तुझ्या विना -मराठी नाटक

(253)
  • 130.7k
  • 54
  • 57.1k

प्रसंग १: केतनचे घर.. पडदा उघडतो. स्टेजवर एक ४५ च्या आसपासची स्त्री स्वयंपाक घरातुन हॉल मध्ये येते, घड्याळाकडे बघते. चेहर्‍यावर निराशेचे भाव. तिच्यापाठोपाठ स्टेजवर एक २५-३० च्या आसपासची तरुणी येते. आई : छे बाई.. कित्ती हा उशीर? वेळ जाता जात नाहीये. कधी या

Full Novel

1

तुझ्या विना [मराठी नाटक] भाग-१

प्रसंग १: केतनचे घर.. पडदा उघडतो. स्टेजवर एक ४५ च्या आसपासची स्त्री स्वयंपाक घरातुन हॉल मध्ये येते, घड्याळाकडे बघते. निराशेचे भाव. तिच्यापाठोपाठ स्टेजवर एक २५-३० च्या आसपासची तरुणी येते. आई : छे बाई.. कित्ती हा उशीर? वेळ जाता जात नाहीये. कधी या ...Read More

2

तुझ्या विना [मराठी नाटक]- भाग-२

सखाराम : तुम्ही हादी बोल्ला हस्तानं तर येक चांगला कट्टा व्हता म्हायतीत..सुशांत आणि केतन : (एकदम) कट्टा…सखाराम : अवं बदाम.. बदाम..सुशांत आणि केतन : (पुन्हा एकदमच) बदाम?सखाराम : अवं कसलं तुमी शिकलेलं येव्हढं येक अमेरीकेला जाऊन आलं,. दुसरं जानार.. आन ह्ये शब्द तुमास्नी म्हाईत न्हायं? अवं बदाम म्हंजी येक चांगली पोरगी व्हं.. कमळा नाव त्यीचं..केतन : अस्स्.. अस्सं.. मग काय झालं तिचं…सखाराम : ठरलं न्हवं लगीन तिचं… केतन आणि सुशांत स्वतःच हासु दाबत, हातावर हात आपटत.. डॅम इट.. चांगली संधी गेली सख्या…न्हायतर कमळाशी जमलंच असतं बघ.. सखाराम : व्हय जी..पन तुम्ही म्हणत असाल तर पुष्पी ला घेऊन येऊ हिकडं..?केतन ...Read More

3

तुझ्या विना [मराठी नाटक] - भाग-३

बर्‍याचवेळ शांतता.. रंगमंचावरील दिवे पुर्ववत होतात. सुशांत : .तुमचं दिवा स्वप्न संपलं असेल तर.. जरा निट कळेल अश्या शब्दात का? केतन आपल्या स्वप्नातुन बाहेर येतो. थोडा सावरायला वेळ गेल्यावर. एक दीर्घ श्वास घेतो. केतन : सांगतो.. सगळं सांगतो.. पण कुठे पचकु नकोस.. (थोड्यावेळ शांतता आणि मग..) इथं येईपर्यंत माझा निर्णय अगदी ठाम होता. मला माहीते इथं तुझ लग्न.. सगळा मस्त माहोल बनलेला, त्यात इतक्या वर्षांनी आईला प्रत्यक्ष भेटणार म्हणजे माझ्या लग्नाचा विचार निघणारच. आणि म्हणुनच मी स्वतःशीच माझं म्हणणं मांडायला लागणारे मुद्दे पक्के करुन आलो होतो. लग्न करीन तर एखाद्या अमेरीकन मुलीशीच..तुला सांगतो दा.. इतक्या हॉट असतात ना तिथल्या ...Read More

4

तुझ्या विना [मराठी नाटक] - भाग-४

केतन टेबलावर ठेवलेला अनुचा मोठ्ठा कॅमेरा उचलतो… केतन : तुझा आहे?अनु : नाही.. तो पलीकडे चिनी बसलाय ना.. त्याचा (थोड्यावेळ थांबत व मग हसुन,) ऑफकोर्स माझा आहे..केतन : डी.एस.एल.आर. ना? वॉव निकॉन डी३ एस?? सॉल्लीड महाग आहे म्हणे.. कित्ती ४ लाख ना? आणि ही लेन्स.. ८०-८५ हजार…?अनु : व्वा.. बरीच माहीती आहे की तुला…केतन : हो.. माझ्या दोन-चार मित्रांना आहे शौक फोटोग्राफीचा… काय पैसा घालवतात वेड्यासारखा..अनु : वेड्यासारखा काय.. छंदाला मोल नसते रे.. आणि तु फोटो क्वॉलीटी पाहीलीस का? हे बघ फ्लेमींगो चे फोटो मागच्याच आठवड्यात काढले होते.. बघ कसले शार्प आलेत.. अनु कॅमेरातले फोटो केतनला दाखवते.. केतन : ...Read More

