तुझ्यावाचून करमेना

(5)
  • 19.4k
  • 0
  • 9.2k

"अक्षय आज बघायचा कार्यक्रम आहे हे फायनल आहे कळलं ना? कामं जरा ठेव बाजूला." मायाताई त्याला ओरडत म्हणाल्या. हे ऐकताच त्याने लॅपटॉपमधून डोकं वर काढलं आणि वैतागून आईला म्हणाला,"अग आई फक्त २३ वर्षांचा आहे गं चाळीशीचा नाही झालोय." "अरे हो रे पण आता हळूहळू बघायला सुरुवात करायला हवी हो ना? माझ्या या राजबिंड्या राजकुमाराला एखादी सुंदरशी राजकुमारी शोधायला वेळ नाही का लागणार ? आणि मी काय अस म्हणतेय का की आज जी मुलगी येईल तिला पसंत करून लग्न करुन टाक. अरे आत्ता पसंत पडलीच तरी आम्ही अजून दोन तीन वर्ष घाई करणार नाही. समजून घ्या एकमेकांना, वेळ द्या तुम्ही आणि आत्ता अनायसे स्थळ आलं होतं म्हणून बघायचं ठरवलं. बर तुझं तिच्यावर प्रेम होतं नंतर कोणाच्या प्रेमात पडलाच नाहीस तू म्हणून म्हटल बघून घ्यायला हरकत नाही. आणि अक्षय मूव्ह ऑन होण गरजेचं आहे तिने तुझा जो अपमान केलाय ना तो अजून आठवतोय "

1

तुझ्यावाचून करमेना - 1

"अक्षय आज बघायचा कार्यक्रम आहे हे फायनल आहे कळलं ना? कामं जरा ठेव बाजूला." मायाताई त्याला ओरडत म्हणाल्या. हे त्याने लॅपटॉपमधून डोकं वर काढलं आणि वैतागून आईला म्हणाला,"अग आई फक्त २३ वर्षांचा आहे गं चाळीशीचा नाही झालोय." "अरे हो रे पण आता हळूहळू बघायला सुरुवात करायला हवी हो ना? माझ्या या राजबिंड्या राजकुमाराला एखादी सुंदरशी राजकुमारी शोधायला वेळ नाही का लागणार ? आणि मी काय अस म्हणतेय का की आज जी मुलगी येईल तिला पसंत करून लग्न करुन टाक. अरे आत्ता पसंत पडलीच तरी आम्ही अजून दोन तीन वर्ष घाई करण ...Read More

2

तुझ्यावाचून करमेना - 2

अक्षय आज मुंबईला जाणार होता. मायाताईंची गडबड चालू होती. अक्षय हे घेतलंस का? अक्षय लाडवांचा डबा भरलास का? असं त्यांची कामं चालूच होती. किरणराव ही अक्षयला मदत करत होते. अखेर अक्षयची जायची वेळ आली. मायाताई थोड्या भावनिक झाल्या. तस पहिल्यांदाच तो एकटा बाहेर जाणार होता नाहीतर लहान म्हणून त्या जायच्या बरोबर. "काळजी घे रे बाळा." "हो गं आई काळजी नको करुस."असं म्हणत तो बाहेर पडला. मायाताई किरणरावांना म्हणाल्या, " खर सांगू तुम्हाला मी अशी मुली बघायची घाई का करत होते? त्याला कोणीतरी आपलं मिळावं जे त्याला समजून घेईल. बस नाहीतर मी कशाला त्याच्या करिअरच्या आड येईन? दिप्तीला तर त्याने ...Read More