विषारी चॉकलेट चे रहस्य

(18)
  • 30.5k
  • 1
  • 16.1k

ट्रिंग ट्रिंग ..... माझा गुप्तहेरतेच्या कामगिरीचे निरोप येणारा फोन वाजला. "हॅलो गुप्तहेर राघव बोलतोय. " "गुप्तहेर राघव लवकरात लवकर कुहू बीच वर ये.", असं म्हणून इन्स्पे. नाईकांनी फोन ठेवून दिला. इन्स्पे. नाईकांची आणि माझी छान ट्युनिंग जमली असल्याने बऱ्याच केसेस मध्ये ते मला मदतीला बोलावून घ्यायचे. मी कुहू बीचवर पोहोचलो , तिथे इन्स्पेक्टर नाईक माझी वाट पहात होते. "काय झाले इंस्पेक्टर नाईक?", मी इंस्पेक्टर नाईक, "हे बघ ह्या निळ्या कार मध्ये एका मुलीचा बहुतेक विषारी चॉकलेट खाऊन मृत्यू झाला आहे." "काय ??? विषारी चॉकलेट ! फारच विचित्र !!", मी "कोणीतरी तिला मुद्दाम ते चॉकलेट दिले असेल", इन्स्पेक्टर नाईक "हो! ही कदाचित खुनाची घटना असू शकते, पुढील चौकशीसाठी मला तिची कार आणि मृतदेह कसून तपासू द्या.",मी मी गाडीजवळ पोहोचलो आणि मृतदेह , विषारी चॉकलेट आणि आतील तसेच कारच्या बाहेरील बाजूची काळजीपूर्वक पाहणी केली. तीची मान स्टेअरिंग वर टेकलेली होती. तिच्या तोंडातून फेस आलेला होता. शरीर निळसर पडलं होतं.

Full Novel

1

विषारी चॉकलेट चे रहस्य - भाग 1

ट्रिंग ट्रिंग ..... माझा गुप्तहेरतेच्या कामगिरीचे निरोप येणारा फोन वाजला. "हॅलो गुप्तहेर राघव बोलतोय. " "गुप्तहेर राघव लवकरात लवकर बीच वर ये.", असं म्हणून इन्स्पे. नाईकांनी फोन ठेवून दिला. इन्स्पे. नाईकांची आणि माझी छान ट्युनिंग जमली असल्याने बऱ्याच केसेस मध्ये ते मला मदतीला बोलावून घ्यायचे. मी कुहू बीचवर पोहोचलो , तिथे इन्स्पेक्टर नाईक माझी वाट पहात होते. "काय झाले इंस्पेक्टर नाईक?", मी इंस्पेक्टर नाईक, "हे बघ ह्या निळ्या कार मध्ये एका मुलीचा बहुतेक विषारी चॉकलेट खाऊन मृत्यू झाला आहे." "काय ??? विषारी चॉकलेट ! फारच विचित्र !!", मी "कोणीतरी तिला मुद्दाम ते चॉकलेट दिले असेल", इन्स्पेक्टर नाईक "हो! ही ...Read More

2

विषारी चॉकलेट चे रहस्य - भाग 2

मी रियाचा फोन कसून तपासला तर त्यात तिचं आणि मोहनचं काही चॅट सापडले ज्यामधून रिया आणि मोहन एकमेकांच्या खूप असल्याचे कळून येत होते. मी दुसऱ्या दिवशी रियाच्या कॉलेजमध्ये गेलो. तिथे मी तिच्या सर्व वर्गमित्रांची विचारपूस केली आणि रियाबद्दल काही प्रश्न विचारले. तिचं वर्गातल्यांशी आणि तसेच कॉलेजमधील सगळ्यांशी कशी वागणूक होती त्याचप्रमाणे सगळ्यांची तिच्याशी कशी वागणूक होती कोणी तिचा शत्रू होतं का ह्याची इतंभूत चौकशी केली. महाविद्यालयीन कॅन्टीनमध्ये मी एकामागून एक रुतुजा, मोना आणि मोहन यांना काही प्रश्न विचारले. "बोल ऋतुजा तुझ्या मैत्रिणी बद्दल तुला काही विशेष माहिती आहे? तिचं एवढयात कोणाशी भांडण वगैरे झालं होतं ? काल ती संध्याकाळी ...Read More

3

विषारी चॉकलेट चे रहस्य - भाग 3

मी वीरजचा महाविद्यालयातून पत्ता घेतला व त्याच्या घरी गेलो , जाताना काही फळं घेऊन गेलो. तेथे मी पाहिले की आजारी व झोपलेला आहे, म्हणून मी त्याच्या आईला त्याच्या आजाराबद्दल विचारले असता तिने उत्तर दिले की 2-3 दिवसां पासून वीर थंडीतापामुळे आजारी आहे. डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. जवळ जाऊन बघितलं तर त्याचं अंग थंड वाटत होतं. तर त्याची आई म्हणाली आत्ताच ताप उतरलाय . ताप जरी नव्हता तरी तो आजारीच आहे ह्याची मला खात्री पटली कारण त्याचा चेहरा अशक्त वाटत होता तसेच त्याचे डोळे खोल गेलेले होते. त्यांचा निरोप घेऊन मी पोलीस स्टेशनला रवाना झालो. जिथे मी ...Read More

4

विषारी चॉकलेट चे रहस्य - भाग 4 (अंतिम)

पुन्हा मी सांगणं सुरु केलं," हं तर त्या मेसेज मध्ये मोहित ने रियाला कुहू बीच वर संध्याकाळी सात वाजता होतं. तो नंबर वेगळा असल्याने रियाने मोहीतला विचारलं कि हा तुझा नेहमीच नंबर नाही. त्यावर मोहितने मेसेज मधून उत्तर दिलं कि त्याचा फोन चार्जिंग ला असल्याने त्याने तात्पुरता मित्राचा फोन घेऊन मेसेज केलाय. रियाला ते पटलं. तिने कुहू बीच वर येण्याचं कबुल केलं आणि त्याप्रमाणे ती घरून निघाली. तिथे गेल्यावर तिला मोह न दिसता एक वेगळीच व्यक्ती दिसली जिने तिला विषारी चॉकलेट दिलं जे खाऊन ती मरण पावली.", माझं वाक्य पूर्ण होण्याआधीच श्री जहागीरदारांचे जावई त्रासिकपणे म्हणाले," अहो डिटेक्टिव्ह राघव! ...Read More