सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे

(1)
  • 57.4k
  • 1
  • 25.6k

खाडीच्या मध्यावर छोटस् बेट होते. साधारण मैलभर व्यासाचे ते बेट एका मगरीच्या आकाराचे होते.प्रवासी त्या बेटाला नक्रद्विप म्हणत.या बेटामुळे खाडीचा प्रवाह दुभंगला होता. बेटाला वळसा घालून पाणी पुन्हा एकत्र येत समुद्राला मिळत होते.वर्षभर हिरव्या वनराईने शोभून दिसणारे ते बेट सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.समुद्रावरून येणारा खारा वारा वृक्षांत घुसला की सारे बेट सैरभैर होत असे.अवखळ वारा वेळूंच्या बनांतून जात असताना मंजूळ असा आवाज येत असे.अनेक वृक्ष- वेली फळ व फुलांनी बहरलेल्या असल्याने सारा परीसर गंधित व रंगीत दिसत होता.जमीनीवर गालीच्या सारखा हिरवा चारा पसरला होता.पिवळी, जांभळी, नारिंगी,निळी, पांढर्या व लाल रंगाची फुले त्या हिरव्या गालिच्याची शोभा वाढवत होती. अनेक प्रकारचे पक्षी आपल्या सुस्वर आवाजाने सारा परीसर भारुन टाकत असत.मोर,माणिककंठ,कोकीळ,कोतवाल ,बुलबुल,खंड्या असे असंख्य पक्षी आसमंतात उडताना दिसत.हरीण,सांबर काळवीट,कोल्हे,लांडगे.,अस्वल असे प्राणी कधी-कधी नजरेला पडत. या बेटावरील सकाळ प्रसन्न व सायंकाळ रंगीत वाटे.या बेटावर फक्त एक कुटुंब राहत होत. या कुटुंबात सध्या तीनच माणसे राहत होती.साठ वर्षांचे प्रतापराव देसाई...त्यांची नात जानकी व नातू शाम.

1

सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 1

खाडीच्या मध्यावर छोटस् बेट होते. साधारण मैलभर व्यासाचे ते बेट एका मगरीच्या आकाराचे होते.प्रवासी त्या बेटाला नक्रद्विप म्हणत.या बेटामुळे प्रवाह दुभंगला होता. बेटाला वळसा घालून पाणी पुन्हा एकत्र येत समुद्राला मिळत होते.वर्षभर हिरव्या वनराईने शोभून दिसणारे ते बेट सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.समुद्रावरून येणारा खारा वारा वृक्षांत घुसला की सारे बेट सैरभैर होत असे.अवखळ वारा वेळूंच्या बनांतून जात असताना मंजूळ असा आवाज येत असे.अनेक वृक्ष- वेली फळ व फुलांनी बहरलेल्या असल्याने सारा परीसर गंधित व रंगीत दिसत होता.जमीनीवर गालीच्या सारखा हिरवा चारा पसरला होता.पिवळी, जांभळी, नारिंगी,निळी, पांढर्या व लाल रंगाची फुले त्या हिरव्या गालिच्याची शोभा वाढवत होती. अनेक प्रकारचे ...Read More

2

सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 2

सहासी जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे २ . आजोबांच्या पायावर पाल्याचा लेप दिल्यावर जानकी व शाम दोन घोडे घेवून बाहेर पडले. वेळ पडली तर प्रतापराव स्वतःच रक्षण करतील या विषयी त्यांच्या मनात कोणतीही शंका नव्हती.सार बेट अंधारल होत.आकाशात पश्चिमेला शुक्राची चांदणी उगवली होती.जानकी हातात दिवटी पकडून घोडा हाकत होती .त्या पाठोपाठ शाम कमरेला तलवार व खांद्यावर धनुष्य बाण लटकवून चालला होता.दोघेही सावध होती पण तेवढीच घाई पण करत होती.आजोबांच्या अंगात बाणाला लावलेले विष पसरु नये हिच प्रार्थना दोघ करत होती. दोघांचेही डोळे व कान सावधतेने परिसरातील बदल टिपत होते. रातकिडे किर्र- किर्र करत होते.मध्येच घुबड घुमल्यासारखा आवाज येत होता. ...Read More

