संयोग आणी योगायोग

(12)
  • 35.8k
  • 1
  • 18.1k

(यात वापरलेली नावं काल्पनिक आहेत. याचा कुणाशी काहीही संबंध नाही. असल्यास केवळ एक योगायोग समझावा ) मित्रांनो, संयोग म्हटला तर अचानक घडणारी एक गोष्ट म्हणा कि बाब म्हणा आणि योगायोग म्हटल तर आवर्जून घडून आलेली गोष्ट किंवा बाब. या दोघांचा मध्ये अनपेक्षित सापडलेला मी आज एका उंबरठ्यावर म्हणा कि वळणावर उभा आहे. मला कळतच नाही आहे, कि मी यात अडकलो कसा. माझ्याविषयी सविस्तर सांगायचे तर तसा मी धीरज, मना भावाने आणि स्वभावाने मी एकदम शांत आणि कमी बोलणारा त्याचबरोबर फार लाजाळू अशा वृत्तीचा मनुष्य आहे. माझ्या सरळपणामुळे अनेक लोक माझ्या वाट्टेल तसा उपहास करतात. या लोकांनाच काय म्हणावे, माझ्या नशिबानेच

Full Novel

1

संयोग आणी योगायोग - 1

(यात वापरलेली नावं काल्पनिक आहेत. याचा कुणाशी काहीही संबंध नाही. असल्यास केवळ एक योगायोग समझावा ) मित्रांनो, संयोग म्हटला अचानक घडणारी एक गोष्ट म्हणा कि बाब म्हणा आणि योगायोग म्हटल तर आवर्जून घडून आलेली गोष्ट किंवा बाब. या दोघांचा मध्ये अनपेक्षित सापडलेला मी आज एका उंबरठ्यावर म्हणा कि वळणावर उभा आहे. मला कळतच नाही आहे, कि मी यात अडकलो कसा. माझ्याविषयी सविस्तर सांगायचे तर तसा मी धीरज, मना भावाने आणि स्वभावाने मी एकदम शांत आणि कमी बोलणारा त्याचबरोबर फार लाजाळू अशा वृत्तीचा मनुष्य आहे. माझ्या सरळपणामुळे अनेक लोक माझ्या वाट्टेल तसा उपहास करतात. या लोकांनाच काय म्हणावे, माझ्या नशिबानेच ...Read More

2

संयोग आणी योगायोग - 2

मी असाच आतुरतेने मला ज्या दिशेने जायचे होते त्या दिशेला बघत उभा होतो. नेमक्या त्याच वेळेस माझ्या विरुद्ध दिशेतून स्कुटी त्या बस स्टॉप जवळ काही अंतरावर अचानक येऊन थांबली. त्या स्कुटीला बघून माझा मनाला वाटलं कि या स्कुटी वरील व्यक्तीला लिफ्ट मागून बघू. तेच मी त्या स्कुटी वरील व्यक्तीचा चेहऱ्याकडे बघितले तर ती व्यक्ती हेल्मेट घालून होती त्यामुळे मला त्या व्यक्तीचा चेहरा काहीच दिसत नव्हता. तेव्हाच माझी नजर त्या व्यक्तीचा कापडाकडे गेली , तर ती व्यक्ती सलवार घालून होती. सलवार बघताच माझे मन जे काही काळापूर्वी आनंदित झाले होते ते एकाएक शांत आणि उदास झाले होते. कारण कि ती ...Read More

3

संयोग आणी योगायोग - 3

भाग-३ ती जेव्हा तिचा बाबांसोबत बोलत होती, तर त्यावेळेस तिचा आवाज ऐकून माझा मनाला फार वाईट वाटत होते. तिने सविस्तरपणे तिचा बाबांना सांगितले आणि काळजी करू नका मला उशीर होईल म्हणून त्यांना सांगितले. तिचे बोलने झाल्यावर तिने फोन कट केला आणि फोन माझ्याकडे देत मला मनातून ती "Thank You!" असे म्हणाली. मला "Thank You" बोलतांना तीचा चेहर्‍यावर आई बाबांशी बोलण्याचे समाधान तर होतेच आणि त्याचबरोबर आता घरी जायचे परंतु ते कसे हा प्रश्न सुद्धा होता. ती सगळी तिची चिंता सहजपणे मी तिचा चेहर्‍यावर बघितली. ती परत हताशपणे तिचा गाडीजवळ गेली आणि पुन्हा गाडीची किक मारून गाडीला सुरु करण्याचा प्रयत्न ...Read More

4

संयोग आणी योगायोग - 4

भाग-४ अशाप्रकारे संयोग यावर योगायोग हा वरचढ होऊ लागला होता. आम्ही दोघेही गप्पा मारत गांधी चौकात पोहोचलो. मी नंतर विचारले, “ आता कुठे आहे तुझे घर. ” त्या छोट्याशा प्रवासाने आम्हा दोघांना जवळ आणण्याचे अल्प से काम केले होते. म्हणून मी ती वरून थेट सीमा वर आणि तुम्ही वरून थेट तू वरती आलेलो होतो. सीमा सुद्धा माझ्याबरोबर फारच सहज आणि मोकळी होऊन गेलेली होती. तिने सांगितले, “ ते दिसतेय ते आहे आमचे घर.” त्यानंतर मी म्हटले, “ तर ठीक आहे , तू आता घरी जा मी निघतो.” परंतु मी विसरलो होतो, कि गाडी खेचताना मला जो त्रास झाला होता ...Read More

5

संयोग आणी योगायोग - 5 - अंतिम भाग

भाग-५ आता तर मला खरच तो संयोग नसून योगायोग आहे यावर विश्वास बसला. सीमाचे बोलने संपल्यावर मी सुद्धा बोललो, होय मला हि तुला भेटण्याची खूप इच्छा होत होती आणि त्यातल्या त्यात हा योगायोग घडला, कि नेमक हि पत्रिका देण्यासाठी तुझा घराजवळच यावे लागले,” असे म्हणून आम्ही दोघेही मनमोकळेपणाने खुलून हसु लागलो. परंतु हसता हसता सीमा काहीशी थांबली आणि लाजून म्हणाली, “इश्श ”. मला कळलेच नव्हते कि त्याक्षणी माझ्या मनातील भावना आणि योगायोगाने सीमाने देखील तिचा मनातील भावना अजाणपणे सत्य स्वरुपात बोलून दाखवल्या होत्या. काही वेळानंतर सीमाचा बाबांनी मला हाक दिली, “ अरे धीरज, बेटा तेथे दारातच काय बोलत उभा ...Read More