5

तुझ्या विना [मराठी नाटक] - भाग ५

मागुन ह्रुदयाचा धडधडण्याचा आवाज ऐकु येत रहातो. अनु आणि केतन एकमेकांकडे पहात रहातात जणु सर्व जग स्तब्ध झाले आहे.थोड्यावेळाने आतमध्ये निघुन जाते. ह्रुदयाच्या धडधडण्याचा आवाज जरा वेळ येत रहातो आणि मग बंद होतो. पांढरा-शुभ्र सलवार-कुर्ता घातलेला सुशांत केतन समोर येउन बसतो. सुशांत : “काय राजे झाली का झोप? जमतंय ना भारतात? का अमेरीकेच्या मऊ-मऊ गाद्यांची सवय झाली आहे?”केतन : (चेहऱावर उसनी हास्य आणुन) “अरे कसलं अमेरीका आणि कसलं भारतं..? आपलं घर म्हणल्यावर युगांडा असले तरी झोप छानच लागणार..”तु बोलं.. कसं झालं देवदर्शन? देव दर्शन केलंस ना? का नुसतंच आपलं देवी.. अं?… अं???सुशांत : खेचा.. खेचा आमची.. बोहल्यावर उभे राहीलो ...Read More

6

तुझ्या विना [मराठी नाटक] - भाग ६

केतन (स्वगत) : अख्या जगात, सुशांतला हीच आवडायला हवी होती का? दुसरी नव्हती का कोणी? साला कितीही प्रयत्न केला ही मनातुन जातच नाहीये. प्रत्येक वेळा तिल्या बघीतल्यावर माझी बैचैनी वाढतच जातेय. ‘तोंड दाबुन बुक्यांचा मार आहे हा’ इच्छा असुनही मी काहीच करु शकत नाही. हताशपणे तो आपल्या खोलीत आवरायला निघुन जायला उठतो इतक्यात त्याला बाहेरुन कुणाच्या तरी हसण्या खिदळण्याचा आवाज येतो. केतन पटकन एका ठिकाणी लपुन बसतो. बाहेरुन सुशांत आणि पार्वती येतात.स्टेजवरील शांतता बघुन.. सुशांत : अरेच्चा.. गेले कुठं सगळे..? शांतता आहे!! पार्वती आतमध्ये निघुन जायला लागते. सुशांत पुन्हा एकदा इकडे तिकडे बघतो आणि पार्वतीला जवळ ओढतो. पार्वती : ...Read More

7

तुझ्या विना [मराठी नाटक] - भाग ७

आई : अरे हे बघ.. ये तुला लावुन बघु कसे दिसते आहे. असं म्हणुन आई सुशांतला मुंडावळ्या बांधुन बघते. मात्र रागाने सुशांतकडे बघत रहातो. आई : हम्म.. आत्ता कसं लग्नाचा मुलगा वाटतो आहेस.. काय अनु? कसा दिसतोय सुशांत?अनु : (चेहर्‍याची एक बाजु तळहाताने झाकत).. ...Read More

8

तुझ्या विना [मराठी नाटक] - भाग ८

प्रसंग -६ स्थळ.. एखादं कॉफी शॉप अनु आणि केतन कॉफी पित बसलेले आहेत. अनु : केतन.. खरंच एकदा थॅन्क.. तु आलास म्हणुन.. नाही तर इतकी कामं होती.. एकट्याने फिरायला कंटाळा येतो.. आणि सुशांतला तर लग्न इतकी जवळ आलं आहे तरी कामातुन सवडच नाही. त्याचं ही बरोबर आहे म्हणा.. नेमका आजच व्हिसा इंटर्व्ह्यु आला त्याला तो काय करणार…??केतन : हे.. कम ऑन.. थॅक्स काय त्यात.. आणि त्या बदल्यात मी कॉफी घेतली ना तुझ्याकडुनअनु त्याच्याकडे बघुन हसते. केतन तिच्या हसण्याकडे पहातच रहातो. (मागुन हृदयाच्या धडधडण्याचा आवाज येत रहातो.) एखादं केतन-अनुवर गाणे जे केतनचा भास असते. गाण संपता संपता स्टेजवर अंधार ...Read More

