(*कोर्ट- कचेरी :-रागावर नियंत्रण करण्याचे एक सुंदर उदाहरण --*) *एका वकीला ने सांगीतलेला हृदयस्पर्शी किस्सा "* - *नेहमीप्रमाणे बसलो होतो. एक पक्षकार आले. हातात कागदाची पिशवी. रापलेला चेहरा. वाढलेली दाढी. मळलेली कपडे. म्हणाले.., सगळ्याच जमीनीवर, इस्टटीवर स्टे लावायचा आहे. आणखी काय कागदं पाहीजेत? किती खर्च येईल?* *मी त्यांना बसायला सांगितलं.* *ते खुर्चीवर बसले. त्यांची सर्व कागदपत्रे तपासली. त्यांच्या कडून माहीती घेतली.* *अर्धा पाउण तास गेला.* *मी त्यांना सांगितलं. , मी अजून कागदपत्रे पाहतो. तुमच्या केसचा विचार करू या. तुंम्ही असं करा ४ दिवसांनी परत या.* *४ दिवसांनी ते पक्षकार पुन्हा आले. तसाच अवतार. भावा बद्दलचा राग अजूनही कमी झाला नव्हता. मी त्यांना बसायची खूण केली. ते बसले.*

1

बोधकथा - 1

बोधकथा:- भाऊबंदकी, भावावरला राग ( कोर्ट- कचेरी :-रागावर नियंत्रण करण्याचे एक सुंदर उदाहरण -- ) एका वकीला ने सांगीतलेला हृदयस्पर्शी किस्सा - नेहमीप्रमाणे बसलो होतो. एक पक्षकार आले. हातात कागदाची पिशवी. रापलेला चेहरा. वाढलेली दाढी. मळलेली कपडे. म्हणाले.., सगळ्याच जमीनीवर, इस्टटीवर स्टे लावायचा आहे. आणखी काय कागदं पाहीजेत? किती खर्च येईल? मी त्यांना बसायला सांगितलं. ते खुर्चीवर बसले. त्यांची सर्व कागदपत्रे तपासली. त्यांच्या कडून माहीती घेतली. अर्धा पाउण तास गेला. मी त्यांना सांगितलं. , मी अजून कागदपत्रे पाहतो. तुमच्या केसचा विचार करू या. तुंम्ही असं करा ४ दिवसांनी परत या. ४ दिवसांनी ते पक्षकार पुन्हा आले. तसाच अवतार. भावा बद्दलचा राग अजूनही कमी झाला नव्हता. मी ...Read More

2

बोधकथा - 2 - दंड न करणे

*सुंदर बोधकथा* २. मच्छिंद्रनाथ माळी छ. संभा- जी नगर. " दंड न करणे " _________________ एके दिवशी (संध्याकाळच्या सुमारास) नदीच्या तटावर. तीन्ही भावांसह फिरत असता, श्री रामाला बंधू भरतानं म्हटलं, "एक गोष्ट विचारु दादा.? माता कैकईनं तुला वनवास मिळावा यासाठी मंथरेसोबत जे कारस्थान रचलं, ते कारस्थान म्हणजे राजद्रोहच नव्हता का.? तिच्या या कारस्थानाने एकीकडे राज्याचा भावी राजा आणि त्याच्या पत्नीला १४ वर्षांचा वनवास भोगावा लागला. आणि दुसरीकडे महाराजा दशरथ यांचा पुत्रविरहाच्या केवळ कल्पनेनंच अपमृत्यू झाला. अशा कारस्थानासाठी (सामान्य नियमांनुसार) तर मृत्युदण्डच दिला जात असतो, तर मग तू , जी तुझीही आई आहे अशा कैकईला दंड का नाही दिलास.?" यावर ...Read More