मनापासून पानापर्यंत

(174)
  • 282.9k
  • 158
  • 78k

लिहायला मी लेखक नाही..पण हो मला लिहायला आवडतं.व्यक्त व्हायला आवडतं.जेव्हा आपण संभाषणातुन व्यक्त होतो, तेव्हा बर्याच शक्यता असतात. जसे की ऐकणारी व्यक्ती दुर्लक्ष करु शकते, बोलण्याला कंटाळु शकते किंवा ती व्यक्ती समजुन घ्यायला कमी पडु शकते.कधी आपण समजवण्यास कमी पडू शकतो.पण, पान आणि पेन यांच माञ उलट आहे. काहीही लिहा, कितीही लिहा. ते कंटाळत नाहीत, दुर्लक्ष करत नाहीत. ते ऐकुन घेतात आपण थकेपर्यंत.. उलट प्रतिप्रश्न न करता. 'अमर्यादपणे व्यक्त होण्याचं माध्यम म्हणजे लिखाण !' लिहील्या जाणाऱ्या प्रत्येक शब्दातील भावना ते हळुवारपणे जपतात.अगदी भावनीक ओळी लिहीताना ओघळले जाणारे अश्रु , कागद आणि शाई अलगद टिपुन घेतात. आणि वाळलेले डाग.. हळव्या आठवणी देतात. मनात येणारे असंख्य विचार..पडणारे प्रश्न, आजुबाजुला घडणाऱ्या घटनांनी मनाच्या पटलावर निर्माण होणारे विचारांचे विवर..संभ्रमाचा गोंधळ..जर तर च्या शक्यता, कल्पनेचा मोह यांनी लिहायला प्रवृत्त केलं. आणि लिहीता लिहीता एक एक पान वाढत गेलं. कधी लेखाच्या स्वरुपात , कधी ललित.. कधी लघुकथा तर कधी कुठल्या प्रकारात. या लिखाणाच्या प्रवासात एक विचार , एक ओळ, एक कविता , एक विषय , एक लेख , एक कथा..ते एक पुस्तक. मला हा एक प्रवास वाटतो. मला बदलणारा..स्वतःची स्वतःला ओळख करुन देणारा...' मनापासुन.. पानापर्यंत ' पोहोचलेल्या माझ्या विचारांचा..शब्दांचा..प्रवास !

Full Novel

1

जिवंत असताना सुख द्या

जिवंत असताना सुख द्या पितृपक्ष सुरु असल्यामुळे पिञ जेवु घालण्याचा विधी सर्वञ चालु होता. सुहासच्या घरी सुद्धा तोच कार्यक्रम होता. बरीच पाहुणे मंडळी आली होती. त्याच्या आजोबांना जावुन १ वर्ष झालं असेल. आजोबांच्या फोटो ला टवटवीत फुलांचे हार लखडत होते. सुंगधी अगरबत्ती , दिवा बाजुला तेवत होते. तेवढ्यात एक सुंदर सजवलेले पंचपक्वानाच ताट घेवुन सुहासची आई फोटोजवळ आली. फोटोला अन्न चढवु लागली. १० वर्षाच्या सुहास ला हे सर्व फार कुतुहलात्मक होतं. त्याने न राहुन विचारलं. सुहास - आई हे काय करतेस ? आई - बाळा , तुझ्या आजोबांच्या आवडीचे सर्व पदार्थ बनवलेत, त्यांना जेवु घालण्यासाठी . त्यामुळे त्यांच्या आत्म्याला तृप्ती ...Read More

2

ट्रँव्हलसचा जन्म

ट्रँव्हलसचा जन्म आगळ्या वेगळ्या ट्रँव्हलसची निर्मिती, कल्पना ने केली होती. आज त्याच ट्रँव्हलस एंजन्सीचा उद्घाटन समारंभ आहे. लोकांची भरपुर झाली आहे. स्ञी - पुरुष दोघेही तेवढ्याच संख्येने उपलब्ध आहेत. आगळ्या वेगळ्या ट्रँव्हलसची आगळी वेगळी न्युज छापण्यासाठी मिडीया देखील हजर आहे . बराचवेळच्या प्रतिक्षेनंतर कल्पना ने स्वतः रिबीन कापुन, स्वतःच्या स्वप्नांच दालन सर्वांसमोर खुल केल. सर्वांना उत्सुकता लागली होती या ट्रँव्हलसच्या जन्माची कहानी ऐकण्याची . जास्त वेळ न घेता मिडीयाने प्रश्न विचारायला सुरुवात केली. पञकार - मँडम, ही ट्रँव्हलस खास महिलांकरिता आहेच , पण यातील सर्व वर्कर सुद्धा लेडिजच आहेत . एक स्ञी ड्रायव्हर राञभर जागुण लातूर ते पुणे ट्रँव्हलस ...Read More

3

युगा ... एक परिवर्तन !

