गुंतागुंत

(12)
  • 26.4k
  • 4
  • 13.1k

नारायण रघुनाथ मोकाशी. पुण्यातल्या एका सहकारी बँकेत ऑफिसर. नेहमी प्रमाणे सकाळची धावपळ सुरू होती. बँकेत वेळेवर जायची घाई होती. अशातच डबा भरता, भरता करुणाला, म्हणजे नारायणच्या बायकोला जरा अस्वस्थ वाटायला लागलं. छातीची धडधड खूप वाढून गेली. शरीराला घाम सुटला होता. तशातच तिने कसाबसा डबा भरून नारायणला दिला. नारायणने तिच्याकडे पाहीलं आणि त्याला धक्काच बसला. “अग काय होतयं तुला ? चेहरा कसा विचित्र झालाय. घाम पण खूप आलाय. तू ताबडतोब आडवी पड.” तिला झोपवल्यावर त्यांनी बँकेत फोन केला, वरिष्ठांना परिस्थिती सांगून आज येत नाही अस म्हणाला. मग त्यांच्या नेहमीच्या रिक्षावाल्याला फोन करून बोलावून घेतलं आणि दवाखान्यात पोचले. तिथे BP चेक केल्यावर ECG काढला. पल्स रेट खूप वाढून गेला होता. तिला डॉक्टरांनी लगेच ICU मध्ये शिफ्ट केलं. “मोकाशी, ECG बघितल्यावर अस दिसतंय की तुमच्या बायकोला हार्ट अटॅक येऊन गेला आहे. पण आता काळजी करू नका. तुम्ही अगदी वेळेवर इथे आणलंत. थोडा उशीर केला असता तर मात्र कठीण होत. त्या आता ICU मध्ये आहेत. आम्ही सर्व काळजी घेऊ. She will be fine.” डॉक्टर म्हणाले.

Full Novel

1

गुंतागुंत भाग १

गुंतागुंत भाग १ नारायण रघुनाथ मोकाशी. पुण्यातल्या एका सहकारी बँकेत ऑफिसर. नेहमी प्रमाणे सकाळची धावपळ सुरू होती. बँकेत जायची घाई होती. अशातच डबा भरता, भरता करुणाला, म्हणजे नारायणच्या बायकोला जरा अस्वस्थ वाटायला लागलं. छातीची धडधड खूप वाढून गेली. शरीराला घाम सुटला होता. तशातच तिने कसाबसा डबा भरून नारायणला दिला. नारायणने तिच्याकडे पाहीलं आणि त्याला धक्काच बसला. “अग काय होतयं तुला ? चेहरा कसा विचित्र झालाय. घाम पण खूप आलाय. तू ताबडतोब आडवी पड.” तिला झोपवल्यावर त्यांनी बँकेत फोन केला, वरिष्ठांना परिस्थिती सांगून आज येत नाही अस म्हणाला. मग त्यांच्या नेहमीच्या रिक्षावाल्याला फोन करून बोलावून घेतलं आणि दवाखान्यात पोचले. ...Read More

2

गुंतागुंत भाग २

गुंतागुंत भाग २ भाग १ वरून पुढे वाचा......... पुण्याच्या डॉक्टरांनी नारायण ला बोलावून विचारलं की “आम्ही शेवटचा उपाय शॉक ट्रीटमेंट द्यायचं ठरवलं आहे. तुमची काही हरकत आहे का ?” नारायण नी होकार दिला आणि डॉक्टरांनी पहिला शॉक दिला. छातीवर प्रेस आणि रीलीज करत तोंडाने एक दो तीन अस म्हणत होते. करूणांवर काही परिणाम झाला नाही तेंव्हा थोडा जास्ती पॉवर चा शॉक देऊन झाल्यावर डॉक्टर प्रेस आणि रीलीज करत असतांना तिथेच उभ्या असलेल्या यमदूताने तिच्या शरीरात प्राण फुंकला. करुणा थोडी खोकली आणि तिचा श्वास सुरू झाला. मॉनिटर पुन्हा जीवंत झाला. VITAL SIGNS मध्ये झपाट्याने सुधार दिसायला लागला. डॉक्टरांनी नि:श्वास ...Read More

3

गुंतागुंत भाग ३ (अंतिम)

गुंतागुंत भाग ३ (अंतिम ) भाग २ वरून पुढे वाचा .......... करूणाला सकाळीच जाग आली. आता तिला फ्रेश वाटत ती उठून बसली. समोरच्या सोफ्यावर संजय झोपला होता. हा माणूस इथे का झोपला होता ? डॉक्टर म्हणाला होते की हा त्यांचा सहकारी आहे म्हणून. पण हा माझ्या खोलीत का झोपला आहे ? आणि नारायणराव कुठे आहेत ? खरं तर त्यांनीच इथे असायला हवं होतं. ती खोलीच्या बाहेर आली. समोरच सिस्टर लोकांचं डेस्क होतं. “सिस्टर माझ्या खोलीत कोण माणूस झोपला आहे ? असा कसा तो इथे आला ?” करुणाने तक्रार केली. सिस्टर चक्रावून गेली. ती खोलीमध्ये धावली. “अहो मॅडम हे तुमचे ...Read More