सत्व परीक्षा

(24)
  • 86.1k
  • 4
  • 54.9k

भाग १ अनिकेत आज मुलगी बघायला चालला होता. अनिकेत त्याच्या मावशी कडे राहत होता. अनिकेत सरमळकर मुळचा कोकणातला पण कामानिमित्त तो मुंबईत आला होता. मुंबई त्याला नविनच होती. म्हणून तो मावशी कडे राहत होता. मावशी चे चाळीतले दोन खोल्यांचे घर होते. मावशी ला दोन मुले होती.दोन्ही मुलगे होते. मोठा मुलगा अनय ८ वीला होता.धाकटा मुलगा विनय ५ वीला होता. दोघांचा पण अनिकेत दादा खूप लाडका होता. मावशी चे मिस्टर पण खूप चांगले होते. त्यांनी कधीच अनिकेत ला परकेपणा नाही दाखवला. अनिकेतचा स्वभाव पण खूप चांगला होता. मावशीचे घर जरी लहान असले तरी मन मात्र मोठे होते.

1

सत्व परीक्षा - भाग १

भाग १ अनिकेत आज मुलगी बघायला चालला होता. अनिकेत त्याच्या मावशी कडे राहत होता. अनिकेत सरमळकर मुळचा कोकणातला पण तो मुंबईत आला होता. मुंबई त्याला नविनच होती. म्हणून तो मावशी कडे राहत होता. मावशी चे चाळीतले दोन खोल्यांचे घर होते. मावशी ला दोन मुले होती.दोन्ही मुलगे होते. मोठा मुलगा अनय ८ वीला होता.धाकटा मुलगा विनय ५ वीला होता. दोघांचा पण अनिकेत दादा खूप लाडका होता. मावशी चे मिस्टर पण खूप चांगले होते. त्यांनी कधीच अनिकेत ला परकेपणा नाही दाखवला. अनिकेतचा स्वभाव पण खूप चांगला होता. मावशीचे घर जरी लहान असले तरी मन मात्र मोठे होते. अनिकेत वर माळ्यावर झोपत ...Read More

2

सत्व परीक्षा - भाग २

भाग २ ते गेल्यावर रुचिराची आई रुचिरा च्या बाबांना म्हणाली, "मुलगा छान आहे. पण स्वतः चे घर नाही आहे त्याला असं मला वाटत होते. " रुचिरा चे बाबा, " आधी त्यांचा होकार तर येऊ दे. मग पुढच्या गोष्टी बोलता येतील आधी च कसे विचारणार. बघू पुढचे पुढे. रुचिरा तुझे काय मत आहे? रुचिरा, " घर नंतर पण घेऊ शकतो. त्यांचा स्वभाव चांगला वाटला मला. " रुचिरा चे बाबा, " तुला आवडला आहे ना मुलगा. " रूचिरा,"तुम्ही म्हणाल तसं बाबा. मला माहीत आहे तुम्ही माझ्या चांगल्याचाच विचार करणार. रुचिरा च्या घरच्यांना अनिकेत आवडला होता. रूचिरा च्या बाबांना रुचिरा च्या चेहऱ्यावरचे ...Read More

3

सत्व परीक्षा - भाग ३

भाग २ ते गेल्यावर रुचिराची आई रुचिरा च्या बाबांना म्हणाली, "मुलगा छान आहे. पण स्वतः चे घर नाही आहे त्याला असं मला वाटत होते. " रुचिरा चे बाबा, " आधी त्यांचा होकार तर येऊ दे. मग पुढच्या गोष्टी बोलता येतील आधी च कसे विचारणार. बघू पुढचे पुढे. रुचिरा तुझे काय मत आहे? रुचिरा, " घर नंतर पण घेऊ शकतो. त्यांचा स्वभाव चांगला वाटला मला. " रुचिरा चे बाबा, " तुला आवडला आहे ना मुलगा. " रूचिरा,"तुम्ही म्हणाल तसं बाबा. मला माहीत आहे तुम्ही माझ्या चांगल्याचाच विचार करणार. रुचिरा च्या घरच्यांना अनिकेत आवडला होता. रूचिरा च्या बाबांना रुचिरा च्या चेहऱ्यावरचे ...Read More

4

सत्व परीक्षा - भाग ४

परवाचा दिवस कधी येतोय असे दोघांना पण झाले होते. कारण दोघांना पण एकमेकांना बघायची ओढ लागली होती. रुचिरा ची रुचिरा ला म्हणाली, " रुचिरा साडीच नेस ग परवा. " रुचिरा, " ठिक आहे आई. " कोणती साडी नेसायची असा विचार ती करू लागली. राणी कलरची खणाची साडी नेसायची तिने ठरवले. बघता बघता परवाचा दिवस उजाडला. घर छोटसं होतं पण टापटीप आणि नीटनेटके होते. मावशीने घर छान असं सजवलं पण होतं. चाळीतले घर असले तरी ते सुंदर होतं. माळ्यावर जाण्याचा जीना पण गोल बसवून घेतला होता. त्यामुळे घराला एक वेगळाच लूक आला होता. मावशीने अनिकेत ला येताना मिठाई चा बॉक्स, ...Read More

