एका सुंदर प्रभाती तो एक महागडी स्पोर्टस् कार घेवून निघालेल ..रस्ता तसा घाटातला नसला तरी फारच वळणदार ,शांत, चकचकीत पण किंचित धुक्याने वेढलेला होता ,त्याची गाडीही म्हणून संथ गतीनेच पुढे चालत होती..दुतर्फा गुलमोहर आणि बकुळीने बहरलेला तो रस्ता कधीच संपूच नये असेच वाटत होते त्याला...आणि का नाही वाटणार शहराच्या धकधकीतुन आज तो अशा शांत,निसर्ग सौंदर्याने नटलेल्या..ठिकाणी आला होता...पक्ष्यांची चिवचिवाट आणि मातीचा मृदगंध बर्याच दिवसांनी अनुभवत होता तो..,त्याने कारच्या सगळ्या खिडक्या उघडून दिल्या गाडीचं वरच छतही उघड केलं..स्टेअरींग व्हिल वरचे दोन्ही हात वर आकाशाकडे उंचाऊन एक दिर्घ श्वास घेतला..जणू असं केल्याने तोही त्या ब्रम्ह देवाने सजवलेल्या निसर्ग देवतेच्या हास्यात.. सामावून जाईल...हो हास्यच तर आहे ...हा मृदगंध..ही फुलांनी केलेली रंगांची उधळण..ही पक्षांची चिवचिव....झऱ्याची खळखळ.. आणि खोडकर वाऱ्या संग सळसळणारी ही पानं...हास्यच आहे निसर्ग देवतेच....जे...सुखवस्तूंनी सजलेल्या ईमारतींच्या गावांत..नाही....शहरांत विरून गेलय ते..पण तो का आला होता ईथं...तर त्याला काही दिवस तरी मनासारखे जगायचे होते..त्या संवेदना हरवलेल्या पण जीवलग म्हणवणाऱ्या मनुष्यरूपी यंत्रांपासून दूर.....पण माहीत होते त्याला तो जास्त काळ असा नाही राहू शकणार...म्हणूनच..आणि...म्हणूनच...ह्या नश्वर शरीराचा त्याग करून...त्यालाही ह्या हास्यात विलीन व्हायचे होते....पण...पण...काही दिवस तरी जगण्याचा आनंद घेवून..
Full Novel
ऋतू बदलत जाती... - भाग..1
ऋतू बदलत जाती........१ एका सुंदर प्रभाती तो एक महागडी स्पोर्टस् कार घेवून निघालेल ..रस्ता तसा घाटातला नसला तरी फारच ,शांत, चकचकीत पण किंचित धुक्याने वेढलेला होता ,त्याची गाडीही म्हणून संथ गतीनेच पुढे चालत होती..दुतर्फा गुलमोहर आणि बकुळीने बहरलेला तो रस्ता कधीच संपूच नये असेच वाटत होते त्याला...आणि का नाही वाटणार शहराच्या धकधकीतुन आज तो अशा शांत,निसर्ग सौंदर्याने नटलेल्या..ठिकाणी आला होता...पक्ष्यांची चिवचिवाट आणि मातीचा मृदगंध बर्याच दिवसांनी अनुभवत होता तो..,त्याने कारच्या सगळ्या खिडक्या उघडून दिल्या गाडीचं वरच छतही उघड केलं..स्टेअरींग व्हिल वरचे दोन्ही हात वर आकाशाकडे उंचाऊन एक दिर्घ श्वास घेतला..जणू असं केल्याने तोही त्या ब्रम्ह देवाने सजवलेल्या निसर्ग देवतेच्या ...Read More
ऋतू बदलत जाती... - भाग..2
ऋतू बदलत जाती.......२. खूप सुखी होती ती ...,ति, तिची सावी आणि अनि सर्व काही क्षणार्धात बदलले.. आता पुढे... परत ती आजीच्या रुममध्ये आली.. "आजी.. आजी उठा माझ्या सावीला घ्या ...आजी" तिने तिचं डोकं त्यांच्या मांडीवर ठेवलं, तिकडे सावी अजूनही रडत होती.. आजीला काय झालं कुणास ठाऊक त्या उठल्या, टेबलावरचे त्यांचे ऐकण्याचा मशिन कानात घातले.. आणि.. त्या गेल्या.. सावीच्या रूम कडे गेल्या.. कदाचित.. तिचा आवाज त्यांच्या कानापर्यंत तर नाही पण मनापर्यंत नक्कीच पोहोचला असेल.. त्यांनी दरवाजा ठोठावला, अजून ठोठावला आता त्यांनाही आतून सावीच्या रडण्याचा आवाज येत होता. "सुवर्णा ..सुवर्णाऽऽ.. लवकर दार उघड.."आजी आजीचा आवाज ऐकून आतली ती मुलगी लगबगीने पळतच ...Read More
