भर धाव रस्त्यावर ती बेधुंद धावत चाललेली आहे आणि दोन गुंड तिचा सारखा पाठलाग करत आहेत. ती धावता धावता एका इमारतीत शिरते आणि जाऊन एका ठिकाणी लपून जाते. तिचा पाठोपाठ ते गुंड सुद्धा त्या इमारतीत जाऊन शिरतात. ती आता एका ठिकाणी लपून बसलेली असते जेथून तिला सगळ काही स्पष्ट दिसत असते. ते दोन गुंड आतमध्ये येऊन थांबतात, त्यातील एक जण म्हणतो, “ कुठे गेली आहे रे ती तुला दिसते आहे काय?” तर दुसरा त्याला म्हणतो, “ नाही मला नाही दिसत आहे.” मग पहिला म्हणतो, “ जाऊन जाऊन कुठे जाणार ती असेल इथेच, आता हि संधी हातातून आपण जाऊ देणार नाही. आज आपण तिचा अध्यायचा समापन करूनच येथून जाऊ. चल आता तिचा शोध घेऊ तू तिकडे जा मी इकडे जातो. तुला जर दिसली तर तू तो आपला गुपित इशारा मला कर आणि मला दिसली तर मी तसे करतो.” असे म्हणून दोघेही इकडे तिकडे तिला शोधण्यासाठी वेगळे झाले. ती त्यांचे सगळे बोलने ऐकत होती आणि आता जरा जास्तच सावध झाली होती.

1

कोण? - 1

भर धाव रस्त्यावर ती बेधुंद धावत चाललेली आहे आणि दोन गुंड तिचा सारखा पाठलाग करत आहेत. ती धावता धावता इमारतीत शिरते आणि जाऊन एका ठिकाणी लपून जाते. तिचा पाठोपाठ ते गुंड सुद्धा त्या इमारतीत जाऊन शिरतात. ती आता एका ठिकाणी लपून बसलेली असते जेथून तिला सगळ काही स्पष्ट दिसत असते. ते दोन गुंड आतमध्ये येऊन थांबतात, त्यातील एक जण म्हणतो, “ कुठे गेली आहे रे ती तुला दिसते आहे काय?” तर दुसरा त्याला म्हणतो, “ नाही मला नाही दिसत आहे.” मग पहिला म्हणतो, “ जाऊन जाऊन कुठे जाणार ती असेल इथेच, आता हि संधी हातातून आपण जाऊ देणार नाही. ...Read More

2

कोण? - 2

भाग - २ ह्याचा विचार करता करता सावली हि तिचा जीवनाचा १० वर्ष पूर्वीचा काळात जाऊन पोहोचली. सावली हि सुशिक्षित आणि मध्यम वर्गीय घराण्यातील मुलगी आहे. तिने तिचे शिक्षण पूर्ण करून ती सध्या एका मोठ्या कंपनीत काम करते. सावली हि शिक्षणासोबतच खेळकूद, आत्मसुरक्षेसाठी मार्शल आर्ट मध्ये ब्लॅक बेल्ट मध्ये पारंगत आहे. शिक्षणात ती आजवर फारच उत्तम होती आणि आताही आहे. ती स्वभावाने एकदम शांत आणि सहयोगी वृत्तीची आहे. कुणी कसल्याही अडचणीत सापडला असेल तर त्याची मदत करण्यासाठी हि सदैव तत्पर असते. तीचा याच वृत्तीमुळे तिचा जीवनात तिचे अनेक शत्रू हे जन्माला आलेले होते. ती कुठल्याही परोपकारी आणि प्रोफेशनल कार्यात ...Read More

