पुन्हा नव्याने

(16)
  • 60k
  • 0
  • 35.6k

मीराला एकटीला घरात खूप कंटाळा आला होता. म्हणून ती रागिणी ला फोन करत होती. पण रागिणी काही फोन उचलत नव्हती. ( मीरा आपल्या कथेची नायिका वय वर्षे ३६, गोरी पान, दिसायला सुंदर पण थोडीशी स्थूल) . मीराचा नवरा( राजीव वय वर्षे ४० , पण तिशीत ला वाटणारा हॅण्डसम, हिरो टाईप पर्सनॅलिटी असणारा, गोरा पान क्नीनशेव ) चार दिवसांसाठी ऑफिस च्या कामा निमित्त कालच बाहेर गावी गेला होता. अधनं मधनं तो जात असतो असा ऑफिस च्या कामानिमित्ताने बाहेर. ( रागिणी पण मीरा च्या च वयाची होती पण सडपातळ, आणि खूप मॉड होती. करीअरच्या नादात लग्नाच राहून गेले होते. मागच्या च वर्षी तीने अमेय बरोबर लग्न केले होते. )रागिणी आणि मीरा शाळे पासून च्या मैत्रीणी होत्या. मीरा ची मुलं पण स्कूल मधल्या कॅम्प साठी बाहेर गेली होती. ती परवा येणार होती. मीराला दोन मुलं होती. राहूल आणि रिया. राहूल ८वीला होता. रिया ५ वीला होती. सगळे बाहेर गेले होते म्हणून मीरा निवांत होती. रागिणी ची सोबत होईल म्हणून ती रागिणी ला फोन करत होती. अर्ध्या तासाने रागिणी चा मीराला फोन आला. रागिणी, " हॅलो मीरा फोन केला होतास. काय झाल गं नाही म्हणजे या वेळेला कधी तुझा फोन नसतो ना म्हणून म्हटलं बाकी काही नाही.

1

पुन्हा नव्याने - 1

मीराला एकटीला घरात खूप कंटाळा आला होता. म्हणून ती रागिणी ला फोन करत होती. पण रागिणी काही फोन उचलत ( मीरा आपल्या कथेची नायिका वय वर्षे ३६, गोरी पान, दिसायला सुंदर पण थोडीशी स्थूल) . मीराचा नवरा( राजीव वय वर्षे ४० , पण तिशीत ला वाटणारा हॅण्डसम, हिरो टाईप पर्सनॅलिटी असणारा, गोरा पान क्नीनशेव ) चार दिवसांसाठी ऑफिस च्या कामा निमित्त कालच बाहेर गावी गेला होता. अधनं मधनं तो जात असतो असा ऑफिस च्या कामानिमित्ताने बाहेर. ( रागिणी पण मीरा च्या च वयाची होती पण सडपातळ, आणि खूप मॉड होती. करीअरच्या नादात लग्नाच राहून गेले होते. मागच्या च वर्षी ...Read More

2

पुन्हा नव्याने - 2

भाग २मीराला असं समोर बघून राजीव शॉकच झाला. काय बोलायचे त्याला सुचेना. मीराला राग अनावर होत होता. हे काय आहे राजीव. " त्या तरुणीला काही सुचेना की अचानक ही कोण बाई आली. राजीव शी असं का बोलते आहे . ती तरुणी, " ओ मॅडम कोण आहात तुम्ही? तुम्हाला माहीती तरी आहे का तुम्ही कोणाशी बोलताय? "मीरा, " मला चांगलेच ठाऊक आहे मी कोणाशी बोलते आहे. मी माझ्या नवऱ्याशी बोलतेय आणि तू आमच्य मध्ये अजिबात बोलायचे नाही. " मीरा म्हणाली.राजीव, " अनया तू ऑटो करून घरी जा . "अनया म्हणजे जी तरुणी राजीव बरोबर बोलत होती ती. ( अनया २७ ...Read More

