प्रेम देशमुख. कोल्हापूरजवळील एका खेडेगावात एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा, घरची परिस्थिती तशी चांगली होती. वडील सरकारी खात्यामध्ये नोकरी करत होते. घरी आई, वडील, मोठी बहीण आणि एक लहान भाऊ असा परिवार होता. पण त्याचे वडील दारूचे व्यसनाधीन असल्यामुळे जो काही पगार मिळायचा तो असाच खर्च करून टाकत असत. त्यामुळे घरची परिस्थिती बिकट होत चालली होती. त्याचे चुलते वगैरे कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते. म्हणुन प्रेमच्या आईने माहेरी जाऊन रहायचा निर्णय घेतला. तेव्हापासून प्रेम आणि त्याचा परिवार त्याच्या मामाच्या गावीच एका भाड्याच्या घरी राहु लागले होते. त्याचे वडील घरी कधी त्रास द्यायला लागले तर त्याचा मोठा मामा मदतीला यायचा. मामांचे घर तसे जवळच होते. त्यामुळे त्यांचे येणे जाणे असायचे. म्हणुन प्रेम चे वडील त्यांना घाबरून घरी जास्त त्रास देत नव्हते. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्याच्या आईने नाईलाजास्तव त्याला पाचवीपासून बोर्डिंग स्कूल मधे टाकले. कारण मोठी बहीण पण शिकत होती. लहान भाऊ शाळेत जायला लागला होता. तिघांच्या शिक्षणाचा खर्च वाढत होता. प्रेमचे वडील घरी काहीच पैसे देत नसल्यामुळे सर्व खर्च त्याची आई शिलाई मशीन चालवून कसातरी भागवत होती.
अनुबंध बंधनाचे.. - भाग 1
अनुबंध बंधनाचे..... ( भाग १ ) प्रेम देशमुख. कोल्हापूरजवळील एका खेडेगावात एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा, घरची परिस्थिती तशी चांगली वडील सरकारी खात्यामध्ये नोकरी करत होते. घरी आई, वडील, मोठी बहीण आणि एक लहान भाऊ असा परिवार होता. पण त्याचे वडील दारूचे व्यसनाधीन असल्यामुळे जो काही पगार मिळायचा तो असाच खर्च करून टाकत असत. त्यामुळे घरची परिस्थिती बिकट होत चालली होती. त्याचे चुलते वगैरे कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते. म्हणुन प्रेमच्या आईने माहेरी जाऊन रहायचा निर्णय घेतला. तेव्हापासून प्रेम आणि त्याचा परिवार त्याच्या मामाच्या गावीच एका भाड्याच्या घरी राहु लागले होते. त्याचे वडील घरी कधी त्रास द्यायला लागले तर त्याचा ...Read More