अंकिलेश - एक प्रेमकथा

(80)
  • 179k
  • 8
  • 82.1k

@ अंकिता माझी एक मेथड आहे, न्यू कमर टीचर असेल तर मी हळूच पाठी बसून लेक्चर अटेंड करते. तशीच त्यादिवशी बसले होते. थिंग्स हॅवन्ट चेंज्ड मच इन सो मेनी इयर्स. पाठी बसणारे लाॅर्डस आॅफ लास्ट बेंचेस तशाच इकड तिकडच्या गप्पा मारतात. आमच्या वेळी मी फर्स्ट बेंचर होते पण पाठी काय चालतं माहिती होतं मला .. त्यादिवशी मी पाठी हळूच येऊन बसलेले. लास्ट बेंचवर पाठी दोन मुली गप्पा मारत होत्या.. हलक्या आवाजात, पण मला ऐकू येत होते क्लियरली.. "यू नो दॅट मॅडम.. साळवी मॅडम.." "ओह! दॅट वन?" "यस्स.. त्याच त्या. कशा आहेत ना.." "बट यू नो.. शी इज सर्जिकल बाॅस डाॅ.साळवी'स वाईफ.." "हाऊ ही मस्ट हॅव मॅरीड हर?" "आय नो. बट आय हर्ड शी इज व्हेरी रीच. यू नो हर दोन्ही पेरेंट्स वेअर अ बिग शाॅट." "ओह! दॅट्स दॅट! मनी टाॅक्स! पैशांसाठी! बाकी गोष्टी कोण बघतेय?" "यस. वर्ल्ड रिव्हाॅल्व्स अराउंड इट! व्हाय शुड यू एक्पेक्ट एक्सेप्शन्स?" "आय नो!" सी, हाऊ एनीबडी जजेस! मला सगळे ऐकून राग नाही आला, गंमत वाटली. साधारण विशीतल्या त्या मुली. आजूबाजूला जे बघतात त्यातूनच शिकतात. आणि तसा आपला समज असतोच. अ गर्ल फाॅलिंग फाॅर अ रीच गाय आॅर व्हाइसाव्हर्सा .. जजमेंट इज, इट्स आॅल ओन्ली द मनी स्पिकिंग! आपण त्या मागची कधी रियालिटी पाहतो का? नाहीच. पण नाही, वुई आरन्ट रियली बाॅदर्ड अबाऊट रियालिटी! आपल्याला फक्त आपल्या मतांची पिंक टाकायची नि पुढे जायचं असतं. कित्येकदा समोर जे दिसतं त्याच्यामागची वस्तुस्थिती अगदी वेगळीच असू शकते.. आणि मनी इज इम्पाॅर्टंट, पण त्याच्या पलिकडेही एक मोठी दुनिया आहे.. आणि या पृथ्वीवरचे कित्येक रहिवासी तिकडेही राहतात.. आणि ते ही आनंदाने नि समाधानाने!

Full Novel

1

अंकिलेश - एक प्रेमकथा - 1

Dr Nitin More १. @ अंकिता माझी एक मेथड आहे, न्यू कमर टीचर असेल तर मी हळूच पाठी बसून अटेंड करते. तशीच त्यादिवशी बसले होते. थिंग्स हॅवन्ट चेंज्ड मच इन सो मेनी इयर्स. पाठी बसणारे लाॅर्डस आॅफ लास्ट बेंचेस तशाच इकड तिकडच्या गप्पा मारतात. आमच्या वेळी मी फर्स्ट बेंचर होते पण पाठी काय चालतं माहिती होतं मला .. त्यादिवशी मी पाठी हळूच येऊन बसलेले. लास्ट बेंचवर पाठी दोन मुली गप्पा मारत होत्या.. हलक्या आवाजात, पण मला ऐकू येत होते क्लियरली.. "यू नो दॅट मॅडम.. साळवी मॅडम.." "ओह! दॅट वन?" "यस्स.. त्याच त्या. कशा आहेत ना.." "बट यू नो.. शी ...Read More

2

अंकिलेश - एक प्रेमकथा - 2

२ @ अंकिता सो व्हेअर वाॅज आय? तर सांगत काय होते? लिंक गेली ना की मला परत विचार करावा टू गेट बॅक टू द ट्रॅक्ट! तर ते साँग आहे ना वो जवानी जवानी नहीं जिसकी कोई कहानी न हो.. तर जवानीची कहाणी जवाँदिल लोकांसाठी. दुसरं काय आहे ना, की रेकाॅर्ड रिवाइंड करताना सारं ओल्ड काही रिमाइंड व्हायला होतं. यू नो ते डेज आठवले ना की अजूनही वन फिल्स यंग. खरंतर यंगर म्हणायला हवं. म्हणजे आय ॲम एनी वे यंग इव्हन नाऊ. बट वाॅज यंगर दॅन दिस देन! हो की नाही? तर अखिलेश .. म्हणजे आय काॅल हिम अख्खा किंवा ...Read More

3

अंकिलेश - एक प्रेमकथा - 3

३ @ अंकिता माझा प्लॅन मला वाटलं होतं फसला. म्हणजे सकाळ सकाळी मी केईम हाॅस्पिटलला निघाले तेव्हा वाटलं होतं, वुड बी वेटिंग फाॅर मी. विथ द ट्राॅफी. इतका व्यवस्थित विचार करून आय हॅड लेफ्ट इट बिहाइंड. पण नाही. त्या हाॅलमध्ये ट्राॅफी नव्हतीच नि अख्खाच्या अख्खा अख्खिही गायब होता. कोणाला विचारावे? इकडे तिकडे भटकून मी परत गाडीत बसले. हाॅस्पिटलात गाडी घालायला नि अख्खि समोर दिसायला एकच गाठ पडली. आय टेल्यू, म्हटले, एक्स्पेक्ट न अनेक्स्पेक्टेड! अख्खि आमच्या काॅलेजात यायला देअर कुडंट बी एनी अदर रिझन दॅन द ट्राॅफी! खरंतर नो अदर रिझन दॅन मी! माझी हाक गेली तसा अख्खि दचकला. एकाएकी ...Read More

