मोक्ष - एक आत्मा हिंड नारा

(20)
  • 127.3k
  • 4
  • 75.5k

मुंबई रेल्वेस्टेशन ! मध्यरात्रीची वेळ.. 3:30 am... मुंबई रेल्वेस्टेशनवर प्लेटफॉर्म नंबर एकवर ती लांबसडक डब्ब्यांची ट्रेन थांबली होती. त्याच ट्रेनच्या एका डब्ब्यातून एक पंचवीस वर्षीय युवती बाहेर आली. मोठ्या कष्टाने तिने ती मोठी काळ्या रंगाची बैग गाडीतून बाहेर काढली..तसा... ' पोंमम्म!' रेल्वे हॉर्न वाजला. " थँक गॉड ! आधीच बैग उतरवली, नाहीतर वाट लागली असती !" ती युवती स्वत:शीच म्हंणाली. तिच्या टपो-या डोळ्यांच्या नाजुक पापण्या फडफडवत ती आजुबाजुला पाहू लागली..! स्टेशनवर काही मोजकीच लोक होती. ती लोक म्हंणजे स्टेशनवर झोपलेले भिकारी होय ! आता ती काही त्या भिका-यांकडून मदत घेणार होती..? " स्वामी ...देवाSSSS आता तूम्हिक्ष काहीतरी करा बाबा...!" ती म्हंणाली. तिचा आवाज किती लाघवी होता.मनमोहिंत करणा-यांमधला होता. धडक धडक आवाज देत , गाडीच इंजीन ड़ब्ब्यांना आपल्या समवेत हळकेच घेऊन जाऊ लागल होत..तोच.. एका ड़ब्ब्याच्या उघड्या दरवाज्यातून प्रथम एक निळी बैग स्टेशनवर फ़ेकली गेली.

Full Novel

1

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 1

मोक्ष भाग 1 मुंबई रेल्वेस्टेशन ! मध्यरात्रीची वेळ.. 3:30 am... मुंबई रेल्वेस्टेशनवर प्लेटफॉर्म नंबर एकवर ती लांबसडक डब्ब्यांची ट्रेन होती. त्याच ट्रेनच्या एका डब्ब्यातून एक पंचवीस वर्षीय युवती बाहेर आली. मोठ्या कष्टाने तिने ती मोठी काळ्या रंगाची बैग गाडीतून बाहेर काढली..तसा... ' पोंमम्म!' रेल्वे हॉर्न वाजला. " थँक गॉड ! आधीच बैग उतरवली, नाहीतर वाट लागली असती !" ती युवती स्वत:शीच म्हंणाली. तिच्या टपो-या डोळ्यांच्या नाजुक पापण्या फडफडवत ती आजुबाजुला पाहू लागली..! स्टेशनवर काही मोजकीच लोक होती. ती लोक म्हंणजे स्टेशनवर झोपलेले भिकारी होय ! आता ती काही त्या भिका-यांकडून मदत घेणार होती..? " स्वामी ...देवाSSSS आता तूम्हिक्ष काहीतरी ...Read More

2

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 2

ep - 2 ) रातकीड्यांची किरकीर्र मंद गतीने ऐकू येत होती. एक पिवळ्या रंगाचा पेटलेला बल्ब दिसत होता. त्या बल्बच्या अवतीभोवती एक दोन उडणारे किडे गोल गोल फे-या मारत होते ! त्याच बल्बच्या उजेडा जवळून वाकडीतिकडी वाफ उडत गेली. बाजुलाच एक चौकोनी स्टो पेटला होता -त्यावर एक चांदीची गोल टोपशी होती, त्यात उकळता चहा होता. . बाजुलाच तीन चार बिस्किट, खारी, नाणखट, शिळेस ह्यांच्या बरण्या होत्या. तर एका बाजुला एक काळ्या रंगाचा रेडीयो होता. एक चमचा धरलेला हात आला आणि चहा लागला. (हा तोच तो टपरीवाला होता) त्या टपरीवाल्याने सांशीमार्फत चहाची टोपशी उचल्ली, आणि एक काचेच ग्लास वाफाळत्या चहाने ...Read More