युगा ... एक परिवर्तन ! प्रणव पेपर वाचत बसला आहे. त्याची बायको शेफाली आणि १० वर्षाची मुलगी शिखा कम्प्युटर बसुनकाहीतरी करत आहेत.शिखा - पप्पा मी फेसबुकवर अकाऊंट काढु ?प्रणव - हो बेटा काढ पण फोटो टाकु नको..शिखा - का ?प्रणव - चांगल नसत शिखा - काँलेज ला असताना , एका मुलीने लग्नाला नकार दिला म्हणुन तिचे अश्लिल फोटो तुम्ही गुगलवर टाकले होते, ते चांगल होत का ?प्रणव - ......,..,..प्रणव दचकलाच. झटकन मान वळवुन त्याने तिच्याकडे बघितले. अचानक भयाण शांतता पसरली. डोक्यामध्ये वारंगोंगाव तसे विचार गोंगु लागले . कोणीतरी कानाखाली मारावी तसा चेहरा लालबुंद झाला. डोळे सैरभैर फिरायलालागले . तो ...Read More

4

माणुसकीच खरा धर्म ...

माणुसकीच खरा धर्म ... जुना पुणेरी वाडा. जानकीबाई देशपांडे शुद्ध ब्राम्हण . आजच्या या काळातही जानकीबाई नवारी काष्ठा , नथआणि कपाळी चंद्रकोर , अंबाडा , हातभर बांगड्या असाच पेहराव करत. त्यांना सर्व काही सोवळ्यात करायचीसवय होती. हल्ली त्यांची तब्येत खराब असल्यामुळे त्यांना काम करण्यासाठी मोलकरीन ची आवश्यकता भासतहोती. पण त्यांच्या प्रथा आणि नियमांना कंटाळुन कुठलीच मोलकरीन काम करण्यास तयार नव्हती. जानकीबाईओसरीवर वाती वळत बसल्या होत्या . तेवढयात त्यांचा शेजारी सदानंद आला.' काकू एक मोलकरीन मिळाली आहेपण ती मुसलमान आहे चालेल का ? 'जानकीबाई नकार दर्शवणार तेवढ्यात त्यांना घरातील सर्व पसारा आठवलाआणि स्वतः च दुखण आठवलं व त्यांनी ...Read More

5

भुंडी

भुंडी कोवळा सूर्य कोवळी किरणे फेकत होता. सूर्यकिरणांमुळे हिरवा सडा आपसुकच पिवळसर पडत होता. 12वर्षाचा सुऱ्या, चुलीवरील भगुन्यातील पाणी उपसत होता. सुऱ्याची आजी तुळशीला पाणी घालतहोती. सुऱ्याची आई चुलीच्या घरात पोतरा लावत होती. सुऱ्याने बकेट उचलुन न्हानी च्या बाजुला असलेल्यादगडाजवळ ठेवली. तो अंघोळ करु लागला.तेवढ्यात त्याची आई रागाने ओरडली, 'त्या भगुन्यात पाणी कोणवतायचं?' सुऱ्याअंगावर पाणी ओततच बोलला, 'आयव.... र्हायलं वत्तो..!' एवढ बोलुन सुऱ्यातोंडाला , अंगालाफसाफसा साबण लावू लागला. आज्जी तुळशीला फेर्या घालु लागली. फेर्या घालत घालत आज्जी सुऱ्या बघुन हसुलागली आणि स्वतःशीच पुटपुटली 'नुस्त माकडावानी साबण लावतया..' तेवढ्यात आई चुलीच्या घरातुन बाहेरअंगणात आली. सुऱ्याला दगडावर बसुन अंघोळ करताना बघुन ...Read More

6

ब्लु लव लेटर..

