असतो. आता यावेळी वाळवंट सुरक्षित व ओॲसिस भितीदायक बनले होते. उंटचालक एका खजुराच्या झाडाखाली बसून सूर्यास्त पहात होता. त्याने तरुणाला येताना पाहिले. तरुण त्याला म्हणाला, सैन्य येत आहे. ...Read More

30

किमयागार - 30

किमयागार -प्रमुख ओॲसिसच्या मध्यभागी असलेल्या एका मोठ्या तंबूच्या दारात असलेल्या पहारेकऱ्यासमोर तरुण उभा राहिला व म्हणाला, मला प्रमुखांना भेटायचे मला काही संकेत सांगायचे आहेत. तो पहारेकरी काही न बोलताच तंबूत गेला आणि थोड्या वेळाने एका शुभ्र कपड्यातील तरुण अरबाला घेऊन आला. तरुणाने अरबाला त्याने काय पाहिले ते सांगितले. अरब म्हणाला, तू इथेच थांब व तो आत गेला.रात्र झाली. बाहेरच्या शेकोट्या पण हळूहळू बंद होत होत्या, सगळीकडे शांतता पसरली होती, त्या मोठ्या तंबूत प्रकाश दिसत होता. या सर्व वेळात तरुणाच्या मनात फातिमाचा विचार चालू होता. त्यांच्या भेटीत झालेले संभाषण त्याला आठवत होते आणि त्याचा अर्थ त्याला अजूनही नीट समजला नव्हता.बराच ...Read More

31

किमयागार - 31

किमयागार -मक्तूब - Girishवृद्ध प्रमुखाने इशारा केल्यावर सर्व उभे राहिले. चर्चा संपली होती. हुक्के विझवले गेले. पहारेकरी त्यांच्या स्थानावर राहिले. प्रमुख परत बोलू लागले. आपण उद्या पासून ओॲसिसवर हत्यार बाळगू नये हा नियम बदलतं आहोत. पूर्ण दिवस आपण शत्रू वर लक्ष ठेवायचे आहे. सूर्यास्त झाल्यावर सगळ्यानी शस्त्रे माझ्या ताब्यात द्यायची आहेत. शत्रूच्या १० मृत माणसामागे एक सोन्याचे नाणे दिले जाईल.पण समोरच्यानी हल्ला केल्याशिवाय कोणीही हत्यार वापरायचे नाही. हत्यारे पण वाळवंटासारखीचं लहरी असतात, वापरली गेली नाही तर ती पाहिजे तेव्हा उपयोगी पडतीलच असे नाही. तरुण आपल्या तंबू कडे निघाला. पोर्णिमेच्या चांदण्याच्या प्रकाशात सर्व स्पष्ट दिसत होते. तो त्याच्या तंबूच्या दिशेने ...Read More

32

किमयागार - 32

किमयागार -घुसखोर - दुसऱ्या दिवशी सकाळी अल फायोममधील पाम वृक्षराजी भोवती दोन हजार शस्त्रधारी लोक जमले होते. सूर्य माथ्यावर त्यावेळी अंदाजे पाचशे लोक क्षितिजावर दिसू लागले. ते शांतपणे येत असले तरी त्यांच्या जवळ शस्त्रे होती. ते उत्तरेकडून ओॲसिसवर पोहोचले होते. ते एका तंबूसमोर आले आणि त्यांनी त्यांच्या कडील तलवारी,रायफली हातात घेतल्या. आणि त्या रिकाम्या तंबूवर हल्ला केला.ओॲसिस मधील लोकांनी वाळवंटातून आलेल्या सैनिकांना घेरले आणि एक तासाच्या आत फक्त एक माणूस सोडला तर बाकीचे घुसखोर मारले गेले होते. ओॲसिस मधील मुलें खजुराच्या झाडांच्या मागील बाजूस होती त्यामुळे त्यांना इकडे काय घडले ते दिसले नव्हते. स्त्रिया आपल्या तंबूत बसून आपल्या नवऱ्यांच्या ...Read More

