श्यामचीं पत्रें

(44)
  • 131.9k
  • 118
  • 32.5k

तूं मागें पुण्याच्या त्या सभेच्या वेळेस अकस्मात् मला भेटलास. सभा संपली होती. कांही तरुण विद्यार्थी माझ्याभोंवती जमले होते. त्यांतील बरेचजण केवळ स्वाक्षरीसाठीं उत्सुक होते. स्वाक्षरी घेऊन ते गेले. परंतु तूं घुटमळत उभा होतास. तुझ्या डोळयांत एक प्रकारची उत्कटता होती, उत्सुकता होती. मी तुझ्याकडे पहात होतों. तूं माझ्याकडे पहात होतास. जणूं डोळयांआड लपलेलें परस्परांचे रुप आपण पाहूं इच्छित होतों. तुझी-माझी पूर्वीची ओळख ना देख. परंतु त्या एका क्षणी तुझी-माझी ओळख झाली. कायमची ओळख ! आणि मी तुला प्रश्न केला. 'तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघांत आहांत का? ' तूं खाली मान घातलीस. तूं कांही बोलेनास. तुझे डोळे कसे तरी दिसले. आणि थोडया वेळानें पुन्हां तूं वर बघितलेंस. त्या बघण्यांत किती तरी भाव होते !

Full Novel

1

श्यामचीं पत्रें - 1

तूं मागें पुण्याच्या त्या सभेच्या वेळेस अकस्मात् मला भेटलास. सभा संपली होती. कांही तरुण विद्यार्थी माझ्याभोंवती जमले होते. त्यांतील केवळ स्वाक्षरीसाठीं उत्सुक होते. स्वाक्षरी घेऊन ते गेले. परंतु तूं घुटमळत उभा होतास. तुझ्या डोळयांत एक प्रकारची उत्कटता होती, उत्सुकता होती. मी तुझ्याकडे पहात होतों. तूं माझ्याकडे पहात होतास. जणूं डोळयांआड लपलेलें परस्परांचे रुप आपण पाहूं इच्छित होतों. तुझी-माझी पूर्वीची ओळख ना देख. परंतु त्या एका क्षणी तुझी-माझी ओळख झाली. कायमची ओळख ! आणि मी तुला प्रश्न केला. 'तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघांत आहांत का? ' तूं खाली मान घातलीस. तूं कांही बोलेनास. तुझे डोळे कसे तरी दिसले. आणि थोडया वेळानें पुन्हां तूं वर बघितलेंस. त्या बघण्यांत किती तरी भाव होते ! ...Read More

2

श्यामचीं पत्रें - 2

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. तूं सेवादलाची लहानशी का होईना शाखा सुरू केलीस, हें वाचून किती तरी आनंद झाला ! तुझ्या मी वाटच पहात होतों. परंतु कांही तरी प्रत्यक्ष कार्यास आरंभ केल्याशिवाय उगीच कशाला लिहा पत्र, असें जें तूं मनांत ठरविले होतंस त्यामुळें आतांपर्यत तुझें पत्र आलें नाहीं. खरें आहें. आपण खंडीभर चर्चा करतों. परंतु प्रत्यक्ष कार्य आरंभणे सर्दव दूरच राहतें. तूं तसा नाहींस ही चांगली गोष्ट आहे. ...Read More

3

श्यामचीं पत्रें - 3

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद तुझें पत्र नाही म्हणून काळजी वाटतें. पुन्हां आजारी तर नाहींना पडलास? तुझ्या वैनीची प्रकृतीहि बरी नव्हती. अधिक नाहींना बिघडली? तुला घरांत अधिक काम पडत असेल. स्वयंपाक करावा लागत असेल. वडिलांना साडेआठ वाजतांच कामावर जायचें. तुला पुन्हां लौकर शाळेत जायचें. वसंता, तूंहि माझ्याप्रमाणें लौकर मातृहीन झालास. आई नसणें म्हणजें संसारांतील, या जगांतील एका महान् सुखाला आंचवणें होय ! असो, तू धैर्यानें सर्व कांही करीत असशील, अशी मी आशा राखतो. तुझ्या वैनीला लौकर आराम पडो, अशी मी देवाची प्रार्थना करतों. प्रार्थनेशिवाय दुसरे मी येथून काय करणार? ...Read More