ऋतू बदलत जाती... - भाग..3
ऋतू बदलत जाती....३ " तुम्हाला मी दिसते ..माझं बोलणं ऐकू जातं,...फक्त तुमच्या थ्रु मला माझ्या अनि शी बोलायचंय... त्याला की मी तुझ्या जवळच आहे.. बस माझ्या सावी ची काळजी घे ... एवढ्या साठी कराल ना माझी मदत तुम्ही ..."शांभवी आता पुढे..... " ओके...मग त्या पुढे काय करायचं ठरवलं आहे तूम्ही.."क्रिश "पुढे काय करायचं ...त्याला माहिती राहील की मी त्याच्या आसपास आहे ...मी त्यांच्या दोघांचा आसपास राहील... राहू आम्ही असेच...."शांभवी " तुम्हाला का मला... पूर्ण आयुष्यभर तुमचा ट्रान्सलेटर म्हणून जॉब वर ठेवायचा आहे की काय..."क्रिश जरा हसला. "नाही ..नाही फक्त आता तुम्ही माझ्यासोबत चला... त्यांना सांगा की मी इथेच आहे ...Read More
ऋतू बदलत जाती... - भाग..5
ऋतू बदलत जाती.....५ "तुमचं प्रारब्ध जुळलेलंय...एकाशीच....कधी सोबत .....कधी एक एक करून...."महेशी आठवत बोलली. "आणि तेच साधू...काल घरी आले होते..."क्रिश बोलला. *** आता पुढे..... "हो काल तेच साधू आम्हाला भेटले होते.. भेटले होते म्हणण्यापेक्षा ..ते दारात अचानकच प्रगट झाले ... म्हणजे दरवाजातूनच आले ...पण अचानक .....आम्ही सुवर्णा विषयी बोलत होतो तेव्हा ..."शांभवी चे शब्द क्रिशच्या मुखातून निघत होते.एका अनुवादकाचे काम तो निट करत होता. "कोण सुवर्णा...."महेशी क्रिश ने एक दीर्घ श्वास सोडला आणि हळूहळू शांभवीच्या एक्सीडेंट ची आणि त्याच्यानंतर ची कहाणी महेशीला सांगितली. "काय ...! माझ्या शांभवी सोबत एवढं सर्व घडून गेलं... आणि मला माहितीच नाही ..."परत महेशी रडायला लागली. ...Read More
ऋतू बदलत जाती... - भाग..6
ऋतू बदलत जाती...६ "जशी तुमची इच्छा...."म्हणत जानकी मात्र पुढे चालू लागली .आणि तो पाठीमागे वाघाला खेचत...आणि त्याच्या पाठी वैदेही... आता पुढे.... जंगलातून वाट काढत ते पुढे जात होते अजूनही पहाट व्हायला बराच वेळ होता. "हे वीर... आम्हाला तुमच्याबद्दल बरेच कुतुहल जाणवत आहे... तुम्ही सांगू शकाल का तुमच्याबद्दल ..?.. वैदेही बोलली ती त्याच्या मागून चालत त्याच्या देहबोलीचे निरीक्षण करत होती. "आम्ही राघवेंद्र.. सोनगडचे जेष्ठ राजपुत्र तो पुढे बघतच बोलला.." जणू जानकिला त्याला त्याची ओळख सांगायची आहे. "ओह तुम्ही ....!... शुरवीर राघवेंद्र ज्यांच्याबद्दल कुलगुरू आम्हाला नेहमी सांगतात..सोनगडचे भावी सम्राट...."वैदेही आश्चर्याने खूष होत बोलली. "मला ज्ञात नाही ..कुलगुरूंनी तुम्हाला आमच्याविषयी काय सांगितले.. ...Read More
ऋतू बदलत जाती... - भाग..7