4

अंकिलेश - एक प्रेमकथा - 4

४ @ डाॅ. सुरेंद्र गावस्कर अंकिता माझी एकुलती एक. लाडकी. हुशार ही. मेडिकलला ॲडमिशन घेताना सगळे टाॅपर्स केईएम मध्ये मी म्हटले, स्टीक टू अवर ओन इन्स्टिट्यूट. नथिंग डुईंग. त्यात तिच्यावर लक्ष राहिल हा ॲडिशनल विचार होता. अंकिता तशी बोल्ड आणि बिनधास्त आहे. कुठे उगाच गडबड करून ठेवायला नको. आणि शी हॅज बीन ब्राॅट अप ॲज अ प्रिन्सेस. मी हे का सांगतोय? वेल, बापाचे काळीज आहे. हार्ट आॅफ द डॅड. ॲक्च्युअली अ रीच डॅड. अँड आय वाॅज वरीड. आपली सर्वोत्तम गोष्टच कुणी पळवून नेली तर? हॅव टू बी आॅन द गार्ड. म्हणजे त्या दिवशी अंकिताला त्या मुलाबरोबर काॅफीहाऊस मधून बाहेर ...Read More

5

अंकिलेश - एक प्रेमकथा - 5

५ @ अखिलेश तिकडून आलो तर खूपच अपसेट होतो मी. नाही म्हटले तरी अंकिता मला आवडली होती. थोडी, नव्हे जास्तच आंग्लाळलेली असली तरी, जब प्यार करे कोई तो देखे केवल मन.. पण शेवटी दुनियादारी पडेगी निभानी. माझे घर, वन रूम किचन. बाबा मिल वर्कर. आई लोणची पापड बनवून विकते. नाही म्हणायला तशी आर्थिक चणचण खूप नाही. दोन वेळेस जेवण आणि कमी असल्याने बाकी गरजा भागवता यायच्या. मी मेडिकलला गेलो त्याचे आई बाबांना कोण कौतुक. तसा मी पहिल्यापासूनच हुशार. खरेतर हुशारीपेक्षा मेहनत महत्वाची. शाळेपासूनच मी नियमित अभ्यास करणारा. त्यात डाॅक्टर व्हायचे स्वप्न पाहिलेले. अगदी जीएस- केईएमसारख्या नंबर वन हाॅस्पिटलामध्ये मिळालेली ...Read More

6

अंकिलेश - एक प्रेमकथा - 6

६ @ अंकिता काही म्हणा, मुंबईतली बेस्ट इज बेस्ट! म्हणजे मुंबईत बसेसची कंपनी बेस्ट नावाची आहे. त्या बसने केईएम कँपस मध्ये पोहोचले अगदी तेव्हापर्यंतही तिथे येण्यासाठी कुठला बहाणा सांगावा हे ठरवले नव्हते. आय सेड आय विल डिसाइड ॲट द लास्ट मोमेंट. विल बिल्ड द ब्रिज व्हेन हॅव टू क्राॅस द रिव्हर! नाहीतर किंवा अगदी हिंमत करून खरे खरे सांगूनच टाकेन. आर या पार! शेवटी इजन्ट द ट्रूथ इटर्नल? अँड अख्खि'ज बाॅडी लँग्वेज टेल्स मी, ही डझ लाईक मी टू! त्या लाल बसमध्ये मी खूप दिवसांनी बसलेले. म्हणजे खूप पूर्वी मी हट्ट केला तेव्हा पपा घेऊन गेलेले. एका संडेला. पूर्ण ...Read More

7

अंकिलेश - एक प्रेमकथा - 7

७ @ अखिलेश अंकिता तशी वेडी आहे. वेडी म्हणजे एखादी गोष्ट हवी असेल तर ती प्रयत्न काही केल्या सोडत त्या गोष्टीचे वेड लागते तिला. त्यावेळी तिला माझे वेड लागले असावे. पुस्तक विकत घेण्याची सबब ही किती लंगडी आहे हे तिला दिसत नव्हते का? बुक स्टोअर काॅलेजच्या आत नाही हे तिला माहिती नव्हते का? आणि एका पुस्तकासाठी तिने मला शोधत यावे हे किती अतार्किक आहे हे तिला समजले नसेल का? पण 'वेडात निघाले वीर मराठे सात' सारखी ती एका वेडात निघालेली. मग त्यासाठी ती काहीही करेल.. वीर दौडले असतील घोड्यांवरून तर ही बी ई एस टी च्या बस मधून! पुढे ...Read More

8

अंकिलेश - एक प्रेमकथा - 8

८ @ डाॅ.अरूणा गावस्कर त्या दिवशी मला अंकिताच्या पर्समध्ये काय सापडावे? बसची दोन तिकिटे? नि त्या पॅथाॅलाॅजीच्या पुस्तकात त्याच रिसिट. केईएम जवळच्या बुक स्टोअरची. मला पोलिसांसारखे इंटरोगेशन आवडत नाही. पण आजकाल अंकिता थोडी गप्प गप्प वाटते. सुरेन्द्रला कुठला आलाय वेळ? ती त्या मुलाबरोबर तर गेली नसेल? त्या दिवशी मी काही बोलले नाही. थोडी सिच्युएशन शांत झाली की डोकं नीट चालतं. दुसऱ्या दिवशी अंकिता उठली तर तिला म्हणाले, "तू पॅथाॅलाॅजीत करणारेस पीजी?" "नो. मला नाही आवडत." "नाही, मग एकाच वेळी दोन दोन राॅबिन्सन वाचतेयस. एकच एडिशन. काल अजून एक तेच पुस्तक आणलेयस. नाही कदाचित नवीन मेथड असेल अभ्यासाची.." "अगं नाही.. ...Read More