ब्लु लव लेटर.. लेक्चर्स सुरु झाले होते. सर्वजण क्लास रुम मध्ये असल्याने काँलेज मध्ये भयाण पसरली होती. तिला उशीर झाला होता. त्यामुळे ती घाई घाईत चालत होती. अचानक तिच्या समोर तो आला आणि ती थबकलीच . तो..तो होता, ज्याने मागच्या काही महिन्यांपासुन तिची झोप उडवली होती. ज्याने तिच्या हृदयावर कब्जा केला होता. ते एकाच क्लास मध्ये होते. पण आजपर्यंत ते एकमेकांना कधीच बोलले नव्हते. ते रोज एकमेकांकडे फक्त चोरुन चोरुन पहायचे. न बोलताही त्यांच्यात एक अनामिक , सुंदर , हळुवार नातं निर्माण झाल होत. तो आज अचानक तिच्या समोर येवुन थांबला होता. तिला ब्लु कलरआवडतो हे त्याने ...Read More

7

SPY BOYS...

SPY BOYS... हॉस्टेल ची एक रूम. खिडक्या अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे रूममध्ये कोंदट वातावरण आहे. धूळ, पसारा. एका कोपर्‍यात चप्पल आणि शूज चा अस्ताव्यस्त ढीग पडला आहे. कुठे जीन्स तर कुठे शर्ट लोळत आहे. डिओ च्या झाकण नसलेल्या 4-5 बॉटल , 1-2 जेल चे डब्बे टेबल वर आहेत. टेबल च्या खाली असह्य असा वास सोडत सॉक्स कुजत पडले आहेत. टेबल ला लागून एक मोठा आरसा आहे आणि आरशाच्या बाजूला अॅनजेलींना चे पोस्टर आहे. तर आरशात पाहताना , बरोबर आरशात दिसणारं मागच्या भिंतीवर कतरिना चे पोस्टर लटकले आहे. डाव्या बाजूला छोटा गॅस , आणि गॅसवर सांडलेली मॅगी वाळून ...Read More

8

पैंजण..

पैंजण.. ढग दाटून आले होते . हवेने गव्हाची पाती चांगलीच डुलत होती. ज्वारी, गहू, ऊसाच्या सळसळणारा आवाज. तो उनाड वारा कधी मातीच्या ढेकळांना तर कधी पटातील पाण्याला स्पर्श करून पळत होता. सार शेत कस हिरवगार दिसत होत. नंदू सोयाबीन च्या बणीम वर, दोन्ही हातांची उशी बनवून, त्यावर डोक ठेवून, एक पाय गुडघ्यात वाकवून त्यावर दूसरा पाय ठेवून.. मस्त दाटलेल्या ढगांकडे बघत झोपला होता. मधूनच इकडे तिकडे करणारा पाखरांचा थवा बघून नंदू च्या चेहर्‍यावर हलकस समाधान दिसे तेवढ्यात त्याच्या कानावर घंटी आणि चंगाळ्याचा आवाज पडला. आवाज ऐकताच नंदू खुश झाला. नंदू त्याच आवाजाच्या दिशेने पाहत राहिला. दूरवर बांधावरून ...Read More

9

पश्चात्ताप

पश्चात्ताप आकाशात ढग दाटुन आले होते. प्रकाश अंधारात विलीन होत होता. भयाण शांतता आणि एक रुकरूक लागली होती . अधुन मधुन भेडसावणारा वारा जोरात वाहत होता . आंबराई अंधारात गुडूप झाली होती. अधुन मधुन एखादं कुञ विव्हळत होत. दुर पाणंदीतून वाट काढत रवी एकटाच निघाला होता . शर्ट चे पहिले आणि शेवटचे बटण तुटलेले होते . त्यामुळे गोंगावणार्या वार्या मुळे त्याचा शर्ट एखाद्या फुग्याप्रमाणे फुगला होता . गरजेपेक्षा जास्त वाढलेले केस वार्यावर डुलत होते . ढगाआड लपलेला चंद्र मध्येच बाहेर डोकावत होता . अचानक कुठेतरी विज चमकत होती . एकदाचा रवि आंबराईत पोहोचला . एका आंब्याच्या बुडाला ...Read More

