ती रात्रीची वेळ होती. बहुतेक ती अमावस्येची काळी रात्र होती. बाहेर काळाकुट्ट अंधार पडला होता. वीजा चमकत होत्या. तसा पाऊस सुरु झाला. बाहेर पाऊस सुरु झाला होता. तो धो धो ही पडायला लागला होता. सदा मात्र आतमध्ये म्हणजेच घराच्या आत पांघरुण घेवून झोपला होता. तो गाढ झोपेत होता. अशातच त्याच्या कानावर लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. तसा तो विचार करु लागला. कोणाचं लहान बाळ रडत असावं एवढ्या काळोख्या रात्री. त्याच्या मनात संभ्रम निर्माण झाला. तसा बाळाचा रडण्याचा आवाज आणखी तीव्र झाला. तो आवाज काही बंद होत नव्हता. ते पाहून सदानं दरवाज्याची कडी उघडली तर पाहतो काय, तिथं लहानगं बाळ होतं. ते लहान बाळ रडत होतं. तसं त्या बाळाकडे पाहताच वाटत होतं की त्याचा नुकताच जन्म झाला असावा. एवढं ते लहान होतं. ते बाळ कुणीतरी त्याच्या दारासमोर आणून टाकून गेलं होतं. सदानं दरवाजा उघडला खरा आणि पाहिलं खरं ते लहान बाळ. परंतू त्याला आता विचार येत होता की या बाळाला उचलावं की नाही. तसा विचार करीतच त्यानं त्या बाळाला उचललं. तसं त्या बाळानं आपलं केकाटणं बंद केलं. त्यामुळं की काय, सदाला हायसं वाटलं.

1

अनाथ - भाग 1

अनाथ (कादंबरी) भाग एक अंकुश शिंगाडे ती रात्रीची वेळ होती. बहुतेक ती अमावस्येची काळी रात्र होती. बाहेर काळाकुट्ट अंधार होता. वीजा चमकत होत्या. तसा पाऊस सुरु झाला. बाहेर पाऊस सुरु झाला होता. तो धो धो ही पडायला लागला होता. सदा मात्र आतमध्ये म्हणजेच घराच्या आत पांघरुण घेवून झोपला होता. तो गाढ झोपेत होता. अशातच त्याच्या कानावर लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. तसा तो विचार करु लागला. कोणाचं लहान बाळ रडत असावं एवढ्या काळोख्या रात्री. त्याच्या मनात संभ्रम निर्माण झाला. तसा बाळाचा रडण्याचा आवाज आणखी तीव्र झाला. तो आवाज काही बंद होत नव्हता. ते पाहून सदानं दरवाज्याची कडी उघडली तर ...Read More

2

अनाथ - भाग 2

अनाथ भाग २ राघव विदेशात पोहोचला होता. त्यानं मालमत्तेचा खटला न्यायालयात दाखल केला होता. तसं पाहता ती केस पैशानंच जाणार होती. तेवढा पैसा होता त्याचेजवळ. तसा त्यानं आपला खटला न्यायालयात लढायला वकील उभा केलाच होता. फैरी फैरी झडत होत्या. राघवचा खटला सुरु झाला होता. त्यात लिहिलं होतं की ती मालमत्ता त्याचीच असून ती त्याच्या वडीलांकडून वारसानुसार त्याला मिळालेली होती. शिवाय ज्यावेळेस त्यानं किमान सतरा वर्ष पुर्ण करुन अठरा वर्षात पाऊल टाकलं. त्यावेळेस तो अठरा वर्षाचा असतांना पाहिजे त्या प्रमाणात समजदार झाला नव्हता. अशातच त्याच्या नासमझपणाचा फायदा घेवून मॅनेजरनं ती मालमत्ता आपल्या नावावर केली. जर ती मालमत्ता त्याला विकायचीच राहिली ...Read More