9

अंकिलेश - एक प्रेमकथा - 9

९ @ अंकिता त्या दिवशी घरी पोहोचायला उशीरच झाला. म्हणजे ती बस, एकतर गर्दी, त्यात ट्रॅफिक. थकले अगदी. पण हरकत नाही. सवय तर हवी. त्याची तयारी जेवढ्या लवकर करेन तेवढे चांगले. माइंड शुड बी रेडी टू ॲक्सेप्ट. रेस्ट इज टेकन केअर आॅफ आॅटोमॅटिकली! शेवटी काय एव्हरी थिंग इज इन वन्स ब्रेन .. आणि मी सांगणार तरी काय होते? बाॅयफ्रेंडला भेटायला गेले म्हणून? अँड टिल देन, पुअर अख्खि डिडन्ट क्वालिफाय टू बी काॅल्ड ॲज अ बाॅयफ्रेंड! जरी वन वे ट्रॅफिक मध्ये मी त्याला आॅलरेडी बुक करून ठेवले होते! सो आय प्रिटेंडेड टू बी अ बीट टायर्ड. आणि मग समोर मायक्रोबायोचं ...Read More

10

अंकिलेश - एक प्रेमकथा - 10

१० @ अंकिता यू नो माय ममा इज ग्रेट! डाॅक्टर मुग्धा देशपांडे मॅडम दोन महिने इकडे नव्हत्याच! त्या दिवशी फोन आल्याचे तिने खोटेच सांगितले! पण काही असो, दॅट अटेंप्ट वाॅज अ ग्रेट थिंकिंग बाय हर! आजची केईएम व्हिजिट मात्र त्यांचा ममाला फोन येण्याच्या आत रिपोर्ट करून टाकायला हवी! पुढे अख्खि एक गाणं म्हणायचा मध्ये मध्ये.. मुहब्बत की राहों में चलना संभलके! खरंय ते. आणि त्याची ही सवयच आहे. येता जाता कुठलाही शब्द मिळाला की त्यावरून गाणे म्हणतो. त्याचा आवाज आता तसा इरिटेट करतो मला. पण तेव्हा नाही करायचा! टाइम चेंजेस एव्हरीबडी.. प्रोबॅबली हिज व्हाॅईस हॅज चेंज्ड ओव्हर द टाइम! ...Read More

11

अंकिलेश - एक प्रेमकथा - 11

११ @ अखिलेश टी एन मेडिकल काॅलेजचा मेन लेक्चर हाॅल. स्टेज, वरती वरती अरेंज केलेले बेंचेस. बहुतेक हा नाटकाचा बराच प्रसिद्ध असावा. हाॅल तुडुंब भरलेला. नाटक कोणते? तर, 'प्यार किए जा!' क्षणभर वाटले अंकिताने ते नाव मुद्दाम द्यायला लावले की काय! ती काहीही करू शकते.. अर्थात तिला हवे असेल तर.. आणि तरच! हट्टीपणा हा जिद्दी स्वभावाचा बाय प्राॅडक्ट असतोच. तेव्हा ती हट्टी आहेच नि हवे ते मिळवण्यासाठी चिकाटी नि मेहनत करण्याची तिची सवय आहे.. नाटकाला तिने मला बोलावले ते इंटरकाॅलेजिएट नाटक म्हणून, पण तिथे माझ्याशिवाय कुणीच दुसऱ्या काॅलेजातून आलेले नव्हते. येणार कसे? हे आमंत्रण फक्त माझ्यासाठी.. पर्सनल होते! ती ...Read More

12

अंकिलेश - एक प्रेमकथा - 12

१२ @ अंकिता त्या नाटकाचे नाटक मस्त झाले. नाटक ही चांगलेच असावे बहुतेक. म्हणजे मी फक्त अख्खिबद्दलच्या विचारात होते. नावच होते तसे.. प्यार किए जा! तशी मी तेव्हा होते वीसेक वर्षांची. तर ह्याला इनफॅच्युएशन म्हणता आले असते का? पण नाही. त्यानंतर एवढे काही झाले. आणि वुई आर टुगेदर, गोईंग स्ट्राँग स्टिल.. म्हणजे ते तात्पुरते आकर्षण कसे असेल? आज कालच्या पोरापोरींत चट पेअरिंग पट ब्रेक अप होतो म्हणे.. त्याबद्दल खरेच आय फिल पिटी.. पुअर थिंग. म्हणजे त्यांना कंप्यानियनशिपचा अर्थच कळलेला नाही बहुतेक. आफ्टर फ्यू इयर्स आॅफ मॅरेज आय कॅन से धिस.. धिज पेअर्स आर लाइक अ जिगसाॅ पझल. पण आपल्या ...Read More

13

अंकिलेश - एक प्रेमकथा - 13

१३ @ डाॅ.अरूणा गावस्कर त्या दिवशी डिपार्टमेंट मध्ये बसलेले. खूप दिवसांनी मुग्धाचा फोन आला. मुग्धा नि मी फास्ट फ्रेंड्स. बहिणी जणू. आम्ही दोघींनी फार्म्याकाॅलाॅजी पोस्ट ग्रॅज्युएशन एकाच वेळी केलं. दोघीही नायर हाॅस्पिटलात लेक्चरर म्हणून लागलो. माझी सुरेन्द्रशी गाठ पडली, तिची नरेन्द्र देशपांडेशी! गंमत म्हणजे सुरेन्द्र नि नरेन्द्र दोघे मामे भाऊ! इथवर आमचे आयुष्य समांतर म्हणावे असे चाललेले. मग मुग्धा केईएमला शिफ्ट झाली ए.पी. म्हणून. मी राहिले नायर हाॅस्पिटलला. सुरेन्द्रच्या भावाची बायको म्हणून वहिनी, नणंद वगैरे काही म्हणण्यापेक्षा मी मुग्धाला मैत्रीणच जास्त मानते. माझे निरीक्षण असेय ना, की मैत्रीत जनरली आपण एक दुसऱ्याला स्पेस जास्त देतो. नातेसंबंध आले की अपेक्षा ...Read More

