भेटली तू पुन्हा...

(82)
  • 217.5k
  • 20
  • 139.9k

थंडीचे दिवस होते अन तो सकाळी सकाळी सायकलिंग करत निघाला होता.... धुकं खूप होत, सकाळचे सात वाजून गेले होते पण अजून ही धुकं कमी झाले नव्हते....त्या धुक्यातूनच वाट काढत तो निघाला होता... थोड्या वेळाने पुढे जाऊन त्याने turn घेतला...अन कोणाच्या तरी धक्क्याने सायकल घेऊन तो खाली पडला... आता थोडं धुकं कमी होत होतं....उन्हाची पिवळसर कोवळी किरणे चोहिकडे पडत होती... आपण कसे पडलो म्हणून तो आजूबाजूला पाहू लागला....तर समोरच दुसऱ्या बाजूला एक मुलगी सायकल घेऊन पडलेली त्याला दिसली.... तो चिडला होता ... अन रागानेच तिच्याकडे जात होता...ती ही आता सायकल उभी करून स्वतःला सावरत होती...की त्याचा मागून आवाज आला... "Excuse me miss..."तो थोडा रागातच बोलत होता... कारण ती चुकीच्या side ने आली होती अस त्याला वाटत होतं... अन त्याच्याकडे पाठ करून उभी असणारी ती....मागे वळली...अन तिला पाहून हा थबकला... कारण ती मुलगी तीच होती जिला तो आठ महिन्यांपासून शोधत होता...

Full Novel

1

भेटली तू पुन्हा... - भाग 1

थंडीचे दिवस होते अन तो सकाळी सकाळी सायकलिंग करत निघाला होता.... धुकं खूप होत, सकाळचे सात वाजून गेले होते अजून ही धुकं कमी झाले नव्हते....त्या धुक्यातूनच वाट काढत तो निघाला होता... थोड्या वेळाने पुढे जाऊन त्याने turn घेतला...अन कोणाच्या तरी धक्क्याने सायकल घेऊन तो खाली पडला... आता थोडं धुकं कमी होत होतं....उन्हाची पिवळसर कोवळी किरणे चोहिकडे पडत होती... आपण कसे पडलो म्हणून तो आजूबाजूला पाहू लागला....तर समोरच दुसऱ्या बाजूला एक मुलगी सायकल घेऊन पडलेली त्याला दिसली.... तो चिडला होता ... अन रागानेच तिच्याकडे जात होता...ती ही आता सायकल उभी करून स्वतःला सावरत होती...की त्याचा मागून आवाज आला... "Excuse me ...Read More

2

भेटली तू पुन्हा... - भाग 2

गोव्यातील एका आलिशान बंगल्यामध्ये ... "कुठे गेली ती?, दहा महिने झाले, अजून तुम्हाला ती भेटली नाही?" एक व्यक्ती रागात बोलत होती. समोरून काही तर बोलाल गेलं. "ही तुम्ही कारण सांगणं बंद करा आधीssss, मी तुम्हाला काम करण्याचे पैसे देतो, ना की कारण सांगण्याचे." तो अजून ही रागात बोलत होता. "मला पुढच्या पंधरा दिवसांमध्ये ती माझ्या समोर पाहिजे, नाहीतर आय विल किल यु, गॉट इट." अन त्याने रागाने मोबाईल फरशीवर फेकला. तसा मोठा आवाज होऊन मोबाईलचे तुकडे झाले. लगेच एक नोकर येऊन फरशी साफ करू लागला. तो होता रु ...Read More

3

भेटली तू पुन्हा... - भाग 3

" मुलांनो हळूहळू उतरा. आणि एकमेकांचा हात धरून दोघे दोघे रांगेत उभे राहा" अन्वी व मस्के मॅडम मुलांना बस खाली उतरवत त्यांना इन्स्ट्रक्शन देत होत्या. म्हेत्रे व सावंत मॅडम पुढे मुलांना घेऊन जात होत्या. गोखले सर उगीचच अन्वी च्या मागे पुढे करत होते. "गोखले सर येताय ना?" पाटील सर येऊन आवाज देऊन पुढे गेले. "हो आलोच! तुम्ही चला पुढे मी आलोच" अस म्हणून त्यांनी पुढे जाणे टाळले. मागून मोरे शिपाई येत होता. "काय मोरे मागे कोणी राहील नाही ना?" गोखले सर मुद्दाम कारण काढून मागे थांबत होते. " सगळे गेले सर, ...Read More