4

श्यामचीं पत्रें - 4

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. मी मागें एकदां एका खेडेगांवात गेलों होतों. रात्रीची वेळ होती. गांवांतील लोक कसली तरी पोथी वाचीत मी त्यांना नम्रपणें म्हटलें, 'आज काँग्रेसची पोथी वाचावयास मी आलों आहें. आजच्या दिवस तुमची पोथी राहूं दे. आज माझी ऐका.' त्यांनीं ऐकलें. मी माझें काँग्रेसचें आख्यान सुरू केलें. काँग्रेस म्हणजे माझें दैवत. देवाजवळ कोणाला मज्जाव नाहीं. देव सर्वांचा. त्याप्रमाणें काँग्रेसजवळ सर्वांना वाव आहे. सर्वांना तेथें अवसर आहे. काँग्रेस म्हणजे माझें रामनाम. मरतांना माझ्या तोंडांतून 'राम राम' असे शब्द कदाचित् नाहीं येणार. परंतु 'काँग्रेस काँग्रेस' असें शब्द येतील. आणि त्यांत काय बिघडलें? काँग्रेस सर्वांचे कल्याण करूं पहात आहे. म्हणून काँग्रेस हें देवाचेंच नांव. ...Read More

5

श्यामचीं पत्रें - 5

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. दत्तु नांवाचा एक लहान मुलगा संघ सोडून तुझ्या सेवा दलांत आला हें वाचून आनंद झाला. जातीय हिंदुस्थानचा नाश चालविला आहे. भारतीय मनाला ही कीड लागत आहे. लाठी फिरवून कवाईत करून संघातील मुलांचीं शरीरें दणकट होतील, परंतु शरीरांतील मनें विषारी होत आहेत. आपल्या संघटनेंतील मुलांच्या कानांवर नवीन विचार ते जाऊं देत नाहींत. बौध्दिक गुलामगिरी निर्मिली जात आहे ! दुनियेंतील सर्व विचारांचा व प्रयोगांचा अभ्यास करून जर कोणी एखादा मार्ग पत्कारला तर ती गोष्ट निराळी, परंतु या जातीय संघटना मुलांची बुध्दिच मारीत आहेत. त्यांच्या आत्म्याचा वध करीत आहेत. ...Read More

6

श्यामचीं पत्रें - 6

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. आज सायंकाळी आकाशांत बीजेची चंद्रकोर दिसत होती. लहानपणीं आम्ही द्वितीयेची ही चंद्रकोर पाहण्यासाठी धडपड असूं. आणि दिसली कीं, ती एकमेकांस दाखवीत असूं. सुताचा धागा त्या चंद्राला वाहून जुनें घे, नवें दे, असें नमस्कार करुन म्हणत असूं. या चंद्रकोरेची इतकी कां बरें महति? कारण ती वर्धिष्णु आहे. विकासाचा तो आरंभ आहे. कोणताहि विकासाचा आरंभ मंगल आहे. श्री. शिवछत्रपतींची जी राजमुद्रा होती तींत ' प्रतिपच्चंद्ररेखेव ' असें तिला म्हटलें आहे. शिवाजी महाराजांची ही राजमुद्रा शुक्ल पंक्षातील चंद्राप्रमाणें वर्धिष्णु आहे असें त्या श्लोकांत आहे. ...Read More

7

श्यामचीं पत्रें - 7

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. आज खूपच थंडी आहे. बाहेरच्या गुलाबावरच्या कळया नीट फुलल्या नाहींत. सूर्याची ऊब मिळेल तेव्हां त्या फुलतील. ऊब सर्वांना हवी. सूर्याचे प्रसन्न व प्रेमळ असे हात लागतांच या कळया खुदकन् हंसतील. वसंता, आज पहाटें एक मांजर थंडीत कुडकुडत होतें. तें माझ्या दाराजवळ येऊन केविलवाणें ओरडत होते. मी दार उघडलें व ते आंत आले. ते माझ्या पांघरुणांत शिरलें. मी त्याला जवळ घेतलें. तें घुरघुर करीत मला बिलगलें. प्रेमानें अनोळखी पशुपक्षीहि माणसाळतात. मग माणसें नाहीं का माणसाळणार? ...Read More

8

श्यामचीं पत्रें - 8

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. आज सकाळी मी अंगणात फिरत होतों. एक लहानसें फुलपाखरूं पडलें होते ! फारच चिमुकले होतें तें. हातांत घेतलें. तें मेलेलें होतें. तरीहि त्याचे ते चिमणें पंख किती तजेलदार दिसत होते. चिवरेबावरें असे ते पंख सौंदर्यानें भरलेलें होते. ते पांखरूं किती दिवस जगलें असेल? कदाचित् चार दिवसहि तें नाचलेंबागडलें नसेल ! इतक्या क्षणभंगुर अशा जीवनांत सुष्टीनें किती सौंदर्य ओतलें होते, किती कला ओतली होती? मग मानवी आत्मा निर्मितांना किती कला ओतली गेली असेल? मानवी आत्म्यांत किती रंग भरलेले असतील? ...Read More

