मृगजळ

(4)
  • 12.6k
  • 0
  • 4.8k

आठ वाजून गेले होते. कामवाल्या मावशींनी अचानक सुट्टी घेतल्याने मनीषाची घाई उडाली होती. त्यात सकाळी सकाळी चुलत बहिणीचा - समीराचा - फोन आला आणि ' असशील तशी ये.. ' ह्या रडक्या आवाजातील विनंतीनंतर मनीषाला राहवलं नाही. चुलत असली तरी बहीणच होती. भांड्याची जबाबदारी आपल्या मुलीवर टाकत, थोड्याश्या सूचना देऊन ती बेडरूममध्ये पळाली. कपाटातून लागेल ती ओढणी गळ्यात टाकत तिने पर्स उचलली आणि पळतच बाहेर निघाली. सकाळची वेळ त्यामुळे निदान ऑटो वेळेवर मिळाली. पण ऑटोवाल्याचं साशंक नजरेने पाहणं तिला जास्तच खटकलं. त्याला नाही म्हटलं तर दुसरी रिक्षा मिळेपर्यंत वांधेच होते... कॅबची वाट पाहण्यात लेट होईल म्हणून तिने तो ऑप्शन टाळला. तसही ' रस्त्यात गर्दी असेल सो डोन्ट वरी ' असं स्वतःलाच समजावत तिने त्याच्या विचित्र नजरेकडे सपशेल दुर्लक्ष केलं. ऑटोवाल्याला पत्ता सांगून तिने आधी ऑफिसला सुट्टीचा मेल टाकला. आपल्या टीमला आजच्या दिवसाचा टास्क व्हाट्सअँप टाकून ती जरा रिक्षात टेकून बसली. सकाळ असल्याने रस्त्यावर ट्राफिक होतंच. तसं पाहायला गेलं तर दोन्ही बहिणींची घर अर्ध्या तासाच्या अंतरावर पण चार रस्त्यावरच्या सिग्नलने ते अंतर एक तासाच केलं होत. अजूनही लाल सिग्नल चमकत होता. सहजच टाईमपास म्हणून ती ही सवयीने टायमरसोबत काउंटिंग करत होती आणि अचानक तिच्या डोक्यात काहीतरी चमकलं. तिची नजर आपोआप स्वतःवर गेली. स्वतःचे कपडे पाहून ती क्षणभर शरमली. डोक्यातल्या विचारांसोबत ती घरातल्या कपड्यांवरच निघाली होती. मगाशी रिक्षावाल्याचा विचित्र नजरेचा तिला लगोलग उलगडा झाला. तरी लेक निघताना काहीतरी म्हणाली होती पण.. जाऊदे. असं ठरवून दुर्लक्ष केलं तरी डोक्यातून विचार काही जात नाही. रोजच्या वापराचा धुवट लाल रंगाचा कुर्ता, काळा कॉटनचा पायजमा आणि हाताला लागलेली पण रंग लक्षात न आलेली पिवळी ओढणी.

1

मृगजळ - भाग 1

आठ वाजून गेले होते. कामवाल्या मावशींनी अचानक सुट्टी घेतल्याने मनीषाची घाई उडाली होती. त्यात सकाळी सकाळी चुलत बहिणीचा - - फोन आला आणि ' असशील तशी ये.. ' ह्या रडक्या आवाजातील विनंतीनंतर मनीषाला राहवलं नाही. चुलत असली तरी बहीणच होती. भांड्याची जबाबदारी आपल्या मुलीवर टाकत, थोड्याश्या सूचना देऊन ती बेडरूममध्ये पळाली. कपाटातून लागेल ती ओढणी गळ्यात टाकत तिने पर्स उचलली आणि पळतच बाहेर निघाली. सकाळची वेळ त्यामुळे निदान ऑटो वेळेवर मिळाली. पण ऑटोवाल्याचं साशंक नजरेने पाहणं तिला जास्तच खटकलं. त्याला नाही म्हटलं तर दुसरी रिक्षा मिळेपर्यंत वांधेच होते... कॅबची वाट पाहण्यात लेट होईल म्हणून तिने तो ...Read More