14

अंकिलेश - एक प्रेमकथा - 14

१४ @ अखिलेश अंकिताला दर आठवड्यात भेटण्याचा मस्त प्लॅन तयार झाला म्हणून मी खूश झालो. कैलास त्या दिवशी कँटिनमध्ये वाट पाहातच होता. म्हणजे तो शादी किसीकी भी हो.. अपना दिल गाता है म्हणायचा. "तो क्या? उनसे मुलाकात हुई? बादमें जाने क्या हुवा? न जाने क्या बात हुई?" "नाटक चांगले होते.." "डोन्ट टेल मी, तू नाटक बघायला गेलेलास! उगाच ताकाला जाऊन भांडं लपवतोय.. चेहऱ्यावर स्पष्ट दिसते सारे.. चेहरा एक आइना होता है.. और हम उसका मुआइना करते हैं. तुरंत अंत.." "गप रे.." "या चार लाइन्स ऐक.. मग गपतो.. नाटक देखने के बहाने मैं चुपकेसे आया दरपर तेरे वापस तो आया ...Read More

15

अंकिलेश - एक प्रेमकथा - 15

१५ @ डाॅ.सुरेन्द्र गावस्कर टू टेल यू.. अस्थाना येऊन गेले नि माझी एक चिंता मिटलेली. केतन इज अ व्हेरी बाॅय. हुशार आणि अँबिशियस, ॲस्पायरिंग. आणि परफेक्टली फिट फाॅर माय गर्ल. अबोव्ह धिस, मुळात श्रीमंत! माय प्रिन्सेस विल आॅटोमॅटिकली रूल द अस्थाना'स किंग्डम! किंग्डम म्हणजे एखाद्या उद्योगपतीचे वगैरे असते तसे नाही. डाॅ.अस्थाना इज अ सीनियर अँड रिस्पेक्टेड डाॅक्टर विथ अ रोअरिंग प्रॅक्टिस. सो दे हॅव देअर ओन सेट अप अँड आॅल. अंकिताला हे सर्व मिळेलच. अँड माय प्रिन्सेस इज बाॅर्न टू रूल! अस्थाना लोकं येऊन गेले.. अस्थाना इज अ थरो जंटलमॅन. केतनची आई लवकरच गेली. अस्थानांनी एकट्याने सारे सांभाळून घेतलेले. ...Read More

16

अंकिलेश - एक प्रेमकथा - 16

१६ @ अंकिता दॅट सायकलिंग आयडिया वाॅज अ मास्टरस्ट्रोक! अख्खि इज अ जिनियस! एनी वे वीक डेज मध्ये वेळ नसताच कधी. संडे के संडे म्हणत अख्खि भेटतोच. म्हणजे एकदा त्याच्या सवयीनुसार तो हे गाणे म्हणालाच.. मी निघताना म्हणाले, सी यू नेक्स्ट संडे.. तर हा म्हणतो .. मेरी जान आना संडे के संडे! त्यातले मेरी जान हे शब्द त्याच्या तोंडी आले खरे, पण त्यानंतर त्याने जीभ चावली.. काही असो मला ते कळलेच! आणि आवडले ही. त्यामुळे अजून एक गोष्ट झाली. ती म्हणजे संडे डायरी! मी त्यानंतर सुरू केले ते दर रविवारी नोट्स काढल्यासारखी डायरी लिहायला. आमचे बोलणे काय झाले, व्हाॅट ...Read More

17

अंकिलेश - एक प्रेमकथा - 17

१७ @ अखिलेश एकूण माझी लक्षणं काही फार चांगली नव्हती. म्हणजे माझी ती दोन्ही मने हल्ली वारंवार बाहेर येऊन करायला लागलेली. एकाला अंकिताचा मोह आवरेना. दुसऱ्याला पहिल्यास पटवून देणे जमेना. तरीही शनिवार संध्याकाळी वाटे अंकिताला फोन करावा नि सांगावे, उद्या सकाळी येत नाही म्हणून. पण शेवटी पहिले मन जिंके. नि दर रविवारी सायकल आपोआप ग्राउंडकडे वळे. अरविंदाची सायकल बिचारी कामी येई बहुतेकदा. पण कधी शक्य नसल्यास एका दुसऱ्या मित्राकडून सायकल मिळेच. हुशार नि निरीक्षण शक्ती तीक्ष्ण असणाऱ्या अंकिताच्या निरीक्षणातून ही गोष्ट सुटतेय कसली? मला आठवतं, आमच्या डिस्कशन्स मध्ये पेशंट एक्झामिनेशनबद्दल आम्ही बोलायचो. त्यात इन्स्पेक्शन म्हणजे बाह्य निरीक्षण खूप महत्वाचे. ...Read More

18

अंकिलेश - एक प्रेमकथा - 18

१८ @ डाॅ.अरूणा गावस्कर अखिलेश साळवी! आमच्या भावी जावयाचे नाव. डाॅ.अखिलेश साळवी खरं तर. ॲस्पायरिंग सर्जन तेव्हा. आता सुपरस्पेशालिस्ट खरं सांगते, म्हणजे आता हे सांगायला आॅकवर्ड वाटते पण शेवटी मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता. आणि त्यासाठी मला पहिल्यांदाच सुरेंद्रशी भांडावे लागणार होते. मुग्धाने सांगितलेले अखिलेशबद्दल ते ऐकूनही थोडे मन धास्तावत होतेच. काही असो झाले ते असे झाले हे खरे. एका आईच्या मनाची घालमेल ध्यानी घेतली तर कदाचित यात काही चुकीचे वाटायचे नाही. पण आज विचार करताना वाटते, अंकिताने दुसरा कोणी, म्हणजे श्रीमंतांच्या घरचा, मुलगा निवडला असता तर मी हे असे केले असते? कदाचित नाही. अगदी मनापासून वाटते ते हेच. म्हणजे ...Read More

