नव्या सोसायटीत मनासारखे घर मिळाल्याने आम्ही दोघेही खूश होतो.घरात आवश्यक असलेले फर्निचर करणे चालू होते.दोन महिन्यांत कामे उरकली आणि धुमधडाक्यात वास्तुशांती केली. इथे रहायला आल्यावर एक अनोखी उर्जा अंगात संचारल्यासारखे वाटत होते.आयुष्यात प्रथमच सगळ्या गोष्टी मनासारख्या घडत होत्या त्यामुळे आमचा आनंद द्विगुणीत होत होता आणि तो आनंद नाही म्हटलं तरी आम्हा दोघांच्या वागण्या बोलण्यात जाणवत होता.मधल्या काळात ज्यांची समोरासमोर भेट झाली नव्हती असे लोक भेटल्यावर त्यांच्याकडून आम्हाला एक वाक्य हमखास ऐकायला मिळत होते… “ तुम्हा दोघांना रिटायरमेंट आणि नवे घर चांगलेच मानवले आहे बर का! “ ते ऐकून छान वाटत होते; पण एक दिवस मात्र आमच्या या आंनदी आयुष्यात वादळ उठले… झाले असे की ,एक दिवस आमच्या खालच्या मजल्यावर बंद असलेल्या घरात कुणीतरी रहायला आले.आता तुम्ही म्हणाल यात विशेष काय? ज्याचे कुणाचे ते घर असेल तो रहायला आला असेल किंवा त्याने भाडेकरू ठेवला असेल! हो बरोबर..,मला आमच्या खाली कुणीतरी रहायला आले याचा आनंदच झाला.
Full Novel
उत्कर्ष… - भाग 1
उत्कर्ष…भाग १ नव्या सोसायटीत मनासारखे घर मिळाल्याने आम्ही दोघेही खूश होतो.घरात आवश्यक असलेले फर्निचर करणे चालू होते.दोन महिन्यांत कामे आणि धुमधडाक्यात वास्तुशांती केली. इथे रहायला आल्यावर एक अनोखी उर्जा अंगात संचारल्यासारखे वाटत होते.आयुष्यात प्रथमच सगळ्या गोष्टी मनासारख्या घडत होत्या त्यामुळे आमचा आनंद द्विगुणीत होत होता आणि तो आनंद नाही म्हटलं तरी आम्हा दोघांच्या वागण्या बोलण्यात जाणवत होता.मधल्या काळात ज्यांची समोरासमोर भेट झाली नव्हती असे लोक भेटल्यावर त्यांच्याकडून आम्हाला एक वाक्य हमखास ऐकायला मिळत होते…“ तुम्हा दोघांना रिटायरमेंट आणि नवे घर चांगलेच मानवले आहे बर का! “ते ऐकून छान वाटत होते; पण एक दिवस मात्र आमच्या या आंनदी आयुष्यात वादळ ...Read More
उत्कर्ष… - भाग 2
उत्कर्ष भाग २ काल माझ्याशी नशेत मग्रुरीने बोलणारा तो तरूण - उत्कर्ष आता माझ्या समोरच्या सोफ्यावर बसला होता..डोळ्यावर जाड चष्मा,अंगावर फिक्क्या पिवळट कलरचा चुरगळलेला ती शर्ट, मूळचा हिरवा कलरअसलेली पण आता विटलेली बर्मूडा, चेहऱ्यावर बावळटपणाची झाक असलेला उत्कर्ष माझ्यासमोर बसून पाणी पीत होता…“ उत्कर्ष तुम्हारा नाम टू बढीया है, फिर ऐसा बिगडा क्यू है भाई?” काल त्याने केलेला उध्दटपणा अजून माझ्याडोक्यातून गेलेला नव्हता..“ अंकल सॉरी बोला ना मै…कभी कभी बियर पिया तो होता है गलती! ““ वैसे आप क्या पढे है? क्या करते हो? ““मै इंजिनीअरिंग किया हैं..”उत्कर्ष इंजिनीयर होता, बायजूस कंपनीत काम करतोय म्हणाला…मी प्रश्न विचारत होतो आणि ...Read More
उत्कर्ष… - भाग 3
