सूत्रधार

(4)
  • 24.5k
  • 0
  • 13.3k

"बाबा...! बाबा...अहो उठा ना...बघा किती वाजलेत? आज तुम्ही मला बागेत जायचं म्हणून प्रॉमिस केलेलं ना..? मग उठा ना." लहानशी चिऊ तिच्या झोपलेल्या बाबांना उठवत होती."चिऊ, उठ बरं तिथून बाबांना त्रास नको देऊ, ते काल रात्री उशिरा दमून आलेत झोपू दे त्यांना. चल बरं पटकन,मी तुला अंघोळ घालते."वैदही आपले केस पुसत म्हणाली."नाही... मी नाही येणार, अगं मला बाबांनी काल प्रॉमिस केलंय..." "काय चाललंय सकाळी सकाळी तुम्हा दोघींचं?"वैदही काही बोलणार इतक्यात शिव डोळे चोळत उठून बसला."Good Morning बाबा..." चिऊ पटकन शिव च्या मिठीत शिरली."Good Morning पिल्लू.." शिव तिला कुशीत घेत बोलला."बघा ना बाबा तुमची बायको मला कशी बोलतिये सकाळी सकाळी."

1

सूत्रधार - भाग १

"बाबा...! बाबा...अहो उठा ना...बघा किती वाजलेत? आज तुम्ही मला बागेत जायचं म्हणून प्रॉमिस केलेलं ना..? मग उठा ना." लहानशी तिच्या झोपलेल्या बाबांना उठवत होती."चिऊ, उठ बरं तिथून बाबांना त्रास नको देऊ, ते काल रात्री उशिरा दमून आलेत झोपू दे त्यांना. चल बरं पटकन,मी तुला अंघोळ घालते."वैदही आपले केस पुसत म्हणाली."नाही... मी नाही येणार, अगं मला बाबांनी काल प्रॉमिस केलंय..." "काय चाललंय सकाळी सकाळी तुम्हा दोघींचं?"वैदही काही बोलणार इतक्यात शिव डोळे चोळत उठून बसला."Good Morning बाबा..." चिऊ पटकन शिव च्या मिठीत शिरली."Good Morning पिल्लू.." शिव तिला कुशीत घेत बोलला."बघा ना बाबा तुमची बायको मला कशी बोलतिये सकाळी सकाळी." चिऊ शिव ...Read More

2

सूत्रधार - भाग २

टेबलवर दोन्ही बाजूला असलेल्या फाईल्स च्या ढिगांमध्ये इन्स्पेक्टर सरनाईक त्रासिक चेहऱ्याने समोरची फाईल चाळत होते,मध्येच घड्याळाकडे कटाक्ष टाकत होते. चेहऱ्यावरचा वैताग सहज दिसून येत होता.टेबलवर बाजूलाच अर्धा झालेला ग्लास होता आणि बऱ्याच पेपर्स ची दाटीवाटीही झाली होती.इतक्यात त्यांना कोणाच्या तरी येण्याची चाहूल लागली."या मिस्टर पटवर्धन तुमचीच वाट बघत होतो मी, या बसा."समोरची फाईल मिटवत शिव आणि अनिशला त्यांनी बसायला सांगितलं."Sir is there any serious case? नाही म्हणजे इतक्या तातडीने बोलावलंत आणि तुम्हीही इतक्या टेन्शन मध्ये दिसताय म्हणून म्हटलं." शिवने खुर्चीवर बसत थेट मुद्द्याला हात घातला."हो खूपच serious केस आहे, वेळ कमी आहे,पुरावे तर त्याहूनही कमी आहेत आणि वरून वरिष्ठांचं ...Read More

3

सूत्रधार - भाग ३

"नाही फार कही सीरियस नाहीये,फक्त थोडा मूका मार लागलाय आणि थोडं खरचटलंय त्यांना..." डॉक्टरांचा आवाज त्याच्या कानावर पडत होता.शिव हळूवार डोळे उघडले.पहिल्याच क्षणी ठणकणारं शरीर आणि मऊ हाताचा स्पर्श त्याला जाणवला."अहो..."वैदही त्याचा हात अजूनच घट्ट पकडत म्हणाली.तिच्या लाल झालेल्या डोळ्यातून गालावरून ओघळणारे तिचे अश्रू नजाणो किती वेळापासून बेडवर पडत होते.शिव मात्र अजून भानावर आलाच न्हवता पुन्हा तेच दृश्य त्याच्या डोळ्यांसमोर तरळलं , बाईकखाली निपचित पडलेला रक्ताने माखलेला अनिश....एखादा विजेचा झटका बसावा त्या प्रमाणे शिव भानावर आला."अनिश...अनिश कुठे आहे...? कसा आहे तो..? मला त्याला भेटायचंय..."शिव ताडकन उठत बोलला,इतक्यात त्याच्या पाठीतून एक जोरदार सनक गेली."आईगं..." तो कळवळला."अहो..,झोपा बरं आधी."वैदही शिवला आधार ...Read More

4

सूत्रधार - भाग ४

"आमदार धनंजय देसाई यांची त्यांच्याच फार्म हाऊस मध्ये झालेली हत्या, त्यानंतर राज्याचे पर्यावरण व विकास मंत्री विलासराव सावंत यांच्यावर प्रचार सभेत झालेला जीवघेणा हल्ला, आणि या हल्ल्यानंतरच्या अवघ्या काहीच तासांमध्ये ' जनशक्ति पक्षकार ' आप्पासाहेब गडकरी यांच्या नाट्यमय हत्येने राज्य हादरून गेलंय,आणि विशेष म्हणजे हल्लेखोराने आज आप्पासाहेब गडकरींच्या हत्येअगोदर याची पूर्वकल्पना पोलिसांना दिली असल्याची खळबळजनक माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समजतीये ,त्यामुळें ' जनता खरंच पोलिसांच्या जीवावर सुरक्षित आहे का? ' असा प्रश्न जनसामान्यांकडून विचारला जातोय..." टीव्ही वर सुरू असलेल्या बातम्या शिव भावनाशून्य नजरेने पाहत होता."अहो! अजून किती वेळ असं स्वतःला दोष देत बसणार आहात?" वैदही शिव च्या शेजारी बसत म्हणाली ...Read More