19

अंकिलेश - एक प्रेमकथा - 19

१९ @ अखिलेश सेकंड इयरचा रिझल्ट! अपेक्षेप्रमाणे अंकिताला चारही विषयात डिस्टिंक्शन. मला तिची तयारी नि हुशारी जवळून ठाऊक होती. परीक्षेचा खरा अजून एक फायदा होता, आम्हा दोघांनाही एकच सेंटर आलेले, विल्सन काॅलेज, चौपाटीवरले. त्यामुळे चार दिवस लागोपाठ एक्झाम सेंटरवर ती भेटत होती. काही नाही तर ती दिसली, निघताना जुजबी बोलणे झाले की बरे वाटायचे. शेवटच्या दिवशी समुद्रावरचा गार वारा खात गिरगाव चौपाटीवर भटकणे झाले. तिची तयारी पाहून तिला चारही विषयांत डिस्टिंक्शन मिळणार हे मला तेव्हाच लक्षात आलेलं. अख्ख्या मुंबई युनिव्हर्सिटीत असे एकूण चार पाचच जण. त्यामुळे हिच्या डिस्टिंक्शन्सचे बिल 'बडे बाप की इकलौती बेटी' वर फाडले जाणार हे माहितीच ...Read More

20

अंकिलेश - एक प्रेमकथा - 20

२० @ अंकिता एखाद्या हिंदी सिनेमात आधी काॅमेडी दाखवतात मग अचानक सीन बदली होऊन रडारड सुरू होते.. तसेच काहीसे दिवशी झाले! दिल्ली दरबारातली ती माझी रिझल्टची पार्टी. त्यात अख्खिबरोबरची संडे दुपार. आम्ही चार पाच तास बरोबर होतो. वुई वेअर हॅपी. अख्खि वाॅज ॲट हिज बेस्ट .. म्हणजे त्याच्या काॅमेडी कमेंटस्, ड्राॅप अ वर्ड ॲंड ही कॅन स्टार्ट अ साँग.. वगैरे. आय वाॅज आॅन द टाॅप आॅफ द वर्ल्ड! तसे आमचे फाॅर्मल प्रपोझ वगैरे झाले नव्हते पण त्या षण्मुखानंदातील नाटकासारखे व्हावे की नाही? न बोलता गोष्टी कळाव्यात की नाही? व्हाय डू वुई नीड टू पुट एव्हरीथिंग इन वर्डस? काही असो, ...Read More

21

अंकिलेश - एक प्रेमकथा - 21

२१ @ अखिलेश दिल्ली दरबारातून परतलो.. शाही मेजवानीनंतर! रविवार असल्याने बसला गर्दी नव्हती. ते ठीक, पण ट्रॅफिक नसल्याने बसला ही कमी लागला! अंकिता घरी गेली. मी आपल्या घरी. येत्या आठवड्यात सेकंड सर्जिकल टर्म सुरू होतेय. मी सर्जिकल दास तोंडपाठ करून ठेवलेय. आता एक एक चाप्टर करत लव्ह अँड बेलीचे सर्जरी टेक्स्टबुक संपवायला हवे.. इतके जाडजूड पुस्तक. त्यात मध्ये मध्ये छोट्या अक्षरात काही महत्वाची माहिती.. इतके सारे वाचावे नि लक्षात कसे ठेवावे? आज लक्षात येते ते हेच, वाॅर्डात प्रत्यक्ष पेशंट बघत काम केल्याशिवाय मेडिसिन आणि सर्जरी शिकताच येत नाही. पुस्तके वाचून डाॅक्टर बनता येत नाही पण पुस्तके वाचल्याशिवाय ही बनता ...Read More

22

अंकिलेश - एक प्रेमकथा - 22

२२ @ अंकिता दोनतीन दिवस मी कशीबशी थांबले नि शेवटी माझा संयम संपला. अख्खिला काहीही करून भेटायलाच हवे, त्याच्याशी हवे. पण मी त्याला प्रपोझ करावे? नाॅट दॅट आय कान्ट डू दॅट पण तो खरंच तयार असेल ना? व्हाॅट इफ ही सेज यस जस्ट बिकाॅज ही कान्ट हर्ट मी? नाही, ही हॅज टू प्रपोझ! आणि तो ते कसे करेल? गेल्या काही दिवसांचा स्ट्रेस एवढा होता की तो विचार करूनही मला रडू यायचे. त्यात त्या दिवशी अखिलेश दिसला नि आय कुडन्ट कंट्रोल मायसेल्फ. हाच तो.. ज्यासाठी आयॅम क्रेझी.. लुझिंग माय स्लीप.. आपोआपच ते गाणे आले मनात, धिस इज व्हाय धिस गर्ल ...Read More

23

अंकिलेश - एक प्रेमकथा - 23

२३ @ डाॅ.अरूणा गावस्कर माझी अंकिता घरी आली तेव्हा मी खूप आनंदात होते. मुग्धाचा फोन आला.. अंकिता केव्हा न केईएम मध्ये अखिलेशला भेटायला जाणार हा माझा अंदाज खराच होता. मुग्धाला सांगूनच ठेवलेलं तसं. तसा सगळ्यांचा ट्रॅक ठेवणं कठीण पण त्या दिवशी क्रिकेटची मॅच, तिथे अंकिता येण्याची शक्यता आहे म्हणून जास्त लक्ष ठेव म्हटलेलं. आणि मुग्धाला ती ग्राउंडवर पहिल्याच लायनीत सापडली! आणि मॅच नंतर अखिलेशने तिला अंगठी घालून सर्वांसमोर केलेले प्रपोझ! त्याआधी अंकिता किती रडलेली वगैरे वृत्तांत नंतर मला अखिलेशने सांगितलाच.. नंतर म्हणजे.. मुग्धाला सांगून मी अखिलेशला घरी भेटायला बोलावले. सुरेंद्रची काॅन्फरन्स होती, त्यामुळे तो नसल्याने सर्व लायनी क्लियर होत्या! ...Read More

