ती एक वेश्या

(4)
  • 25k
  • 0
  • 14k

"का ........का .......केलास तू असं ???? हा दिवस मला बघायला मिळण्यापेक्षा तू मला मारून टाकायचं होत ना ......" असं जोरात म्हणत , ओरडत ती हात आपटत समोरचा फ्लॉवर पॉट आणि समोर येईल ते फेकून देत होती . जोरजोरात रडत होती ती . रागाचा उद्रेक होत होता तिचा .अक्षरशः थरथरत होती ती .स्वतःच्या आई बद्दल समजल्यावर तिला स्वतःची किळस येत होती कि आपली आई असं काम करते आणि एवढी वर्ष त्याबद्दल आपल्याला काहीच माहित नव्हतं . आपल्या आई ने एवढी वर्ष आपल्यापासून लपवलं आणि आपण त्यावर विश्वास ठेवला हेच आठवून आठवून तिला स्वतःची चीड येत होती . तिच्या आईने हजारदा बजावून सुद्धा ती तिथे आली होती आणि हे भयानक सत्य आज तिच्या समोर आलं होत . ज्याची तिला कल्पना सुद्धा करवत नव्हती. जिच्या शिवाय तिला राहवत नव्हतं आज त्याच आई च तोंड तिला बघायची तिची इच्छा होत नव्हती. तिच्या आईने तिला ती एक सोशल वर्कर असल्याचं सांगितलं होत , पण तस काहीही नसून ती एका ती एका रेड लाईट एरिया मध्ये सेक्सवर्कर चं कामं करत होती. आणि जेव्हा एवढ्या वर्षा नंतर तिला हे भयानक सत्य समजलं होत जे तिला पचत नव्हतं.

1

ती एक वेश्या - भाग 1

"का ........का .......केलास तू असं ????हा दिवस मला बघायला मिळण्यापेक्षा तू मला मारून टाकायचं होत ना ......" असं जोरात , ओरडत ती हात आपटत समोरचा फ्लॉवर पॉट आणि समोर येईल ते फेकून देत होती . जोरजोरात रडत होती ती . रागाचा उद्रेक होत होता तिचा .अक्षरशः थरथरत होती ती .स्वतःच्या आई बद्दल समजल्यावर तिला स्वतःची किळस येत होती कि आपली आई असं काम करते आणि एवढी वर्ष त्याबद्दल आपल्याला काहीच माहित नव्हतं . आपल्या आई ने एवढी वर्ष आपल्यापासून लपवलं आणि आपण त्यावर विश्वास ठेवला हेच आठवून आठवून तिला स्वतःची चीड येत होती . तिच्या आईने हजारदा बजावून सुद्धा ...Read More

2

ती एक वेश्या - भाग 2

मला ना अक्षरशः लाज वाटते तुला आई म्हणायला ??? असच काहीबाही पंखुडी विनिताला बोलत होती आणि तिच्या कानात गरम ओतल्यासारखं विनिताला होत होत . तिची विचारशक्ती अगदी शीण झाली होती. आजपर्यंत फक्त हिच्यासाठी एवढं केलं केलं आणि हिलाच आज माझी लाज वाटते . मला वाटलं होत कि माझी लेक मला समजून घेईल काहीही झालं तरी........ पण.....पण इथे उलटच घडत होत अगदी. विनिताने आज पर्यंत खुप चढउतार तिच्या आयुष्यात पहिले होते . पण आज पहिल्यांदा तिला हरल्यासारखं वाटत होत . तिच्या डोळ्यासमोरून तिचा भूतकाळ झरकन जात होता.साधारण सहा महिन्यापूर्वी, त्या दिवशी ती खुप थकलेली असते, तिच्या अंगात कामासाठीच काय पण ...Read More