5

सत्व परीक्षा - भाग ५

भाग ५ एप्रिल मध्ये साखरपुडा होता. त्यामुळे साखरपुड्याच्या तयारी ला सुरूवात केली. आज ते साखरपुड्याची साडीची खरेदी करण्यासाठी सगळे होते. वॉटस्अप वर तर दोघांचे बोलणे चालूच होते. पण आज साडी खरेदीच्या निमित्ताने भेट होणार होती. त्यासाठी अनिकेत ची मामी आणि तिची मुलगी आले होते. संध्याकाळी ५ वाजता सगळे घाटकोपर ला भेटणार होते. ठरल्याप्रमाणे सगळे भेटले. मावशी काका, अनिकेत चे आईबाबा, त्याची मामी आणि तिची मुलगी मिनाक्षी असे सगळे आले होते. रुचिरा कडून तीची आई आणि तीची काकी आली होती. बाकीच्या लोकांना रुचिरा आधी च भेटली होती. अनिकेत ने त्याच्या मामीची आणि तीच्या मुलीची रुचिरा बरोबर ओळख करून दिली. रूचिरा ...Read More

6

सत्व परीक्षा - भाग ६

भाग ६ दोघांचे पण फोनवर बोलणे चालू होते. आता त्यांना असं वाटतच नव्हतं की, त्यांचं अरेंज मॅरेज आहे. इतके एकमेकांना ऒळखायला लागले होते. साखरपुड्याची तारीख जवळ आली होती. म्हणून दोघांची पण तयारी जोरात सुरू होती. रुचिरा चे ब्लाऊज वैगरे शिवायला जाणे, पार्लरवालीला भेटणे, मेकअप ट्रायल , फेशियल यामध्ये ती खूप बिझी झाली होती. त्यामुळे त्यांना भेटता येत नव्हते. अनिकेत ला रुचिरा च्या साखरपुड्याच्या साडी ला मॅचिंग जॅकेट घेण्यासाठी ते दोघे उद्या भेटणार होते. रुचिरा ला अनिकेत चा फोन आला.. अनिकेत, " हॅलो, रुचिरा. " रुचिरा, " हॅलो बोला. " अनिकेत, " अगं मी काय म्हणत होतो उद्याचं कसं करायचं? ...Read More

7

सत्व परीक्षा - भाग ७

भाग ७ अनिकेत पटकन मागे वळला. त्याने पटकन मिनाक्षी ला दूर ढकलले, आणि तिला वाॅर्निंग दिली. अनिकेत, " हे मिनाक्षी मला तू अजिबात आवडत नाहीस. ही गोष्ट डोक्यात पक्की बसवून घे. मला तू कधीच आवडली नाही. तू जे हे माझ्या आजूबाजूला सारखी घुटमळत असतेस ना ते बंद कर समजलं. " तो तिथून निघून गेला. मिनाक्षी तो गेला त्या दिशेला बघत राहीली. अनिकेत ला मिनाक्षी अजिबात आवडायची नाही. कारण तिचा स्वभाव खूप फटकळ होता. ती सगळ्यांना उलट उत्तर करायची . कोणाशी धड बोलायची नाही. तिची आई म्हणजे अनिकेत ची मामी पण तशीच होती. मामाला सारखं भडकवत बसायची त्यामुळे तिच्या मुलीवर ...Read More

8

सत्व परीक्षा - भाग ८

काका, मावशी आणि ‌अनिकेत दोघेही हसू लागले.‌सगळे झोपायला गेले. अनिकेत झोपायला ‌आला पण त्याला झोपच येईना. रुचिरा ची आठवण बसली. रुचिरा चा फोटो काढून बघत बसला.खूप वेळाने त्याला झोप लागली. इकडे रुचिरा ची पण् तीच अवस्था होती. कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतो असं दोघांना पण झालं होतं. दुसरा दिवस उजाडला दोघेपण आज खूप फ्रेश मुड मध्ये होते. रुचिरा आज खूप सुंदर दिसत होती. तिने अनिकेत ला फोन केला.‌ रुचिरा," हॅलो अनिकेत" अनिकेत," हा बोल रुचिरा." रुचिरा," येताना साखरपुड्याची साडी घेऊन या.म्हणजे कलर च मॅचिंग बरोबर होईल.‌" अनिकेत," ओके घेऊन येतो. " रुचिरा," बाय " अनिकेत," बाय" अनिकेत ऑफिस ला ...Read More