4

भेटली तू पुन्हा... - भाग 4

अन्वी लाजून तिथून पळून गेली, तर आदी तिच्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहत समाधानाने हसत होता. हसतच तो मागे फिरला तर गोखले सर उभे होते. हे पाहून आदित्य दचकला व दोन पावले मागे गेला. हे पाहून तर गोखले सरांना जास्तच जोर आला ते रागाने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत दोन पावले पुढे गेले. "ओ! सॉरी." अस म्हणून आदी तिथून निघत होता. "कोण आहेस तू?" गोखले सर रागाने व तिरस्काराने बोलले. " मी आदित्य, तुम्ही मला ओळखता का?" आदीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत गोखले सर आपलाच प्रश्न विचारतात "काय करतोस तू?" "मी CA आहे, तुमचे काही काम आहे का माझ्याकडे" आदि चेहऱ्यावर स्मित ...Read More

5

भेटली तू पुन्हा... - भाग 5

दोन तीन दिवस सुट्टी असल्याने साहिल घरी जाणार होता.आदित्य अनाथ असल्याने घरी भेटायला जावं अस कोणीही नव्हतं, त्यामुळे तो राहणार होता. साहिलने आदित्यला खूप वेळा सांगितले की माझ्या सोबत माझ्या घरी चल पण नाही. त्याला तर अन्वी सोबत वेळ घालवायचा होता. कारण सरकारी सुट्टी असल्याने तिच्या स्कूलमध्ये ही सुट्टी असणार होती. तो मानातूनच खूप खुश झाला.सकाळी लवकरच साहिल ला सोडून तो मंदिराकडे गेला.मंदिरात जाण्याआधी त्याने अन्वीच्या आजोबांच्या दुकानावर नजर टाकली. त्याला तिथे अन्वी दिसली नाही. तसा त्याचा हिरमोड ...Read More

6

भेटली तू पुन्हा... - भाग 6

आदित्य दुपारी रूममध्ये परतला व काही तरी लिहू लागला. इतक्यात त्याचा मोबाईल वाजला. काम बाजूला ठेवून त्याने पटकन मोबाईल साहिलचा कॉल होता."हॅलो! हा पोहचलास का?" आदि खुर्चीत आरामात बसत बोलला."हो आता जस्टच पोहचलो""ओके""तुझ्यामुळे आई मला घरात घेण्याआधीच ओरडत आहे"साहिल लटक्या रागाने बोलला."का? मी काय केले?" न समजून आदिने विचारले."तुला ये म्हणत होतो ना माझ्यासोबत " "हा मग""मग कायss मग, आई मला म्हणते पोराला एकट सोडून का आलास घेऊन ये म्हणले होते ना" तस आदी हसू लागला.साहिलचा आई साहिलच्या हातातील मोबाईल घेत बोलली."दे इकड मीच बोलते त्याच्याशी" "हॅलो!" एक प्रेमळ आवाज आदीच्या कानावर पडला."हॅलो! नमस्कार काकी, कश्या आहात?" आदि आदराने ...Read More

7

भेटली तू पुन्हा... - भाग 7

अन्वीच्या हाती त्या मुलीचा फोटो लागला. आदीला त्या फोटोबद्दल विचारले असता त्याने टाळाटाळ केली त्यामुळे ती अपसेट झाली. तिच्या ती हर्ट झाल्याचे जाणवले पण का ते अजून ही त्याला समजत नव्हते. "ओके" तो तिचा हात सोडत बोलला. तशी ती मागे वळून न पाहतच तिथून निघून गेली. तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला. आता पुढे... अन्वी जाताच आदिने दरवाजा बंद केला व पुन्हा डॉक्युमेंटस् पाहू लागला. पण आता त्याचे मन त्या कामात लागत नव्हते. त्याने डोळे चोळली व अन्वीला कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतला. मोबाईल अनलॉक करून त्याने कीपॅडवर एक नंबर डायल केला. सहा सात रिंग नंतर समोरून कॉल घेतला ...Read More