ऋतू बदलत जाती...७ " हा तुमचा हट्ट आहे तर... पण लक्षात ठेवा जानकी... आता आम्ही तुमचे ऐकतो आहोत.... पण तुम्हाला आमच्या आयुष्यात आणायची संधी चालून येईल... तेव्हा आम्ही तुम्हाला आमच्यापासून दूर नाही राहू देणार... आणि मी आशा करतो तुम्ही माझी वाट बघाल.." आणि तो मोठे मोठे पाऊल टाकत तेथून निघून गेला .पण झाडाच्या आडोशाला उभे राहून त्याच्या पाठीमागे आलेले वैदेहीने हे सर्व ऐकले होते.... *** आता पुढे... वैदेही तशीच सुन्न होवून परत आली आणि आपल्या कुटीत जावून बसली..तिच्या संवेदना जणू संपल्या होत्या..त्याचं एक न एक वाक्य तिच्या कानात घुमत होतं... "आमचं ह्रदय भृंगा बणून तुमच्या भोवती रुंजी घालतेय...आम्ही तुमच्याशिवाय ...Read More
ऋतू बदलत जाती... - भाग..8
ऋतू बदलत जाती...८ राजकुमार राघवेंद्र नुकतेच एक लढाई जिंकून परत आले होते. सकाळी त्यांचे जंगी स्वागत झाल्यावर ,संध्याकाळी होत पारिवारिक वार्तालापात त्यांच्या पिताश्रींनी त्यांना ठणकावून सांगितले... "आम्हाला विचार करण्यास थोडासा वेळ द्यावा..."राघवेंद्र. "तुमच्याकडे एक मास आहे... विचार करून कळवा..."महाराज. *** आता पुढे... असाच आठवडा निघून गेला ,अजूनही राघवेंद्र ने काही निर्णय घेतला नव्हता, ना त्या राजकुमारींचे चित्र बघितले होते, ज्यांची स्थळे त्यांना आली होती. तेव्हाच एक शिपाई त्यांच्या कक्षात वर्दी देऊन गेला. "युवराज तुमच्यासाठी सोमगडचा एक हेर एक संदेश घेवून आला आहे ..."शिपाई. "पाठवा त्याला आत... "राघवेंद्र ला वाटत होते, कदाचित जानकिचा काही संदेश असेल .तो घाईत कक्षामध्ये येरझाऱ्या ...Read More
ऋतू बदलत जाती... - भाग..9
ऋतू बदलत जाती....९ क्रिश च्या तोंडून साधुनी सांगितलेली ही कथा ऐकून महेशी अदीती स्तंभित झाल्या. महेशीने परत आपल्या खांद्यावर ,जणू बाजूने शांभवी तिच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली असेल या आशेने.. "शांभवी तु वैदेही असशील आणि मी जानकी असेल तर तुझे उपकार मी जन्मोजन्मी विसरणार नाही.. धन्य आहेस वैदेही.. धन्य आहेस तू शांभवी.."महेशी. "खरंतर धन्यवाद मी तुझेच मानले पाहिजे होते... कोण आपल्या प्रेमात दुसऱ्याला वाटेकरी करून घेते.. पण तू केलस.. मला माझे प्रेम मिळवून दिले जानकी... माझी महेशी.."शांभवी. ******* आता पुढे... महेशी ला ते ऐकू गेले नाही पण क्रिश ने तिला सांगितले ते... "शांभवी मला तुला एक गोष्ट सांगायची आहे... ...Read More
ऋतू बदलत जाती... - भाग..10
ऋतू बदलत जाती....१०. ऋतू बदलत जाती... "एवढ्या दिवसांमध्ये तुला नाही आवडला का तो..??" शांभवी. त्या वाक्य सरशी महेशीची नजर झुकली. "अच्छा.. म्हणून तू माझ्या लग्नाच्या आधीच निघून गेली होती का?.." शांभवीचे शब्द क्रिश बोलत होता पण आता जणू त्या दोघींच बोलत आहेत असे वाटत होते. ***************** आता पुढे.... तेवढ्यात सावीच्या रडण्याचा आवाज आला.. शांभवी आणि महेशी पळतच अनिकेतच्या रूमकडे गेल्या . शांभवी मध्ये गेली, पण महेशीचे पाय मात्र बाहेरच थांबले .शांभवी घेऊ शकत नव्हती, महेशी आत जाऊ शकत नव्हती आणि समोर अनिकेत तीला हातात हलवून हलवून उगी करण्याचा प्रयत्न करत होता, जे त्याला जमत नव्हते. शांभवी महेशी कडे बघत ...Read More
ऋतू बदलत जाती... - भाग..11