3

कोण? - 3

भाग – ३ त्याच श्रेणीत एक दिवस सावली तिचा घरी बसलेली असतांना तिचा फोनची घंटी वाजली. तिने फोन बघितला तिला अनोळखा नंबर दिसला. तिने तरीही तो कॉल उचलला आणि ती म्हणाली, “ हेलो कोण बोलता, कोण पाहिजे तुम्हाला.” तेव्हा समोरून काहीच आवाज नाही आला तर तिने पुन्हा तोच प्रश्न केला. परंतु या वेळेस सुद्धा समोरून काहीच प्रतिक्रिया झाली नाही. म्हणून मग सावलीने शेवटी त्रासून तो फोन कट केला आणि ती म्हणाली, “ कोण बावळट आहे तर माहित नाही. सारखा फोन करतो आणि काहीच बोलत नाही, मूर्ख कुठला.” असे म्हणून ती फोन तेथेच ठेवून उठून चालली गेली. ती जाऊन तिचे ...Read More

4

कोण? - 4

भाग – ४ सावलीने फोन कट केला आणि ती कापड बदलण्यासाठी घराचा दिशेने जाऊ लागली होती. तेच तिचे लक्ष आवारात पडलेल्या त्या वस्तूकडे गेले. तिने जाऊन बघितले तर ते एक पत्र होते त्याच नामर्द मनुष्याचे. सावलीने ते पत्र हातात घेतले आणि ती घराचा आत गेली. आत जाऊन तिने कापड बदलली आणि ती पोलीस स्टेशनकडे जाण्यास निघाली. सावलीची गाडी निघाली तर तिचा पाठोपाठ एक दुचाकी सुद्धा निरंतर तिचा पाठलाग करू लागली होती. त्या दुचाकीवर दोन तरूण होते जे सावलीचा पाठलाग करत होते. त्यातील एका तरुणाने फोन काढला आणि फोन लावला. समोरील व्यक्तीने फोन उचलला आणि म्हणाला, “ काय खबर आहे ...Read More

5

कोण? - 5

भाग – ५ त्यांची गाडी तेथून काही अंतरावर निघाली तेव्हा त्या स्त्रीचा पती बोलला, “ काय झाले ग असे आणि तू का बर अशी आवाज चढवून त्या तरुणांना बोललीस.” मग त्या स्त्रीने तिचा पतीला सावली बद्ल सांगितले आणि मग ती सावलीकडे वळली. ती स्त्री म्हणाली, “ तर सांग बेटा काय झाले होते आणि ते तुझ्या मागे का बर लागलेले होते.” मग सावलीने तीचाबरोबर घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. तो सगळा प्रकार ऐकून त्यांनी म्हटले, “ फार बरे झाले कि तू आमचा सोबत आलीस. तर आता सांग तुला इस्पितळात नेऊ कि तुझ्या घरी.” मग सावली बोलली, “ मला तसे फार ...Read More

6

कोण? - 6

भाग – ६आईने कोमलला सावलीचा बरोबर घडलेला प्रकार सांगितला आणि तिला ताबडतोब घरी येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी कोमल घरी आली आणि सावलीला येऊन भेटली. कोमलला घरी आलेलं बघून सावलीला आधी असहज वाटले परंतु कालचा सबंध परिस्थितीचा बद्दल विचार डोक्यात आला तेव्हा आईने केलेल्या त्या अनयास कार्याबद्दल तिला आता बरे वाटू लागले होते. तिचा मनात कोमलचा सुरक्षेची काळजी राहणार नाही कारण कि ती आता तिचा नजरे समोर आणखी विशेष त्या तिघी सुद्धा एकमेकांचा सोबत एकाच घरात राहतील याबद्दल तिला समाधान होते. तर असे एक आठवडा गेला आणि सावली आता बरी होऊन गेली होती. तेव्हा तिने शॉपिंगला जाण्याचा बेत आखला होता. ...Read More