8

भेटली तू पुन्हा... - भाग 8

आदि साहिल सोबत बोलून कॉल ठेवतो, व फ्रेश होण्यासाठी जातो.अन्वी आदिला भेटून आल्यापासून शांत शांतच होती. आजीला हे जाणवत होतं, पण ती फक्त तिच्या हालचाली टिपत होती. आल्या आल्या तिने मोबाईल चार्ज करण्यासाठी लावला. आजोबा दुकानाकडे जाण्यासाठी तयार होतं होते. अन्वी तिथून जाताच आजी आजोबांशी बोलू लागली."अहो! ऐकल का" आजीने हळू आवाजातच आजोबांना आवाज दिला."गेली पन्नास वर्षे तुमचंच तर ऐकत आलो आहे सरकार बोला" आजोबा आजींच्या गालाला हात लावत खट्याळपणे बोलले."काही ही काय तुमचं, आपलं सोडा नातीकडे पाहिलं का तुम्ही" आजी बारीक आवाजातच बोलली."का?, काय झाले तिला?" आजोबा डोळे बारीक करून बोलले."आल्या पासुन शांत शांतच आहे, त्या सीए साहेबांना ...Read More

9

भेटली तू पुन्हा... - भाग 9

आदिने आजोबांसाठी शुगर फ्री गुलाबजाम आणले. हे पाहुन आजोबा खुश झाले. आजी ही हसत व खुश होत त्याच्याकडे प्रेमाने होती. अन्वी मात्र थोडी सॅड होती. कारण ती आदिला पसंद करू लागली होती. आणि तिला अस वाटत होते की तो ही तिला पसंद करत आहे. पण आज दुपारी जेव्हा त्याच्या रूममध्ये गेली होती तेव्हा तिथे एका मुलीचा फोटो तिने पहिला होता , त्या फोटो मागे त्याने माय लव्ह असे लिहिले होते. आता पुढे.... आजोबा गुलाबजाम खात अन्वीकडे पाहत होते. जी आदिला पाहत होती. आजोबांनी आजीला खुणावले की त्या दोघांकडे बघ. आजी पाहते तर ते दोघे एकमेकांमध्ये हरवले होते. "बेटा अन्वी ...Read More

10

भेटली तू पुन्हा... - भाग 10

आदिने आजोबांसाठी शुगर फ्री गुलाबजाम आणले. हे पाहुन आजोबा खुश झाले. आजी ही हसत व खुश होत त्याच्याकडे प्रेमाने होती. अन्वी मात्र थोडी सॅड होती. कारण ती आदिला पसंद करू लागली होती. आणि तिला अस वाटत होते की तो ही तिला पसंद करत आहे. पण आज दुपारी जेव्हा त्याच्या रूममध्ये गेली होती तेव्हा तिथे एका मुलीचा फोटो तिने पहिला होता , त्या फोटो मागे त्याने माय लव्ह असे लिहिले होते. आता पुढे.... आजोबा गुलाबजाम खात अन्वीकडे पाहत होते. जी आदिला पाहत होती. आजोबांनी आजीला खुणावले की त्या दोघांकडे बघ. आजी पाहते तर ते दोघे एकमेकांमध्ये हरवले होते. "बेटा अन्वी ...Read More

11

भेटली तू पुन्हा... - भाग 11

अन्वी थोडी पळतच बाहेर आली व किचनमध्ये गेली. किचनमध्ये जाताच ती भिंतीला टेकून उभी राहिली. डोळे बंद करून, छातीवर ठेवून ती उभी होती. तिचा श्वास फुलला होता. ती स्वतःला कंट्रोल करू पाहत होती. वाढलेल्या श्वासांवर काबू करण्याचा ती प्रयत्न करत होती. "काय ग? काय झाले तुला?" आई तिला अस पाहून विचारू लागली. आईचा आवाज तिच्या कानांवर पडला. तशी ती गोंधळली. "अ....ह.... कुठे काय? काहीच तर नाही" ती आपले वाढलेल्या हार्टबिट्स वर नियंत्रण मिळवण्याचा निष्फळ प्रयत्न करत बोलली. "काही नाही कसे, मग तू इतकी धापत का आहेस? कुठे मॅरेथॉनला जाऊन आली का?" आई डोळे बारीक करून विचारत होती. "छे ग! ...Read More