ऋतू बदलत जाती....११. "हा कुठे...?? तु..तिला माझ्या मदतीसाठी थांबवले ना??"महेशीने भुवया उंचावल्या. त्याने केसांतून हात फिरवला. "ठिक आहे जा गालात हसली. "अरे पण..कुठे..."अदीती अजूनही तिथेच होती. " त्या पोलीसांकडे...."क्रिश. **** आता पुढे... घरात आता फक्त आजी ,सावी आणि महेशीच होती. "महेशी बेटा दुपारच्या जेवणाला काय बनवायचं.."आजी. "आजी तुम्हीच सांगा ना काय बनवू... अ...अनिकेत येणार आहेत का जेवायला..??."महेशी. " तो जेवायला घरी येत नाही ..ड्रायव्हरच्या हातात डबा पाठवावा लागतो.. पण शांभवी गेल्यानंतर तो डबा ही नीट खात नाही तसाच परत येतो..."आजी. "हम आज नाही येणार ..."महेशी काहीतरी विचार करत बोलली. " तसच होवो..मी जरा माझ्या माळा करून घेते सावी झोपली ...Read More
ऋतू बदलत जाती... - भाग..12
ऋतू बदलत जाती....१२. "आजीने फोन स्पीकर वर टाकला होता त्यामुळे महेशिला हे ऐकू गेले. अनिकेत काय बोलला होता ते तिलाही हायसं वाटलं..संध्याकाळी परत तिला त्याच्या आवडीचं काहीतरी बनवायचं होतं. जेणेकरून तो संध्याकाळीही पोटभर जेवेल.. तिला आठवलं एकदा तो म्हटला होता मेथीची डाळ घातलेली कोरडी भाजी त्याला खूप आवडते, थोडीशी गुळचट चवीची मात्र.. त्याची आई बनवायची तशी. पण आई गेल्यावर त्याने ती भाजी खालीच नव्हती .कारण तसं कुणी बनवायच नाही. मग त्याने ती भाजी खाणंच सोडलं. आज तीच भाजी बनवायची तिने मनाशी पक्के ठरवले. आता पुढे.... अनिकेत ऑफिसमधून घरी येत होता ,रस्त्यात बार लागतो तिथे त्याने जरावेळ गाडी थांबवली, पण ...Read More
ऋतू बदलत जाती... - भाग..13
"ठीक आहे ..मी बोलतो विशालशी..."क्रिश. " त्या पेक्षा एक करशील का..?? उद्या तू मला हॉस्पिटलमध्ये सोड.. मी तिथं सर्वांना करते ..काही ना काही तर ते एकमेकांशी बोलतीलच..."शांभवी. "हम हे ठीक राहील..."क्रिश. ***** आता पुढे.... सर आज सावीला मी तिच्या रूम मध्ये झोपवू का..?? मी ही तिच्याजवळच थांबेल रात्रभर.." अनिकेत हॉलमध्ये रात्री न्यूज पेपर चाळत होता, तर महेशी त्याला विचारायला आली. "तुम्हाला असं वाटतं का आजही मी ड्रिंक वगैरे करेल ते..." अनिकेतने पेपर घडी करून टीपॉयवर ठेवला. "नाही तुम्ही करूच नाही शकणार ..!! तुमच्या बेडरूममध्ये बॉटलच नाहीत..." महेशी थोडी ठसक्यात म्हणाली. "कोणी हटवल्या त्या बॉटल्स...??"अनिकेतच्या भुवया गोळा झाल्या. "मी.."महेशी. " ...Read More
ऋतू बदलत जाती... - भाग..14
ऋतू बदलत जाती...१४. त्याला आता स्वतःच्या वागण्याची लाज वाटत होती, एवढज बोलूनही महेशी किती प्रेमाने सावीला झोपवत आहे... नसेल तिचा कुठला स्वार्थ ..चांगल्या असतील त्या कदाचित मनाने ... म्हणून माझ्या सावीची काळजी असतील... आणि मला दुःखात बघू शकत नसतील म्हणून माझी काळजी घेत असतील ..."सॉरी महेशी.. मी तुमच्याविषयी चुकीचा विचार केला.." त्याने परत दरवाजा ओढून घेतला आणि वर निघून गेला. महेशीला कळलं होतं, की तो आला होता ते. पण तिने मागे वळून बघितलं नाही. ****** आता पुढे.... दुसऱ्या दिवशी सकाळी महेशीनेच मावशींच्या मदतीने नाश्ता बणवला.आज बटाट्याचे पराठे होते आणि गोड दही... पण आजचा नाश्ता ती वाढत नव्हती. ते सर्व ...Read More