10

पत्र

पत्र.. सकाळी सकाळी आई चुलीवर भाकरी करत होती . गरम भाकरीवर तूप आणि मीठ लावून मला आवडत , म्हणून आई शेजारी बसून मी खात होते . तेवढ्यात एक आजी आमच्याकडे आल्या . ७०- ७५ वर्षाच्या आहेत . बऱ्याच थकलेल्या आहेत . काबाड कष्ट करून पाठीवर कुबड निघालं आहे . सुरुवातीपासूनच त्यांची परिस्थिती जेमतेम . दोन मुलं. घरी शेती नव्हती . दुसऱ्याच्या शेतात रोजान जाऊन घर भागवायचे . मुलांना शिकवण्याची दोघा नवरा बायकोला फार हौस होती . मुलांना शिकवण्यासाठी पैसे कमी पडू लागला म्हणून दोघांनी इतरांच्या शेतातील , रस्त्यावरील शेण गोळा करायचे , त्याच्या गौर्या लावून , त्यांचा ...Read More

11

टि. व्ही. सिरियल...

टि. व्ही. सिरियल... एका विदेशी मैञिणी सोबत चँटिंग सुरु होती. आमच्या गप्पांचे विषय नेहमी सामाजीक आजही तेच चालू होते. मी तिला सहज विचारले , तुमच्या काही चांगल्या टि.व्ही. सिरियलची नावे सुचव ना.. फार बोअर होत आहे. त्यावर तिने मला एक लिस्ट दिली. मी खुश झाले. त्यावर तिने मला विचारल, तुमच्या काही हिंदी सिरियलची नावे सुचव ना..! आणि मी बुचकळ्यातच पडले. कारण माझ्या डोळ्यासमोर अनेक सिरियल तरळू लागल्या , ज्यात मेकअपचा भडिमार , भावनांचा उद्रेक , नात्यांची अव्हेलना , सुडाच्या भावनेत जळणारे नायक , नायिका, आणि धाडधाड वाजणारं तबला म्युझीक ठासुन भरलेल आहे. आपल्याकडील ९९ मालिका प्रेमकथेवरच ...Read More

12

चुंगड

चुंगड आकाशाला भिडणारा उंचच उंच डोंगर , आणि हृदयाला घर करणारी खोल खोल दरी. आणि दोन विसंगतीच मिश्रण म्हणजे निसर्गाचं सौंदर्य. एका लयीत पसरलेले कमी अधिक डोंगर, त्यांनी पांघरलेली हिरवळीची शाल. थोड्या थोड्या अंतरावर वाहणारे लहानमोठे धबधबे. बेभान वाहणारा वारा. धुक्यात न्हाऊन निघालेली ही सृष्टी मोहकच. मध्येच कोवळ्या उन्हात दृष्टीस पडणार एखाद कौलारु. दुरवर दिसणार एकट कौलारु बघुन मनात अनेक प्रश्न येतात की हे लोक अस का राहत असतील? आवड म्हणुन , मजबुरी म्हणुन कि आणखी काही.. अशीच एक झोपडी डोंगरउतारावर वार्या पासुन वाचवण्यासाठी जमिनीलगत, जाणिवपुर्वक बनवलेली. आत एक जुनी बाज, एक छोटीशी माचोळी, एक चुल आणि ...Read More

13

घुसमट...

घुसमट ... मिनलसाठी स्थळ बघणे चालु होते. आठवड्यातुन दोन - तिन मुल पाहुन जात असतं. एक मुलगा पाहायला येणार होता , म्हणुन घरात लगबग सुरु होती. आई स्वयंपाक करत होती. तर वडिल हाँलमधील टेबल आवरत होते. मिनलचा मोठा भाऊ सामान आणण्यासाठी बाहेर गेला होता. छोट्या बहिणी मिनलपेक्षा सुंदर असल्यामुळे , त्यांना शेजार्यांकडे पाठवल होतं. वडिल टेबलवरील सामान व्यवस्थीत लावत होते , तेव्हा अचानक धक्का लागुन २-३ वह्या आणि एक डायरी खाली पडली. फँनच्या हवेने डायरीची पाने काहीवेळ फडफडली आणि एक पान स्थिर झालं. त्या स्थिर पानावर वडिलांची नजर पडली. ती डायरी मिनलच्या मधव्या बहिणीची होती. त्यात तिने ...Read More