3

पुन्हा नव्याने - 3

उ़ भाग ३ मीराने राजीव ला विचारले की," माझं असं काय चुकलं ते सांग? " राजीव, " मीरा माझ्या काळात तू माझ्या पाठिशी खंबीर पणे उभी राहायची स , माझ्या आईवडिलांना तू स्वतः चे आई वडील समजून वाटायची, आणि बाकी पण बरचं काही तू केले आहेस. माझं वागणं चुकलं मी मान्य करतो. मी माझ्या बिझनेस सेटप मध्ये बिझी झालो. तु घरामध्ये बिझी झालीस. आपण जवळ असून पण कधी लांब गेलो कळलचं नाही. मीरा, " राजीव मी आपल्या च संसारात बिझी होते ना रे. मला तर असं कधीच जाणवलं नाही. तु जे कारण देतो आहेस ना ते मला अजिबात पटलं ...Read More

4

पुन्हा नव्याने - 4

आ भाग ४ मीरा" मुलांच काय? घर कोण सांभाळेल? मी बाहेर पडले तर. रागिणी, " मीरा मुलं आता मोठी आहे त. त्यांचं त्यांच ते स्वतः हुन करु शकतात. तु मेकप आर्टिस्ट आहेस त्या दृष्टीने काहितरी कर. पण काहीतरी कर. " मीरा, " मला जमेल का गं रागिणी? किती वर्षे झाली? घरातील कामं कशी होतील. " रागिणी, " का नाही जमणार मीरा. घरातल्या कामांना बाई ठेव. थोडं स्ट्रॉंग बन मीरा. जेव्हा आपण पूर्ण वेळ गृहिणी असतो . तेव्हा सगळेच आपल्या वर डिपेंड असतात. ते आपल्या ला आवडत पण असतं. पण पण मुलं जेव्हा मोठी होतात. आपापल्या विश्वात रमायला लागतात. मुलं ...Read More

5

पुन्हा नव्याने - 5

भाग ५ राजीव, " मीरा आता बस झालं. या गोष्टी साठी मी तुझी खूप दा माफी मागितली आहे. " " राजीव साहेब खूप उपकार झाले तुमचे की, तुम्ही माफी मागितली. पण फॉरमॅलिटी म्हणून. तुला पश्चात्ताप झालेला दिसत नाही. मी माझ्या मतावर ठाम आहे. आता मी जे ठरवलं आहे ते मी करणारच. " राजीव विचार करू लागला. कसं बरं हिला सयजवाव. राजीव ने मग खर्चाचा विषय काढायच ठरवले. कारण जास्ती चा खर्च नको म्हणून मीरा ने आजपर्यंत कधी कामवाली बाई नाही ठेवली. त्याने खर्चाचा विषय दाखवून तिचं काम करण थांबवायचे ठरवले. राजीव, " मीरा पूर्ण वेळ कामवाली म्हणजे तिचा पगार ...Read More

6

पुन्हा नव्याने - 6

भाग ६ दुसऱ्या दिवशी अनया राजीव च्या ऑफिस मध्ये आली. राजीव खर तर तिची वाटचं पाहत होता. पण त्याने न दाखवता तिला थोडा वेळ वाट पाहायला लावायचं ठरवलं . प्युन ने दरवाजा वाजवला. राजीव सीसीटीव्ही च्या स्क्रीन मध्ये बघत होता. प्यून ने दरवाजावर टकटक केली. प्यून, "आत येऊ का सर? " राजीव, "या. काय काम आहे? पटापट बोला.? प्यून, "सर ते अनया पवार नावाच्या कोणी मॅडम आल्या आहेत. तुम्ही त्यांना बोलावलं आहे. असं त्या म्हणतं आहेत. " राजीव जरा आठवल्या चे नाटक करून म्हणाला, " ओ हा हा आल्यात का त्या? त्यांना १५ मिनिटांनी आत पाठवा. " पंधरा मिनिटानंतर ...Read More