ऋतू बदलत जाती... - भाग..15
ऋतू बदलत जाती....१५. " जाऊदे ..कुठे बोलू नकोस.. नाहीतर उगाच पोलीस स्टेशनच्या चकरा माराव्या लागतील.."दुसरा. पण त्या डॉक्टरांना कुठे होतं त्यांचं हे सर्व बोलणं शांभवीने ऐकलं होतं ...तिला त्या नाशिकच्या हॉस्पिटलचं नाव कळलं होतं.. आता बस तिला असे झाले होते की केव्हा क्रिश तिला घ्यायला येतो आणि केव्हा ती त्याला हे सर्व सांगते. ************ आता पुढे.... संध्याकाळी चार वाजेच्या जवळपास अदिती आणि क्रिश गच्चीवर गप्पा मारत होते ,आता दोघे बर्यापैकी एकमेकांशी मोकळे बोलत असत. "क्रिश आता मला इथे हे असं रहायला बर वाटतं नाही.. निघून जावं परत ..पण महेशी साठी थांबलेय..."अदीती. "हा मलाही थोडं वेगळं वाटतं ..म्हणजे बघ ना ...Read More
ऋतू बदलत जाती... - भाग..16
ऋतू बदलत जाती....१६ "अच्छा.. ठीक आहे " तो बाहेर गेला पण दरवाजाच्या बाहेरच थांबला .दहा एक मिनिटे तो तिथेच मग त्याने त्याचा मोबाईल उघडला. " हाय राधा.. झोपलीस का? मला झोप नाही येत.. गप्पा मारायच्या का ..??"अनिकेतने मेसेज टाईप केला आणि तो सावीच्या दरवाज्याजवळ उभा राहून पाठवला . बरोबर त्याच वेळी सावीच्या रूममध्ये एक मेसेज टोन वाजली. त्याचं काळीज क्षणभर थांबलं..... आता पुढे..... अनिकेतने त्याचा मोबाईल आधीच सायलेंट करून ठेवलेला होता. "अनिकेतने आज मला राधा म्हणून हाक मारली..?? नाही कदाचित भास असेल माझा.... नेहमी माझं त्यांच्यासोबत राधा नावानेच संभाषण होतं ना म्हणून...... कदाचित काय ..भासच असेल... तेवढ्यात तिच्या मोबाईलची ...Read More
ऋतू बदलत जाती... - भाग..17
ऋतू बदलत जाती....१७. "नाही...ते.. डॉक्टर निघून जातील.."त्याने सावीला कडेवर घेतले . ""अदीती तु पण चल...."महेशी. "अगं तिला कशाला....तिला काम ना राहूदे तिला.."अदीती पाय पुढे टाकतचं होती कि अनिकेत महेशीचा हात पकडून तिला बाहेर घेवून आला. आता पुढे... त्याने महेशीला हाताने धरूनच गाडीत बसवले. क्रिश मागून पळत आला ,अनिकेतला वाटलं की हा म्हणतो की काय मला पण येऊ द्या म्हणून .....वेडा अनिकेत घाईघाईने गाडी सुरु करू लागला. "अनिकेत आहो ..थांबा.. क्रिश कडे सावीची फाइल आहे ती तर घेऊ द्या..."महेशी. "ओ तर .क्रिश फाईल द्यायला आला होता का..?" त्याने गाडी थांबवली. महेशी त्याच्याकडे विचित्र नजरेने बघत होती ,तो आज थोडा वेगळाच ...Read More
ऋतू बदलत जाती... - भाग..18
ऋतू बदलत जाती...१८. "नाही ती नॉर्मल वाटतेय..पण तु असं का विचारतेस..??"क्रिश गोंधळला. . "हुश्श..!!"महेशीने मनातच देवाचे आभार मानले बरं शांभवीला काही दिसले नाही ते... पण शांभवी ने या दोघांची कुसूरफुसूर ऐकली होती तिने हळूच नजर उंचावून वर अनिकेतच्या रूमकडे बघितले आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हसू उमटले. *********** आता पुढे... "हा विशाल मी येतोच..."क्रिश. क्रिशला विशालचा फोन आलेला. "हे क्रिश कुठे जातोय ... " शांभवीने त्याला अडवले. "पुलीस स्टेशन...."क्रिश. "हम्म चल मी पण येते.."शांभवी. "काल महेशी तुला काय विचारत होती..?"शांभवी. "तुझ लक्ष होतं तर.." क्रिश गाडी चालवत चालवत तिच्याशी बोलत होता. "अनिकेतला समजले आहे महेशीच राधा आहे ते..."शांभवी. "काय ...Read More