3

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 3

मोक्ष 3 सकाळचा सुर्य उगवून आला होता. चारही दिशेना हळकासा थंडावा आणि सुर्याचा कोवळा उन्ह पसरलेला दिसत होता.. आकाशातून किलबिलाट करत उडत होती. त्यांचा तो आवाज किती मंत्रमुग्धिंत करत होता? पंतांचा वाडा म्हंणायला काही वाडा नव्हताच. एक शाही हवेली होती ! प्रथम एक दोन झापांच बारा फुट उंचीच काळ्या रंगाच लोखंडी गेट होत. गेटला जोडून चारही दिशेना , पंधरा फुट उंचीची कंपाउंडची भिंत होती. गेटच्या बाहेर दोन गुंडासारखी शरीरयष्टी असलेली मांणस उभी होती. दोघांच्या हातात काठ्या होत्या. गेटलासून पुढे एक S आकाराचा रस्ता पुढे जात होता.. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजुला गार्डन होत गार्डनमध्ये दोन इंचाएवढ कट केलेल गवत होत...तर ...Read More

4

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 4

4एक उघडी खिडकी दिसत होती. त्या उघड्या खिडकीतून सकाळच्या उन्हाची किरणे खोली आत येत होती. खिडकी बाजुलाच थोड दूर उभट आरसा होता! आरश्याच्या काचेतून पुढच बैड-आणि बैडच्या मागचा दोन झापांचा काच आणि लाकडावा वॉशरूमचा बंद दरवाजा दिसत होता , तोच दरवाजा उघडला. उघड्या दरवाज्यातून ती चालत आली. आरश्यासमोर उभी राहीली. ती आनिषा होती. तीने आताच अंघोळ केली होती. तिच्या अंगावर फिकट निळसर, हाफ बाह्यांचा ड्रेस होता. खाली फिकट पिवळ्या रंगाचा पायजमा घातला होता. डोक्यावरचे काळे केस अद्याप ओलेचिंब होते...त्याच केसांना ती टॉवेलने पुसत होती. केस पुसुन झाल्यावर आरश्यासमोर एक चौकोनी प्लास्टीकचा डब्बा होता तो तिने उघडला , आणि त्यातून ...Read More

5

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 5

देवपाडा बाजारातल्या मातीच्या रस्त्यावर तीस - चाळीस लोक जमली होती. त्या सर्व मांणसांणी गोल गराडा केला होता. त्या गोल आर्यंश हातात तप्त तीन फुट उंचीचा काळा झरा घेऊन उभा होता. एकट्या आर्यंशला चार गुंडांनी घेरल होत ! शरीरयष्टीने जल्लाद सारखे काळे कुट्ट, ढेरी वाढलेले .. भरदार मिश्यांचे गुंड! तीन जनांकडे लोखंडी रॉड होते. तर उर्वरित त्यांच्या मेन म्होरक्याकडे एक धारधार पातीचा चंदेरी सुरा होता. चौघेही दात ओठ खात एकल्या आर्यंशकडे पाहत होते. त्या चौघांना पाहून त्याची हवा लीक झाली नव्हती! नाही भीतिने त्याचे अवसान गळाले होते. नाही हाता पायांना कंप सुटला होता. रेसलिंग करीयर मध्ये मिळालेली ट्रेनिंग त्याच्या अंगी ...Read More

6

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 6

पंतांच्या वाड्यावर उस्मान काकांना भीमाने भाजी घेऊन बोलावल होत. पंतांच्या वाड्यावर भीमा जेवण बनवायचं काम करायचा , तो नेहमीच कडून भाज्या विकत घ्यायचा , आज सुद्धा तो भाजी विकत घ्यायला बाजारात जाणार होता -पन जखोबाने सांगितल्या नुसार जास्तीत जास्त पदार्थ बनवायचे होते..ज्या कारणाने बाजारात जायला त्याला वेळ मिळाला नव्हता.. म्हणुनच त्याने उस्मान काकांना फोन करून वाड्यावरच बोलावल होत. उस्मान काकांबरोबर आर्य्ंश पंताच्या वाड्यावर आला.. उस्मान काकांनी भाजी विकली होती.! परंतू भीमाकडे त्यांना द्यायला पैसे नव्हते. कारण भाजी खरेदीचे पैसे जखोबा देणार होता ! पन ज्खोबा वाड्यात नसल्याने उस्मान काकांना आता तिथे थांबन भाग होत. आर्यंश आणि उस्मान काका पंतांच्या ...Read More

