मृण्मयीची डायरी

(23)
  • 48.5k
  • 0
  • 25.1k

नमस्कार वाचकांसाठी यावेळी मी वेगळ्या विषयावर कथा मालिका घेऊन आले आहे. हा वेगळा विषय वाचकांना आवडेल अशी आशा करते.माझं लिखाण आवडत असेल तर नक्की तुमच्या ओळखीच्या लोकांना पाठवा ही विनंती धन्यवाद. ##मीनाक्षी वैद्य. मृण्मयीची डायरी. भाग १ला मृण्मयीला जाऊन पंधरा दिवस झाले होते तरी घरात सगळ्यांना तिची प्रकर्षानी आठवण येत होती. मृण्मयी हयात असताना एवढी आठवण आपल्याला कधीच कशी आली नाही याचं वैजू ला आश्चर्य वाटलं. मृण्मयी खूपच संवेदनशील मनाची होती. हेही घरच्यांना माहिती नव्हतं तिच्यावर अनेक घातक प्रसंग आले.पण घरच्यांना ते कधीच कळले नाही. ते सहन करताना ती बोलणच विसरली. याचीपण घरात कोणाकडून दखल घेतल्या गेली नाही. घरच्यांना यत् किंचीत ही तिच्यावर आलेल्या प्रसंगांची माहीती नव्हती. कशी असणार? ती तशीही मितभाषी होती. स्वतःला व्यक्त करणं तिला जमत नसे. शेवटी शेवटी काही वर्ष ती व्यक्त व्हायची पण स्वतःशीच. तेच तिचं वागणं घरात सगळ्यांना खटकू लागलं. तिच्या अश्या असंबद्ध बडबडण्याची घरातल्यांना काहीच तर्कसंगती लागतं नव्हती. त्यामुळे निष्कर्ष तरी काय काढणार?

Full Novel

1

मृण्मयीची डायरी - भाग १

नमस्कार वाचकांसाठी यावेळी मी वेगळ्या विषयावर कथा मालिका घेऊन आले आहे. हा वेगळा विषय वाचकांना आवडेल अशी आशा करते.माझं आवडत असेल तर नक्की तुमच्या ओळखीच्या लोकांना पाठवा ही विनंती धन्यवाद. ##मीनाक्षी वैद्य. मृण्मयीची डायरी. भाग १ला मृण्मयीला जाऊन पंधरा दिवस झाले होते तरी घरात सगळ्यांना तिची प्रकर्षानी आठवण येत होती. मृण्मयी हयात असताना एवढी आठवण आपल्याला कधीच कशी आली नाही याचं वैजू ला आश्चर्य वाटलं.मृण्मयी खूपच संवेदनशील मनाची होती. हेही घरच्यांना माहिती नव्हतं तिच्यावर अनेक घातक प्रसंग आले.पण घरच्यांना ते कधीच कळले नाही.ते सहन करताना ती बोलणच विसरली. याचीपण घरात कोणाकडून दखल घेतल्या गेली नाही. घरच्यांना यत् किंचीत ही ...Read More

2

मृण्मयीची डायरी - भाग २

मृण्मयीची डायरी भाग २रा.मागील भागावरून पुढे…तारीख… १६/६/१९८८इतरांचं जाऊ दे आईनी पण कधी गंभीरपणे माझी दखल घेतली नाही. वैजुताई आणि दादा सारखं मलापण माझी मतं आहेत हे तिला कळतच नव्हतं.मला वाटायचं माझ्याजवळ आईनी येऊन बसाव.प्रेमानी डोक्यावरून हात फिरवावा.पण असं कधीच झालं नाही.मग दादा,ताईंच्या डोक्यावरून कशी येता जाता हात फिरवायची. त्यांचा गालगुच्चा घ्यायची. माझ्यावेळी तीला हे आठवलं नाही कधी.आई जेव्हा दादा ताईचे लाड करायची तेव्हा ते मी आधाशासारखं माझ्या डोळ्यांनी पिऊन घ्यायचे.तारीख...१५/६/१९८८मला नेहमीच सगळेच मंदच समजत आले.मला ओरडून सांगावं वाटलं की मी मंद नाही. मी इतरांसारखी हसू शकते, रागाऊ शकते, बोलू शकते.मला सगळं येतं पण मला दादा ताई सारखं खूप बडबड ...Read More