ऋतू बदलत जाती... - भाग..19
ऋतू बदलत जाती....१९.. "मॅडम ..मॅडम.. मी सांगतो मला काही करू नका त्यांनी माझ्या फँमिलीला कोंडून ठेवलय कुठेतरी ..."ड्रायव्हर. "तू नाव सांग.. आम्ही त्यांना सेफली सोडवू.. माणूसकी तू जरी विसरला असला तरी आम्ही विसरणार नाही..."क्रिश. त्याने विशालला त्या माणसांची नावे सांगितली. ******** आता पुढे... सकाळपासून महेशी अनिकेतला टाळत होती. नाश्ताही तिने मावशींच्या हाती त्याला दिला.. ती जिथे जात होती, तो बोलण्यासाठी तिच्या मागे तिथे येत होता .पण ती त्याला एकटी भेटत नव्हतीआणि घरात बरीच माणसं असल्यामुळे त्याला नीट तिच्याशी बोलता येत नव्हते. नाश्ता झाल्यावर तो ऑफिसला जायला निघाला तेव्हा त्याला महेशी सावीच्या रूममध्ये सावीला तयार करताना दिसली. "अरे वा माझी ...Read More
ऋतू बदलत जाती... - भाग..20
ऋतू बदलत जाती....२० "माल तर गेला आता आपला जीव कसा वाचवायचा ते सांग... "स्टॉक किपर. " तुला आपल्या जीवाची माल त्याच्या जागेवर नाही पोहोचला तर... तो भाऊ पुरं खानदान संपवेल.. ईकडे फाशी टाळू शकतो...तिकडे नाही..... काहीही करून तो माल मिळवावा लागेल..."मानमोडे. ******** आता पुढे.... महेशी शी बोलून क्रिश सावीच्या रूम मध्ये गेला. सावी बेडवर झोपली होती. क्रिश ने सावीच्या डोक्यावरून हात फिरवला, तिच्या माथ्यावर ओठ टेकवले .त्याचे डोळे भरून आले होते, डोळ्यात खुप सारे प्रेम साठवून तो फक्त तिला बघत होता. " क्रिश काय झालं ...?"मागून महेशी त्याच्या हालचाली टिपत होती. "महु ..बघ ना... किती गोड दिसते ही झोपल्यावर ...Read More
ऋतू बदलत जाती... - भाग..21
ऋतू बदलत जाती....२१ "शांभवीची इच्छा... मी राधा शी लग्न.. मी राधा शी लग्न..." आता त्याला खूप चढली होती, झोप डोळ्यात आली होती.. तसा सोफ्यावर तो आडवा झाला .शांभवीने एक उसासा सोडला. तिने त्याच्या केसातून हात फिरवला , त्याचे पाय सरळ करून क्रिश च्या रूम मध्ये निघून आली. तिने परत क्रिशच्या शरीराबाहेर निघण्याचा प्रयत्न केला. तिने आधी डोकं बाहेर काढले ...आणि ह्यावेळेला तिला ते जमलंही ती क्रिशच्या शरीराबाहेर निघालेली होती.... ************ आता पुढे... सकाळी अनिकेतला जाग आली, उठून बघतो तर जवळपास नऊ वाजलेले होते. तो खाडकन सोफ्यावरून उठला आणि लगेच फ्रेश होऊन , पोलीस स्टेशनला जायला निघाला, त्याने नाश्ता केला ...Read More
ऋतू बदलत जाती... - भाग..22