9

सत्व परीक्षा - भाग ९

भाग ९ वेटर त्यांच्या टेबलवर ऑर्डर घेण्यासाठी आला . अनिकेत," चिकन मंचाऊ सूप घेऊन या आधी आणि चिकन लॉलीपॉप या. बाकीचं नंतर सांगतो. " ऑर्डर घेऊन वेटर निघून गेला. अनिकेत," जेवण मध्ये काय मागवायचं ? तुला काय आवडतं. ?" रुचिरा," मला चायनीज ‌आवडतं . नॉनव्हेज पदार्थ‌ मला खूप आवडतात.‌? अनिकेत," मला पण खूप आवडतं नॉनव्हेज.‌" कोकणी लोकं पक्की नॉनव्हेजीटेरियन असतात. अनिकेत," लग्नानंतर ‌आपण आधी गावाला जाऊया गावदेवी च्या आणि कुलदेवी च्या दर्शनाला. " रुचिरा ," हो नक्कीच जाऊया." अनिकेत, " तुला कोणता रंग आवडतो ?" रुचिरा," मला मोरपिशी कलर आवडतो. " अनिकेत," तुला आपण लग्नात मोरपिशी रंगाचा शालू घेऊया ...Read More

10

सत्व परीक्षा - भाग १०

फ्लॅट बघायला जाऊया? " अनिकेत म्हणाला. परवा साखरपुडा आहे तर उद्या आपली गडबड असेल तर साखरपुडा झाल्यावर च जाऊ निवांतपणे फ्लॅट बघता येईल. अनिकेत," ठिक आहे.‌आई बाबा पण बघतील." काका," हो चालेल." दुसऱ्या दिवशी ची सुरुवात जरा गडबडीची होती. आई आणि मावशी दोघी जेवण आवरून मार्केट मधून काय काय आणायचं त्याची तयारी करत होत्या. विड्याची पानं, सुपाऱ्या , नारळ , नवरी साठी गजरा आणि वेणी. बरीच मोठी लिस्ट होती. दोघी ही मार्केट मध्ये गेल्या. काका आणि बाबा पण बाहेर गेले होते. मावशी ची मुलं पण क्लासला गेली होती. अनिकेत एकटाच घरी होता. अनिकेत ने रुचिरा ला फोन केला. खूप ...Read More

11

सत्व परीक्षा - भाग ११

भाग ११अनिल आणि रुचिरा तर वेगळ्याच विश्वात होते. दोघांची पण एकमेकांच्या नातेवाईकांशी ओळख करून देणे चालू होते. हळूहळू एक करून सगळे नातेवाईक जायला लागले. दोघांसाठी मग त्याच्या मित्राने प्लेट आणून दिली. अनिकेत चा मित्र, " खायचं विसरले वाटतं दोघे. "दुसरा मित्र, " अरे त्यांना भूक नाही लागणार आता. त्याचं पोट भरले असेल. "असे अनिकेत च्या मित्रांचे संवाद चालू होते. मित्र नसले तर कुठल्याच फंक्शन ला मजा नाही. रुचिरा, " खाण्याचं लक्षातच आलं नाही ना. "अनिकेत, "हो ना माझ्या पण नाही लक्षात आलं. खरचं भूक लागली नाही. "रुचिरा आणि अनिकेत एकमेकांकडे पाहून हसत होते. सगळे गेल्यावर फक्त घरचेच राहतात. घरच्यांची ...Read More

12

सत्व परीक्षा - भाग १२

दोघेही एका हॉटेल मध्ये गेले. संध्याकाळी ची वेळ होती. म्हणून हॉटेल मध्ये बऱ्यापैकी गर्दी होती. दोघे कॉर्नर चाटेबल बघून आशुतोष ने कॉफी आणि वडा सांबार मागवले. अनिकेत, " बोल रे काय बोलायचं आहे. "आशुतोष, " अनिकेत तुला माझा स्वभाव माहिती च आहे. जे आहे ते स्पष्ट च बोलतो. मला तुझ्या मामची मुलगी आवडली आहे. मला तिच्याशी लग्न करायचे आहे. "अनिकेत, " ते तर माझ्या कालच लक्षात आलं होतं. "आशुतोष, " मी माझ्या घरच्यांशी बोलून घेतलं आहे. ते मुलगी बघायचा कार्यक्रम करु म्हणत आहेत. तु माझं प्रपोजल तिच्या घरी सांगशील का? ते हो म्हणाले तर पुढच्या कार्यक्रम करु या. तुला ...Read More

13

सत्व परीक्षा - भाग १३

मिनाक्षी, " ओके आतू, मी लक्षात ठेवेन सगळं . बरं तू उद्या येशील का घरी? मी कुठली साडी नेसू सांग. मावशी, " अगं तुला तुझ्या सगळ्या च साड्या छान दिसतात. तुला जी सगळ्यात जास्त आवडते ना ती नेस. त्यात तू जास्त कम्फर्टेबल राहशील आणि तुझा कॉन्फिडन्स पण वाढेल. " मिनाक्षी, " थॅंक्यु, तू किती छान बोलतेस.चल बाय. " मावशी, " बाय. " आशुतोष च्या घरच्या काही म्हणणं नव्हते. फॉरमॅलिटी म्हणून ते मुलगी बघायला येत होते. लग्न आशुतोष ला करायचं आहे. त्यामुळे सगळे त्याच्या मनासारखे होऊ दे असे त्याला वाटत होते. आशुतोष च्या घरचे खूप आधुनिक विचारांचे होते. अनिकेत ने ...Read More