9

श्यामचीं पत्रें - 9

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. हिंदुस्थानचा प्रश्न मोठा बिकट आहे. कुटिल ब्रिटिश मुस्तद्यांनी तो अधिकच बिकट करून ठेवला आहे. हिंदी संस्थानिकांची धोंड स्वराज्याच्या मार्गात सदैव उभी असते. हिंदुस्थानांतील हे बहुतेक संस्थानिक म्हणजे जगांतील एक अजब चीज आहे ! त्यांच्या लीला किती वर्णाव्या? किती सांगाव्या? ...Read More

10

श्यामचीं पत्रें - 10

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. आज तुला निराळयाच गोष्टीविषयीं लिहिणार आहे. राष्ट्रभाषेविषयीं आज थोंडें सांगणार आहे. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी स्वतंत्र होऊ पाहणा-या हिंदुस्थानला सर्व राष्ट्राची अशी एक भाषा असणें जरूर आहे. त्या त्या प्रांतांतून प्रांतीय भाषा असतीलच, परंतु अखिल भारतीय भाषा हवी. ...Read More

11

श्यामचीं पत्रें - 11

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. माझीं पत्रें तुला व तुझ्या सेवा दलांतील मित्रांना आवडतात. हें वाचून मला बरें वाटलें. मला माझी माहीत आहे. सांगोपांग ज्ञान मला नाहीं. परंतु समर्थांनी सांगितलें आहे कीं, जें जें आपणांस माहीत असेल तें तें द्यावें. काजव्यानें आपल्या शक्तींनें चमकावें. तारे आपल्यापरी चमकतील. चंद्रसूर्य त्यांच्या शक्तीप्रमाणें प्रकाश देतील. माझ्यानें राहवत नाही. भारतीय तरुणांकडे माझें मन धांवतें. त्यांना मिठी मारावी व भारताच्या ध्येयाकडे त्यांना न्यावें असें वाटतें, परंतु मी कोण, माझी शक्ति ती किती ! राहवत नाहीं म्हणून करायचें. ...Read More

12

श्यामचीं पत्रें - 12

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. मागील पत्रांतून तुला यंत्रवाद, गांधीवाद, समाजवाद, साम्राज्यवाद, फॅसिझम वगैरेंविषयी थोडें थोडें लिहिलें होतें. गांधीवाद व समाजवाद साम्य व विरोध मी दाखवीत होतों. गांधीवादी लोकांची जीं तीन तत्वें तीं समाजवादानेंहि कशीं साधलीं जातात तें मी मांडले होतें. ...Read More

13

श्यामचीं पत्रें - 13

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद, तू मला परवाच्या पत्रात अचानक एक नवीनच प्रश्र केलास. ठीक केलेंस. राष्ट्रांतील सर्व प्रश्नांची माहिती हवी. निवेदिता यांनी एके ठिकाणी म्हटलें आहे, 'तें खरें शिक्षण जें या क्षणापर्यंतच्या सर्व प्रश्नांचे सम्यक् ज्ञान देतें. जास्तीत जास्त पुढे गेलेल्या आजच्या विचारसरणीशीही गांठ घालतें.' तू वर्धा शिक्षण पध्दतीविषयी माहिती विचारलीस मला आनंद झाला. तुझ्या सेवादलांतील एका मुलानें हा प्रश्र तुला विचारला. त्याला वक्तृत्वोत्तेजक सभेंत या विषयावर बोलायचे आहे. चांगलें आहे. तुला जातां जातां एक गोष्ट सांगतों. तुमच्या सेंवादलांतील मुलांसाठी चिकट-बुकें तयार करा. इंग्रजी, मराठी वर्तमानपत्रें येत असतात. ...Read More

14

श्यामचीं पत्रें - 14

प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद. मागे तूं वर्धा योजनेविषयी विचारलेस. आज पुन्हा तूं असाच एक प्रश्न विचारला आहेस. आजकाल साहित्य व यांची चर्चा फार होत असते. हाच प्रश्न निराळया दृष्टिने मांडला तर कला व जीवन असा मांडावा लागेल. कारण साहित्य म्हणजे एक कलाच आहे. साहित्य या शब्दाचा अर्थच मुळी जें सदैव जीवनाच्यासह असतें ते. जीवनापासून वाङमयाची किंवा कोणत्याच कलेंची फारकत करतां येणार नाही. ...Read More