साथ तुझी माझी....कथा पुर्नजन्माची..

(8)
  • 29k
  • 1
  • 13.5k

निशी थोडी घाईमध्येच होती.. आधीच तिला उशीर झाला होता.. त्यामध्येच तिची आई तिच्यामागे नास्ता करून घे म्हणून मागे होती... पण निशीला ऑफिसला जायची घाई झाली होती.. एक तर आज महत्वाची मीटिंग.. त्यामध्ये त्या मीटिंगचे प्रेझेन्टेशन निशीच करणार होती.. यामुळे तिला एकच घाई लागली होती.. कशीबशी ती घरामधून बाहेर पडली.. समोर मिताची आई, जानवी उभी होती.. निशी मनामध्ये विचार करतच होती.. "आता काकी माझे चांगले पंधरा वीस मिनिटे तर निवांत घेणार.. इकडच्या तिकडच्या चार गोष्ठी सांगत बसणार.. आणि मी नेहमीसारखी मान हालवत हालवत त्यांना प्रतिसाद देणार.." असे विचार करतच होती की जानवी काकींनी निशीला हाक मारलीच... जानवी काकी- अरे...! निशी बेटा, उशीर झाला आज... उशिरा उठली का...?? रात्री झोपयालाच उशीर झाला असेल...हो न..?? निशी- ऐका न काकी... आज थोडा उशीरच झाला आहे...आपण संध्याकाळी भेटू.. निवांत बोलू.. (असे म्हणत निशीने जानवी काकींना मस्त असे स्मित हास्य दिले..)

1

साथ तुझी माझी....कथा पुर्नजन्माची.. - भाग 1

निशी थोडी घाईमध्येच होती.. आधीच तिला उशीर झाला होता.. त्यामध्येच तिची आई तिच्यामागे नास्ता करून घे म्हणून मागे होती... निशीला ऑफिसला जायची घाई झाली होती.. एक तर आज महत्वाची मीटिंग.. त्यामध्ये त्या मीटिंगचे प्रेझेन्टेशन निशीच करणार होती.. यामुळे तिला एकच घाई लागली होती.. कशीबशी ती घरामधून बाहेर पडली.. समोर मिताची आई, जानवी उभी होती.. निशी मनामध्ये विचार करतच होती.. "आता काकी माझे चांगले पंधरा वीस मिनिटे तर निवांत घेणार.. इकडच्या तिकडच्या चार गोष्ठी सांगत बसणार.. आणि मी नेहमीसारखी मान हालवत हालवत त्यांना प्रतिसाद देणार.." असे विचार करतच होती की जानवी काकींनी निशीला हाक मारलीच... जानवी काकी- अरे...! निशी बेटा, ...Read More

2

साथ तुझी माझी....कथा पुर्नजन्माची.. - भाग 2

निशीचा चेहरा उतरला.. ती स्वतःशीच पुटपुटली.. "इतके छान प्रेझेंटेशन देऊन ही याला काहीच नाहीये.. पण तिला आतून एक प्रश्न मी इतकी उशिरा येऊन ही रूद्र काहीच का बोलला नाही..? मला रूद्रचा इतका राग येतो असे मी सर्वांना दाखवते पण प्रत्यक्षात का मी रूद्रवर रागऊ शकत नाही..?? कितीही ठरवले तरी त्याला दुखावू शकत नाही..?? का माझ्या मनामधून त्याचा विचार जात नाही..? असे का वाटते रूद्र आणि माझे आधीपासूनच काही तरी नाते आहे..?? का..? का..?"निशी विचार करतच तिच्या डेस्कवर जाऊन बसली. तेव्हा तुक्स तिच्याजवळ येत म्हणाली, "वा... काय प्रेझेंटेशन दिली तू. सिरयस्ली इट वॉज ॲसोम. मी तर फक्त पाहतच राहिले तुझे ...Read More

3

साथ तुझी माझी....कथा पुर्नजन्माची.. - भाग 3

पण निशीचेही लक्ष रुद्रकडेच होते. पण ती सरळ सरळ तसे त्याला दाखवत नव्हती. त्याला पाहून आतून ती खुश झाली तिला एकदम फ्रेश फ्रेश वाटू लागले.अचानकच वारेची मंद झुळूक चेहऱ्यावरून गेल्यासारखी तिला भासू लागले. कुठेतर संगीत वाजू लागले आणि त्यावर तिचे पाय आपोआप थिरकत आहेत असा भास तिला होऊ लागला.पण तिला जसे जाणवले की ती कोणत्यातरी सुप्त स्वप्नामध्ये हरवली आहे तेव्हा तिने पुन्हा स्वतःला सावरले आणि कामावर लक्ष केंद्रित करू लागली. रुद्रने एकदा निशीकडे पाहिले पण ती तिचे काम करत आहे हे पाहून तो मनामधून चिडला आणि तिथून निघून गेला.रुद्रची कस्टमरसोबत मीटिंग होती म्हणून तो बाहेर जाणार होता. त्यामुळे तो ...Read More