33

किमयागार - 33

किमयागारतरुण म्हणाला, मला आत्ता तरी खजिना सापडला आहे असेच वाटते. माझ्याकडे उंट आहेत, माझ्याकडे क्रिस्टल दुकानात मिळवलेले पैसे आहेत पन्नास सोन्याची नाणी आहेत. माझ्या देशात तर मी श्रीमंत माणूस समजला जाईन.‌ किमयागार म्हणाला पण यातले काही पिरॅमिड मुळे मिळालेले नाही. तरुण म्हणाला, मला फातिमा मिळाली आहे ती पण एखाद्या खजिन्यासारखीच आहे. ते आता शांतपणे जेवण करत होते. किमयागाराने एक बाटली उघडली व त्यातील लाल पेय तरुणाच्या ग्लास मध्ये ओतले. तरुणाने आतापर्यंत चाखलेल्या वाईनमधील ही सर्वात छान वाईन होती. तरुण म्हणाला, इथे वाईनला बंदी आहे ना ?. किमयागार म्हणाला, " माणसाच्या तोंडातून आत जाते ते वाईट नसते, तर माणसाच्या तोंडातून ...Read More

34

किमयागार - 34

किमयागार -ओॲसिसकडे परत - Girishकाय घडेल ते मी तुला सांगतो.तू ओॲसिसचा सल्लागार होशील. तुझ्याकडे खुप मेंढ्या व उंट घेण्याइतके असेल.तू फातिमाशी लग्न करशील.एक वर्षे तुम्ही आनंदाने संसार कराल.तू पन्नास हजार खजुराच्या वृक्षामधील सर्वांना ओळखू लागशील. तुला जग कसे बदलते ते दिसेल. तू अधिकाधिक शकून ओळखू लागशील कारण वाळवंट हेच मोठे शिक्षक आहे. दुसऱ्या वर्षी तुला खजिन्याची आठवण होईल. शकून दिसू लागतील पण तू तिकडे दुर्लक्ष करशील.ओॲसिसच्या रहिवाशांप्रमाणे तू युद्ध विद्येचे ज्ञान वापरशील. टोळी प्रमुख तुझी स्तुती करतील. आणि तुझे उंट तुला पैसा व सत्ता देतील. तिसऱ्या वर्षीही तुझे भाग्य आजमावण्यासाठीचे शकुन तुला दिसतील.तू वाळवंटात फिरत राहशील आणि फातिमाला तुझे ...Read More

35

किमयागार - 35

किमयागार -फातिमा - Girishतरूण पुढे बोलू लागला. मला एक स्वप्न पडले, मग माझी राजाची भेट झाली. मी क्रिस्टल विक्री आणि वाळवंट पार केले आणि युद्धामुळे मी इथे थांबलो, विहीरीजवळ किमयागाराच्या शोधात गेलो, तिथे तू भेटलीस आणि माझे तुझ्यावर प्रेम आहे. वैश्विक शक्तीनी मला तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली. त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली, ही त्यांची स्पर्शाची पहिलीच वेळ होती. मी परत येईन , तरुण म्हणाला.फातिमा म्हणाली, यापुर्वी मी वाळवंटाकडे बघताना काही इच्छा करत असे पण आता मी अपेक्षेने तिकडे पाहीन. माझे वडील पण बाहेर गेले व परत आले आणि ते परत येतातच. ते दोघे आता शांतपणे चालत होते. तरूणाने तिला ...Read More

36

किमयागार - 36

पांचूची गोळी -किमयागार म्हणाला, 'कृती' हा एकचं शिकण्याचा मार्ग आहे.तुला तुझ्या प्रवासात पाहिजे होते तेव्हढे ज्ञान मिळाले आहे, तुला फक्त एकच गोष्ट शिकायची बाकी आहे. तरुणाला वाटले किमयागार ती गोष्ट सांगेल पण तो आकाशाकडे, ससाणा येतोय का ते पाहत होता.तरुणाने विचारले' तुम्हाला किमयागार का म्हणतात?.कारण "मी किमयागार आहे " किमयागार म्हणाला.आणि इतर जे लोक सोने बनवण्याचा प्रयत्न करत होते ते अयशस्वी का ठरले ? तरुणाने विचारले. कारण ते फक्त खजिन्याच्या शोधात होते स्वतःच्या नियतीच्या शोधात जगत नव्हते.तरूणाने विचारले, मला आणखी काय ज्ञान आवश्यक आहे?. पण किमयागार अजूनही आकाशाकडे बघत होता. बहिरी ससाणा भक्ष्य घेऊन आला. किमयागाराने एक खड्डा खोदला ...Read More