24

अंकिलेश - एक प्रेमकथा - 24

२४ @ अंकिता माझे रूटीन सुरूच होते. तीच लेक्चर्स.. तेच वाॅर्डस, राउंड्स, इमर्जन्सिज, क्लिनिक्स.. आणि अभ्यास पण! मान वर बघायला वेळ हवा ना! त्यात एक बरं होतं, अख्खि फ्रंट आता सेटल्ड होता. दर रविवारचे सायकलिंग आमचे सुरू होतेच कारण बाकी दिवशी वेळ कुठे मिळणार. त्या एक तासात पूर्ण वीक बद्दल बोलून घ्यायचे. आता 'त्या' प्रपोझल नंतर बोलण्याचे विषयही बदलले आमचे. अर्लियर दे वेअर इन जनरल.. नाऊ दे वेअर स्पेसिफिक! म्हणजे कदाचित म्युच्युअल ॲडमिरेशन सोसायटी म्हणा! बट अख्खि'ज रिअल ॲडमायरर वाॅज.. अँड इज, माय माॅम. ममा आजही म्हणते, देवास ठाऊक तुला दुसऱ्या कुणी कसे सांभाळले असते? मी म्हणाले तिला, मग ...Read More

25

अंकिलेश - एक प्रेमकथा - 25

२५ @ अखिलेश उस प्रपोझलकी आवाज बहुत दिनोंतक गुंजती रही कँपस मे! त्या' प्रपोझल नंतर मी काॅलेजातला जणू हीरो मला अशा प्रसिद्धी झोताची सवय तर नव्हतीच, आवड तर मुळीच नव्हती. आजही नाही. इकडे मुलं दिलका हाल कसा सांगावा याबद्दल डोकेफोड करत असताना मी असे काही रोमँटिक करावे.. काॅलेजातली पोरं वेअर इंप्रेस्ड! दोन चार पोरांनी तर मी कन्सल्टिंग प्रपोझालाॅजिस्ट असल्यासारखे मला नवनवीन पद्धती सुचवण्याबद्दल विचारले! मी त्यांना काय सांगणार होतो? मी त्या दिवशी जे केले.. खरेतर माझ्याकडून त्या दिवशी जे झाले.. ते न ठरवता अगदी स्पर आॅफ द मोमेंट झालेले. अंकिताला त्या दिवशी दिलेले प्राॅमिस.. आणि तिला त्या टेन्शनमधून बाहेर ...Read More

26

अंकिलेश - एक प्रेमकथा - 26

२६ @ डाॅ.सुरेन्द्र गावस्कर आय टेल यू, आय ॲम सो प्राऊड आॅफ माय डाॅटर. यस,अंकिता हॅज पास्ड हर फायनल्स फ्लाइंग कलर्स! दॅट्स समथिंग वर्थ सेलिब्रटिंग! मला वाटलंच होतं, अंकिता मोठी होणार. शेवटी मुलगी कोणाची आहे! आता ती डाॅक्टर अंकिता झालीय! आता एक वर्षाची इन्टर्नशिप.. मला वाटतं तिने माझ्यासारखे जनरल मेडिसिन करावे, शी इज गुड इन इट. पण तशी ती सगळ्याच विषयांत चांगली आहे. पण अंकिताला तिच्या मम्मीसारखे फार्म्याकाॅलाॅजी आवडते म्हणे. ती त्यातही जाईल पुढे. पण खरी माझी चिंता आता सुरू होतेय.. केतन अस्थाना हातचा गेला.. जाऊ देत. अंकिताला काय मुलांची कमी? फक्त तिला तो जो कोणी असेल त्याने नीट ...Read More

27

अंकिलेश - एक प्रेमकथा - 27

२७ @ डाॅ.अरूणा गावस्कर शेवटी द टाॅम कॅट वाॅज बेल्ड! म्हणजे सुरेन्द्रच्या डोक्यात ती अखिलेशची माहिती मी घातली! अगदी साधून. परीक्षेला काही आठवडे होते, त्यात सुरेन्द्र काही गडबड करणार नाही याची खात्री होती. नि परीक्षा होईतोवर बराचसा तो निवळेल.. कमीत कमी पूर्ण विचार तरी करेलच.. मी त्याला ओळखते चांगली. माझा अंदाज चुकायचा नाही! पण त्या आधी त्याने काय काय गोंधळ घालावा? केतन काय हातातून गेला जशी जगातील सारी मुले संपलीत. ही वाॅज सो डिस्टर्बड्. मग तो कुठला तरी डाॅक्टर्स मॅरेज ब्युरो! त्यातून आली चार दोन स्थळं. पण ह्याच्या क्रायटेरियात बसतील तर! खरे तर बरेच झाले नाही फिट बसले ते! ...Read More

28

अंकिलेश - एक प्रेमकथा - 28

२८ @ डाॅ.सुरेन्द्र गावस्कर आचार्य भास्कराचार्य पंडित. तेव्हा वय वर्षे ८५. माझे गुरू. म्हणजे मी तसा आध्यात्मिक नाही. देव देवळांमागे जाणारा नाही. समोर जित्याजागत्या पेशंटपुढे मला इतर काही दिसत नाही. अगदी तरूणपणी, म्हणजे माझ्या वडलांचे आचार्य पंडित हे गुरू होते. वडलांचा कल अशा स्पिरिच्युअल बाबींकडे फार होता. बिचारे यात मश्गुल राहिले नि देशोधडीला लागले असे मला वाटायचे तेव्हापासून. मग मी ते सारेच आयुष्यातून बाद करून टाकले. पण बाबांचे गुरू म्हणून पंडितांबद्दल मला नितांत आदर. कारण एकच, पंडित गुरूजी कधीच त्यांच्या ज्ञानाचा वापर चुकीचा करत नसत. नाहीतर भविष्य कथन म्हणजे एक मानसिक खेळ.. समोरच्याच्या मानसिकतेचा फायदा उठवण्याचा. तुला लोक समजून ...Read More

