आज तिला वडापावची गाडी बंद करायला अंमळ उशीरच झाला .. घरी जाताना मनात विचारांचा कल्लोळ माजला. हल्ली रोज उशीर होतोय आपल्याला . काय करणार?, राहाटगाडं चालवायला रोजचा पुरेसा गल्ला तरी जमला पाहिजे ना?. कमावणारे आपण एकटे अन् खाणारी तोंड चार!. त्यात ही महागाई. महिन्याचे रेशनपाणी ,मुलांच्या शाळेची फी , सासूची औषधे.... आणि त्यात हप्ता घेणारे वेगळेच!! नवरा होता तेंव्हा अगदी राणीसारखं सुखात राहिलो आपण. श्रीमंती नव्हती पण कसली आबाळही नाही झाली. अचानक एक दिवस तिकडे काश्मीरमध्ये झालेल्या आतंकवाद्यांच्या हल्ल्यात त्याला वीर मरण आलं काय आणि आपली ओढाताण सुरू झाली काय.. !! नाही म्हटले तर त्याची पेन्शन मिळते पण आजकाल महागाईच्या काळात कुठं पुरणार ती.?. घरात होता नव्हता तो पैसाही हळू हळू संपायला लागलाय. त्यात सासूबाईंनी हे गेल्यापासून जे अंथरूण धरले ते धरलेच. मला शेवटी डोक्यावरचा पदर कंबरेला खोचून संसारासाठी घराबाहेर पडावं लागलं.
यक्षिणी - भाग 1
आज तिला वडापावची गाडी बंद करायला अंमळ उशीरच झाला ..घरी जाताना मनात विचारांचा कल्लोळ माजला.हल्ली रोज उशीर होतोय आपल्याला काय करणार?, राहाटगाडं चालवायला रोजचा पुरेसा गल्ला तरी जमला पाहिजे ना?. कमावणारे आपण एकटे अन् खाणारी तोंड चार!. त्यात ही महागाई. महिन्याचे रेशनपाणी ,मुलांच्या शाळेची फी , सासूची औषधे.... आणि त्यात हप्ता घेणारे वेगळेच!!नवरा होता तेंव्हा अगदी राणीसारखं सुखात राहिलो आपण. श्रीमंती नव्हती पण कसली आबाळही नाही झाली. अचानक एक दिवस तिकडे काश्मीरमध्ये झालेल्या आतंकवाद्यांच्या हल्ल्यात त्याला वीर मरण आलं काय आणि आपली ओढाताण सुरू झाली काय.. !!नाही म्हटले तर त्याची पेन्शन मिळते पण आजकाल महागाईच्या काळात कुठं पुरणार ती.?.घरात ...Read More
यक्षिणी - भाग 2
त्या वासाने मात्र हळू हळू तिच्या मनाचा ताबा घेतला. तिची अवस्था कस्तुरी मृगासारखी झाली.मन मोहित करणारा वास तर येतोय कुठून हे कळत नव्हते.तो वास तिला क्षणभर का होईना तिचं दुःख विसरायला लावतो.कशीतरी घरी पोहोचते. आजच्या प्रसंगाबद्दल घरी मात्र ती कोणालाच काही सांगत नाही . स्वतःच यावर काहीतरी उपाय शोधायचा असा मनोमन विचार करून झोपून जाते.आज घरी बसलो तर सासूबाईंना आणि मुलांना कळेल हा विचार करून ती घरी न बसता संध्याकाळी बाहेर पडते. आजूबाजूला असलेल्या ओळखीच्या दुकानदारांशी , तिथल्या भाजीवाल्या बायकांशी बोलून काय मार्ग निघतोय का याची चाचपणी करते.तिथल्या लोकांना तिची परिस्थिती माहीत असल्याने ते तिला धीर देतात. काहीजण तर ...Read More
यक्षिणी - भाग 3
आता त्यांचं भेटणं रोजचं होऊन जाते. तिलाही मन मोकळे करण्यासाठी एक हक्काची जागा मिळते आणि तो रस्ताही तसा जास्त नसल्यानं काही गर्दुल्ले सोडले तर कोणी त्यांच्या गप्पामध्ये येत नव्हते. तिथले गर्दुल्लेही हळू हळू "अपने जैसी कोई पागल है "असा मनात विचार करून दुर्लक्ष करत.असेच दिवस चालले होते. मधेच एकदा भावाने येऊन थोडी आर्थिक मदत केलेली . त्यावर आणि नवऱ्याच्या पेन्शन वर घर कसेबसे तग धरून होते.पुन्हा आपला धंदा सुरू व्हावा म्हणून तीही तिच्या परीने धडपडत होती.आज ती नेहमीप्रमाणे ती धंद्याच्या ठिकाणी जाते तर तिथले दुकानदार पेढे हातात घेऊनच तिची वाट बघत असतात . "अहो ताई एक आनंदाची बातमी आहे ...Read More