नागार्जुन

(7)
  • 29.4k
  • 0
  • 15.1k

" नगमा ,छोरी हुआ कि नहीं...आज तेरे जॉब का पहिला दिवस है...और तू अभी एसी ही बैठी है...." एक पन्नाशीच्या वयातील बाई एका मुलीला पाहत ओरडत होती..जिचं वय अवघे वीस वर्ष होतं.. " अम्मा..." म्हणत ती पाठमोरी असलेली नगमा...आपल्या आईकडे वळते...जी दिसायला इतकी ही चांगली नसली तरी इतकी ही वाईट ही नव्हती दिसायला...केस खांद्यापर्यंत रूळलेले..जे सरळ होते...ज्याला वेगळीच चमक दिसत होती...भुवया मस्त कोरीव होत्या...रंग निमगोरा असल्याने आणि विशेष म्हणजे सिंपल च रहायला आवडत असल्याने चेहर्यावर कसलाही मेकअप छापला नव्हता...बस लिपस्टिक आणि साधी पॉंडस पावडर होती ,डोळ्यांत काजळ ही नव्हते...पण तरी ही ते कोरीव वाटत होते...दिसायला जितकी गोड होती...तितकीच नाजूक ही होती...

1

नागार्जुन - भाग १

" नगमा ,छोरी हुआ कि नहीं...आज तेरे जॉब का पहिला दिवस है...और तू अभी एसी ही बैठी है...." एक वयातील बाई एका मुलीला पाहत ओरडत होती..जिचं वय अवघे वीस वर्ष होतं.. " अम्मा..." म्हणत ती पाठमोरी असलेली नगमा...आपल्या आईकडे वळते...जी दिसायला इतकी ही चांगली नसली तरी इतकी ही वाईट ही नव्हती दिसायला...केस खांद्यापर्यंत रूळलेले..जे सरळ होते...ज्याला वेगळीच चमक दिसत होती...भुवया मस्त कोरीव होत्या...रंग निमगोरा असल्याने आणि विशेष म्हणजे सिंपल च रहायला आवडत असल्याने चेहर्यावर कसलाही मेकअप छापला नव्ह ...Read More

2

नागार्जुन - भाग २

" ती हिथे काय करत होती...?? का तिला आपल्या ऑफिसमध्ये घेतलंस तू...??" अर्जून चे डॅड अर्जून ला ओरडत होते संध्याकाळी घरी आल्यावर ...तर तो कशाला ह्यांना सांगितलं असं एक्स्प्रेशन देत रोहित कडे पाहत होता...रोहित मात्र एकदा अर्जून कडे तर एकदा त्याच्या चाचांकडे पाहत होता... " काय विचारत आहे मी अर्जून ...?? ती आपल्या ऑफिसमध्ये काम का करत होती...??" अर्जून काहीच उत्तर देत नसल्याने त्याचे डॅड त्याला परत बोलतात... " मला वाटतंय या प्रश्नाचे उत्तर द्यायला मी बांधील नाही..." अर्जून रागात बोलतो आणि आपल्या रूमकडे जायला लागतो.. " मिस्टर अर्जून..." तोच त्याच्या कानावर आवाज पडतो, तसा तो मागे वळून पाहतो...तो ...Read More

3

नागार्जुन - भाग ३

" अम्मा..आज तारिख क्या है..." स्वतः चा राग गिळून शेवटी नगमा किचनमध्ये आपल्या आईला मदत करायला आली होती...भांडी घासता ती अचानक बोलते.." अरे हा आज तो रक्षाबंधन होगा ना...भाई बहन का त्योहार ..." तिला परत काहीतरी आठवत तशी ती बोलते आणि तिच्याही नकळत तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल येते... " कितनी बार बोला है तुला नगमा...जे झालं आहे ते विसरून जा आणि नविन आयुष्य जग...पण नही...तुझे करना है वोहीच तू करेगी..." फ्रीजमधील पालेभाजी काढत तिची अम्मा तिला बोलतं होती पण तिचं कुठे लक्ष होतं...ती तर आपल्या स्वप्नांत हरवली होती... " खुदा क्या करू मैं ईस लडकी का.." अम्मा तिला ...Read More

4

नागार्जुन - भाग ४

" हं चला आता लाईन मध्ये बसा मोठे...आणि राखी बांधून घ्या..." सुरभी सर्व खाली जमताच बोलते,तिने व लाचो ने ची तयारी आधीच केली होती...सोबत प्रितो ही होतीच...पण या घरची एकेकाळची लाडकी बहिण, कोमल..किट्टू मात्र जरा दुरच उभी होती...कारण तिथे अर्जून ही होता... " नील भैय्या...आधी तुमचा मान...तुम्ही बसुन घ्या..." लाचो नील ला बोलते तसं ते हसुन मान डोलवतात आणि सुरभी कडून टोपी घेत तिथेच असलेल्या पाटावर जाऊन बसतात...तसंही लाचो ही हसत त्यांचं औक्षण करते व राखी बांधते... " आपले उत्सव मुर्ती कुठे गेले...?? ना फोटो नाही , ना दंगा नाही..." तोच डोक्यावरती हात ठेवून असलेले नील ,सर्व ठिकाणी एक ...Read More

5

नागार्जुन - भाग ५

" बरं बरं..असु दे..." तो तसा पटकन उठतो आणि बोलतच चालायला लागतो ही, " ते मी हेच सांगायला आलो कि आजच्या आज घर खाली करून द्या मला नाहीतर उद्याच माझ्याबरोबर बोहल्यावर चढ...." तो चप्पल घालतच बोलतो..." काय...??" ती तो निघाला म्हणून आपल्या आयडिया वर खुश झाली होती पण त्याच बोलणं ऐकून ती ताडताड उडालीच आपल्या जागेवर..." मिस्टर अरविंद...." तोच एक कठोर आवाज आला..तसं दोघांनी तिकडे पाहिलं ...तिची अम्मी समोर होती तिच्या..जिच्या डोळ्यांत सध्या आगीच्या ज्वाळा दिसत होत्या...तिला पाहताच नकळत नगमाचे ओठ इअर टू इअर रूंदावले...आणि अरविंदचा चेहरा तर बघण्यालायक झाला होता...." अम्मी बरं झालं तू लवकर आलीस...." नगमा पुढे ...Read More

6

नागार्जुन - भाग ६

" ऐ पब्लिक ...चला आता तुम्ही पण फुटा...संपला फुकटचा शो..." तो जाताच आता नगमा पुढे येते आणि दारातल्या त्या पाहून चिडून बोलते...तसं सर्वजण पटकन पांगतात आणि ती ही धाडकन दरवाजा लावून घेते... " हाच आवाज आधीच त्या अरविंद शी बोलताना चढवला असता तर मला मध्ये पडायची गरज पडली नसती नगमा..." आंटी सोफ्यावर बसत बोलतात..तसा तिचा चेहरा पडतो..." इट्स ओके नगमा..चलता है...जिंदगी है ये...फक्त पुढच्या वेळेस लक्षात ठेव आणि परत चूक अशीच घडून देऊ नकोस..." त्या तिचा पडलेला चेहरा पाहताच स्वतः च्याच वाक्यावर नाराज होत तिला चेअर अप करतात...तशी ती हसुन हो मध्ये मान हलवते... " हे सर्व काय होतं ...Read More