7

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 8

8 पंतांची हवेली ! रात्री 12 वाजता ... पंतांच्या हवेलीला चारही बाजुंनी पांढरट भिंतीच कंपाउंड होत..आणि मधोमध एक आठफुट काळ्या उभ्या सळ्यांचा, गेट होता. कंपाउंड आत आणि बाहेर धुक्याची तमाम अंतयात्रेत उभ्या मांणसासारखी गर्दी उभी होती. गेटच्या सळ्यांमधुन पुढे धुक्याने घेरलेली पंतांची तीन मजल्यांची स्तबध बधित- अपशकूनी हवेली दिसत होती. हवेलीच्या मागे डोक्यावर ... आकाशातल्या दुधाळ चंद्राच्या गोळसर कायेजवळून अजुनही ते काळे सर्पट विषारी ढग सरतांना दिसत होते.. चंद्र मागे असल्याने त्या वास्तूच्या सफ़ेद भिंतींवर त्याचा उजेड पडला नव्हता ! म्हणुंनच की काय त्या शुभ्र भिंती अंधाराने गिळून त्यांना काळसर श्रापित रुप दिल होत . दिवसा शोभनीय वाटणा-या त्या ...Read More

8

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 7

थरथराट कालोख्या रात्रीचा नोट - ह्दयाचा त्रास असणा-यांनी ह्या पुढचे भाग बिल्कुलंच वाचू नका ! पंतांचा वाडा हॉलमध्ये ड़ायनिंग बाजुलाच थोड दूर चार सोफे होते. मधोमध एक मोठा काचेचा टिपॉय होता. एका सोफ्यावर ललिताआज्जी तिच्या बाजुलाच आनिशा, तिच्या बाजुलाच रिया बसली होती. दुस-या डाव्या बाजूच्या सोफ्यावर रघुराव त्यांची पत्नी निषा, दोघेच बसले होते. आणि ह्या सर्वाँसमोर पुढच्या सोफ्यावर एकटा आर्यंश बसला होता . दोन्ही पाय एकमेकांना जोडून, आणी दोन्ही हात मांडीवर ठेवून , खाली मान घालून तो बसला होता. ह्या सर्वाँत जखोबाचा मात्र पत्ता नव्हता! न जाणे तो कोठे असावा? ही सर्व मंडळी जिथे बसली होती -त्या सर्वाँच्या मागेच ...Read More

9

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 9

9थरथराट कालोख्या रात्रीचा नोट - ह्दयाचा त्रास असणा-यांनी ह्या पुढचे भाग बिल्कुलंच वाचू नका ! सीन 1 काळ्या रंगाच जागेवर स्थिरावलेल पाणि होत ते , त्या पाण्यात वरच्या काळया आकाशाची हुबेहूब छ्वी उमटली होती. पुढच्याक्षणाला पाण्यावर ' धप्प ' असा आवाज होत एक चांदेरी रंगाची बालदी पाण्यात पडली. बालदी पाण्याने भरताच ज्याने ती फ़ेकली होती ..तोच वर वर खेचू लागला. बालदीच्या कडीला बांधलेल्या दोरीसहित ,काळ्या खडकांवर घासत ती बालदी वर जातांना दिसत होती. बालदी कठड्यावर पोहचताच एक बलदंड बाहूचा हात आला. त्याने ती बालदी हातात पकडली, खाली ठेवली. मग दोन्ही हातांची ओंजळ बनवून , त्या ओंजळीने पाणि हातात घेऊन ...Read More

10

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 10

10,दिवसाच्या स्वच्छ प्रकाशात सुप्त पावलेल्या त्या अघटित शक्तिंचा रात्रीच्या काळोखात अभद्र मृत्यूंजय खेळाचा नंगानाच सुरु झाला होता. तिस-या मजल्यावर पंतांच्या खोलीत फरशीवर बहादूरच सताड उघड्या डोळयांच प्रेत पडल होत. तोंडाचा आ - वासला होता. डोळे मरण्या अगोदर काहीतरी भ्याव द्रुष्य पाहील्यासारखे विस्फारले होते. आपल्या सर्वाँकडेच पाहत होते.. जसच्या तस ते प्रेत खोलीत खाली पडल होत. बहादूरची निर्जीव नजर त्या पेंटिंगवर खिळली होती.. ज्यात नरहरपंतांच कोरलेल फोटो होत. आणि खालची ती घोडाखुर्ची आपोआप मागे पुढे होत मंद गतीने झुळत होती. जणु त्या खुर्चीवर कोणितरी बसल असाव! सुर्यांंशला राहायला दिलेल्या खोलीत . तो पलंगावर झोपला होता. पन डोळे मात्र उघडे होते... ...Read More