12

भेटली तू पुन्हा... - भाग 12

"बिन कामाचे आहात सगळे तुम्ही, एक मुलीला शोधता येत नाहीये तुम्हाला" रुद्र आपल्या माणसानंवर रागवत होता. "बॉस....पूर्ण कर्नाटक, केरळ पाहून झालं पण मॅडम भेटल्या नाहीत" एक जण घाबरतच बोलला. "तू रे! तू कुठे कुठे शोधलं?" रुद्र चा असिस्टंट दुसऱ्या व्यक्ती ला विचारू लागला. "आंध्रप्रदेश, तामिळनाडू...." ज्यांना जी जी राज्य वाटून दिली होती ते ते सांगत होते. कोणालाच रुद्र ची बहीण भेटली नव्हती. शरद आपला नाकावरचा चष्मा वरती सरकवत सार काही पाहत व ऐकत होता. "साल्यानो, तुम्हाला मी याचे ...Read More

13

भेटली तू पुन्हा... - भाग 13

आदि अनुला घेऊन घरी आला. ती अजून ही घाबरलेली होती. तिला आदि सोबत अस येताना पाहून आई थोडी घाबरली गडबडीने दरवाज्याकडे गेली. "काय झालं अनु बेटा?" आई तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत काळजीने विचारत होती. "आई आधी बसु दे तिला, मग बोलू आपण" आदि आईला म्हणाला. "हो, ये ये बसा दोघे ही, मी पाणी घेऊन येते तुम्हाला" अस म्हणून आई किचन मध्ये निघून गेली. "अनु, शांत हो आता घाबरू नको, त्याला साहिल बघून घेईल" आदि तिला समजावत बोलला. "हम्म" तिने फक्त हुंकार भरला. तिच्या डोळ्यात पाणी थांबत ...Read More

14

भेटली तू पुन्हा... - भाग 14

"मी सरांशी बोलतो यावर" आदि म्हणाला. "ओके, चल आता झोप तू, मी ही झोपतो उद्या वरीष्ठ येणार आहेत बँकेत तपासणीला" साहिल बेडवर आडवा होत बोलला. "आता हे कधी ठरलं यार...." आदि चकित होत थोडा वैतागुन बोलला. "थोड्या वेळापूर्वी कॉल आलेला " साहिल हसत बोलला. "काय थोडा उसंत म्हणून देतात की नाही ही माणसं यार..." आदि खूपच वैतागला होता. कारण महिना झाला त्याला काय काय कागदपत्रे गोळा करायला लावत होते त्याचे वरिष्ठ. आपलं काम सोडून त्याला या बाकी कामावर पण लक्ष द्यावे लागत होतं त्यामुळे त्याची चिडचिड होत ...Read More

15

भेटली तू पुन्हा... - भाग 15

संध्याकाळी आदित्य व साहिल अन्वीच्या घरी तिला भेटायला गेले. घरात अजून ही शांतता होती. हे जाणवताच आदिला काळजी वाटू की, अन्वीची तब्बेत अजून ठीक नाही का?, आई कुठे गेली?आत येताच त्याने आईला आवाज दिला."आई..!"एक-दोनदा आवाज दिल्यानंतर आईने आतून आवाज दिला."ये.. ये..आदि, मी देव घरात आहे" आईचा आतून आवाज येताच आदि देवघराकडे गेला. साहिल ही त्याच्या मागे मागे निघाला."आई, बाबा आले नाहीत का अजून?" आई हातातील जपमाळ डोळ्यांना लावून बाजूला ठेवत बोलली," येतीलच इतक्यात"आई उठून मागे फिरली आणि समोर साहिलला पाहून खुश झाली."अरे! साहिल बेटा कसा आहेस? खूप दिवसांनी आठवण झाली आईची" "आठवण तर रोजच येते पण ड्युटी फस्ट नियम ...Read More

