दारावरची बेल वाजली..तिनं लगबगीनं दरवाजा उघडला. नवऱ्याला असा लवकर आलेला बघून तिला अचंबित व्हायला झालं."काय झालं.. आज लवकर आलात.. तब्येत बरी नाहीये का?"तो काहीही न बोलता बॅग ठेऊन तिथंच सोफ्यावर आडवा होतो.पाण्याचा ग्लास त्याच्या हातात देत, "अहो काय झालं."काही नाही ग.. चक्कर आली आज ऑफिसमधे.. बॉस नी माझी अवस्था बघून टॅक्सी करून घरी जायला सांगितलं. आलो मग.. थोडी विश्रांती घेतली की बरं वाटेल. तू तुझं आवर . मी झोपतो थोडा वेळ."किचन मध्ये काम करत करत तिचं विचारचक्र सुरू होतं.हल्ली हे बराच उशिरा येतात घरी. घरी आल्यावर देखील अंगात काहीच त्राणचं उरत नाही. आल्यावर फ्रेश होऊन जेवणं झाल्यावर पडल्या पडल्या झोपतात.
सवत माझी लाडकी - भाग १
दारावरची बेल वाजली..तिनं लगबगीनं दरवाजा उघडला. नवऱ्याला असा लवकर आलेला बघून तिला अचंबित व्हायला झालं."काय झालं.. आज लवकर आलात.. बरी नाहीये का?"तो काहीही न बोलता बॅग ठेऊन तिथंच सोफ्यावर आडवा होतो.पाण्याचा ग्लास त्याच्या हातात देत, "अहो काय झालं.""काही नाही ग.. चक्कर आली आज ऑफिसमधे.. बॉस नी माझी अवस्था बघून टॅक्सी करून घरी जायला सांगितलं. आलो मग.. थोडी विश्रांती घेतली की बरं वाटेल. तू तुझं आवर . मी झोपतो थोडा वेळ."किचन मध्ये काम करत करत तिचं विचारचक्र सुरू होतं.हल्ली हे बराच उशिरा येतात घरी. घरी आल्यावर देखील अंगात काहीच त्राणचं उरत नाही. आल्यावर फ्रेश होऊन जेवणं झाल्यावर पडल्या पडल्या झोपतात.पुन्हा ...Read More
सवत माझी लाडकी - भाग २
"आदित्य भावोजी.. बोला..""आज मला कसा काय फोन केलात.. कसे आहात तुम्ही..""अहो वहिनी, शेखरचा फोन लागत नाही म्हणून तुम्हाला केला. का ऑफिसला जायला.""कधीच गेले हे..""बाकी तुम्ही कसे आहात. ऑफिस काय म्हणतेय..""एकदम भारी चालू आहे बघा.. हल्लीच आमची नवीन बॉस आली आहे.. खूप को ऑपरेटिव्ह आहेत त्या मॅडम. राजेश तर त्यांचा एकदम फेवरेट झाला आहे आणि हो, तुमच्यात एरियात राहतात. राजेश काही बोलला नाही का..""हो हो बोलत होते एकदा पण मीच नीट ऐकलं नाही.."तिनं सारवा सारव केली आणि थोड जुजबी बोलून फोन ठेऊन दिला..आता मात्र शंकासुराने नुसतं डोकं नाही तर पुर्ण अंगच बाहेर काढलं..आधी नुसती चुकचुकणारी शंकेची पाल आता मनात ठाणचं ...Read More