11

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 11

शुभ्र ढ़गांतून सकाळचा सुर्य उगवला होता. छानशी थंड हवा , आणि हळकस धुक देवपाडा गावावर पडल होत. हिरवगार गवतांचा सकाळच्या धुक्यातल्या द्रवबिंदूनी न्हाऊन निघाला होता. गुरे ढ़ोरे सकाळच्या उन्हात माळरानांवर चरत होती. बायका हिवाळा असल्याने रानातून तोडलेली झाडाची सुखी लाकड डोक्यावर घेऊन येतांना दिसत होती वातावरण कस नयनसुख देणार होत. मानव जो पर्यंत एका अज्ञात गोष्टी पासून अजाण असतो- अज्ञाणात असतो , तो पर्य्ंत सर्वकाही सुरळीत सुरु असत. जस की पुढे पाहुयात! काळ घडलेल्या अमानविय शक्तिच्या अकल्पित क्रूर खेळाचे पडसाद हळुहळू दिसायला सुरुवात झाली होती. सरपंच नामदेव आबांच्या बंगल्यावर रोजच ग्रामपंचायतीतली पाच - सहा मांणस जमायचीच. म्हंणूनच नामदेव आबांच्या ...Read More

12

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 12

महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेनेच पाहावी ! आणि फक्त मनोरंजन होइल ह्या हेतूने कथा वाचावी तीच आनंद घ्याव . ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर त्यावफ कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल! ....... .. 2 :00 pm दुपारची वेळ . देवपाडा गाव ... कथा सुरु देवपाडा गावात ...Read More

13

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 13

10 x 10 ची लाल रंगाची खोली दिसत होती . खाली फरशी नसून शेणाने सारवलेली तुलतूलित भुई होती. खोलीत बाजुंना असलेल्या लाल रंगाच्या दहा फुट उंचीच्या भिंतींवर काळ्या कोळश्याने पौराणिक मंत्र रेखाटळेले , तर कुठे अभद्र सैतानी हिडिस आकाराचे चेहरे कोरले होते. जसे की टक्कल पडलेल डोक, त्या टक्कल पडलेल्या डोक्यातून दोन शिंग उगवलेली, बैलासारख तोंड असलेला माणुस - बाकी शरीर मानवाच होत. त्याच्या हातात एक कू-हाड दिसत होती. अळ्या, झुरळ , नाना त-हेच्या कृमी युक्त कीटकांची नासकी शरीर असलेल्या सैतानांची छ्वी तिथे भयंकर रित्या काळ्या कोळश्याने कोरलेली होती.. कोणी मानवाच अवयव फाडुन खात होत.....तर कोणी रक्ताने माखलेल तोंड ...Read More

14

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 14

समर्थ कृणाल आणी सैतान येहूधी. भाग 37 सीजन 3 पंतांचा झपाटलेला वाडा... ep 16 महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल! " ... चला ...चला ...!" दहा बारा गावक-यांचा ...Read More

15

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 15

15महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल! देवपाडा गाव - वेळ दुपारी 4 .... चार वाजेच्या सुमारास आकाशात जऊळ जमा झाला होता - सुर्याचा शुभ प्रकाश त्या जऊळाने पृथ्वीवर ...Read More

16

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 16

महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्व काही काल्पनिक असून .. वाचकांनी ही ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!पोहचलो बघा साहेब !" मण्या जागीच थांबला - समोर वीस मीटर अंतरावर एक भलमोठ्ठ वडाच झाड होत. वडाच्या झाडाच खाली काळ पडलेल ...Read More

17

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 17

पैका पाहिजे !" प्रथमच त्या आकृतीच्या तोंडून आवाज आला, तो आवाज ऐकून मंजूलालच्या पायाखालची जमिनीच फाटली, कानांचे पडदे फाटले कस धस्स झाल. एका म्हाता- या मांणसाच जस खोंकताना घशातून खस,खस खर्र , खर्र आवाज बाहेर पड़तो - तसा तो आवाज होता. घोगरा , खर्जातला - खसखसता , आवाज. त्या आज्ञाधारक आवाजासरशी ,गुलाम असल्यासारखा मंजूलालने होकारार्थी मान हळवली आणि हळकेच " हो !" असा हुंकार भरला. " पैका भेटल , पन त्या बदल्यात काय देशील !" " त..त्या बदल्यात !" मंजूलालच्या स्वरात भीति होती. आणि ही भीती ? हे आपल्याला काय होत आहे ? आपण असे घाबरत का आहोत ? ...Read More