7

पुन्हा नव्याने - 7

भाग ७ मीरा काही आता ऐकणार नाही हे तो जाणून होता. मीरा किती जिद्दी आहे हे तो जाणून होता. शी लग्न करण्याचा तिच्या निर्णयाला तिच्या आई वडिलांनी जेव्हा विरोध केला. तेव्हा त्याच्या शी लग्न करण्याच्या निर्णायावर ती ठाम होती. तिच्या आई वडिलांशी भांडून तीने राजीव शी लग्न केलं होतं. राजीव ला माहिती होतं की. आता ती आपलं काहीच ऐकणार नाही. लग्न झालं तेव्हापासून येणाऱ्या प्रत्येक संकटात ती राजीव च्या पाठी ठाम उभी राहिली होती.‌राजीव ला ते आठवलं. कितीही मोठा प्रॉब्लेम आला तरी ती नेहमी मला धीर देत सगळं काही ठिक होईल अस़ं नेहमी म्हणत नेहमी मला मोटीवेट करायची.राजीव मनातल्या ...Read More

8

पुन्हा नव्याने - 8

तिने हि दोघांना मिठीत घेतले. दोघेही खूप खूष दिसत होते. रियाने पप्पांना पण बोलावले. चौघांनी एकमेकांना मिठी मारली. मीरा देवाकडे प्रार्थना केली की, माझं कुटुंब असचं एकत्र राहू दे. मुलं मग फ्रेश व्हायला गेली. राजीव पण फ्रेश व्हायला गेला. मीरा किचनमध्ये गेली. हॉट चाॅकलेट आणि चीज टोस्ट चा मस्त नाश्ता बघून मुलं खूप खूष झाली. राजीव आणि मीरा पण नाश्ता करायला बसले. मुलं काय काय गमती जमती झाल्या ते राजीव आणि मीराला सांगत होते. मीरा ने मुलांना सांगितले की उद्या पासून नवीन मावशी येणार आहे त. मम्मा आता मेक अप चा स्टुडिओ काढणार आहे.त्यामुळे ती थोडी बिझी असेल. पण ...Read More

9

पुन्हा नव्याने - 9

भाग ९ मावशी मीराच्या केसांना मनापासून तेल लावत होत्या. मीराला तिच्या आईची आठवण आली." माझी आई पण माझ्या केसांना तेल लावून द्यायची. " मीरा मावशी ला म्हणाली. राजीव साठी तिने आई बाबांना दुखावले होते याची तिला खंत वाटत होती. मावशी, " आई ती आईच असते तिच्या मायेची सर कशालाच नसते. तिच्या इतकी माया आपल्या वर कुणी च करत नाही. " मीरा, " मावशी तुम्हाला एक विचारू रागवणार नाही ना? " मावशी, "अहो ताई, असं कायं बोलताय तुमच्या वर मी कशाला रागवेन.? तुम्ही माझ्या अन्नदाता आहात. * मीरा, " तुम्ही जेव्हा माझ्या घरी आलात तेव्हा मी सांगितलेल्या अटी तुम्ही लगेच ...Read More

10

पुन्हा नव्याने - 10

भाग १० किती दुख: असतना एखाद्या च्या आयुष्यात तरीही ते आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असतात. मावशी ना बघून कोणाला ही नाही त्यांनी किती सोसलयं ते. उद्या गुढी पाडवा होता. दुसऱ्या दिवशी मीरा लवकरच उठली खरतरं रात्रभर तिला नीट झोपेच लागली नाही. तिला सतत तिच्या स्टुडिओ च ओपनिंग च दिसत होते. मावशींनी मस्त इडली सांबार चा नाश्ता केला होता. तो खाऊन ती मावशींना म्हणाली, " मावशी तुमचं पण आवरून घ्या राजीव आणि मुलं येतील त्यांच्या बरोबर या. जास्त उशीर करु नका. " जीमचा परिणाम थोडाफार तरी झाला होता. मीरा खूप छान नटली होती. डार्क रेड कलरची पैठणी ती नेसली होती. ...Read More