निळ्या आकाशाचं स्वप्नं

(11)
  • 43.4k
  • 4
  • 23k

पंकजने माधवीला हाक मारत आधी घरातले सगळे दिवे लावले. पंकजने तीन चारदा बेल वाजवली तरी कोणी दार उघडलं नाही. दार नेहमीच माधवी ऊघडते.घरात अजून दुसरं कोणी नाही. पंकज आणि माधवी दोघच असतात. पंकजच्या स्कूटरचा आवाज माधवीला त्यांच्या घरातील बाल्कनीत येतो. पंकज घरी यायच्या आधी माधवी नेहमीच बाल्कनीत उभी राह्यची. पंकजला पार्किंग मध्ये गाडी ठेवताना बघीतलं की माधवी घराचं दार उघडून ठेवत असे. हा माधवीचा रोजचा शिरस्ता होता. त्याप्रमाणे आज काही घडलं नाही त्यामुळे मनाशी आश्चर्य करत पंकज स्वतःजवळ असलेल्या किल्लीने दार उघडून घरात शिरला आता शिरला तर घरात सगळीकडे त्याला अंधार दिसला. " आज झालं काय माधवीला ? सगळं घर अंधाराच्या हवाली करून गेली कुठे?" माधवी सहसा पंकज घरी यायच्या वेळी कधी बाहेर जात नसे. अगदी अर्जंट काम निघालं तर ती पंकजला सांगून जात असे. आज असं काही घडलं नाही. पंकजने खिशातून फोन काढून बघीतला . माधवीचा मिस कॉल किंवा मेसेज दिसतोय का? तेही दिसलं नाही.

Full Novel

1

निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग १

निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग १" माधवी ऐ माधवी"पंकजने माधवीला हाक मारत आधी घरातले सगळे दिवे लावले. पंकजने तीन चारदा वाजवली तरी कोणी दार उघडलं नाही. दार नेहमीच माधवी ऊघडते.घरात अजून दुसरं कोणी नाही. पंकज आणि माधवी दोघच असतात.पंकजच्या स्कूटरचा आवाज माधवीला त्यांच्या घरातील बाल्कनीत येतो. पंकज घरी यायच्या आधी माधवी नेहमीच बाल्कनीत उभी राह्यची. पंकजला पार्किंग मध्ये गाडी ठेवताना बघीतलं की माधवी घराचं दार उघडून ठेवत असे.हा माधवीचा रोजचा शिरस्ता होता. त्याप्रमाणे आज काही घडलं नाही त्यामुळे मनाशी आश्चर्य करत पंकज स्वतःजवळ असलेल्या किल्लीने दार उघडून घरात शिरला आता शिरला तर घरात सगळीकडे त्याला अंधार दिसला." आज झालं काय ...Read More

2

निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग २

निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग २मागील भागात आपण बघीतलं की पंकज घरी आला तेव्हा माधवी उदास बसलेली होती. पुढे बघू झालं ते.आज पंकज आणि माधवी डाॅक्टर कडे जाऊन आले. त्यांच्या लग्नाला पाच वर्ष उलटून गेली तरी त्यांना बाळाची चाहूल लागली नव्हती. डाॅक्टरांना माधवीने सरळच विचारलं," डाॅक्टर किती दिवस हे सायकल करायचं आहे.गोळ्या थांबल्या की माझी पाळी पुन्हा पहिल्यासारखी अनियमित येते. असं का?"" तुमची पाळी अनियमित आहे ती नियमित येण्यासाठी आधी उपचार करावे लागतील. नंतर मूल होण्यासाठी उपचार करावे लागतील."" हे कधी पर्यंत करावं लागेल?"" हे बघा. मूल व्हावं म्हणून जी उपचार पद्धती आपण सुरू करतो ती फार वेळ खाऊ आहे. ...Read More

