एक पडका वाडा

(32)
  • 61.8k
  • 1
  • 36.2k

"चल ह्यावेळेस नीट नेम धरून मार बरं! आपल्याला हरायचं नाही ह्यावेळेस!",माझी मैत्रीण सीमा मला म्हणाली. मी बरोब्बर नेम धरून एकावर एक रचून ठेवलेल्या लगोऱ्यांवर एक दगड मारला आणि नेम अचूक लागला. आम्ही जिंकलो. "चला यार आता काही तरी वेगळं खेळू. ही बघ मी गिल्ली आणली आहे तुझ्या जवळ दांडू आहे न?",रक्षाने साक्षीला विचारलं. "हो हा काय! मी घरून लक्षात ठेवून आणला",साक्षी जवळचा दांडू दाखवत म्हणाली. "आण तो दांडू,आमची टीम जिंकलीय न मग आधी मीच खेळणार!",मी "घे बाई! तू खेळ आधी",असं म्हणून रक्षाने मला गिल्ली दांडू दिलं. "हे बघ असा स्ट्रोक मारायचा! हां! की गिल्ली अशी दूर.... जाऊन...... पडते",असं म्हणत मी गिल्ली ला दांडू ने जोरात फेकलं. आणि आम्ही दूरवर गिल्ली कुठे पडते हे बघत राहिलो. पण गिल्ली जमिनीवर पडलीच नाही ती जाऊन पडली जवळच एका कोपऱ्यात असलेल्या पडक्या वाड्यात.

Full Novel

1

एक पडका वाडा - भाग 1

"चल ह्यावेळेस नीट नेम धरून मार बरं! आपल्याला हरायचं नाही ह्यावेळेस!",माझी मैत्रीण सीमा मला म्हणाली. मी बरोब्बर नेम धरून एक रचून ठेवलेल्या लगोऱ्यांवर एक दगड मारला आणि नेम अचूक लागला. आम्ही जिंकलो. "चला यार आता काही तरी वेगळं खेळू. ही बघ मी गिल्ली आणली आहे तुझ्या जवळ दांडू आहे न?",रक्षाने साक्षीला विचारलं. "हो हा काय! मी घरून लक्षात ठेवून आणला",साक्षी जवळचा दांडू दाखवत म्हणाली. "आण तो दांडू,आमची टीम जिंकलीय न मग आधी मीच खेळणार!",मी "घे बाई! तू खेळ आधी",असं म्हणून रक्षाने मला गिल्ली दांडू दिलं. "हे बघ असा स्ट्रोक मारायचा! हां! की गिल्ली अशी दूर.... जाऊन...... पडते",असं म्हणत मी ...Read More

2

एक पडका वाडा - भाग 2

हळूहळू रक्षा शुद्धीवर आली. "रक्षा काय झालं तुला? ही तुझी अवस्था हे ओरखडे कसे आले? त्या खोलीत कोण आहे?",मी म्हणताच भीतीने तिचे डोळे पांढरे झाले. "नेहा हे सगळं खूप भयानक आहे. आपण खूप मोठ्या संकटात सापडलोय. ह्या वाड्यात अघोरी शक्ती आहे. मी गिल्ली घ्यायला पुढे गेली तेव्हा कोणीतरी त्या खोलीत मला ओढून नेल्यासारखं वाटलं. मी आत जाताच माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. दार बंद व्हायचा जोरात आवाज झाला आणि मला खोलीत पाच मोठमोठे वटवाघूळ खोलीच्या चार कोपऱ्यात चार आणि छतावर एक असे उलटे लटकलेले दिसले ते वटवाघळे साधे नव्हते त्यांचा आकार खूप मोठा होता मानवाच्या आकारा एवढे होते ते त्याचं ...Read More

3

एक पडका वाडा - भाग 3

आमचे पालक एकसारखे धडधड दार ठोठावत होते. आमच्या खोलीचा दरवाजा काही केल्या उघडेना. आम्ही दाराजवळ उभ्या राहून दार उघडण्याची करत होतो. तेवढ्यात आमच्या खांद्यावर दोन हात पडले आणि मोठ्याने कोणीतरी आमच्या कानात आरोळी मारली. बापरे! केवढी कर्कश्श होती ती आरोळी क्षणभर आमचे कान आणि मेंदू बधिर झाले. आम्ही थरथरत मागे वळून बघितलं आमच्या माना अक्षरशः भीतीने थरथरत होत्या. दात दातांवर आपटत होते. मागे वळून बघताच एक मोठी आरोळी माझ्या तोंडून निघाली. रक्षा ची तर दातखीळच बसली होती. एक सांगाडा आमच्या पुढ्यात उभा होता व त्यानेच त्याचे दोन हात आमच्या खांद्यावर ठेवले होते. त्याच्या डोळ्यांच्या खोबण्या लाल भडक रंगाच्या होत्या. ...Read More