3

मृण्मयीची डायरी - भाग ३

मृण्मयीची डायरी भाग ३रा तारीख...५/९/१९८८काल दादाचा फायनल ईयरचा निकाल लागला.तो प्रथम श्रेणीत प्रथम आला होता.सगळे खुप कौतुक करत होते मीपण त्याचं अभिनंदन केलं तर माझ्याकडे लक्ष न देता आईला म्हणाला "आई ही मंद माझं अभिनंदन करतेय" आणि हसला.मी अभिनंदन केल्यावर इतरांना थॅंक्यू म्हणतो तसं मला का म्हणाला नाही.मंद म्हणून का हसला.माझी कोणतीच गोष्ट दादाला का आवडत नाही. त्याला माझ्याशी बोलायला का आवडत नाही? मी तर त्याला त्रास होईल असं कधीच वागत नाही. त्याचे मीत्र आले की मी खोलीच्या बाहेरच येत नाही.कोणाला सांगू मनातलं कळतच नाही.आई बाबा दादा ताई सगळे आपल्याच कामात असतात. दादा आणि ताईला काही अडचण आली की ...Read More

4

मृण्मयीची डायरी - भाग ४

मृण्मयीची डायरी भाग ४था..मागील भागावरून पुढे….किती तरी वेळ वैजू डायरीकडे सुन्न नजरेनी बघत बसली होती. तिला वाटू लागलं एका निरागस मनाच्या जीवाला आपण खूप मोठ्ठी शिक्षा दिली.अशी शिक्षा देण्याचा आपल्याला काय अधिकार होता?आपल्या स्वप्नांच्या कळ्या वेचण्यासाठी आपण धडपड केली नं! तिची स्वप्नं तर खूपच छोटी होती.ती फुलवण्याचा तिला आपल्यासारखाच अधिकार होता. मी, आई, बाबा, सारंग सगळ्यांची जबाबदारी होती तिच्या स्वप्नांना ऊमलविण्यासाठी हवी ती मदत करायची. मदत सोडा आपण तिची स्वप्नंसुद्धा समजून घेतली नाही.तिची स्वप्नं या जगातील स्वप्नांपेक्षा वेगळी होती. निरागस होती. सच्ची होती. तिची स्वप्नं आपल्याला पेलवली नसती कदाचित.आपण नेहमीच जगाच्या वेगवान शर्यतीत दौडत होतो. या जगात निरागसतेला किंमत ...Read More

5

मृण्मयीची डायरी - भाग ५

मृण्मयीची डायरी भाग ५वामागील भागावरून पुढे…वैजू आत आली तर तिला सारंग रडताना दिसला.त्याला रडताना बघून वैजूच्या डोळ्यातून पुन्हा पाणी लागले.सारंग दोन्ही हातांनी डोकं पकडून जमीनीकडे बघत मुसमुसत होता.वैजूने सारंगजवळ जाउन त्याच्या पाठीवरून हात फिरवला.सारंगने वैजूकडे वर बघितलं तसं वैजू त्याला म्हणाली,"सारंग मला वाटतं आपण त्या काऊन्सलरला भेटाव.."" आता काय उपयोग भेटून?""नेमकं तिला काय झालं होतं हे तरी कळेल. तिला आई घेऊन गेली होती पण नंतर आपण कुठे काही विचारलं आईला? ऊलट मृण्मयीला काऊंन्सलरची गरज पडली यावरच आपण हसलो. खरच हसण्यासारखं होतं का काही? सारंग आपण असताना तिला काऊंन्सलरची गरज पडायला नको होती.""हो...खरय तुझं म्हणणं. आपण तिच्या प्रश्नांना किती सहजपणे ...Read More