18

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 18

मोक्ष 18तीच ती लाल रंगाची खोली दिसत होती. शेणाने सारवलेल्या भुवईवर खाली मधोमध चौकोनी हवनकूंड पेटला होता . हवनकूंडातली रक्ताळलेली लालसर आग पुर्णत खोलीत लाल रंग पोतून गेली होती. त्या हवनकुंडासमोर तीच ती काळ्या साडीतली म्हातारी डोक्यावर पदर घेऊन- खाली भुवईवर मांडी घालून बसली होती. डोक्यावर पदर घेऊन बसल्याने नेहमीसारखाच तिचा चेहरा दिस नव्हता - फक्त हाता पायाची वयाने सुरकूतलेली त्वचा दिसत होती. त्या पेटत्या हवनकूंडापासून थोड पुढे नरहरपंतांच आत्मा उभा होता. उभट राकीट चेहरा , जाड भुवया आणि बारीकसे घारे चिंचोळे डोळे, टोकदार नाक , आणी त्यांखाली काळ्याशार मिश्या.. डोक्यावर चौकलेटी रंगाची गांधी टोपी होती. अंगात सिल्कचा पांढरा ...Read More

19

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 19

समर्थ कृणाल आणी सैतान येहूधी. भाग 46 सीजन 3 पंतांचा झपाटलेला वाडा... ep 25 -पितृपक्ष अमावस्या स्पेशल१ महत्वाच संदेश- कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्व काही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल! ..कथा सुरु.... तिस-या दिवसाची ...Read More

20

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 20

महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्व काही काल्पनिक असून .. वाचकांनी ही ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल! ..कथा सुरु.... पंतांची हवेली : वेळ सकाळी 8:45 am पंतांच्या हवेलीत टेरीसवर एक हवनकूंड पेटला होता . पेटत्या हवनकूंडातून तांबडी आग ...Read More

21

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 21

२१ महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्व काही काल्पनिक असून .. वाचकांनी कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल! ..कथा सुरु.... देवपाडा स्मशानभूमी . दुपारच्या वेळेस तळपत्या उन्हात स्मशानभूमीत घुम्या जाधवाच्या पोराच मयत जळत होत. चितेतून चार फुट उंचीच्या ज्वाला वर ...Read More

22

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 22

मोक्ष 22तिथली परिस्थिती हे सर्व काही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल! ..कथा सुरु.... वेळ संध्याकाळ 7:30 pm... " हेल्लो आनिषा!" रिया धाप लागल्यासारखी बोलत होती. नाकातून गरम श्वास बाहेर पडत होते. कानसुळे तापली होती@ अंगावर रोमांचकारक काटा येत होता... तिला अस झाल ...Read More

23

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 23

भाग २३ मोक्ष महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्व काही काल्पनिक असून वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल! कथा सुरु..रात्री 11 pm.. मृत्युधारी अंधा-या रात्रीचा खेळ सुरु झाला होता. आकाशातिल काळया ढगांनी चंद्राला झाकून टाकल होत. 'किरकिकिर .. ...Read More

24

मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 24 - अंतिम भाग

आंतिम.... दिवस.. .! घटस्थापना.. लढ्याचा दिवस...मोक्ष भाग २७ देवपाडा गाव ... " कूकडू..कूंsss..कुकडू...कूंssss!" गावात कोणाच्या तरी घराबाहेरच कोंबड आरवल.. सात वाजले होते..आजची सकाळ देवपाड गाववासियांसाठी एक विळक्षण विचीत्र अनुभव घेऊन येत उगवली होती. बाकीच्या दिवसांप्रमाणे ह्या आज उगवलेल्या सकाळीच्या वातावरणात सुर्याचा प्रकाश नव्हता. पुर्णत देवपाडागावच्या , नाही नाही नुस्त गावावरच नाही - तर पुर्णत पृथ्वीवरच म्हंणायला हववर आकाशात झाकोळून आल होत. वर पाहता काळ्या जऊलधारी पाषाणी ढ़गांनी उभ्या आसमंताला काळ कवच घालून सुर्याचा प्रकाश अडवून धरलेल दिसत होता. हळू हळू वेळ पुढे सरकत होती.. सकाळच्या सुर्याचा प्रकाशच नाही, तर ती शरीराला मिळणारी ड जीवनसत्वे कोठून मिळणार.सकाळच्या पाव्हणे आठ वाजायच्या ...Read More