9

तुझ्या विना [मराठी नाटक] - भाग ९

[ पडदा उघडतो…] प्रसंग – ७ स्थळ.. केतनचे घर.. स्टेजवर सुशांत आणि सखाराम बसले आहेत. केतन स्टेजवर येतो… केतन सुशांत दा.. हे बघ तुझ्यासाठी खास येताना आणले होते… सुशांत वळुन केतनकडे बघतो. केतन हातातली वस्तु पुढे करतो. सुशांत : ओह माय गॉड.. स्कॉच?? वंडरफुल.. थॅक्स यार.. सखाराम आज घरी कोणी नाहीये.. आपली ताई मावशी आहे ना, तिच्या नातवाचं बारसं आहे उद्या. सगळे आज तिकडे गेले आहेत.. एकदम उद्याच येतील. चल होऊन जाउ दे.. जा ग्लास घेऊन ये.. सखाराम उठुन जायला लागतो.. सुशांत : आणि हो.. येताना जरा कपाटातुन काही तरी शेव-चिवडा घेऊन ये…सखाराम : (सुशांतच्या हातातील बाटलीकडे बघत) आयची ...Read More

10

तुझ्या विना [मराठी नाटक] - भाग १०

सखाराम : (दारुच्या नशेत) हसा केतनदादा हसा.. पण एक लक्षात ठेवा.. तुमी ज्ये करताय ना.. त्ये बरोबर नाय बघा..केतन का रे बाबा? असं काय चुकीचं केलंय मी अं?सखाराम : अहो कोणाला चुx बनवताय या सखाराम ला……..आ कोणाला …….. शिकवताय आ ??केतन : अरे पण काय झालं ते तरी सांगशील का?सखाराम : तुमास्नी काय वाटतंय, चढलीय मला? अहो असल्या देसीच्या छप्पन्न बाटल्या मी रिकाम्या केल्यात.. ही विदेसी काय चिज हाय? सखारामला सगल कलतया.. कुनाचं काय चाललय.. तुम्चं अन अनुताईंच… केतन ताडकन उठतो आणि सखारामच्या कानाखाली वाजवतो… सखाराम : (गाल चोळत) अहो तुम्ही दुसरे काय करणार? ……… जातो म्या पण एक ...Read More

11

तुझ्या विना [मराठी नाटक] - भाग ११

प्रसंग – ९ स्थळ.. केतनचे घर.. केतन सोफ्यावर पुस्तक वाचत बसलेला आहे. खरं तर नुसतच पुस्तक हातात तेवढ्यात अनु येते. अनुला बघुन केतन उठुन उभा रहातो.(मागुन हृदयाच्या धडधडण्याचा आवाज येत रहातो.) अनु : आई…..sssssकेतन : अनु? आई घरी नाहीये… बाहेर गेली आहे..अनु : ओह.. कधी पर्यंत येतील? कालच्या त्या किचन रेसेपीज मधला एक पदार्थ बनवला होता मी.. केतन तिच्या हातातले भांड काढुन बाजुला ठेवतो, आणि तिचा हात हातात घेतो केतन : आई आणि तायडी बाहेर केळवणाला गेल्यात.. यायला खुप उशीर होइल…अनु : केतन प्लिज.. हात सोड.. मला जाऊ देत घरी…केतन : अजुन किती दिवस स्वतःला माझ्यापासुन दुर ठेवणार ...Read More

12

तुझ्या विना [मराठी नाटक] - भाग १२

प्रसंग -१० शेवटचा स्थळ.. घराची गच्ची… गच्चीवर खाण्या-पिण्यापासुन अगदी नाच-गाण्यापर्यंत जय्यत तयारी केली गेलेली आहे. केतन एका उभा आहे, तर सुशांत आणि अनु एकत्रीतपणे आलेल्या पाहुण्यांना भेटत आहेत.. अनु चेहऱ्यावर उसने हसु आणुन सगळ्यांशी बोलते आहे. पण तिचं लक्ष सतत मान खाली घालुन उभ्या असलेल्या केतनकडे जाते आहे.आजुबाजुच्या लोकांच अनुचं आणि सुशांतच कौतुक करणं चालु आहे. आवाज १: ए सुशांत दा, मेहंदी बघ ना काय छान रंगली आहे अनु वहीनीची.. येना बघायला.. कित्ती छान दिसते आहे अनु वहीनीच्या हातावर..आवाज २: सुशांतदा.. मेहंदीमध्ये तुझं नाव लिहीलं आहे बरं का.. बघ शोधुन सापडते आहे का.. असलं भारी लिहीलं आहे ना.. ...Read More