प्रेमा तुझा रंग कसा ?

(4)
  • 17.3k
  • 0
  • 6.4k

"ए भावा, चल यार काय नौटंकी यार?” प्रथम अविकला खेचत होता. “यार...... काम आहे मला.... आज नाही” अविक प्रथमकडे न बघताच पीसीवर खाड्खुड करायला चालू झाला. “यार प्लिज प्लिज... भावासोबत अस करणार आता......” प्रथमच तरिही अविकला खेचन चालुच होत. “च्यायला, मी तर सुट्टा मारत नाही.... तरिपण साल्या तुझ्यामुळे मला हे सो कॉल्ड सुट्टा ब्रेक्स घ्यावे लागतात.” प्रथम ऐकनार नाही हे माहित असल्याने अविक नाईलजाने पीसी लॉक करून उठला. अविक आणि प्रथम शाळेपासुनचे जीवलग मित्र. नशिबाने जॉबला पण एकाच मल्टिनॅशनल कंपनीत होते. एकमेकांचे जीवलग दोस्त स्वभावाने मात्र एकमेकाच्या अगदी विरुद्ध. प्रथम प्रत्येक दिवस फक्त मजा करायला आहे ह्या तत्वावर जगायचा. अविक बिचारा शक्यतो आपण बर आणि आपल काम बर असा माणुस पण आत्यंतिक मित्रप्रेमामुळे प्रथमने केलेले सगळे ‘कांड’ अविकला निस्तारायला लागायचे. दारु,सिगरेट हे प्रथमसाठी रोजचच होत आणि अविक मात्र त्याच्या विरुद्ध होता. प्रथमच्या सुट्टा ब्रेक वरुन त्या दोघांच रोजचच भांडन व्हायच. पण प्रथमला अविकशिवाय करमायचच नाही मग काय सिगरेट संपेपर्यंत दोघेही भांडतच असायचे व एव्हाना ‘भांडन ओव्हर’ सिगरेट्ची दोघानाही सवय झालेली आता. प्रथम प्रत्येक संडे नंतर पुर्ण विक नेक्स्ट संडेचा प्ल्यान करत असायचा आणि अविक संडेला देखिल नेक्स्ट वीकच्या टास्कचा विचार करायचा. हे अस काहितरी विचित्र समीकरण होत दोघांच.

1

प्रेमा तुझा रंग कसा ? - 1

"ए भावा, चल यार काय नौटंकी यार?” प्रथम अविकला खेचत होता. “यार...... काम आहे मला.... आज नाही” अविक प्रथमकडे बघताच पीसीवर खाड्खुड करायला चालू झाला. “यार प्लिज प्लिज... भावासोबत अस करणार आता......” प्रथमच तरिही अविकला खेचन चालुच होत. “च्यायला, मी तर सुट्टा मारत नाही.... तरिपण साल्या तुझ्यामुळे मला हे सो कॉल्ड सुट्टा ब्रेक्स घ्यावे लागतात.” प्रथम ऐकनार नाही हे माहित असल्याने अविक नाईलजाने पीसी लॉक करून उठला. अविक आणि प्रथम शाळेपासुनचे जीवलग मित्र. नशिबाने जॉबला पण एकाच मल्टिनॅशनल कंपनीत होते. एकमेकांचे जीवलग दोस्त स्वभावाने मात्र एकमेकाच्या अगदी विरुद्ध. प्रथम प्रत्येक दिवस फक्त मजा करायला आहे ह्या तत्वावर जगायचा. अविक ...Read More

2

प्रेमा तुझा रंग कसा ? - 2

दुसऱ्या दिवशी प्रथमला ऑफिसला जायचं जीवावर आलेलं, अविकचा मूड कसा असेल काय माहित...? एकतर तो फारसा रागावत नाही आणि कि मग बस्स..... कसबस मनाची तयारी करत थोडं लेटच पोचला तो ऑफिसला...प्रथमला असं शांत येताना बघून वॉचमन पण अचंबित झाला. "प्रथमभाऊ, आज गप्प गप्प...?" वॉचमनचा प्रश्न. सिक्युरिटी गेटपासून ते बॉसपर्यंत सगळ्यांचाच आवडता होता तो. असं उतरलेल्या चेहऱ्याचा प्रथम प्रथमच पाहत होते सगळे. "काही नाही." त्याने पडक्या चेहऱ्याने उत्तर दिल आणि मान हलवत एंट्रन्सच्या दिशेने निघाला. कडू चेहरा आणि खांदे पाडूनच तो आपल्या डेस्कवर पोचला. त्याला काहीच प्रसन्न वाटत नव्हतं. अविकच्या सीटवर पाहिलं तर अजून आला नव्हता तो. फोन टिवटिवला बघितलं ...Read More