उत्कर्ष भाग 3 उत्कर्षने घातलेल्या गोंधळामुळे रात्री नीट झोप झाली नसल्याने दुसऱ्या दिवशी मी उशिराच उठलो. सकाळची आन्हीके उरकून वाचायला घेतले होते तेवढ्यात घराची बेल वाजली. समोर उत्कर्ष उभा होता!त्याच्या हातात मला मोठा चॉकलेटचा बॉक्स होता.मी थोडा नाखुशीनेच दरवाजा उघडला."सॉरी अंकल, कल भी आपको मेरी वजह से तकलीफ हो गया, वो क्या है ना, मेरा बर्थडे था ना." आत येऊन तो माझ्या पायाशी झुकला.खरं तर मला त्याचा प्रचंड राग आलेला होता, पण त्याचे ते केविलवाणे बोलणे ऐकून मी स्वतःवर नियंत्रण ठेवले. या दुहेरी व्यक्तिमत्व असलेल्या तरुणाशी नक्की कसे वागावे तेच कळत नव्हते! रात्री नशेत असताना तो कशाचीच पर्वा करत ...Read More
उत्कर्ष… - भाग 4
उत्कर्ष भाग 4 रात्री जरा लवकरच आम्ही झोपायला गेलो. आज तरी झोपेच खोबरं होऊ naye म्हणून प्रार्थना करून झोपी गाढ झोपेत असताना अचानक कसलाशा आवाजने झोप चाळवली गेली.डोळे चोळत उठून कानोसा घेतला... संपूर्ण बिल्डिंग दणाणून सोडणाऱ्या व्हॅल्यूममध्ये कुठल्या तरी पंजाबी गायकाच्या गाण्याचा आवाजाने मी जागा झालो होतो. उत्कर्षचा उपदव्याप चालू झालेला दिसत होता! आता स्वतःला फार त्रास करून घेण्याच्या फंदात न पडता मी उशाला ठेवलेले कापसाचे बोळे कानात सरकावले, तरीही असह्य आवाज येत होता. मी घड्याळात बघितले.. रात्रीचे दोन वाजले होते. त्या दणदणीत आवाजाने बहुतेक सगळी बिल्डिंग आता जागी झाली होती. बिल्डिंगमधील बरेच रहिवाशी हळू हळू वैतागत उत्कर्ष रहात ...Read More
उत्कर्ष… - भाग 5
उत्कर्ष भाग 5 दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मी गॅलरीतून उत्कर्षचा अंदाज घेत होतो ...मी पहिले की सकाळी उठून उत्कर्ष गॅलरीतला त्याने करून ठेवलेला पसारा आवरत होता... थोड्या वेळात कुणीतरी कामवाली मावशी त्याच्या मदतीला आली आणि उत्कर्ष तिच्याकडून हवी तशी घराची साफसफाई करून घ्यायला लागला. उत्कर्षने कामवालीला दिलेल्या सूचना मला माझ्या घरात ऐकू येत असल्याने मला घरात बसून खाली काय चालले आहे याचा अंदाज येत होता. उत्सुकता म्हणून सहज खालच्या मजल्यावर डोकावले तर उत्कर्षने दरवाजाच्या बाहेर ओळीत मांडून ठेवलेल्या पंधरा वीस बियरच्या बाटल्या आणि घरातला जमा केलेला खूप सारा कचरा दरवाजाच्या जवळ ठेवलेला दिसला.उत्कर्ष कामवालीला सांगत होता..." दोपहरके पहले ये ...Read More
उत्कर्ष… - भाग 6
उत्कर्ष भाग 6(अंतिम भाग) त्या नंतरच्या दिवशी सकाळी बराच वेळ खालच्या फ्लॅट मधून कसलाही आवाज नव्हता.. काल उत्कर्षची बहीण सगळे कसे शांत शांत वाटत होते...कसलाच आवाज नाही!अकराच्या दरम्यान मी काही कामानिमित्त खाली गेलो होतो.योगायोगाने रस्त्यात माझी आमच्या बिल्डिंग प्रतिनिधीशी गाठ पडली.मला पाहून त्यानेच मला हाक दिली." काय म्हणताय काका? "" काही नाही बघा, मग काय म्हणतोय मग तुमचा उत्कर्ष?"आमच्या बिल्डिंग मधला सध्याचा चर्चेचा विषय उत्कर्ष ने घातलेला गोंधळ हाच होता...मी तो विषय काढताच बिल्डिंग प्रतिनिधी खुलला.... मधल्या दोन तीन दिवसांत घडलेल्या परंतु मला माहीत नसलेल्या बऱ्याच गोष्टी मला आमच्या बिल्डिंग प्रतिनिधीने सांगितल्या. त्या दिवशी उत्कर्षची पोलीसात तक्रार झाली होती ...Read More