मुरारीचा खून

(1)
  • 19.9k
  • 0
  • 10.6k

गुप्तहेर गोगटे हा एक खाजगी गुप्तहेर होता. विक्रांत रामानंद गोगटे हा दिल्ली शहरातील प्रसिद्ध गुप्तहेर होता. त्याची फी होती फक्त 125 रुपये. तो केसेस अशा पद्धतीने सोडवायचा की सगळे लोक चकित व्हायचे. विक्रांत गोगटेने एखादी केस हातात घेतली म्हणजे तो खुनी किंवा चोर पकडला जाणारच असा दिल्लीतल्या सर्वच लोकांचा समज होता. एकदा शहरातला एक धनवान माणूस, मुरारी आनंदकुमार दत्ता, गोगटेकडे आला व म्हणाला, “विक्रांत, तू प्रसिद्ध गुप्तहेर आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलोय. मला ठार मारायची कोणीतरी धमकी देत आहे”. हे बघ, असे म्हणून मुरारी दत्ताने कागद काढला, ज्याच्यावर लिहिले होते मी तुला मारून टाकेन लवकरच------ तुझीच मीना. हे वाचून विक्रांत गोगटेने प्रश्न केला, तुम्हाला हे पत्र किंवा कागद कोणी दिला? मुरारीने उत्तर दिले, एक अहमद नावाच्या माणसाने मला हे दिले. तो म्हणाला, त्याचा मालक कादीरनें हे मला पाठवले आहे. विक्रांतने विचारले, “तो अहमद दिसायला कसा होता ?” मुरारी उत्तरला, त्याने चेहरा कापडाने झाकला होता, म्हणून मी त्याचा चेहरा काही मला पाहता आला नाही पण तो उंचीने मध्यम होता व काठी टेकत-टेकत चालत होता. विक्रांतचा पुढचा प्रश्न, तुमच्या जवळपास कोणी कादीर किंवा मीना आहे का? मुरारी ने नकारार्थी मान हलवली व म्हणाला माझ्या ओळखीत कोणी कादीर किंवा मीना नाहीये. विक्रांत म्हणाला, ठीक आहे. तुम्ही जाण्यापूर्वी तुमच्या घराचा पत्ता मला द्या, मी उद्या एक चक्कर टाकेन त्या परिसरात. स्वतःची काळजी घ्या. मुरारी दत्ता विक्रांतला पत्ता देऊन आपल्या घरी गेला. विक्रांतने पत्ता वाचला, घर नंबर 4, काशी गल्ली, जैन रोड. नंतर विक्रांत रात्रीचे जेवण जेवून झोपला.

1

मुरारीचा खून - भाग 1

गुप्तहेर गोगटे हा एक खाजगी गुप्तहेर होता. विक्रांत रामानंद गोगटे हा दिल्ली शहरातील प्रसिद्ध गुप्तहेर होता. त्याची फी होती 125 रुपये. तो केसेस अशा पद्धतीने सोडवायचा की सगळे लोक चकित व्हायचे. विक्रांत गोगटेने एखादी केस हातात घेतली म्हणजे तो खुनी किंवा चोर पकडला जाणारच असा दिल्लीतल्या सर्वच लोकांचा समज होता. एकदा शहरातला एक धनवान माणूस, मुरारी आनंदकुमार दत्ता, गोगटेकडे आला व म्हणाला, “विक्रांत, तू प्रसिद्ध गुप्तहेर आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलोय. मला ठार मारायची कोणीतरी धमकी देत आहे”. हे बघ, असे म्हणून मुरारी दत्ताने कागद काढला, ज्याच्यावर लिहिले होते मी तुला मारून टाकेन लवकरच------ तुझीच मीना. हे वाचून विक्रांत ...Read More

2

मुरारीचा खून - भाग 2

विक्रांत गोगटे परत जैन रोडला आला व म्हणाला, इन्स्पेक्टर कदम, नरसिंह कुठे आहे? कदमांनी उत्तर दिले, आज तो कुठेतरी पडला व त्याला जखम झाली आहे म्हणून मी त्याला घरी पाठवले. विक्रांत गोगटे म्हणाला, हे प्रकरण तर खूप गुंतागुंतीचे आहे. अनेक विद्वान मंडळी यात गुंतलेली आहेत. पहिला माणूस नरसिंह, काल नरसिंह घरात बसला नव्हता असे हरिदास म्हणाला. त्याला बाहेर जाताना एका दुकानदाराने पाहिले. इतकेच नाही तर ते त्याच्या कॅमेऱ्यातही रेकॉर्ड झाले. कॅमेऱ्यात दिसले की तो एका माणसाशी आणि मुलीशी बोलत होता. तू म्हणतोस, त्याची तब्येत बरी नव्हती पण तब्येत बरी नसतानाही तो का बाहेर गेला? खरे कारण असे की नरसिंह ...Read More