6

मृण्मयीची डायरी - भाग ६

मृण्मयी ची डायरी भाग ६वामागील भागावरून पुढे…वैजू काऊंन्सलर अमीता पटवर्धन यांना फोन करून त्यांची वेळ आणि पत्ता विचारून घेते."सारंग संध्याकाळी पाच वाजता या म्हणाल्या. आपण दहा मिनीटे आधी पोहचू असंच घरून निघू. पहिलीच वेळ आहे आपल्या भेटीची उगीच उशीर नको व्हायला.या ट्रॅफिकचं काही सांगता येत नाही." वैजू सारंगला म्हणाली."हो बरोबर बोलते आहेस.आपल्या या मिटींगबद्दल आई- बाबांना सांगायची काही गरज नाही.""अर्थातच नाही.का सांगायचं? त्यांना मुळी पटत नाही आपण जे करतोय ते.मग कशाला सांगायचं?"" हं. चार सव्वा चारलाच निघू आपण.""हो. मृण्मयीची डायरी आणि चित्रांची वही दोन्ही बरोबर घेऊन जायला हवं.मी आत्ताच दोन्ही गोष्टी माझ्या पर्समध्ये ठेवते नाहीतर विसरेन." वैजूनी मृण्मयीची डायरी ...Read More

7

मृण्मयीची डायरी - भाग ७

मृण्मयीची डायरी भाग ७वैजू आणि सारंग घरी पोचतात तेव्हा सारंग म्हणाल्या प्रमाणे आई बाबा समोरच्या हाॅलमध्ये या दोघांची वाट असतात.टिव्ही नावालाच चालू असतो.वैजू आणि सारंग एकमेकांकडे बघून हसतात.सारंग मान आणि डोळे मिचकाऊन वैजूला म्हणतो "बघ मी म्हटलं होतं तसंच झालं की नाही?" दोघंही हसत घरात शिरतात.आईबाबांना वाटतं की हे दोघं काहीतरी सांगतील.कुठे गेले होते इतक्या वेळ.पण दोघांपैकी कोणीच बोललं नाही.पुढील प्रश्नाची सरबत्ती टाळण्यासाठी वैजू आत जाऊ लागली तेवढ्यात जतीनचा तिच्या नव-याचा फोन येतो.तिला मनातून हायसं वाटतं.ती आत जाते.पायातील काढलेल्या चपला सारंग पुन्हा पायात अडकवतो आणि " आई मी येतो थोड्याच वेळात." असं म्हणत घराबाहेर पडतो आणि तो ऊदयकडे पळतो.वैजू ...Read More

8

मृण्मयीची डायरी - भाग ८

मृण्मयीची डायरी भाग ८मागील भागावरून पुढे…वैजू साधारण महिनाभरानी परत नागपूरला येते. कारण अमीता मॅडमनी येत्या शनिवारी साधारण दोन वाजेपर्यंत सारंग आणि वैजूला बोलावलं असतं.वैजू सकाळी बसमधून उतरल्या उतरल्या सारंगला म्हणते. "सारंग आपण परवा आधी अमीता मॅडमच्या क्लिनीकला जाऊ नंतर प्राजूला भेटू असं मी म्हटलं होतं तुला.तसं सांगीतलं कातू प्राजूला ?"" हो.तिलाही हाफ डे आहे तर जमेल म्हणाली.""घरी या गोष्टी बोलणं म्हणजे आ बैल मुझे मार असं करण्यासारखं होईल. अमीता मॅमशी बोलणं कधीपर्यंत आटपेल त्यावर प्राजूला कधी भेटायचं ठरवू." वैजू म्हणाली." हो चालेल.मी तसंच सांगीतलं आहे प्राजूला."बोलता बोलता दोघं घरापाशी आले.वैजू बॅग घेऊन घरात शिरली.आईची चांगली,वाईट या मधील कोणतीच प्रतिक्रिया ...Read More