3

सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 3

दुसर्या दिवशी सकाळी प्रतापराव बर्यापैकी सावध झाले होते.घाव भरायला अजून दहाबारा दिवस लागणार होते.दयाळांनी आठवडाभराची औषध दिली होती.त्यात लेप,चाटण काढे होते. आपण दोन दिवसांत पून्हा फेरी मारु असं ते म्हणाले.त्यांना किनार्यावर सोडण्यासाठी शाम चांद घोडा घेऊन गेला.ते गेल्यावर जानकी आजोबांसाठी शिरा व दूध घेऊन त्यांच्या खोलीत गेली. " आजोबा, थोडं टेकून बसा मी दूध भरवते." " मी आता अगदी ठिक आहे.मी खाऊ शकतो." प्रतापराव हसत म्हणाले. प्रतापरावांनी नाष्टा केल्यावर जानकीने विचारले.... " आजोबा चंद्रसेन म्हणजेच माझ्या बाबां बद्दल कसलं गुपीत तुम्ही ह्रदयात जपून ठेवलंय? नेमकं काय घडलं होतं बाबांच्या बाबतीत? तुम्ही मध्ये -मध्ये नौका घेऊन कुठे जात असता?" प्रतापराव ...Read More

4

सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 4

शाम झाडावरच्या झोपडीवर सोनपिंगळ्या सोबत होता तेव्हा जानकी होडी घेवून कोळ्यांच्या प्रमुखाला भेटायला गेली होती. सखाराम किंवा दादू कोळी कोळ्यांच्या प्रमुख होता. जानकीला पाहून तो अदीबीने उभा राहिला. " ताईसाब,आपण एवढ्या सकाळी?" " होय, काका आम्हाला यावं लागलं. आजोबांवर काल हल्ला झाला..." " काय ? प्रत्यक्ष रावांवर हल्ला ! कोणी हे धाडस केलं?" " खड्गसिंगाने... म्हणूनच मी आलेय.काका कधी तुमची मदत लागली तर मी तुम्हाला वाड्याच्या गच्चीवरून इशारा देईन." " एक हाक मारा, आम्ही लागलीच धावत येऊ. खड्ग सिंगांच्या कारवाया वाढल्यात त्याला धडा शिकविणे गरजेचे आहे." " आजोबांनी, आपल्या राजाला कळविले होते. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.आता आपल्यालाच ...Read More

5

सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 5

साहसी जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे ५ दुसर्या दिवशी पहाटेच जानकीने शामला झोपेतून उठवले. अभयची निघण्याची तयारी झाली का पहायला तिने शामला पाठवले.ती स्वतः तयार झाली होती. कासोटा घातलेले मोरपंखी रंगाच लुगड वर लाल रंगाचा पोलका.. बाजूबंद...निळ्या रंगाच्या बांगड्या..चंद्रकोरीच्या आकाराचे ठसठशीत कुंकू..पायात चामड्याच्या चपला...चामड्याच्या कमरपट्टा त्यात तलवार लटकत असलेली असा पेहराव तिने केला होता. ती बाहेर चांद घोड्यावर मांड ठोकून तयार होती.एवड्यात अभय व शाम तिथे आले. येताना अभय प्रतापरावांना भेटून आला होता.मी पुन्हा तुम्हाला भेटायला येईन असं वचन त्याने प्रतापरावांना दिले होते. जानकीला पाहताच तो स्तब्ध झाला.ते घरंदाज आरसपानी सौंदर्य बघून तो भारावला होता. दुसर्या घोड्यावर शाम व ...Read More

6

सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 6

साहसी जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे ६ पहाटेला जानकी व शाम किनार्यावरच्या वाळूत तलवारबाजी व तीरंदाजीचा सराव करत होती टाळ्या पिटत दोघांचा उत्साह वाढवत होता.तलवारींचा खणखणाट व लाटांचा धीर गंभीर आवाज वातावरणातील चैतन्य वाढवत होता. तलवारबाजी झाल्यावर तीरंदाजीचा सराव सुरू झाला. चरणनेने वाळूत एक खांब रोवला व त्यावर धातूचे गोल भांडे ठेवले .भांड्यावर चरणशने एक चेहरा काढला. " हा.. खड्गसिंग आहे. याच्या दोन डोळ्यांच्या मध्ये बाण लागला पाहिजे.चला..सुरु करा. जानकी ने धनुष्याला बाण चढवला व नेम धरत बाण सोडला खड्गसिंगा बद्दलचा राग तिच्या डोळ्यात उतरला होता बाण अचूक दोन डोळ्यांच्या मध्ये बसला होता.शाम व चरणने टाळ्या मारत जानकीचे कौतुक ...Read More