29

अंकिलेश - एक प्रेमकथा - 29

२९ @ अंकिता थर्ड इयर थर्ड टर्म! सगळ्यात टफ एक्झाम. मी इकडे तिकडे न पाहता अभ्यास एके अभ्यासावर लक्ष केलेलं. पण तरी बॅकग्राउंडवर पपांच्या ॲक्टिव्हिटीज लक्षात येत होत्याच. कोणत्या त्या ब्युरोमधून मुलांची माहिती काढत होते, मध्ये मध्ये मम्मी आणि त्यांची डिस्कशन्स चालत होती. लक्षात येत होते ते एक, पपांच्या यातील कोणीच पसंतीस पडत नव्हते. एक्झाम संपली. ममाने अख्खिला घरी बोलावलेले ते ही पपांना सांगून. ममा इज ग्रेट. कारण तिने अखिलेशबद्दल स्वत:च पपांना सारे सांगून टाकलेले. आता पुढे काय? पपांनी मग एक दिवस अखिलेशलाच इंटरव्ह्यूला बोलावले.. मी म्हटले त्याला,"कँडिडेट शुड ॲपिअर फाॅर द इंटरव्ह्यू फाॅर द पोस्ट आॅफ अंकिता गावस्कर्स ...Read More

30

अंकिलेश - एक प्रेमकथा - 30

३० @ अखिलेश ती अंकिताच्या घरची 'होम व्हिजिट' झाली. डाॅ.गावस्कर एकदम जेन्युईन वाटतात. त्यांच्या म्हणण्यात तसं तथ्य आहे. शेवटी चालते ती पैशांवर. फक्त एक आहे, जोवरी पैसा तोवरी बैसा म्हणणारे आपले कधीच नसतात. नि आयुष्यात आपल्या माणसांशिवाय दुसरे काय आहे? मला ते वाक्य आठवले, द रीच लाईफ हॅज नथिंग टू डू विथ मनी. थोडक्यात 'इट्स आॅल इन मनी, हनी!' आणि त्याचवेळी 'नथिंग टू डू विथ मनी' एकाचवेळी खरंय हेच खरं! दुधारी तलवारी सारखं! किंवा नसून अडचण.. असून नो ग्यारंटी आॅफ हॅपिनेस असे असावं. तरीही मला डाॅक्टर गावस्कर आवडले. मुख्य म्हणजे ते सदैव डाॅक्टरकीच्याच भूमिकेत वावरतात असे वाटते. डेडिकेशन टू ...Read More

31

अंकिलेश - एक प्रेमकथा - 31

३१ @ अंकिता त्या दिवसानंतर अख्खि आणि माझ्या रिलेशनशिपला एक सँक्शन मिळाले. पपांनी कितीही नाही म्हणत होईना, परमिशन तर नंतर एकदा मला पंडित गुरूजींबद्दल कळले, म्हणजे पंडित गुरूजी हॅड टोल्ड डॅड दॅट धिज वाॅज गोइंग टू हॅपन एनी व्हिच वे! अर्थात हे सांगायला कोणी फाॅर्च्युन टेलर कशाला हवा? मला ही ते ठाऊकच होते! बट देन आय वाॅज हॅपी दॅट पंडित गुरूजी हॅड बेल्ड द कॅट! मी अख्खिला हे म्हणाले, तर अख्खि न्यू भास्कराचार्य पंडित. रादर पंडित गुरूजी न्यू अखिलेश वेल. खरंतर वेल इनफ टू टेल डॅड अबाऊट हिम! थोडक्यात झालं काय की पपा स्टाॅप्ड हिज मिशन ग्रुम फाईंडिंग आणि ...Read More

32

अंकिलेश - एक प्रेमकथा - 32

३२ @ डाॅ.अरूणा गावस्कर आयुष्याची ही गंमत असावी. आज गंमत शब्द वापरतेय मी.. तेव्हा इट वाॅज टफ. म्हणजे एका आनंदाचे अश्रू आले की दुसऱ्यात संकटामुळे पाणी यायलाच हवे असा माझ्या बाबतीत नियतीचा काही नियम असावा की काय? माझे सुरेन्द्रशी लग्न ठरले.. सगळे ठरवले त्यानंतर लगेच सुरेन्द्रच्या वडलांनी इहलोक सोडावा? अंकिताच्या जन्माच्या आनंदाच्या वेळी सुरेन्द्रचा गावच्या घरावरील हक्क जाण्याचा निकाल यावा? माणसाचं मन उगाच या योगायोगांमध्ये लिंक जोडत असतं. पण इजा बिजा नंतर तिजा अशा वेळी व्हावा? ते ही अंकिताबाबत? सुरेन्द्र मोठ्या मुश्किलीने तयार झालेला तिच्या लग्नाला, त्यात त्याच्या भास्कराचार्य पंडित गुरूजींचा सल्ला महत्वाचा होता. माझ्यासाठी अखिलेश अंकिताला सांभाळेल याची ...Read More

33

अंकिलेश - एक प्रेमकथा - 33

३३ @ अंकिता दॅट पॅच चेंज्ड एव्हरीथिंग फाॅर मी ओव्हरनाईट. इमॅजिन, पूर्ण स्कीन अशी डिसकलर्ड होणार. वेगवेगळ्या रंगांचे डाग, तोंडावर.. फाॅर अ यंग गर्ल इमॅजिन द सायकाॅलाॅजिकल ट्राॅमा. अँड आय वाॅज टू गेट मॅरीड.. तो डाग येण्याच्या आदल्याच दिवशी, इट वाॅज माय बर्थ डे. म्हणजे सेलिब्रेशन टाइम. शिवाजी पार्कात फिरणं, मग जिप्सीत पिझ्झा नि शिवाजी मंदिरात नाटक! इट वाॅज अ मराथी ड्रामा. नाव आठवत नाही. द लेडी डेव्हलप्स लेप्रसी. लेप्रसीला इतका स्टिग्मा आहे; शी गेट्स ॲबँडन्ड. तिचे स्वत:चे नातेवाईक तिला ॲक्सेप्ट करत नाहीत. अगदी हर ओन हजबंड. लेप्रसी काही तसा मोठा आजारच नाही. वेळेवर इलाज केला तर पूर्ण बरा ...Read More