16

भेटली तू पुन्हा... - भाग 16

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच आदित्य सर्वांच्या आधी उठून बिच वर गेला. सहा सात ची वेळ असेल. सकाळीचे गार वारे झोंबत होत. आदि कॅमेरा घेऊन निघाला होता.त्यावेळी बिच वर अजिबात गर्दी नव्हती. दहाबारा जण असतील फक्त ते ही लोकलच वाटत होते जे की मॉर्निंग वॉक साठी आले होते.खूपच शांतता जाणवत होती. त्या शांततेत समुद्राच्या लाटांचा आवाज कानाला सुखावून जात होता. जवळच असणाऱ्या झाडांवर पक्ष्यांचा गोड किलबिलाट सुरु होता.सगळ्या मोहक गोष्टींचे फोटो घेत तो पुढे निघाला.तो फिरत फिरत थोडं बाजूच्या किनाऱ्यावर गेला. आणि एक मुलगी त्याला दिसली. जी पाण्यात पाय ठेवून लाटांचा पायांना होणार स्पर्श अनुभवत होती. पाण्याचा पायाला स्पर्श होताच ...Read More

17

भेटली तू पुन्हा... - भाग 17

आदि अन्वीचा हात हातात घेऊन जुन्या आठवणीमध्ये हरवला होता.साहिलने सर्वांना तिचे फोटो जे आदिने सकाळी बिचवर घेतले होते ते दाखवले."काय आदि तू ही या झमेल्यात पडत आहेस, प्रेमापासून लांबच राहा" यश बोलला."होय संन्यासी बाबा,तू एक प्रेमपूजाऱ्याला पूजा करू नको अस कस सांगू शकतो" विशाल व राहुल एकदमच बोलले.आपल्या फ्रेंड्स सोबत बोलून आदिने त्या मुलीशी दुसऱ्या दिवशी बोलायचे असे ठरवले व झोपी गेला. दुसऱ्या दिवशी ही सकाळी तो लवकर उठून बिच वर गेला व तिला शोधू लागला पण त्याला ती कुठेच दिसली नाही.खूप उशिरापर्यंत वाट पाहून तो रिसोर्टला परत आला. त्याला अस उदास पाहून राहुल त्याच्या जवळ आला."काय झाले? अस ...Read More

18

भेटली तू पुन्हा... - भाग 18

त्याचं वेळी रात्री मुंबई मध्ये...." सोडा त्यांनला, पाहीजेल तर आमचा जीव घ्या त्यांनला सोडा" रामचंद्र म्हणजेच रुद्रच्या काकांचा विश्वासू होता तो बोलला." तुमचा जीव घेऊन काय करू हा....प्रॉपर्टी काय तुमच्या नावावर आहे का?" समोरून एक काळा बलदंड गुंड बोलला." मालक तुम्ही काय बी काळजी करू नकासा" रामचंद्र बोलले.मालकांना म्हणजेच जीवनला खुर्चीत बांधून ठेवले होते. आता बऱ्यापैकी त्यांच्या तब्बेतीत सुधार झाला होता." अव बोला की त्यासनी काय तरी " सावित्रीबाई बोलल्या."ये! गप्प बसा रे आल्यापासून काय टीव टीव लावल्या, बॉस येतीलच थोड्या वेळात मग समजेल" गुंडाचा मुखीय बोलला.********" अनु ऐकून तर घे माझं" आदि अनुच्या मागे जाग बोलला.अनु रागाने त्याला ...Read More

19

भेटली तू पुन्हा... - भाग 19 (अंतिम भाग)

"अनु आय मिन मायरा तुझं खर नाव आहे" आदि अन्वीला सांगत होता. "मायरा....?" "हो बेटा तुझ्या आईने खुप प्रेमाने नाव ठेवले होते" जीवन बोलले. "तुम्ही कसे माझे बाबा असू शकता? माझे आई बाबा तर..." तिच्या डोळ्यात पाणी तरळले. तिला होणारा त्रास पाहून आदिला वाईट वाटत होते. "हे बघ अनु मी सगळं सांगतो तू शांतपणे ऐकून घे" "तू जीवन कुमार म्हणजेच यांची मुलगी आहेस" आदि जीवन यांच्याकडे हात करत बोलला. अन्वी पुरती गोंधळली होती. तिला काहीच आठवत कस नाही म्हणून ती स्वतःला त्रास करून घेत होती. "तुझा चुलत भाऊ म्हणजे रुद्रने प्रॉपर्टीसाठी तुला व काकांना मारण्याचा प्रयत्न केला होता. जीवन ...Read More