7

सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 7

साहसी जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे ७ साहसी जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे ७ अघोरीची पूजा बंद होताच जानकी इतर झटकन पुन्हा गुहेतल्या खोलीत उतरले. आत येताच जानकीने पहार खडकाच्या खाचीत घालून मागे ओढलं व पुन्हा जाग्यावर बसवलं.अचानक शाम खाली बसून ढसाढसा रडू लागला.जानकीलाही रडू येत होतं.तिने स्वतःला सावरले. " शाम,आपण बाबांना निश्चितच सोडवू, त्यासाठी व्यवस्थित नियोजन करावं लागेल. एक जरी चूक झाली तरी बाबांचा जीव धोक्यात येईल. आता हातपाय गाळून उपयोग नाही." जानकीने शामला समजावले. " जानकीताई, मला कसलातरी आवाज येतोय." चरण म्हणाला. "आवाज! मला तर काहीच ऐकू येत नाहीय." जानकी कानोसा घेत म्हणाली.चरणने खडकांच्या भिंतीला कान लावला.काहीवेळ ...Read More

8

सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 8

शामने होडी नक्र बेटाच्या किनार्यावर लावली. त्या वेळी किनार्यावर त्यांची वाट बघत असलेला चांद घोडा आनंदाने खिंकाळला. तो आनंदाने टापा आपटत आवाज काढू लागला. त्याने चंद्रावतीला ओळखले होते. असंख्य वेळा त्याने तिला आपल्या पाठिवर बसवून रपेट मारली होती.मुकी जनावर आपल्या मालकांवर किती प्रेम करतात नाही,,,,! " चांद बेटा, किती दिवसांनी बघतेय तूला.." चंद्रावती त्याच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली.तिच्या डोळ्यात आसवे आली होती. सारेजण पुन्हा वाड्यावर परतले.प्रतापराव चंद्रावतीला पाहून आनंदित झाले.जी मृत झाली असं समजून सारे संस्कार केले ती समोर बघून त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना.त्यांचे सारे शरीर आनंदाने थरथरत होते. आधारासाठी हाती पकडलेली काठी त्यांनी फेकून दिली. " मला ...Read More

9

सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 9

साहसी जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे ९ जानकी तयारीला लागली होती.मध्ये अवघे सहा दिवस होते. चंद्रसेनाला सोडविण्यासाठी व्यवस्थित नियोजन लागणार होते.जानकीने दयाळ व दादू कोळी यांना नक्र बेटावर बोलावले. सर्वानी एकत्र बसून खलबतं केली.जो दिवस चंद्रसेनाला बळी देण्यासाठी खड्गसिंगांने निवडला होता त्याच रात्री हल्ला करण्याचे निश्चित करण्यात आले.त्या दिवशी खड्गसिंगांची माणसे गाफिल असतील त्यामुळे काम थोडं सोपे होणार होते. " त्या रात्री सभोवतालच्या टेहाळणी बेटावरचे चाचे पण कर्ली द्विपावर जमा होणार आहेत. रात्री मोठी मेजवानी होणार आहे." शाम म्हणाला. " तूला कसं समजलं?" प्रतापरावांनी विचारले. " पिंगळ्याने त्यांचे संभाषण ऐकले होते." " हे खरं असेल तर काम आणखीच सोपं ...Read More

10

सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 10

साहसी जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे १०त्या दिवशी सायंकाळी जानकी,शाम , चंद्रसेना व चरण आजोबांचे आशिर्वाद घेऊन बाहेर पडले.चौघांनीही वेष धारण केला होता. शामने लागणार सारं सामान दुपारीच होडीत ठेवले होते .त्यात धनुष्य, बाण, तलवारी, आपटल्यावर धूर तयार होणारा दारूगोळा, वळलेल्या दोर्या व खंजीर अशी हत्यारे होती.चौघे पहिल्यांदा चंद्रसेनाची सुटका करणार होती.त्याचवेळी प्रतापराव,दयाळ व दादू कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली भिल्ल व कोळ्यांच्या दोन तुकड्या दोन बाजूंनी एकाच वेळी हल्ला करणार होते.प्रतापरावांच्या शस्त्रागारातील शस्त्रे ,तीर कामठी यांनी सज्ज लढवय्ये नक्र बेटावर तयार होते.त्यांना बाहेर पडायला अजून अवधी होता.आज खड्गसिंगांच्या क्रूरतेचा अंत करायचाच असा सार्यांनी चंग बांधला होता. सारा परीसर भयमुक्त करण्यातआपल्याला ...Read More