7

कोण? - 7

भाग – ७कोमलचा चिंतेने सावली पडत धडपडत कोमलचा बेडकडे जाऊ लागली. तिचा डोक्यात आता त्या दिवशी घडलेला प्रकार आणि परिस्थिती एका चित्रपटाचा रीलप्रमाणे भर भर धावू लागली होती. ती स्वतःला आता त्या क्षणी घटना स्थळी बघू लागली होती. कोमल तिचा डोळ्यांना समोर रक्ताचा थारोळ्यात पडलेली तिला दिसत होती. तिला तसे बघून सावली आता आणखीनच चिंताग्रस्त होऊन कोमलचे नाव घेत पुढे जात होती. शेवटी ती कोमलचा बेडजवळ जाऊन पोहोचली. तर काय बघते तिची आई तेथेच बसून होती गुपचूप आणि निस्तेज, निष्प्राण. सावली तेथे आईजवळ गेली आणि म्हणाली, “ आई कोमल कशी आहे?” अचानक सावलीचा आवाज ऐकून तिचा आईचा निष्प्राण शरीरात ...Read More

8

कोण? - 8

भाग – ८त्याचा परिणाम स्वरूप सावलीचा मानसिक उपचार सुरु झाला होता. तिला डॉक्टरांनी वेगवेगळ्या औषधी दिल्या होत्या ज्यांचे सेवन करू लागली होती. शरीराने स्वस्थ असून मानसिक आजाराचा औषधी घेतल्याने आता सावलीचा डोक्यावर आणि मेंदूवर आणखीनच अतिरिक्त ताण निर्माण होऊ लागला होता. त्यामुळे सावली आता आधीपेक्षा अधिक जास्त चीड चीड करून रागात येऊ लागली होती आणि गंमत अशी होती कि त्या रागाचा भारात ती बेशुद्ध व्हायची याचे तिलाच माहित नाही रहायचे. काही वेळाने ती सामान्य अशी वागायची. सावलीचा सोबत एवढे काही घडत होते तरीही ती सतत कोमलचा विचार करत रहायची. असेच सुरु असतांना एके दिवशी कोमलला शुद्ध आली आणि तिने ...Read More

9

कोण? - 9

भाग – ९तितक्यात पोलीस स्टेशन मध्ये एक वकील दाखल होतो. तो तेथे येऊन स्वतःचे नाव स्वामी म्हणून सांगतो. तो साहेबांशी बोलतो आणि म्हणतो, “ माझे नाव स्वामी आहे आणि मी मिस्टर निलेश यांचा वकील आहे. मी मिस्टर निलेश यांचा जामीनचे कागदपत्र सोबत आणले आहे. तर तुम्ही ते बघून घ्या आणि मिस्टर निलेशची लवकरात लवकर कोठडीतून सुटका करा.” सावंत साहेबांनी सगळे कागदपत्र बघितले आणि शिपायाला सांगितले सोडा मिस्टर निलेशला. कोठडीतून सुटका झाल्यानंतर निलेश वकिलांसोबत लगबगीने बाहेर निघून गेला. सावलीला मात्र आता आणखी राग आला होता. तर ती सावंत साहेबांना म्हणाली, “ साहेब हे काय आहे तुम्ही त्याला का बर सोडून ...Read More

10

कोण? - 10

भाग – १० तेव्हा निलेश चीढून म्हणाला, “ बास कर तू स्वतःचे सामर्थ्य पुराण बोल कशासाठी तू मला भेटण्यास होतीस.” तेव्हा सावली बोलली, “ मला तुझ्या तोंडातून सत्य ऐकायचे आहे जे तू नाही बोललास आजवर.” मग निलेश थोडा सावध झाला आणि जोरात हसत म्हणाला, “ ओ हो तर तू माझ्या तोंडून मी काय केले आणि काय नाही हे बाहेर काढून पुरावे शोधण्यासाठी आलेली आहेस.” तेव्हा सावली म्हणाली, “ नाही मी ते नाही करायला आलेली आहे.” तेव्हा मध्येच निलेश बोलला, “ मला शिकवू नकोस तू एकटी तर आली आहेस परंतु सोबत काहीतरी घेऊन आलेली आहेस ज्याचा सहाय्याने तू माझे बोलने ...Read More

