संस्कार

(7)
  • 20.5k
  • 0
  • 8.9k

राधानं शिकवलं होतं मुलांना. परंतू ती मुलं शिकली नाही. त्यातच ती वाया गेली व आपल्या अख्ख्या आयुष्याचं नुकसान करुन बसली. राधाला दोन मुलं होती. एकाचं नाव गोविंद होतं तर दुसरी एक मुलगी होती. तिचं नाव विणा होतं. ते आपल्याआपल्या संसारात खुश होते. राधा आज मरण पावली होती. परंतू तिचं अस्तित्व आजही जाणवत होतं. तिनं केलेलं कर्तव्य. त्यामुळंच ती जनांच्या मनात बसली होती. तिनं आबालवृद्ध माणसांची मुलांकडून होणारी हेळसांड दूर केली होती. आज राधा नव्हती. तिचा मुलगा होता. तोही आज म्हातारा झाला होता. गोविंद आज म्हातारा झाला होता. त्याला दोन मुलं होती. ती सरकारी नोकरीवर होती. ती सरकारी नोकरी नोकरी. त्यात आता समस्या निर्माण झाली होती. गोविंदानं आपल्या आईची सेवा केली नव्हती. त्यामुळं तो जेव्हा म्हातारा झाला, तेव्हा त्याची सेवा करीत नव्हती त्याची मुलं. आज त्यालाही विचार येत होता व तो पश्चाताप करीत होता.

1

संस्कार - 1

संस्कार भाग एक(कादंबरी) अंकुश शिंगाडे राधानं शिकवलं होतं मुलांना. परंतू ती मुलं शिकली नाही. त्यातच ती वाया गेली व अख्ख्या आयुष्याचं नुकसान करुन बसली. राधाला दोन मुलं होती. एकाचं नाव गोविंद होतं तर दुसरी एक मुलगी होती. तिचं नाव विणा होतं. ते आपल्याआपल्या संसारात खुश होते. राधा आज मरण पावली होती. परंतू तिचं अस्तित्व आजही जाणवत होतं. तिनं केलेलं कर्तव्य. त्यामुळंच ती जनांच्या मनात बसली होती. तिनं आबालवृद्ध माणसांची मुलांकडून होणारी हेळसांड दूर केली होती. आज राधा नव्हती. तिचा मुलगा होता. तोही आज म्हातारा झाला होता. गोविंद आज म्हातारा झाला होता. त्याला दोन मुलं होती. ती सरकारी नोकरीवर होती. ...Read More

2

संस्कार - 2

मनोगत 'संस्कार' नावाची पुस्तक वाचकांना देतांना अतिशय आनंद होत आहे. ही पुस्तक त्या जिवांसाठी लिहिली. जे घटक आजवर उपेक्षीत त्यांनी कधीच कोणाला काहीही मागीतलं नाही. कधीच कुरकूर केली नाही आणि मागतील तरी कोणाला? ती त्यांचीच पिल्लं होती. मायबाप......मायबाप आपल्या लेकरांना उन्हातून सावलीत नेतात. लहानाचं मोठं करतात. त्यांनी आपल्या पायावर उभं राहावं, म्हणून राब राब राबतात ते कर्तव्य करतात आपलं. परंतू बदल्यात मुलं काय करतात. मुलं त्यांच्या म्हातारपणात त्यांना ज्यावेळेस आधाराची गरज असते. त्या वयात ...Read More