सीता गीत (कथामालीका

(2)
  • 16.3k
  • 0
  • 7.8k

श्रीराम व सीतादेवी वनवासातून आल्यावर जावांनी सीतेला सर्व हकिगत विचारली असतां सीतेने जे कथन केले ते म्हणजे सीता गीत. हे ओवीबद्ध आहे. कवी - मोरोपंत धन्य अशा जनक राजाला यज्ञासाठी भूमी नांगरताना मिळालेली कन्या सीतादेवी ही श्रीरामाची पत्नी झाली. जनकाची सुशिल कन्या उर्मिला लक्ष्मणाची पत्नी झाली. जनकाचा कनिष्ठ पण गुणाने श्रेष्ठ असा एक बंधु होता त्याची दुहिता (कन्या) मांडवी ही दोन्ही कुळांच्या हितासाठी भरताची पत्नी झाली, दुसरी कन्या श्रुतकीर्ती जीची कीर्ती पतिव्रताही सांगतात ती शत्रुघ्न ची पत्नी झाली. अशा रीतीने या चार भाग्यवान बहिणी एकमेकांच्या जावा झाल्या. त्यांच्यातील सुसंवाद,

Full Novel

1

सीता गीत (कथामालीका) भाग १

श्रीराम व सीतादेवी वनवासातून आल्यावर जावांनी सीतेला सर्व हकिगत विचारली असतां सीतेने जे कथन केले ते म्हणजे सीता गीत. ओवीबद्ध आहे. कवी - मोरोपंत धन्य अशा जनक राजाला यज्ञासाठी भूमी नांगरताना मिळालेली कन्या सीतादेवी ही श्रीरामाची पत्नी झाली. जनकाची सुशिल कन्या उर्मिला लक्ष्मणाची पत्नी झाली. जनकाचा कनिष्ठ पण गुणाने श्रेष्ठ असा एक बंधु होता त्याची दुहिता (कन्या) मांडवी ही दोन्ही कुळांच्या हितासाठी भरताची पत्नी झाली, दुसरी कन्या श्रुतकीर्ती जीची कीर्ती पतिव्रताही सांगतात ती शत्रुघ्न ची पत्नी झाली. अशा रीतीने या चार भाग्यवान बहिणी एकमेकांच्या जावा झाल्या. त्यांच्यातील सुसंवाद, एकी ही वाखाणण्याजोगी होती. तिघी सात्त्विक अशा जावांनी प्रेमाने सीतेला वनवासाची ...Read More

2

सीता गीत (कथामालीका) भाग २

रावण मला नेंत असतांना मी अंगावरील पाच सात दागिने काढून ते एका वस्रात बांधून पर्वतावर कांहीं वानर दिसत होते दिशेने ते खाली टाकले. चारशे कोस दूर असलेल्या समुद्रापलीकडील लंका येथे मला कलंक लावण्यासाठी नेऊन ठेवले. तेथील अशोक वनात मला ठेवले. हजार राक्षसी माझ्यावर पहारा ठेवत होत्या. मी शोकसागरात बुडून गेले होते. मला एक क्षणही चैन पडत नव्हते. मी चिंताग्रस्त झाले होते. इंद्राणी माझ्यासाठी नाना परीचा थाट असलेले ताट पाठवत असे. स्वर्गीय अन्नपदार्थ पाठवत असे पण मी एखादाच खात असे. तिकडे दिव्य धनुर्धारी (श्रीराम) हे मारीचाचा (हरीणाचे रुपातील) वध करून मागे फिरले. मार्गात त्याना लक्ष्मणजी भेटले व त्यांनी श्रीरामांना वंदन ...Read More

3

सीता गीत (कथामालीका) भाग ३

समुद्र पार करण्यासाठी मारुतीने मोठी उडी मारली व तो त्याच्या पुण्याईमुळे सागरात न बुडता लंकेमध्ये पोहोचला व त्याने लंकापुरीत शोध घेतला व अशोक वनात पोहोचला. रात्री तो रावण मी वश व्हावे म्हणून आर्जव करीत बडबड करत होता पण मी त्याच्याकडे लक्षच देत नव्हते. शेवटी तो ' मेला ' राक्षसींना म्हणाला ही जर दोन मासात तयार नाही झाली तर तीला मारून मांस खायला द्या. असे म्हणून रावण तीथून गेला. हनुमंताला हे पाहून दु:ख झाले. मारूतीने हळूच गुणांचा सागर अशा श्रीरामाचे वर्णन सुरू केले व माझ्या समोर येऊन रामनाम असलेली अंगठी ( मुद्रा ) दाखवली. ती मुद्रा बघताचं माझ्या हृदयाला शांतता ...Read More