14

कृष्णभक्त

कृष्णभक्त शितल पुण्यात जाँब करणारी लातुरची एक सामान्य मुलगी. सायंकाळचे ७ वाजले होते , ती आँफीस मध्येच होती. रविवारी ट्रेक्रिंग ला जाण्याचा प्लँन बनवत होती. तेवढयात घरचा फोन आला. ' बेटा उद्या एक स्थळ येणार आहे. तु ९ च्या गाडीने निघ...' वडील बोलले. अचानक रिझर्वेशन मिळण अशक्य होतं. त्यामुळे महामंडळाच्या बसने ती निघाली. बसला प्रंचंड गर्दी होती. पाय ठेवायलाही जागा नव्हती . राञभर तिला उभं राहुन जावे लागले. बसमध्ये अनेक विचार तिच्या मनात पिंगा घालत होते. आजपर्यंत प्रत्येक स्थळाकडुन नकारच येत होता. कारण , ती खुप जाड आणि सावळी होती. वयही वाढल होतं. 28 वर्षाची झाली होती ...Read More

15

कटुसत्य

हा माणुस १० वाजता आँफिसला जाण्यासाठी पायी निघाला होता. देवीचे दर्शन घेवुन निघताना त्याला अटँक आला आणि तो जाग्यावरच तो ही पालथा. कोसळताना त्याला कोणीही पाहील नाही .. हा मोठा गुढ प्रश्न आहे. देऊळात बरीच गर्दी असते. कुठल्याही भक्ताने त्याला पाहील नाही हे ही नवलच. चार पावलांवर फेमस वडापाव चा गाडा होता , त्या वडापाव वाल्याने किंवा खाणार्या लोकांनीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही. खुप रहदारीचा रस्ता आहे तो , तरीही कोणीही पाहण्याची तसदी घेतली नाही. सर्वांची समजुत अशी होती की , ' तो दारु पिऊन पडला आहे '. विशेष म्हणजे एक ते दोन मिनीटाच्या अंतरावर पोलिस चौकी आहे, कोणीतरी पोलिसांना फोन केला होता तरीही पोलिस एकदाही फिरकले नाहीत असे तेथील जमाव बोलत होता . ...Read More

16

लैंगिक आकर्षण आणि शिक्षण

लैंगिक आकर्षण आणि शिक्षण २ वर्षांपूर्वी मी चाकण मध्ये जाँब करत होते. त्यामुळे भोसरी गावातील नगर येथे मैञिणींसोबत रुम करुन राहत होते. आम्ही राहायचो ते घर आणि आजुबाजुची काही घर सोडली तर बाकी सर्व झोपडपट्टी वजा घर होती. एकदम छोटी छोटी . सिंगल रुम , डबल रुम वगैरे. आमच्या रुम च्या डाव्या बाजुला थोडे अंतर ठेवुन कंपाऊंड वाँल होती. त्यामुळे तो पुर्ण भाग एखाद्या बोळीप्रमाणे होता. त्या बोळी मध्ये आम्ही फक्त कपडे सुकवण्यासाठीच जात असु. शक्यतो तिकडे कोणी फिरकत नसे. एके दिवशी मी नेहमीप्रमाणे कपडे सुकवण्यासाठी गेले आणि जे पाहीलं.. ते पाहुन हातातील बकेट तर गळुन पडलीच ...Read More

17

ज्याच्या त्याच्या आयुष्याचे वादळ

ज्याच्या त्याच्या आयुष्याचे वादळ सिग्नल लागला आणि धावणारी वाहने पटापट करकचुन ब्रेक दाबु लागली. सर्व वाहने जागच्या जागी थांबली . पिएमटी , फोरव्हिलर आणि टेम्पो , च्या मधोमध थोडीशी जागा होती , त्यात विरेन ने त्याची बाईक अँडजस्ट केली. विरेन २५ वर्षाचा हँण्डसम मुलगा. त्याच्या मागे तन्वी शांत बसली होती. त्याने वळुन तिच्याकडे बघीतले. तिने बळच हलकीशी स्माईल दिली. मग त्याने बाईकचा मिरर अँडजस्ट केला. आणि त्यात दिसणाऱ्या तन्वीकडे पाहुन , त्याने फ्लाईंग किस केले. त्याचा वेडेपणा पाहुन तिला हसु आलं. पण लगेच रागाने तिने मिरर परत पुर्वीसारखा केला. त्याने लगेच तिचा हात ओढुन घेतला आणि तिच्या ...Read More