11

कोण? - 11

भाग – ११ मी तूला गाडीखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न केला परंतु तुझे नशीब प्रबळ आणि तुझ्या बहिणीचे कमकुवत होते. तू बचावलीस आणि अकारणच तुझी बहिण मेली नाही परंतु अपंग होऊन बसली आहे बिचारी. तुला मी माझ्या शक्तीची आणि सामर्थ्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न पुष्कळदा केला परंतु तू काही ऐकायला तयार नव्हतीस. आज तुला मी माझ्या चरणात झुकवले आहे. याचे प्रमाण म्हणून आता तुझ्या रसरसीत आणि मादक देहाचे मी मनसोक्त रसपान केले आहे. त्यासाठी तू माझे काहीच वाकडे करू शकत नाहीस. शिवाय तुला कधी मला खुश करण्यासाठी जर मी बोलाविले तर तुला माझ्याकडे कसलाही विरोध केल्याविण यावेच लागेल. एक आणखी ...Read More

12

कोण? - 12

भाग – १२ शेवटी सावली तिचा स्वतःचा घरी एकदाची आली परंतु तिचा मानसिक आजारामुळे तिला अधून मधून तेथे जावे या अचानक घडलेल्या प्रकारामुळे शरीराने स्वस्थ अशा सावलीला मानसिक ताण हि एक नवीन प्रकारची व्याधी आयुष्यात भेट म्हणून तिला मिळाला होती आणि तिला आता तिचा सोबतच संपूर्ण आयुष्य जगायचे होते. आता हळू हळू सावलीचे जीवन सुरळीतपणे व्हायला सुरु झाले होते. ती आणि तिचा परिवार मागील सगळा त्रास विसरून आता एका नवीन दिवसाप्रमाणे पुढील आयुष्य जगत होते. सावलीची तब्येत आता पूर्वीपेक्षा फार बरी म्हणजे एकदम फुल एन्ड फायनल झाली होती. तिला आता तिचा पूर्वीचा दिवसांप्रमाणे आपल्या दैनंदिन कार्यात व्यस्त व्हायचे होते. ...Read More

13

कोण? - 13

भाग – १३मग ती मुलगी पुढे म्हणाली, “ त्यांनी माझे कागदपत्र त्यांचाकडे ठेवून घेतले आणि ते म्हणाले, कि दिवस शेवटी जेव्हा सगळ्या मुली जातील तेव्हा आम्ही तुला आमचा निर्णय कळवू तोपर्यत तू बाहेर प्रतीक्षा कर आम्ही तुला जेव्हा आत बोलावू तेव्हा तू ये.” हे ऐकताच दुसरी सुंदर मुलगी मध्येच बोलली, “ अग त्यांनी माझे पण कागदपत्र ठेवून घेतले आणि मला सुद्धा सगळे गेल्यानंतर बोलावले आहे. शिवाय मला तर तुझाप्रमाणे प्रश्न विचारलेच त्यांनी मला त्यांचा समोर वॉक करण्यास सांगितले. सगळी वेळ ते फक्त आणि फक्त माझ्या शरीराकडे वेगळ्याच नजरेने बघत होते. त्यांचा त्या नजरी बघून मला तर फारच किळसवाने होत ...Read More

14

कोण? - 14

भाग – १४सावली मात्र त्यांचा या चालाकीला आणि हलकटपणाला चांगली ओळखत होती. तितक्यात दुसरा म्हणाला, “ अरे असे का विचारतोस ती तर एक स्त्री आहे मुलगी आहे तर तिची छाती नाही तिला तर स्तन आहेत मोठे.” तितक्यात तिसर्याने हुशारी केल्यागत हळूच प्रश्न केला, “ फिगर काय आहे तुमचा.” तेव्हा मात्र सावली उत्तरली, “ तुम्ही तुमचा बहिणीला कधी विचारले आहे काय तिचा फिगर काय आहे.” असे म्हटल्या बरोबर तो तिसरा तापून उठला आणि म्हणाला, “ हे काय उत्तर झाले माझ्या प्रश्नाचे, हे याद राखा तुमचा साक्षात्कार सुरु आहे आमचा नाही. आम्ही येथील ऑफिसर आहोत जे ठरवणार आहे कि कोण या ...Read More