37

किमयागार - 37

किमयागार -हृदय पुढील तीन दिवस ते हत्यारबंद सैन्याच्या मधून जात होते आणि क्षितिजावर पण सैन्य दिसत होते. तरुणाचे ह्रदय भाषा बोलू लागले होते. ते त्याला जगद्आत्म्याकडून ऐकलेल्या गोष्टी सांगत होते.अशा माणसांच्या गोष्टी सांगत होते जे खजिन्याच्या शोधात निघाले होते पण अयशस्वी झाले होते.काही वेळा अशी भीती दाखवत असे की तो खजिना शोधू शकणार नाहीच पण तो या वाळवंटात मृत्यू पावेल.काही वेळा ते प्रेम व श्रीमंती दोन्ही मिळाल्यामुळे समाधानी असल्याचे पण सांगत असे.माझे ह्रदय विश्वास घातकी आहे, ते दोघे घोड्यांना विश्रांती देण्यासाठी एके ठिकाणी थांबले तेव्हातरुण किमयागाराला सांगत होता , ते पुढे जाऊ नको असे सांगतेय.ते एका दृष्टीने बरोबरच आहे. ...Read More

38

किमयागार - 38

पृथ्वीवरील प्रत्येकासाठी त्याचा खजिना वाट बघत असतो. पण माणूस शोध घ्यायला तयार नसतो.माणसे त्याबद्दल बोलतात, पण ते‌ नंतर आयुष्य पुढे जाते तसे जाऊ देतात, जिकडे नेईल तिकडे.आणि दुर्दैवाने फारचं थोडे लोक त्यांना आखून दिलेल्या मार्गावर चालतात, त्यांचे भाग्य मिळवण्याचा आणि त्यांना आनंद मिळवून देणारा मार्ग.बरेच लोक जगाकडे भीतीयुक्त नजरेने पाहतात आणि त्यांना हे जग एक भयंकर ठिकाण वाटू लागते.आणि आम्ही ह्रदये खुप मृदुपणे बोलतो, आम्ही बोलणे थांबवत नाही आणि आपले शब्द ऐकले जाणार नाहीत अशी आशा करतो, आम्हाला असे वाटते, माणसाला ह्रदयाचे न ऐकल्याने दुःखाची वेळ येउ नये.तरुण किमयागाराला म्हणाला, ह्रदय माणसाला स्वप्न पूर्तीसाठी प्रयत्न करायला का सांगत नाही? ...Read More

39

किमयागार - 39

तरुणाने किमयागाराला विचारले, माणसाचे ह्रदय त्याला मदत करत असते कां?किमयागार म्हणाला, खरेतर जे‌ लोक स्वतःचे नशीब आजमावाण्याचा प्रयत्न करतात ते मदत करते, पण मुले, वृद्ध व्यक्तीना ते मदत करते. म्हणजे माझ्यावर कोणते संकट येणार नाही का?. याचा अर्थ इतकाच की , ह्रदय त्याला शक्य ते सर्व करत असते.त्या दुपारी ते एका टोळीच्या वस्तीवर पोहोचले. त्या वस्तीवर चांगले कपडे घातलेले अरब होते, पण ते हत्यारबंद होते. ते हुक्का पित युद्धातील प्रसंगाविषयी बोलत होते. त्यांच्या पैकी कोणी या प्रवाशांकडे बघितले नाही. तरुण म्हणाला, आपल्याला काही त्रास झाला नाही ते बरे झाले.किमयागार म्हणाला, ह्रदयावर विश्वास ठेव, पण एक लक्षात घे तू वाळवंटात ...Read More

40

किमयागार - 40

किमयागार - वारा.तरुण म्हणाला, तुम्ही त्यांना माझी सर्व कमाई देऊन टाकलीत.किमयागार म्हणाला, खरे आहे, पण तू जर मेला असतास तुला त्याचा काय उपयोग होता. तुझ्या पैशाचा तुला जीव वाचवण्यासाठी उपयोग झाला. तरूणाला खरेतर किमयागाराने सैन्य प्रमुखाला जे सांगितले होते त्यामुळे भीती वाटत होती.तो स्वतःला वारा कसा बनवणार होता, तो किमयागार नव्हताच.किमयागाराने एका सैनिकाकडून चहा मागवला आणि थोडासा चहा तरुणाच्या मनगटावर ओतून काहीतरी पुटपुटला त्यामुळे तरुणाला एकदम शांत वाटू लागले.किमयागार म्हणाला भीतीला बळी पडू नकोस नाहीतर तुझे हृदय तुझ्या बरोबर बोलू शकणार नाही. पण मी वारा कसा होईन हे मला माहीत नाही. जो माणूस स्वतःचे भाग्य आजमावत असतो त्याला सर्व ...Read More

