सख्या रे

(18)
  • 41.9k
  • 0
  • 25.4k

ट्रिंगचा ट्रिंगचा आवाजाने दिवसाची सुरुवात झाली. घडयाळीचा त्या कर्कश आवाजमुळे सुमितची झोप उडाली आणि तो उठला. सुमित म्हणाला, “ काय रे तुझी रोजचीच कट कट रोज चंगली झोप लागलेली असते तेव्हाच तू अशी ओरडून उठवतेस.” असे म्हणत सुमित बाथरूम मध्ये जातो आणि छान ब्रश आणि आंघोळ करून बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर लगबगीने तो ऑफिस मध्ये जाण्यासाठी तयार होतो. पोटाला आता सकाळचा नाश्ता हवा असतो त्यासाठी तो फ्रीज मध्ये काहीतरी शोधतो. त्याला काही सापडत नाही तर तर अनायास त्याचा तोंडून निघते, “ मिताली, अग काही बनवून देना फार भूख लागली आहे.” मग थोड्या वेळात तो स्वतःवर एकदम हसतो आणि म्हणतो, “ बेटा सुमित मिताली इथे कुठे असणार ती तर ....” म्हणता म्हणता त्याचे डोळे पाणावले. मग त्याने स्वतःच स्वतःला सावरले आणि पुन्हा म्हणाला, “ चला सुमित राव आपली पुढची मंजिल आहे, कॅन्टीन.” असे म्हणून तो लगबगीने घराचा बाहेर पडला.

Full Novel

1

सख्या रे - भाग 1

भाग – १ ट्रिंगचा ट्रिंगचा आवाजाने दिवसाची सुरुवात झाली. घडयाळीचा त्या कर्कश आवाजमुळे सुमितची झोप उडाली आणि तो उठला. म्हणाला, “ काय रे तुझी रोजचीच कट कट रोज चंगली झोप लागलेली असते तेव्हाच तू अशी ओरडून उठवतेस.” असे म्हणत सुमित बाथरूम मध्ये जातो आणि छान ब्रश आणि आंघोळ करून बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर लगबगीने तो ऑफिस मध्ये जाण्यासाठी तयार होतो. पोटाला आता सकाळचा नाश्ता हवा असतो त्यासाठी तो फ्रीज मध्ये काहीतरी शोधतो. त्याला काही सापडत नाही तर तर अनायास त्याचा तोंडून निघते, “ मिताली, अग काही बनव ...Read More

2

सख्या रे - भाग 2

भाग – २ आता या लवबर्डसाठी आणखी दुरावा वाढणार होता, कारण कि आधी दिवसभर कॉलेज मध्ये दोघांची भेट नाही म्हणून ते घरी आल्यावर जास्तीत जास्ती वेळ एकमेकासोबत घालवायचे परंतु आता ते हि शक्य नव्हते म्हणून दोघेही बेचैन होते. एके दिवशी दोघांनी एका ठिकाणी भेटण्याचा बेत आखला आणि ते भेटण्यास आले. तेथे त्यांनी ठरवले कि आपण कायम एक व्हायचे म्हणजे आपण लग्न करायचे. दिघांचे शिक्षण जवळ जवळ पूर्ण झालेच होते म्हणून त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला होता. त्यांनी हे सुद्धा ठरवले होते कि आपण पळून जाऊन लग्न नाही करायचे. सत्य परिस्थिती आणि आमची इच्छा हे सगळ दोघांचा घरच्या मंडळींना सांगून ...Read More

3

सख्या रे - भाग 3

भाग – ३दोघेही घरातून बाहेर पडले आणि बाहेर येऊन आपसात बोलू लागले. तेव्हा मिताली बोलते, “ सुमित मला काही वाटत नाही आहे. तू तुझ्या आई बाबांपासून वेगळा राहशील. अरे त्यांना तुझी फार आवश्यकता आहे.” तेव्हा सुमित हि म्हणतो, “ हो ग माझे मन हि तेच बोलते आहे. मला तर वाटते आपल्याला काहीतरी मार्ग काढावे लागेल अथवा...” मग मिताली बोलली, “ का बर थांबलास तू काय करणार आहेस.” तेव्हा सुमित म्हणाला, “ मिताली मला एक गोष्ट सांग, तू माझ्यावाचून दूर राहू शकते काय?” मिताली म्हणाली, “ काय म्हणतोस तू आणि काय करायचा विचार आहे तुझा.” तेव्हा सुमित म्हणतो, “ मला ...Read More

4

सख्या रे - भाग 4

भाग – ४ मिताली हि आता थोडी तापली होती आणि ती तिचा आईची बाजू बोलू लागली होती. तेव्हा तिची बोलली, “ म्हणून म्हणत होते मी तुला आपल्या पेक्षा खालचा थराचा लोकांशी संबंध वाढवू नकोस. मेली या थर्ड क्लास लोकांचा मध्ये माझी मुलगी फसली.” सुमितचा आई बाबांना थर्ड क्लास म्हटल्यामुळे सुमित हि आता भयंकर तापला होता आणि तो म्हणाला, “ हो माहित आहे तुम्ही कोणत्या क्लासचा आहात म्हणून सांगू नका आम्हाला.” सुमितचे असे बोलने आणि मग मितालीची आई बोलली, “ चल मिताली आपल्या घरी अशा थर्ड क्लास लोकांचा मध्ये आता एक क्षण हि रहायचे नाही.” मिताली हि रागाचा भारात तिचा ...Read More

5

सख्या रे - भाग 5

भाग – ५संध्याकाळ होणार होती आणि सगळ्यांना ऑफिसची सुट्टी झाली होती. मितालीचा परिपूर्ण लक्षात होते कि तिला ऑफिस नंतर जायचे आहे, कारण सुमित तिची बागेत वाट पाहणार आहे म्हणून. तर मिताली तिचा सीटवरून उठली आणि तिने थेट सुमितचा केबिनकडे नजर वळवली. तर तिला तेथे काहीच हलचल दिसली नाही. घरी जाण्याची वेळ झाली म्हणून ती ऑफिसचा बाहेर निघतांना मुद्दामून सुमितचा कॅबीन जवळून आली. काय बघते तर सुमित आधीच निघून गेलेला होता. मिताली हि आता लगबगीने ऑफिसचा बाहेर निघाली. तिचा बरोबरचा मित्र मैत्रिणी तिला बस स्टँड जवळ चालण्यास म्हणू लागले. तर मितालीने त्यांना मला काही काम आहे जवळच म्हणून दांडी मारली. ...Read More

6

सख्या रे - भाग 6 - अंतिम भाग

भाग – ६ मग थोड्या वेळाने मितालीने स्वतःला सावरले आणि ती आता सुमितकडे चेहरा करून बोलली, “ सख्या रे हे आजवर का नाही बोललास, हि गोष्ट आणि हे वाक्य बोलण्यास का बर इतका उशीर केलास. अरे तुझ्या कॉल न उचलणे हा माझ्या कडून घडलेला फार मोठा अक्षम्य असा गुन्हा होता रे . तू बोललास त्याचप्रमाणे माझ्या हि राग अनावर झाला होता आणि मी रागाचा भारात हे सगळ कृत्य केलं. मग काही दिवसांनी जेव्हा माझा अनावर झालेला राग शांत झाला त्यावेळेस मला हे कळून चुकले होते कि माझ्या हातून किती मोठी चूक घडली आहे. मला माझी चूक लक्षात आली होती ...Read More