15

कोण? - 15

भाग – १५सावली आता एकदम रौद्र रुपात आलेली होती आणि तीने म्हटले, “ मी आता तुम्हा तीघांची तक्रार तुमचा कार्यालयात करणार आहे. तुम्ही या ऑफिसचा नावावर काय काळे धंदे करत आहात हे मी सगळ त्यांना सांगणार आहे.” आता मात्र त्या तीघांना हि जाणीव झाली होती कि हि मुलगी काही आपल्या दडपणाचा खाली येणार नाही म्हणून, ते तीघे सुद्धा आता खुलून त्यांचा मूळ औकातीवर आले होते. ते म्हणाले, “तुला जे करायचे आहे ते कर तुझ्याकडे काय पुरावा आहे कि आम्ही तुझ्याबरोबर वाईट वर्तन केले आणि तुला आम्ही काय बोललो. तू आमचे काही वाकडे करू शकत नाहीस तर गुमान येथून निघून ...Read More

16

कोण? - 16

भाग – १६सावली आता आणखीनच मानसिक त्रासात एकदम गहरी समावली होती. या अचानक उद्भवलेल्या संकटामुळे तीचे मस्तिष्क चालणे बंद होते. ती तीच डोकं घेऊन बसून राहिली वीचार करत. तीचं दिवसाचं सुख आणि रात्रीची झोप उडाली होती. तेवढ्यात तीची आई आली आणि म्हणाली, “ बाळा आता काय बर आपण करायचे, हे तर फारच मोठे संकट आहे. हे देवा तूच काही मार्ग सुचव रे आम्हाला.” सावली आता वीचार करून करून थकली होती आणि ती फारच रागावली होती. तीचा मानसीक अवस्थेत गेलेली होती. ती त्याच भारात बोलली, “ आई आता घाबरून चालणार नाही. काय करायचे ते आता तेथेच जाऊन करायचे आहे. मला ...Read More

17

कोण? - 17

ऑफिस मधील स्टाफ तो आवाज ऐकून मात्र फार चिंता ग्रस्त झाले होते. मग जेवणाची वेळ झाली आणि सावली जेवण्यास होती. तेच केबीनचा बाहेरील घंटा वाजली आणि चपराशी तसाच आत गेला. थोड्या वेळाने तो बाहेर आला आणि त्याने सावलीला आत जाण्यास सांगीतले. तेव्हा सावली तीचा डबा तसाच ठेवून आत गेली तर त्या तीघांतील एकजण म्हणाला, “ काय म्हणता मिस झाशीची राणी, कसे वाटले मघाशी. कसा अपमान केला आम्ही तुझा.” तेव्हा सावली म्हणाली, “ कुठला आणि कसला अपमान मी तर काहीच ऐकले नाही.” असे म्हणत तीने स्मित से हसू आणले ओठांवर. तीचे ते हसू बघून मात्र तीघांचा डोक्यात आगीचा भभका भरून ...Read More

18

कोण? - 18

भाग - 18 त्याचा परीणाम हा झाला कि वरचा कार्यालयातील त्या तीघांचा चाहत्यांना सुद्धा ताबडतोब नीर्णय घ्यावा लागला. त्या तबादला दुसऱ्या एका अती दुर्गम अशा स्थळी करण्यात आला आणि त्यांना लवकरात लवकर ते ऑफिस सोडण्याचा फरमान जाहीर करण्यात आला. सबंधित आदेशाची एक प्रत ऑफिस मध्ये येऊन झडकली आणि सगळ्यांचा चेहरयावर आनंदाने हसू आले. सगळ्या स्टाफने त्यांचे आंदोलन संपवून त्यांचा कामाला सुरुवात केली होती. वीशेष करून एक गोष्ट चांगली झालेली होती कि त्या ऑफिस मधील वरीष्ठ अशा स्टाफला त्या तीघांचा जागेवर प्रमोशन देऊन साहेब बनवले होते. आता कुठलाच नवीन साहेब तेथे येणार नव्हता आणि सावलीला ते नरकामय आयुष्य आणखी जगावे ...Read More