3

निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग ३

निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग ३मागच्या भागात आपण बघीतलं की संध्याकाळी पंकज माधवीला रोज फिरायला जायचं असं म्हणाला.जातात का रोज बघू या भागात.त्या दिवसापासून पंकज ऑफीसमधून आल्यावर न कंटाळता आणि न चुकता माधवीला बाहेर फिरायला नेऊ लागला.ज्या रस्त्यावर फारशी गर्दी नसेल अशा ठिकाणी पंकज आणि माधवी फिरायचे आणि जुने काॅलेजचे दिवस आठवायचे. खूप हसायचे. माधवीचं हसणं कानावर पडायचं तेव्हा प्रत्येक वेळी पंकज आनंदाने मोहरायचा. त्याला अशी हसरी माधवी आवडायची. मधल्या काळात ती फार आपल्या कोषात गेली होती.पंकजला मनातून बरं वाटलं की आपण वेळेवर माधवीची अवस्था ओळखली. मनसोक्त फिरणं झालं की ते दोघंही त्या ठरलेल्या बागेत जायचे. तिथे बालगोपाळांचा मेळावा भरलेला ...Read More

4

निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग ५

निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग ५मागच्या भागात आपण बघीतलं की माधवीशीपंकजचे बाबा दत्तक या विषयावर बोलतात.आता माधवी काय निर्णय घेते गेले आठ दिवस बाबांनी सुचवलेल्या दत्तक या पर्यायाचा विचार करत होती. तिच्या मनात प्रचंड घालमेल चालू होती. विषय इतका नाजूक आहे की त्यावर कोणाशी मनमोकळेपणाने बोलावं तिला कळत नव्हतं. स्वतःच्या आईबाबांशी कसं बोलावं हेही तिला उमगत नव्हतं.पंकज माधवीची घालमेल बघत होता पण मुद्दामच काही विचारत नव्हता. त्याच्या बाबांनी त्याला सांगीतलं होतं की हा निर्णय माधवीलाच घेऊ दे. तिच्या मनाची पूर्ण तयारी होईपर्यंत तू हा विषय तिच्यासमोर काढू नकोस. खूप नाजूक विषय आहे आणि यावर निर्णय घेणं कठीण आहे तो तिला ...Read More

5

निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग ४

निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग ४मागच्या भागात आपण बघीतलं की पंकज माधवीला दत्तक मुलीबद्दल सांगतो.आता पंकजचे बाबा माधवीला काय सांगतात आणि माधवी पंकजच्या आईबाबांकडे गेले. पंकजचे आईबाबा आणि मोठा भाऊ प्रसाद, अंजली त्याची बायको आणि दोन मुलं नेहा आणि रिया असे सगळे एकत्र रहात. पंकजचं लग्न झाल्यावर आहे ते घर सगळ्यांसाठी अपुरे पडू लागल्याने पंकजच्या बाबांनीच पंकजला वेगळं रहावं असं सुचवलं.माधवीला खरतरं इथं राह्यला आवडायचं पण अंजली वहिनींनी माधवीला समजावून सांगितले.वहिनी म्हणाली," माधवी तात्पुरते तुम्ही दुसरीकडे भाड्याने रहा. हे घर लहान पडतं. तुमचं नवीनच लग्न झालंय तेव्हा जरा मोकळे रहा. माझं लग्न झाल्यावर हे घर पुरायचं आता रिया आणि नेहा ...Read More

6

निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग ६

निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग ६मागील भागात आपण बघीतलं की माधवीला राहूलच्या भावाकडे जायची इच्छा असते.त्याप्रमाणे आज पंकज तिला घेऊन आहे.आज संध्याकाळी पंकज माधवीला राहूलच्या भावाकडे घेऊन जाणार असल्याने माधवी खूप उत्साहात होती. संध्याकाळ कधी होते याची ती वाट बघत होती.' सकाळपासून घड्याळाचा काटा लवकर पुढे सरकतच नाही.एरवी वेळ कसा पुढे सरकतो कळत नाही. गॅसवर दूध तापत ठेऊन बाजुच्या खोलीत काही करायला गेले की तेवढ्या पाच मिनिटांत दूध गॅसवर हमखास ऊतू जाणार. थोड्यावेळापूर्वी स्वच्छ केलेली गॅसची शेगडी पुन्हा दुधाने माखल्यावर धुवावीत लागते.तेव्हा कसा हा वेळ भरभर सरकतो! आज जागीच थांबला आहे असं वाटतं आहे.'घड्याळाकडे बघत माधवी स्वतःशीच पुटपुटली.त्या लहान बाळाला ...Read More