18

क्रांती

क्रांती खरतर मला या विषयावर लिहायचच नव्हतं. मी लिखाणाला सुरुवात केली तेव्हाच ठरवलेल काही विषय बुजुन टाळायचे. कारण आपल्याला स्वातंत्र्य मिळुन आज एवढी वर्ष झाली, पण आपले मुलभुत प्रश्न जागा सोडायला तयार नाहीत. शाळेतील निबंधाचे विषयही कित्येक वर्षापासुन तेच आहेत... स्ञीभ्रुणहत्या, हुंडाबळी आणि बरच काही... ते ही १०-१० मार्काला ! किती प्रगती केलीय आपण ! जग कुठे जात आहे आणि आपण..... असो सत्य ऐकण्यात कुणाला इंटरेस्ट नसतो. आपण मांडलेल्या सत्यावर परखड टिका ही होवु शकते. लिहीणार्याच्या अकलेचे कांदे वगैरे काढले जावु शकतात. आपल्याला नुसत मत मांडल्याने देशद्रोही वगैरे वगैरे लेबल ही लावले जावु शकतात सो... मुद्द्याकडे ...Read More

19

अज्ञात

अज्ञात अनेक लहान सहान गावातून येणारी मातीची निमुळती पायवाट, एखाद्या मेन डांबरी रोडला मिळत असते.अशाच पायवाटे वरुन चिखल तुडवत सागर , काँलेजला जाण्यासाठी बसची वाट बघत बसस्टाँप वर थांबला. गावाकडे बसस्टाँप म्हणजे एखादं पटकन लक्षात येणारं मोठ झाड ...Read More

20

स्ञी बदलाची गरज..

स्ञी बदलाची गरज.. स्ञी..नावातच सर्वकाही आहे. स्ञी एक शक्ती आहे. स्ञी एक प्रेरणा आहे. स्ञी घरपण आहे. स्ञी नात्यांची गुंफण आहे. म्हणटल तर स्ञी सर्वकाही आहे. अशी स्ञी पुर्वीच्या काळापासुन ते आजपर्यंत रहस्यमयच आहे. तिच्या अंतरमनाचा शोध कोणीच घेवु शकत नाही. स्ञी मध्ये आजवर अनेक बदल झालेत. पुर्वी नवारीत राहणारी स्ञी.. साडीत आली. साडीची आज जीन्सवर आली. लाजरी बुजरी आज चारचौघात बोलायला व्यक्त व्हायला शिकली. इतरांवर अवलंबून असणारी आता स्वतःच्या पायावर उभी राहु लागली. वरखर्च स्वतः करु लागली. नवर्याच्या मागेमागे फिरणारी स्ञी आज मुलांसाठी दुचाकी शिकु लागली आहे. गाडी आवरत नसतानाही दोन पायावर बँलन्स करत मुलांना ...Read More

21

शायर

शायर पन्नाशिचा एक शायर , अंगावर थोडी मळकटलेली कुर्ती , डाव्या खांद्यावर झोळी अडकवलेली , हातात एक जाडसर पुस्तक घेवुन , डुलत डुलत लायब्ररी च्या पायर्या चढु लागला. लायब्ररी मध्ये पिन ड्राँप सायलेंन्स. लायब्ररीयन , एक २० वर्षाचा पार्ट टाईम जाँब करणारा काँलेज तरुण , पुस्तकांची माहिती कम्प्युटर मध्ये फिट करत बसलेला. तेवढयात त्याची नजर शायर वर पडली. तसा चाकांच्या खुर्चीला गरकन फिरवत तो टेबलजवळ आला. आणि दोन्ही हात टेबलवर ठेवत हसत म्हणाला , लायब्ररीयन - शायर साब आये है.. मतलब जरुर कुछ नया सुनने को मिलेगा . तस शायरने बुक टेबलवर ठेवल आणि रागाने खाली वाकुन ...Read More

22

शेपुची भाजी

शेपुची भाजी भुकेने व्याकुळ ' केरबा ' जेवणाची वाट बघत बसला आहे. थोड अंतर सोडुन मुलगा ' गोट्या ' अभ्यास करत बसला आहे. तेवढ्यात केरबाची बायको ' द्रोपदी' उर्फ ' धुरपा ' , जेवणाच ताट वाढुन केरबाच्या समोर ठेवते. ताटातील शेपुची भाजी बघुन केरबा संतापतो. केरबा - धुरपे , शेपुची भाजी आवडत नाही हे माहित असुनही का वाढतेस गं ? धुरपा( थोड लाजुन) - अहो पण मला आवडते ना.. केरबा - तुला आवडते म्हणुन मी का खायची ? स्वतः चीच तारीफ करत , धुरपा - माझ्या हातची भाजी खावुन लोक बोटं चोखत बसतात..तुम्हाला ...Read More