19

कोण? - 19

भाग – १९ तीने तो नंबर तीचा फोनवरून डायल केला. समोरचा व्यक्तीचा फोन वाजू लागला होता. फोनची रिंग संपूर्ण वाजली परंतु समोरचा व्यक्तीने फोन उचलला नाही. सावलीने पुन्हा तो नंबर डायल केला पुन्हा फोनची रिंग वाजली आणि वाजत राहिली. मग अचानक त्या व्यक्तीने फोन उचलला आणि हेलो मिस्स सावली असे म्हटले. तो आवाज सावलीचा ओळखीचा नव्हता परंतु त्याने मिस्स सावली म्हटले होते. त्यामुळे सावली एकदम घाबरली होती. कारण कि या आधी निलेशने सुद्धा तीला याच प्रकारे मिस्स म्हणून संबोधले होते. तीला वाटू लागले होते कि निलेश जिवंत तर नाही आहे. तो पुन्हा तीचा आयुष्यात वीष तर मिळवणार नाही ना. ...Read More

20

कोण? - 20

भाग – २० मग साहेब उत्तरले, “ हे बघ सावली आमचे कामच असते संशय करणे, त्या संशयाचा जोरावर आम्ही ध्येयाचा पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आम्ही तक्रार करणारा आणि अपराधी या दोघांवरही आधी संशय करतो आणि आपल्या तपास सुरु करतो. त्यानंतर जसजसा तपास पुढे पुढे वाढतो आणि आम्हाला पुरावे मिळत जातात. त्यानुसार आम्ही संबंधित व्यक्तीची उलट तपासणी करतो, तो मग तक्रार करणारा असोत कि मग अपराधी. त्याच अनुषंगाने माझा तपास सुरु होता. तुझावर संशय आम्हाला तेव्हा आला जेव्हा त्या घटना स्थळापासून निघालेला श्वान पथक इस्पितळाचा पायरीपर्यंत येऊन परत फिरला. परंतु नंतर तो इस्पितळाचा मागील बाजूस जाऊन तिथल्या तिथे थांबला. ...Read More

21

कोण? - 21

सावली मग तातडीने घराकडे जाण्यास नीघाली होती. ती लगबगीने घरी पोहोचली आणि गाडी ठेवून घरात जाऊन शिरली. तीची आई कोमल हि सोफ्यावर बसून कसले तरी रीपोर्ट बघत होत्या. तीचा आईने तीला जीतक्या तातडीने घरी येण्यास सांगीतले होते, ती घाई तीचा चेहरयावर दिसत नव्हती सावलीला. उलट एक समाधान आणि आनंद दिसत होता. ते बघून मात्र सावली आधी आश्चर्यचकित झाली आणि नंतर रागावली होती. ती सरळ जाऊन आईला म्हणाली, “ आई इतकी कसली महत्वाची गोष्ट होती ग तुला सांगायची कि तू मला इतक्या तातडीने येण्यास सांगीतले. तुझा तो आवाज आणि बोलने ऐकून एका क्षणाला मला वाटले होते कि काही मोठे संकट ...Read More