ऋतू बदलत जाती....२२ "अहो सर ...आपलं फक्त बघायचं ठरलं होतं ....आता बघून झालं असेल तर करता का इन्स्पेक्टर विशाल फोन....??"मानमोडे. "काय पाहिजे आहे तुम्हाला ..??"अनिकेत. "माहिती नाही का सर... का उगाच वेड्याचं सोंग घेत आहात.... त्या इन्स्पेक्टर विशाल ला कॉल करा मी सांगतो तसं सांगा..."मानमोडे. ****** आता पुढे... "कुणाला काही फोन करायची गरज नाही ....विशाल तुमचा माल घेऊन येतच आहे...." क्रिश दारातून आत येत बोलला. क्रिशने शांभवीला इशारा केला. शांभवी मानमोडे च्या मागे गेली. तिला मानमोडे च्या अंगात शिरायचं होतं. त्या नीच आणि नालायक माणसाच्या अंगात शिरायला तिलाही किळस येत होती ... तरीही ती मानमोडेच्या अंगात शिरण्यासाठी प्रयत्न करत ...Read More
ऋतू बदलत जाती... - भाग..23
ऋतू बदलत जाती....२३. तसा अनिकेत हे पुढे सरसावला, त्याने तिच्या हाताला पकडले. भरलेल्या डोळ्यांनी त्याने मानेनेच तिला नाही सांगितले.. डोळ्यातले अश्रु बघून शांभवी शांत झाली, हळूच ती खाली जमिनीवर उतरली... "अनि... "त्याला बघून तिचेही डोळे भरून आले होते... तिने हाताने त्याच्या चेहऱ्यावर गोंजारले .. त्याने थोडे स्मित झळकवत मानेने होकार दिला... आणि दुसर्याच क्षणी ती त्याच्या मिठीत गेली. ******* आता पुढे.... महेशीने खाली मान घातली आणि ती आत निघून गेली. "अनिकेतssss.. शांभवी sss ! " क्रिश ने दोघांना आवाज देऊन भानावर आणलं. शांभवीची नजर परत त्या दोघांवर गेली.. दोघं रक्ताने लटपट तिथेच जमिनीवर अंगाची वळकुटी करून बसले होते...शांभवीची नजर ...Read More
ऋतू बदलत जाती... - भाग..24
ऋतू बदलत जाती...२४.आजींनाही वाटत होतं की अनिकेत आणि शांभवी ला जरा वेळ देऊ या... म्हणून त्याही त्यांच्या रुममध्ये निघुन रूम मध्ये शांभवी ,अनिकेत आणि झोपलेली सावीच होती.आता पुढे.... दोघांनाही काय बोलावं ते कळत नव्हतं, सांगायचं तर भरपूर होतं.. दोघं फक्त एकमेकांकडे बघून स्मित देत होते. दहा-पंधरा मिनिटे फक्त एकमेकांकडे मनभरून बघितल्यावर अखेर शांभवीनेच चुप्पी तोडली . "खूप त्रास झाला असेल ना...?? मी नसताना.. माझ्या सावीला...."शांभवी. " फक्त तुझ्या सावीला नाही... मलाही... !..जगावं अस वाटतच नव्हतं ...........फक्त सावीसाठी जिवंत होतो....शांभवी ..!! आता तू मला सोडून कुठेच जाणार नाही ना..??"अनिकेत " अनि ...हे बघा ..! मला हातात वस्तू पकडता येतात.. मी ...Read More
ऋतू बदलत जाती... - भाग..25 - अंतिम.
ऋतू बदलत जाती...२५."शांभवी..!! काय बोलतेस तु हे..?? हे बाबा कोण आहेत ..??..अनिकेतच्या कानावर महेशी आणि अनिकेत चा विवाह हे चे शब्द गेलेले होते. "अनि मी तुम्हाला सर्व सांगते.. आधी आपण बाबांना आत बोलवू... त्यांचा आशीर्वाद घेऊ...."शांभवी आता पुढे.... "नाही बेटा... मी आत येत नाही.. पण माझा आशीर्वाद नेहमी तुमच्या तिघांच्या पाठीशी आहे.."बाबा. दोघांनी बाबांना नमस्कार केला ,डोळे उघडले तर बाबा समोर नव्हते.बाबा गेट बाहेर पडले असतील म्हणून अनिकेत तिकडे गेला, पण त्याला गेटबाहेर ते कुठेच आढळले नाहीत.तो परत आला. "शांभवी हे बाबा कोण होते ?? ते इथे का आले होते..??ते कुठे गायब झाले....आणि तुझी आग शांत झाली का...??..... तु ...Read More