23

अपवाद

अपवाद राञीचे ९ वाजले होते. नंदिनी ने बाळाला झोपवले. आणि बर्याच दिवसानंतर स्वतः आरशात निरखुन पाहु लागली . आज मुड काही वेगळाच होता. गालातल्या गालात हसत ती छान तयार झाली. जेवणाची ताट तयार केली. तेवढयात पुरुषोत्तम आला. दिवसभर काम करुन खुप थकला होता आणि भुकही लागली होती. दोघेही लगेच जेवायला बसले. नंदिनी , पुरुषोत्तम काहीतरी कमेंट देईल म्हणुन वाट पाहत होती पण , तो जेवण्यात मग्न होता. ती थोडीशी हिरमुसली. जेवण करुन उठताना पुरुषोत्तम तिच्याकडे बघुन बोलला. पुरु - छान दिसतेस.. तशी तिच्या गालावरची खळी खुलली. तिने वर पाहिलं तोवर पुरु बेडरूममध्ये निघुन गेला होता. काम ...Read More

24

मुलांना बाहेर ठेवताना..

मुलांना बाहेर ठेवताना.. सुमिञा ऊर्फ सुमी ७ वी ला शाळेतुन पहिली आली पण गावात पुढिल सोय नव्हती. म्हणुन सुमी आणि तिचा छोटा भाऊ संतोष या दोघांनां जिल्ह्याच्या ठिकाणी ठेवण्याचा निर्णय त्यांच्या आई वडिलांनी घेतला. काही ओळखीच्या माणसांच्या मदतीने ओळखीच्या ठिकाणी एक दहा बाय दहा ची रुम भाड्याने घेण्यात आली. शाळेपासुन रुम जवळच असल्याने जाण्या येण्याचे टेंशन नव्हते. डाव्या बाजुला दहा बाय दहा च्या , सुमिची रुम पकडुन , सलग तीन रुम होत्या. सर्वात पहिली रुम सुमिची. दुसर्या रुममध्ये घराची मालकीण , ज्यांना प्रेमाने सर्व माय म्हणत ,तिची होती. तिसरी रुम त्यांचा मुलगा आणि सुन यांची होती. या ...Read More

25

गाईड

गाईड प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी अस होतच की , अचानक कुणीतरी विचारत , तुझ स्वप्न आहे ? किंवा आयुष्याच ध्येय काय आहे ? आणि आपण एकदम गांगरुन जातो. कारण बर्याच वेळा आपल्यालाच माहीत नसत की काय करायच आहे ? किंवा स्वतः ला आवड कशात आहे ? कधी कधी आपण ह्या गोष्टीचा विचारही केलेला नसतो. सद्यस्थितीला आयुष्य इतक महाग झाल आहे की जगण्यासाठी काहीना काहीतरी काम करावच लागत. त्यामुळे प्रत्येकजण शिक्षण संपल्यावर कुठेतरी जाँब बिझनेस वगैरे करत असतो. सुरुवातीला काही दिवस खुप सुंदर वाटत. स्वतः कमावतो ही फिलींग खुप भारी वाटते. मग चालु होते डेली रुटीन. आता हेच ...Read More

26

एकटेपणा

एकटेपणा काय चाललय आयुष्यात ? काहीच मनासारख होत नाहीये ! कितीही ट्राय केल तरी इंटरव्यु नाही होत. हे शहर सोडायचय ते ही जमत नाहीए . पुन्हा परिक्षेत फेल . परत त्याच वर्गात. परत मुलाने रिजेक्ट केल . ३० वर्षाची झालेय अजुन लग्न होत नाहीए . परत बिझनेस लाँस . तो मला सोडुन गेला . ती मला सोडुन गेली. जमीनीची केस अजुन साँल्व्ह होत नाही. घराच लोन पास होत नाही.. इत्यादी ...इत्यादी ... असंख्य जणांचे असंख्य प्राँब्लेम . यातुन होत काय ? वाढत जाते भिती , स्ट्रेस , एकटेपणा.. सतत काहीतरी सुटतय याची जिवघेणी जाणीव . एकलकोंडे होत ...Read More