7

निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग ७

निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग ७मागील भागात आपण बघीतलं की पंकज माधवीला राजेश कडे घेऊन जातो.राजेश त्याला बाळ दत्तक घेण्याच्या बद्दल काय सांगतो ते या भागात बघू" राजेश आम्ही पण बाळ दत्तक घ्यायचं ठरवलं आहे. मला त्याची सगळी प्रोसीजर सांग."" पंकज पूर्वी बाळ दत्तक देणा-या ज्या संस्था होत्या त्या संस्थेतून बाळ दत्तक घेता येत असे पण आता तसं नाही होत."" म्हणजे ?" पंकज ने विचारलं." आता 'कारा' ची साईट आहे त्यावर आपण आपलं नाव रजीस्टर करावं लागतं."" हे कारा काय आहे?""कारा यांचा फूल फाॅर्म आहे सेंट्रल ॲडाॅप्शन रिसोर्स ॲथाॅरिटी "" इथे रजिस्टर केल्या नंतर काय करावं लागतं?""कारा वर रजीस्टर केल्यावर ...Read More

8

निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग ८

निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग ८मागील भागात आपण बघीतलं की पंकजने राजेश कडून दत्तक प्रक्रियेसाठी कराव्या लागणाऱ्या गोष्टी समजून घेतल्या.आता काय होईल ते बघूराजेश ने सांगितल्याप्रमाणे पंकजने काराच्या साईटवर जाऊन नाव रजीस्टर केलं आणि त्यांच्या गावात असलेल्या दोन दत्तक केंद्रापैकी ' माऊली' या केंद्राचं नाव निवडलं.दोन दिवसांनी माऊली या दत्तक केंद्रामधून पंकजला फोन आला" हॅलो"" पंकज बोलताय?"" हो."" तुम्ही बाळ दत्तक हवंय यासाठी काराच्या साईटवर नाव रजीस्टर केलंय?"" हो मॅडम. दोन दिवसांपूर्वी केलंय."" तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये येऊन सगळी कागदपत्रं जमा करा."" काय लागेल?"" हा तुमचा व्हाॅट्स ॲप चा नंबर आहे का?"" हो." पंकज म्हणाला." ठीक आहे. मी या नंबरवर कोणती ...Read More

9

निळ्या आकाशाचं स्वप्नं - अंतिम भाग

निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग ९ ( अंतिम भाग)मागील भागात आपण बघीतलं की पंकजने काराच्या साईटवर आपलं नाव रजीस्टर केलंय. काय घडलं बघू.काराच्या साईटवर नाव रजीस्टर करून आता जवळपास दीड वर्ष झालं होतं. पंकज आणि माधवीचा रोजचा दिवस हा काराकडून येणाऱ्या फोनची वाट बघण्यात जायचा. माधवी आता पूर्वीसारखी निराश होत नसे कारण तिला कळलं होतं की आज नाही तर ऊद्या आपल्या घरी बाळ येईल.पंकजला ही आता माधवीची पूर्वी सारखी काळजी वाटत नसे. पूर्वी पंकज घरी आला की माधवी खूप वेगळ्या मूडमध्ये दिसत असे त्यामुळे ऑफीसमध्येही पंकजच्या मनात माधवीचाच विचार चालू असे.***पंकज आणि माधवीची प्रतिक्षा एके दिवशी संपली त्यांना 'सुखदा ' ...Read More