34

अंकिलेश - एक प्रेमकथा - 34

३४ @ अखिलेश असं म्हणतात, चोरी कशी ही करा, तिला वाचा फुटतेच. मग चोर किती ही हुशार का असेना. तसा मी चोर नव्हतो. पण प्रेम म्हटले की चोरटेपणा आलाच त्या पाठोपाठ. पहिल्याच दिवशी आपण थोडीच सर्व जगाला सांगत असतो आपली कथा? म्हणजे सविस्तर प्रेमकथा? सर्व काही जगाशी फटकूनच. दुनिया जालीम आहे किंवा तिला ही प्रेमकहाणी पटायची वा पचायची नाही असले काही समज असतात की काय? त्यामुळे काही जवळचे मित्र सोडले तर ही बाब म्हणजे अति गोपनीय! आपण कितीही लपवले तरी ही दुरून जग आपली गंमत बघत असतेच. आपल्या नकळत. किंवा आपणच इतके गुंतलेले असतो की आजूबाजूस बघायला सवड नसते ...Read More

35

अंकिलेश - एक प्रेमकथा - 35

३५ @ अंकिता इट वाॅज टफ. स्टेइंग अवे फ्राॅम अख्खि. पण नंतर तो आलाच. आय वाॅज सो हॅपी. मला होतं तो येणारच. खरं तर तो काय बोलणार ते ही ठाऊक होतं. त्याला हे व्हिटिलिगोचं कारण पुरेसं नाही हे ही माहिती होतं. सिनेमात अशा वेळी हीरो किंवा हिराॅइन दुसऱ्याच्या मनातून उतरण्यासाठी काहीबाही ट्रिक्स करतात. मग जो दुसरा किंवा दुसरी असेल तो किंवा ती दु:खभरे गाणं वगैरे गातात. पण ना हा सिनेमा होता, ना मी हिराॅइन होते.. फक्त अख्खि माझा हीरो होता! तेव्हा असं सारं माझ्याकडून तर होणार नव्हतं. पण अखिलेश समोर आला नि माझा तो निश्चय लगेच बर्फासारखा वितळून वाहून ...Read More

36

अंकिलेश - एक प्रेमकथा - 36

३६ @ अखिलेश बिचारी अंकिता. ज्या वयात पोरींना दिसण्यातली गंमतच महत्वाची वाटायला लागते त्या वयात विद्रुप होण्याचं नशिबी आलं. कोड वाढत गेलं. नि दोन वर्षात चेहराही त्याच्या तडाख्यात आला. एकसंध रंग पांढरा झाला तर एकवेळ ठीक, पण थोडा थोडा कमी जास्त झाला की अधिक विचित्र दिसतो. दररोज उठून आज डाग कुठवर आलाय हे बघायची सवय झाली तर मनावर परिणाम होणारच. कितीही म्हणा, दिसण्यापेक्षा असणे महत्वाचे, पण ज्याला त्यातून जावे लागतं त्याची मनोवस्था कठीण आहे समजणे. लग्नाआधीच्या दोन वर्षात अंकिताला बऱ्यापैकी सांभाळून घ्यावे लागले. हळूहळू ती त्यातून सावरली. आता तर तिला त्याचे काही वाटेनासे झालेय. खरे सांगू ना तर हे ...Read More

37

अंकिलेश - एक प्रेमकथा - 37

३७ @ डाॅ.अरूणा गावस्कर त्या दिवशी अखिलेश डिपार्टमेंटमध्ये भेटायला आलेला. बिचारा परेशान झालेला. अंकिताचा पत्ता नाही. इकडे अंकिता घरात घेतल्यासारखी बसलेली. माझा अंदाज खरा होता, तिला अखिलेशवर जबरदस्ती करण्यापेक्षा त्याच्यापासून दूर जायचे होते. तिचा हा कोडाचा आजार म्हणजे अगदी नको तेव्हा टपकलेला. कसा किती पसरेल ठाऊक नसताना.. "ममा, व्हाय मी? आय ॲम नाॅट फेअर. लहानपणापासून ह्या स्कीन कलरशी ॲडजस्ट केलं. आय लर्न्ट टू गेट ओव्हर इट. आता कुठे आय ॲक्सेप्टेड इट तर हे? डायरेक्ट डिपिगमेंटेशन? हाऊ वियर्ड विल आय लुक? माझ्याच मागे का लागलेय हे सगळं?" तिच्या सगळ्या प्रश्नांना माझ्याकडे काय उत्तर होतं? स्वत: मी काही फारशी गोरी नाही. ...Read More

38

अंकिलेश - एक प्रेमकथा - 38 - अंतिम भाग

३८ @ अंकिता इतक्या वर्षांनी ही सारी कथा आठवताना परत तरूण झाल्यासारखं वाटतं. तरूण म्हणजे त्या काॅलेजच्या दिवसांसारखं. अगदी ॲट हार्ट! केअरफ्री आणि आॅलवेज लुकिंग फाॅर्वर्ड टू समथिंग. डोळ्यांत सदा स्वप्नं. करियरची नि आयुष्याची. त्यात एका मुलीच्या स्वप्नात येणार तो राजकुमार! मी तशी स्वप्नं विशेष पाहिली नाहीत. कारण घोड्यावरून कुणी राजकुमार येतो यावर माझा विश्वास नव्हताच. आणि आजकाल घोड्यावर कोण बसतं नाहीतरी! पण अखिलेशला पाहून माझ्यात काहीतरी झालं असावं. आय न्यू ही इज द वन चोझन फाॅर मी. तोच एक होता ज्यासाठी मी ते शेकिंग स्टीव्हन्सचे 'यू ड्राइव्ह मी क्रेझी' म्हणू शकत होते.. ॲज इफ आय स्टार्ट फ्लोटिंग इन ...Read More