41

किमयागार - 41

किमयागार - वारातुमच्या मनात प्रेमभावना असेल तर तुम्ही काहीही करू शकता. घटना घडत जातात. माणूस वारा बनू शकतो, अर्थात मदत केली तरचं.खरेतर हे बोलणे वाऱ्याला विचित्र वाटत होते. त्याने आपला वेग वाढवला, वाळू उंच उडू लागली, पण त्याला कळले की, आपण जरी असे केले तरी, माणसाला वारा कसे बनवायचे आपल्याला माहीत नाही. आणि प्रेमाबद्दल काही माहिती नाही. वारा म्हणाला, मी माझ्या प्रवासात लोकांना प्रेमाबद्दल बोलताना आणि आकाशाकडे बघताना पाहीले आहे. तो आता स्वतः वर रागावला होता. त्याला त्याच्या मर्यादा कळल्या होत्या. तो म्हणाला आपण आकाशाला विचारून बघुया.तरुण म्हणाला, या जागेवर असे वादळ उठव की सूर्यपण दिसला नाही पाहिजे, मी ...Read More

42

किमयागार - 42

तरुणाने आकाशाकडे पाहीले आणि त्याला कळले की सर्वत्र शांतता पसरली आहे.आणि अचानक त्याच्या ह्रदयातून उर्मी आली आणि तो प्रार्थना लागला. त्या प्रार्थनेत मेंढ्यांना नवीन कुरणे मिळाल्याबद्दल आभार नव्हते, तरुणाला क्रिस्टल विक्रीमध्ये वाढ होण्याची इच्छा नव्हती, तो ज्या स्रीला भेटला होता ती त्याची वाट बघत राहूदे अशी विनंतीही नव्हती.या शांततेत त्याच्या लक्षात आले की, वाळवंट, वारा, सूर्य हे पण परमात्म्याचे संकेत कळून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांचे मार्ग शोधत आहेत आणि 'पाचूच्या गोळी' वर काय लिहिले असावे ते समजण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्याला कळले होते, पृथ्वी व आकाशात शकुन चिन्हे पसरली आहेत आणि त्यांच्या दिसण्यामागे कोणतेही कारण नव्हते.त्याच्या लक्षात आले की ...Read More

43

किमयागार - 43

किमयागार -पिरॅमिडप्रवास परत सुरू झाला. किमयागार म्हणाला, मी तुला एक गोष्ट सांगणार आहे. तरुणाने आपला घोडा जरा किमयागाराच्या घोड्याजवळ फार पूर्वी टिबेरीयस हा रोमचा सम्राट होता. त्या राज्यात एक भला माणूस व त्याची दोन मुले राहत होती. एक मुलगा सैन्यात होता आणि तो मोहीमेवर खूप दूर होता. दुसरा मुलगा कवी होता. तो आपल्या कवितांमुळे राज्यात प्रसिद्ध होता. एका रात्री वडिलांच्या स्वप्नात देवदूत आला व म्हणाला, तुझ्या दोन मुलांपैकी एका मुलाचे शब्द प्रसिद्ध होतील आणि अनेक पिढ्या ऐकले जातील. भल्या माणसाला आनंद झाला कारण देवदूताने अभिमान वाटावा अशी गोष्ट सांगितली होती. काही दिवसांनी एक मुलगा रथाखाली सापडत होता, त्याला वाचवताना ...Read More

44

किमयागार - 44 - (अंतिम भाग)

किमयागार -खजिनाआता तो खजिना शोधण्याच्या अंतिम टप्प्यात आला होता. जोपर्यंत उद्देश सफल होत नाही तोपर्यंत कोणतेही कार्य पूर्ण होत डोळ्यातून अश्रु आले. त्याच्या लक्षात आले की वाळूवर जिथे अश्रू पडले होते तिथे पवित्र किडे आले होते, हे किडे ईश्वराचा संकेत असतात असे त्याने ऐकले होते. तरुणाने खणण्यास सुरुवात केली. क्रिस्टल व्यापारी म्हणाला होता पिरॅमिड कोणीही बांधू शकतो पण तरुणाच्या लक्षात आले की त्याने दगडावर दगड ठेवण्यात आयुष्य घालवले तरी ते शक्य नाही.रात्रभर खणून पण त्याला काही सापडले नाही. इतक्यात त्याला काही सैनिक तिथे आले, त्यांचे चेहरे दिसत नव्हते. एकाने विचारले तू येथे काय करत आहेस. तरुणाने घाबरल्यामुळे काही उत्तर ...Read More