4

एक पडका वाडा - भाग 4

असा विचार करून मी भिंतीला टेकली आणि माझी मान वर जाताच मला जे काही दिसलं ते एवढं अनपेक्षित होतं माझं हृदय बंद पडते की काय असं मला वाटून गेलं. मी खुणेने रक्षाला वर बघण्यास सांगितलं. तिनेही वर बघितलं आणि तिचे डोळे विस्फारल्या गेले. वर छतावर सगळे सांगाडे लटकलेले होते. म्हणजे ते गायब झाले नव्हतेच आमच्यावर नजर ठेवून होते. आमची नजर वर जाताच ते धडाधड एकेक करून खाली कोसळू लागले. तेवढ्यात मला त्या चौथ्या मोठ्या कपाटात गेल्याशिवाय गत्यंतर नाही असं वाटलं कारण बाहेर पडण्याचं दार बंद होत आणि ते कपाट आत्तापर्यंत बंदच होतं ह्याचा अर्थ ते रिकामच असणार असं वाटून ...Read More

5

एक पडका वाडा - भाग 5

तेवढ्यात रक्षाला एक चौकोनी फरशी दिसली ती मला म्हणाली, "ते बघ नेहा तिकडे त्या फरशीवर चल तिथे एकही साप मी बघितलं खरंच त्या फरशीवर एकही साप नव्हता कारण त्याच्या भोवती काटेरी वनस्पती उगवल्या होत्या. आम्ही कशाबशा काटेरी झुडुपे ओलांडून त्या फरशीवर उभे राहिलो न राहिलो की ती फरशी एखादं झाकण आतल्या बाजूला उघडावे अशीं उघडली आणि आम्ही खाली अंधाऱ्या बोगद्यात पडलो. म्हणजे ती एक आणखी एका गुप्त मार्गाची कळ होती. त्या अंधाऱ्या बोगद्यात वरच्या दिशेने जायला मार्ग होता. पुन्हा ती फरशी घट्ट बंद होऊन गेली होती. आम्हाला वर जाण्याऐवजी दुसरा पर्याय नव्हता. आम्ही सरड्या सारखं सरपटत वर वर जाऊ ...Read More

6

एक पडका वाडा - भाग 6

मला त्यांच्या पंखांचे जोरदार तडाखे बसत होते कितीही चुकवण्याचा प्रयत्न करूनही मी स्वतःला वाचवू शकत नव्हती. मी किंचाळत धावत आणि वटवाघळे त्यांच्या पंखांचे फटके मारत होते. आणि तेवढ्यात त्या खोलीचे दार उघडले मी दारात बघितलं आणि अवाक झाली. दारात एक काळ्या कफनीतील व्यक्ती होती लांब जटा गळ्यात कवट्यांची माळ कपाळावर चिता भस्म करडी तीक्ष्ण नजर. क्षणभर एक भीतीची लहर माझ्यामधून गेली. आश्चर्य म्हणजे ते सगळे वटवाघळे आपापल्या कोपऱ्यात जाऊन लटकले. कोण आहे हा माणूस नक्की मांत्रिक असावा म्हणूनच सगळे हे पिशाच्च त्याला टरकून कोपऱ्यात गेले. पण आणलं कोणी यांना बोलावून माझे आईबाबा कुठे आहेत? रक्षाचे आईबाबा कुठे आहेत? सगळ्यात ...Read More

7

एक पडका वाडा - भाग 7

ते दहा ही सांगाडे आज्ञा मिळल्याप्रमाणे त्या राखेच्या वर्तुळाभोवती बसले. "ती दुसरी मुलगी कुठे आहे?",मांत्रिक बाबांनी मला पुन्हा विचारलं. आपल्याला त्या कपाटात जावं लागेल.",मी म्हंटल मी माझे बाबा रक्षाचे बाबा आणि मांत्रिक बाबा त्या कपाटात कसेबसे उभे राहिलो आणि मी कपाटाच्या भिंतींवर मागच्या बाजूने जोर देताच गुप्त मार्ग खुला झाला आणि आम्ही बोगद्यात घसरलो आणि घसरत घसरत त्या तळघरात पोचलो. तिथल्या सापांना चुकवत चुकवत आम्ही त्या फरशी वर उभे राहिलो आणि लगेच फरशी बाजूला होऊन तिथला गुप्तमार्ग खुला झाला. त्या बोगद्यातून चढत चढत आम्ही त्या दोन लोखंडी कड्यां पर्यंत आलो. "त्या उजव्या कडीला चुकूनही हात लावू नका",मी जोरात ओरडली. ...Read More

8

एक पडका वाडा - भाग 8 - (अंतिम )

त्या दागिन्यांचा उजेड सर्वत्र पसरला. सगळी अंधारलेली खोली प्रकाशाने लख्ख उजळली. "कालकेतू बाबा हे एवढे दागिने इथे कसे आले ह्याचं आता काय करायचं?",माझ्या व रक्षाच्या बाबांनी त्यांना विचारलं काळकेतू बाबांनी ती संदुक पूर्ववत बंद केली आणि म्हणाले,"पोलिसांना ह्याची खबर द्यावी लागेल आणि सरकारी मालमत्तेत ह्याची भर पडेल." त्या खोलीतून बाहेर पडण्याचा आणखी कुठे मार्ग आहे का हे काळकेतू बाबा बघू लागले. त्या खोलीला एकही खिडकी नव्हती फक्त उंचावर छोटे छोटे झरोके होते. दुसरा कुठलाही मार्ग दिसत नव्हता. त्यामुळे आम्हा सगळ्यांना त्याच भुयारी मार्गाने जाणं क्रमप्राप्त होतं. खुंटीवर लटकलेल्या पिशवीत नाग एकसारखा वळवळत होता. काळकेतू बाबांनी तो नाग असलेली पिशवी ...Read More