एका झाडाची गोची

(6)
  • 21.9k
  • 0
  • 8.6k

मकाजी महानगरपालिकेत गेला होता त्यांने तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितले की आमच्या गल्लीमध्ये जे झाड आहे त्या झाडामुळे आम्हाला यायला जायला खूप त्रास होतो. ते झाड तुम्ही पाडून टाका असा त्यांने अर्जही दिला. अथवा आम्हाला तुम्ही तसे करण्याची परवानगी द्या. असे आर्जव ही त्यांने केले. महानगरपालिकेत अर्ज देऊन मकाजी घरी आला तेव्हा त्याच्या आईने आणि पत्नीने विचारले काय झालं मिळाली कां परवानगी,? परवानगी काय अशी लगेच मिळतेय. ते म्हणाले आठ दिवस लागतील साहेब त्याच्यावर विचार करतील आणि मग तुम्हाला सांगतील. बरं आता आठ दिवस वाट बघू या. त्याची आई म्हणाली. आणि या झाडामुळे आपल्याला घरी काय वस्तू सुद्धा आणता येत नाहीत. म्हणजे वॉशिंग मशीन... कपाट.... किती अडचण होतेय. जागा कमी आहे. तिथे अरुंद गल्ली आहे. करायचं काय. तरी आई मी तुला सांगत होतो हे झाड जेव्हा लहान होते. तेव्हाच तोडून टाकूया तोडून टाकूया तर तू म्हणालीस नको तुझ्या बापाने लावले. आता काय बघ ते झाड किती अवाढव्य वाढलेय. तेही खरंच म्हणा मकाजीची आई म्हणाली.

1

एका झाडाची गोची - भाग १

मकाजी महानगरपालिकेत गेला होता त्यांने तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितले की आमच्या गल्लीमध्ये जे झाड आहे त्या झाडामुळे आम्हाला यायला जायला त्रास होतो. ते झाड तुम्ही पाडून टाका असा त्यांने अर्जही दिला. अथवा आम्हाला तुम्ही तसे करण्याची परवानगी द्या. असे आर्जव ही त्यांने केले.महानगरपालिकेत अर्ज देऊन मकाजी घरी आला तेव्हा त्याच्या आईने आणि पत्नीने विचारले काय झालं मिळाली कां परवानगी,?परवानगी काय अशी लगेच मिळतेय. ते म्हणाले आठ दिवस लागतील साहेब त्याच्यावर विचार करतील आणि मग तुम्हाला सांगतील.बरं आता आठ ...Read More

2

एका झाडाची गोची - भाग २

मकाजी, मकाजीची आई, त्याची पत्नी झाडामुळे पार मेटाकुटीला आले होते.पण त्यांचा काहीच इलाज चालत नव्हता. झाडा पुढे त्यांनी अगदी हात टेकले होते.आठ दिवसांपूर्वीच मकाजीची मुलगी झाडाच्या खोडाला अडकून पडली होती.तिला इजा झाली नव्हती.पण थोडेफार खरचटले होते. तिला मुका मार लागला होता. त्यामुळे त्याची मुलगी नार्गीमधून मधून वेदनेने कळवळत होती. नार्गीला मकाजीच्या बायकोने डॉक्टर कडे नेऊन आणले होते तरीपण तिला बरे वाटत नव्हते असे त्याची बायको त्याला म्हणत होती. मकाजी ची आई मकाजीची वर जोराने ओरडली, म्हणाली.... हा कोपऱ्यात पडलेला कोयता घे आणि जा बाहेर...ते झाड अगदी मुळापासून पासून तोडून काढ. आताच्या आत्ताच.मकाजिला सुद्धा तसेच वाटत होते. परंतु मुन्शीपार्टी वाले, ...Read More