27

मलाला

मलाला शेक्सपियर ने म्हंटल आहे नावात काय आहे ? नावात काही असेल नसेल पण प्रत्येक एक अर्थ दडलेला असतो हे नक्की. जसे की साधना म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी करावी लागणारी तपश्चर्या , योग , मेहनत वगैरे. असाच प्रत्येक नावाचा काही ना काही अर्थ असतोच. नावांचे ही प्रकार असतात. जसे की स्त्रियांची अणि पुरुषांची नावे वेगळी असतात. पण त्यातही काही नाव कॉमन असतात. जसे की किरण, शितल , सुजल , नवीन ही अशी नावे आहेत जी स्त्री आणि पुरुष दोघांसाठी वापरली जातात. टोपणनाव हा ही प्रकार पहायला मिळतो . लाडाने सोनू , मोनू , छकुली, पपी, बंटी ,गोट्या ...Read More

28

मनापासून पानापर्यंत - शेवटची मिठी

शेवटची मिठीसायंकाळचे ४ वाजले आहेत. माधव माने दोन्ही हातात सामानाच्या पिशव्या घेऊन धापा टाकत सोसायटीच्या गेटच्या आत मध्ये पाय तोच त्यांची नजर समोर ढाराढूर झोपलेल्या वॉचमन कडे जाते. तसा त्यांच्यातील अधिकारी जागा होतो. आणि ते रागाने खेकसतात. ' यादव.. इथे झोपा काढायचा पगार मिळतो का रे तुला?' हे ऐकताच तोंडावर ठेवलेली टोपी डोक्यावर चढवत वॉचमन झोपेतून खडबडून जागा होतो आणि समोर थांबलेल्या माधव रावांना 'सलाम साब.. ' म्हणतो. 'कसला डोंबल्याचा सलाम. 'वो गलतीसे आँख लग गई थी..!' अरे गलतीसे इथे चोर चोरी करके निघून जाईल पण तुला कळणार नाही. आणि म्हणे वॉचमन !' वॉचमनला काय बोलावं कळत नाही. विषय ...Read More

29

A Virgin HIV positive

श्रेयस ने २१ ची कॅण्डल फुंकली आणि केक कापला. दोघांनी एकमेकांना केक भरवला.दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. थँक यू मच आई ! तू जगातली सगळ्यात बेस्ट आई आहेस. ' हो का ? ती मी आहेच पण असं समजू नकोस की अशी लाडी गोडी लावून तुला गिफ्ट वगैरे मिळणारय.' 'अरे यार आई.. असं नाही हा.. मला गिफ्ट पाहिजे म्हणजे पाहिजे.' ' नाही म्हणजे नाही.' 'आई प्लिज.. प्लिज.. दे ना.. ' इवलुसा चेहरा करून श्रेयस आईकडे बघू लागला. तशी आई म्हणाली, ' देवू म्हणतोस ? अम्म्म्म... ठिकय!हे घे.' म्हणत आई ने गाडी ची चावी श्रेयस समोर धरली. ते पाहून श्रेयस भयंकर ...Read More

30

आयुष्याचे पान

आयुष्याचं पान ! एखादी नवीन वही खरेदी केल्यावर आपण किती उत्सुक असतो नाही त्यावर लिहिण्यासाठी. नव्या वहीचा नवा वास ही आवडतो आपल्याला. त्या वहीचे कव्हर किती आकर्षक आहे किंवा नाही यावरून बरेच जण ती वही वापरायची कि नाही ठरवतात. आवडतं कव्हर आवडत्या विषयाला. नावडते कव्हर नावडत्या विषयाला. पण खरी गम्मत असते ती वहीच्या आत. वहीच्या पानांमध्ये. कारण वरून जरी प्रत्येक पान सारखं दिसत असलं तरी प्रत्येक पानं हे वेगळं असतं. एखाद्या पानावर रेषा स्पष्ट उमटलेल्या नसतात. काही पानं कोरीच सुटलेली असतात. काही पानावरील रेषा अर्धवट सरळ आणि अर्धवट नागमोड्या असतात . तर काही रेषांची सुरुवात जरी व्यवस्थित सरळ झाली असली ...Read More