22

कोण? - 21

भाग - २२ त्यावेळेस घरात एकदम भावनात्मक असे माहूल निर्माण झालेला होता. तेवढ्यात सावलीचा फोन वाजू लागला होता. बघीतले तर तो नवीन नंबर होता, तो बघून ती समजली नवीन नंबर म्हणजे त्या तीसऱ्या व्यक्तीचा असेल. तर तीने तो फोन घेतला आणि बाहेर येऊन उचलला. ती बाहेर गेटजवळ येऊन बोलू लागली, ती हॅलो म्हटल्यावर सहज इकडे तीकडे बघीतले तर तो मनुष्य तीला तीचा घराचा पासून काही अंतरावर रस्त्याचाकडेला उभा राहून बोलतांना दिसला. तो बोलू लागला, काय म्हणता मिस्स सावली, सावंत साहेबांनी तुम्हाला सत्य सांगून दिलेच. ते तसे त्यांचा तपासाची एकही गोष्ट आपल्या स्वतःचा घरचा व्यक्तींना सुद्धा सांगत नाहीत. परंतु ...Read More

23

कोण? - 22

आईने आतून कुंकू आणि हळदची कुहिरी आणून सावलीचा कपाळाला टिका लावला. मग आई म्हणाली, " तू बैस पियुष सोबत मी तुम्हा दोघांसाठी काहिती खायला आणते.' असे म्हणू आई पुन्हा घराचा आतगेली. मग पियुष म्हणाला, 'सांग सावली काय महत्त्वाचे काम काढले आहेस तू, मला माहित आहे तुझी सवय तू कधीच रिकामी वावरत नाहीस. तू सतत कुठल्या न कुठल्या कामात व्यस्त असतेस, मागील महिन्यात तुझ्याबद्दल ऐकून फारच वाईट वाटत होते. माझा मनाला सारखी आत्मग्लानी होत होती कि ज्या सावलीने आमचा आयुष्याचा एका महत्वपूर्ण वळणावर आमचा बाजूने खंबीरपणे उभे राहून आमचे हक्क आम्हाला मिळवून दिले होते. त्या सावलीला आम्ही कसलीच ...Read More

24

कोण? - 23

भाग २४ सावलीने मग पियुषला फोन लावला आणि त्याला सर्व घडलेला प्रकार सांगीतला. पियुषने तीला सांगीतले कि तो दिवशी घरी येऊन कॅमेराचे व्हिडिओ सावलीचा फोनवरती डायरेक्ट २४ तास दिसतील अशी सेटिंग करून देईल, तर मग सावली आपल्या ऑफिसचा कामाला लागली होती तोच सावलीचा फोन वाजला. तीने तो फोन उचलला आणि बोलली, "हेलो सर बोला कसा काय फोन केला.'तेव्हा समोरून आवाज आला कि येथेऑफिस मध्ये एक अती आवश्यक काम आलेले आहे. तर सावलीला उदयाला ऑफिसला यावे लागेल म्हणून. सावलीने मग होकार दिला आणि तीने फोन ठेवला. त्यानंतर ती स्वतःच म्हणू लागली, "बाई मी तर विसरले होते कि मी ऑफिसमध्ये ...Read More

25

कोण? - 24

भाग २५ सावलीने मग थेट तीचा बेडरूममध्ये जाऊन त्या कॅमेराची रेकॉर्ड केलेले व्हिडिओ आणून कोमलला दाखवलेआणि म्हणाली, " या खिडकी आणि या व्यक्तीबद्दल विचारत आहे. " हे बघून कोमल मात्र आता थोडी घाबरली आणि मग चतुरपणे उत्तरली, "हे कसले व्हिडीओ मला दाखवत आहेस तू आणि कुणाचा घरचे व्हिडिओ आहेत हे. मग सावली म्हणाली, "वाह कोमल फारच छान अभिनय करतेस तू. चिकित्सा माझ्या डोक्याची सुरु होती आणि विसर तुला पडतो आहे. हे आपल्याच घराचे आणि तुझ्या या खिडकीचा बाहेरचे व्हिडीओ आहेत.' मग कोमल उत्तरली, " आपल्या घराचा बाहेर आणि आतमध्ये कॅमेरा तर मी कधीच नाही पहिले तू माझ्याशी खोट ...Read More